मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

आता येणार हुकुमी एक्का...!

नुकत्याच झालेल्या निवडणूका व कॉंग्रेसचा पराजय यावर सध्या सर्वत्र चर्चा झडत असून २०१४ मध्ये काय होणार याचा हा ट्रेलर होता वगैरे बाता चालू आहेत. कॉंग्रेस नेतृत्वानेही जनतेचा कौल स्विकारत आत्मचिंतनाची वाट धरली आहे. त्याच बरोबर राहुल गांधीच्या नेतृत्वावर अनेकानी तोंडसुख घेतले असून कित्येकांच्या सुप्त भावनाना या निमित्याने वाट मोकळी करता आली... खास करुन पक्षातल्या राहूल विरोधकाना...!!!
या पराजयामागे मुख्यत्वे दोन प्रकारच्या चर्चा होताना दिसत आहेत. एक म्हणजे हा मोदीचा विजय असून मोदी फॅक्टर प्रचंड प्रभावी ठरला वगैरे माननारी अर्ध्या हळकुंडाची काही मोदीछाप लोकं अतिरंजीत गप्पा हाणताना दिसत आहेत. अन दुसरा मतप्रवाह मात्र हा कॉंग्रेसच्या बेफिकीरीमुळे जनतेने व्यक्त केलेला रोस आहे असे प्रांजळपणे मान्य करतो.  दोन्ही मतप्रवाहाची चाचपणी केल्यास मोदी प्रभाव हा बनावटी व लबाड प्रचार असून कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे हा विरोधात जाणार कौल मिळाला हेच सिद्ध होते.
याचा अर्थ काय?
लोकाना मोदी हवा हा प्रश्नच निकाली निघतो. कारण लोकाना मोदीमध्ये पोटेन्शीअल वगैरे असे काही दिसत नसून कॉंग्रेसनी आपली जबाबदारी बजावताना उदासीनता बाळगली एवढाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे लोकाना मोदी हवा आहे असे अजिबात होत नाही... तर उलट कॉंग्रेसनी यातून धडा घेत उदासीनता झटकुन टाकत अधीक जबाबदारीने काम करावे हा संकेत मतदारानी दिला आहे. तो कॉंग्रेसलाही कळाला असून आता तशी पावलं उचलल्या जातीलच. मायबाप मतदारानी दिलेला ईशारा जरा कडक होता हे मान्यच... पण याचा अर्थ अजिबात असा होत नाही की त्याना मोदी हवा आहे. उलट दिल्लीतील भाजपाला मिळालेल्या मतदानात मागच्या पेक्षा या वेळी एक टक्क्याने घट झाली आहे. मोदीनी जिथे जंगी सभा घेतल्या तिथे मतदारानी मोदीला साफ नाकारले असून मतदानातून ते दाखवून दिले आहे. याचाच अर्थ मोदीच्या नावानी उठविलेले वादळ ही माध्यमांची करामत असून सामान्यांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. आपला मतदार सुज्ञ आहे...!
आता दुसरा प्रश्न असा की राहुलबाबाच्या नेतृत्वाचे काय?
मुळात ही हार नेतृत्वाची नसून कर्तूत्वाच्या अभावामुळे झाली हे जाहीर आहे. राहूल बाबाला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे राहुलच्या नेतृत्वावर व त्याच्या संगठण कौशल्यावर प्रश्नच उठत नाही. काही मोदीछाप लोकं अनेक शेरेबाजी करत असतात पण त्याला उपाय नाही. ते विरोधकांचे कामच आहे. त्यानी भाजपाची दिल्लीतील घटलेली लोकप्रियता व मतदान कसे वाढवता येईल यावर लक्षा दिल्यास जास्त बरे. न दिल्यास आहे तेही हातचे जाईल एवढे मात्र नक्की...
सेमिफायनल नावाचा हा कल्ला उठविताना सामान्य माणुस गोंधळून जाईल अशी खेळी मिडीयानेही खेळून घेतली. यात मोदीवर स्तूतीसुमनांचा वर्षाव करताना राहुलच्या नेतृत्वावर हमखास हल्ला चढविला गेला. मोदीचा विकास नि प्रगल्भता वगैरे वल्गना करताना राहुलवर हमखास अपरिपक्वतेचा ठसा मारायला कोणीच विसरले नाहीत. राहुल गांधीचे नेतृत्व कसे कुचकामी वगैरे सांगत आता कॉंग्रेस संपणारच इथपर्यंत चकाट्या पिटून झाल्य़ा. कॉंग्रेसकडे राहूल ब्रिगेड म्हणून जी तरुणांची एक नवी फडी उभी आहे ती अत्यंत कार्यक्षम असून येत्या काळात एक नवा झंझावात उभा होणार या भितीपोटी भाजप नि विरोधक माईंडगेम खेळत आहेत हे त्याचे खरे कारण आहे. सेमिफायन जर कुणाला  फायद्याचं ठरलं असेल तर ते कॉंग्रेसलाच. कारण यातून चौदाची आखणी काय व कशी असावी याची नेमकी दिशा अधोरेखीत झाली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी ती आखणी करतीलच. पण मला मात्र राहुल ब्रिगेडमध्ये एका नवा चेहरा येताना दिसतोय, तो म्हणजे प्रियंका गांधीचा. २०१४ मध्ये जे काही बदल होतील त्यातला एक बदल म्हणजे प्रियंकाचे आगमन हे असावे. सध्याची परिस्थीती पाहाता प्रियंकाच्या आगमनाने प्रचंड उलथापालथ होईल. तिकडे मोदीच्या सभा (ज्या नुसत्याच गाजतात) जशा प्रचंड ओसंडून वाहतात त्या तोडीच्या सभा उभ्या करायच्या असल्यास प्रियंका आलीच पाहिजे. कॉंग्रेसनी एवढी हुशारी नक्कीच दाखवावी... किंबहुना तसा निर्णय झालाही असेल. नव्या पिढीची, नव्या दमाची राहुल ब्रिगेड सज्ज आहेच... पण जोडील प्रियंका उतरल्यास २०१४ चे रण खरे रंगणार...!!!
कॉंग्रेस पक्ष त्यांचा आजवर न वापरला हुकूमी एक्का ’प्रियंका’ला आता बाहेर काढणार  का? ते लवकरच  कळेल.

४ टिप्पण्या:

 1. "कॉंग्रेस शिवाय देशाला पर्यायच नाही" या तुमच्या मानसिकतेतून हे लेखन झाले आहे. नेहमीसारखे उस्फुर्त आणि सडेतोड वाटत नाही.
  कॉंग्रेसला जनाधार हवा असेल तर आता गांधी घराणे सोडून दुसरे नेतृत्व त्यांनी स्वीकारायला किंवा तयार करायला हवे .

  उत्तर द्याहटवा
 2. Nothing more expected from you. But why you comment only on Delhi? rajasthan, MP and Chattisgarh have also voted in favor of BJP. Also, did you check what was percentage of votes Congress got where your favorite Rahul Gandhi had his rallies? What did your Rahul brigade did in these 3 states? Or you dont want to speak about that as it is not confortable for you to agree that your rahul Gandhi failed?

  उत्तर द्याहटवा
 3. तुमचे प्रियांका बद्दलचे मत हा जातीयवादाचा उत्तम नमुना आहे म्हटले तर वावगे ठरू नये.
  "जन्माने..." हाच केवळ criteria लावणे म्हणजे जातीयावादच!

  उत्तर द्याहटवा
 4. आज ब्लॉग उघडून पाहिला तर हा लेख वर आलेला दिसला. म्हणजे खूप सारी लोकं काल-आज मध्ये हा लेख वाचत आहेत. म्हणजे कोण्यातरी फेबू गृपवर शेअर करुन चर्चा झडत असाव्यात म्हणून हा लेख वर आलेला दिसतोय.
  खरच प्रियांकाला न आणून कॉंग्रेसनी चूक केली असून त्यामुळे पक्षाचा किती मानहानिकारक पराजय होत आहे ते दिसतच आहे. त्याच बरोबर नरेंद्र मोदी नुसताच बोलतो फारसा काही करत नाही हे सुद्धा सिद्ध झाले आहे. या सगळ्यात कॉंग्रेस मात्र आज नेमकी काय स्थान राखून आहे हे कळत नाहीये.
  मागिल चार वर्षात राहूल गांधीने स्वत:च्या वर्तनातून तो नेतृत्व बनू शकत नाही यावर शिक्का मोर्तब केले आहे. मोदीनीही भगव्यांच्यापुढे आपले फारसे चालत नसून हिंदूत्ववाद्यांना आवर घालण्यात अपयश स्विकारले आहे. एकूण परिस्थीती पाहता राहूल तर नेतृत्व म्हणून बादच आहे, पण मोदीही नापास सिद्ध होत आहे.
  या नव्या पोकळीला भरुन काढण्याची कुवत फक्त कॉंग्रेस बाळगतो पण त्यासाठी डावपेच नि नेतृत्व बदल यात कॉंगेसनी स्वताचा आत्मघात करुन घेतला आहे. त्यामुळे पुढे कोण बाजी मारेल हे नक्की नसले तरी मोदीची विश्वासार्हता गेली असून कॉंग्रेस मरगळ झटकायला तयार नाही.

  उत्तर द्याहटवा