शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

मोदी आणि टॉयलेट्स

मोदीनी आमच्या टॉयलेटची कॉपी मारली म्हणून सर्वत्र बोंबा मारणे सुरु आहे. काही महिन्यापुर्वी आमच्या जयरामनानी विनोदाने श्रीरामची खिल्ली उडवत अयोध्येच्या मंदीरावरुन टोमणा मारला होता की मंदीरांपेक्षा टॉयलेटं बनवा... नालायक मोदीला टोमण्याचा अर्थ कळला नाही व त्यानी चक्क टॉयलेटला अत्यंत महत्वाची चीज समजून पळवून नेले. आमच्याकडे बरेच टॉयलेट्स असल्यामुळे तशी अडचण झाली नाही. पण मोदी मात्र लै हुश्शार... त्यानी टॉयलेटचा वापर नियोजित विधीसाठी केलाच नाही. टॉयलेट्सच्या टोमण्याला उत्तर देताना तीच चिज राजकीय भांडवल म्हणून वापरली. या भांडवाच्या बडावर अनेक भांडवलदाराना मात देण्याचा एकुण डाव तयार केलेला दिसतो. हे गुज्जू लोकं कशाचही भांडवलात रुपांतर करु शकतात याचा हा ताजा नमूना आहे. अन कॉंग्रेस मध्ये बसलेले अनेक अब्जाधीश भांडवलदारांचे मात्र या नव्या भांडवलामुळे भंबेरे उडाले. टॉयलेट नावाचं नवीन भांडवल बाजारात आलं हे त्या अब्जाधिशाना कळायच्या आत मोदीनी राजकारणाच्या बाजारात गुंतवलं देखील. आता भांडवल गुंतवलं म्हटल्यावर त्यावरील लांभाश मिळणे आलेच. हृदयाकडचा मार्ग पोटातून जातो म्हणतात तसं आता पंतप्रधानपदाचा मार्ग टॉयलेटातून जाणार असे दिसते. ज्या टॉयलेट्सना आजवर राजकारणात काडीचेही महत्व नव्हते त्याचं मोल मोदी स्पर्शामुळे रातोरात कैकपट्टीने वाढून गेलं. गुज्जूभाईचा हात लागल्या लागल्या टॉयलेट्स मध्ये कमालीचे मुल्यवर्धन होऊन ते आता चक्क पुढच्या निवडणूकीत भारताचा पंतप्रधान ठरविण्याचं साधन बनलं. २०१४ च्या निवडणूकीत भाजप व कॉंग्रेसवाले टॉयलेट टॉयलेट खेळणार असे दिसते... असो.
... तर आता प्रकरणावर थोंड थंड डोक्याणी विचार करु या. टॉयलेट बनविण्याचं कॉंग्रेस पक्षानी पेटंट घेतलं आहे का? अजिबात नाही. म्हणजे भारतातील कोणताही नागरीक कोणासाठीही टॉयलेट बनवू शकतो. मग जर मोदी म्हणत असेल की टॉयलेट्स बनले पाहिजे... अन कॉंग्रेसलाही हेच वाटत होते व आहे तर मोदीची भुमिका कॉंग्रेसला पुरक नाही का? त्याच्याही पलिकडे जाऊन टॉयलेट्स बनविल्यामुळे आपल्या आया-बहिणींची सोय होणार असेल तर त्यात वाईट काय? चांगल्या गोष्टीचं आम्ही कधीतरी स्वागत करणार आहोत की नाही? कॉंग्रेसनी ही संकल्पना आधी मांडली त्यामुळे त्यांचं कौतूकच. पण जर का मागून येऊन मोदी म्हणत असेल की मलाही या विधायक कार्याचा भाग बनायचा आहे व देशातील स्वच्छतेत जमेल तेवढं योगदान द्यायचं आहे... तर आपण सगळ्यानी मोदींचं स्वागतच केलं पाहिजे. सध्या मिडीया व कॉंग्रेस वाल्यांचा अजुन एक युक्तीवाद असा आहे की "मोदीनी कॉपी मारली..." ठीक आहे, मारली तर मारली. चांगल्या कामासाठी मारली. तुम्ही जे करणार तेच मोदीही करणार... म्हणजे ही टॉयलेट मोहीम वेग घेणार... त्यातून आपलचं भलं होणार. खेड्या पाड्यात उघड्यावर बसणा-या बायकांची सोय होणार... मग अशा कॉप्या स्वागतार्ह नाही का? 
अजुन एक गोष्ट आहे... संत गाडागेबाबा नावाचे महान समाजसेवी आपल्या देशात होऊन गेले. तुमच्या जयरामच्या कित्येक वर्षा आधी त्यानी स्वच्छता मोहीम राबविली होती. आरोप करायचाच म्हटल्यास  कॉंग्रेसनी गाडगेबाबांची कॉपी केली असेही म्हणता येईल... तुमच्या प्रत्येक कार्याची प्रेरणा भुतकाळातील घटनात शोधता येईल व तुमच्यावर कॉपी पेस्टचा अरोपही ठेवता येईल. मोदीवर कॉपीचा अरोप करण्यापेक्षा त्यानी आधीची ताठर भुमिका बदलत जर नवी भुमिका स्विकारली असेल तर त्याचं स्वागत करा... अन त्या भुमिकेतून समाजाच हित साधत असेल तर नक्कीच करा. काहिंचं हे ही म्हणनं आहे की जयराम बोलले तेंव्हा हेच भगवे केकटत हिंडायचे... आता का नाही केकटत? त्यावर मी म्हणेन अरे चांगलं झालं. त्यांच्याच घरात कोणीतरी असा निघाला जो त्यांची जुनी मुल्ये नाकारुन मंदीरा ऐवजी टॉयलेट्सचा विचार करु लागला आहे. उलट या भुमिके बद्दल व नवे मुल्य स्विकारल्या बद्दल आपण सर्वानी त्यांचे आभार मानले पहिजे. राजकारणाचे निमित्त का असेना.. पण त्यामुळे समाजाला मारक असलेली भुमिका सोडली जात असेल व तारक अशी नवी मुल्ये स्विकारली जात असतील तर ती भुमिका नेहमी स्वागतार्हच असायला हवी. 
राहिला प्रश्न पंतप्रधान बनण्याचा... ते २०१४ मध्ये जनता ठरवेल. पण आरोप प्रत्यारोप करताना थोडं तारतम्य मिडीयानीही बाळगावा नि थोडं कॉंग्रेसनेही!!!

जयभीम
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा