सोमवार, २७ जानेवारी, २०१४

हायकमांडशाहीचे निर्मूलन!

बाबासाहेबानी अनेक देशांचे संविधान अभ्यासून शेवटी आपल्या देशाला संसदीय लोकशाही बहाल केली. व्यक्तीसापेक्ष राजकारण टाळण्यासाठी नि नेतृत्वाचा समतोल राखण्यासाठी म्हणून ही संसदीय लोकशाही निवडल्या गेली. जगातील बलाढ्य समजल्या जाणा-या अमेरीकेतही लोकशाही आहे, पण  ती अध्यक्षीय लोकशाही असून थेट मतदाराद्वारे अध्यक्ष निवडला जातो. तिकडे ही लोकशाही यशस्वी झाली पण ती भारतात होणार नाही याची बाबासाहेबाना खात्री होती. बाबासाहेबानी ही अध्यक्षीय लोकशाही नाकारण्याचे कारण  म्हणजे अध्यक्षीय प्रणालीत जनसामान्यातून नेतृत्व उदयास येण्यापेक्षा भांड्वलदार-बनीया किंवा सामाजीक व धार्मिक दबदबा असणारी व्यक्ती निवडूण येईल अशी भिती होती. ६५०० जातीत विभागलेल्या या देशात ही अध्यक्षीय प्रणाली समाजाला मारक ठरेल व मागास नि अल्पसंख्यांकांचे नेतृत्व कधीच उभे राहणार नाही हे बाबासाहेबानी हेरले. थोडक्यात अध्यक्षीय लोकशाही प्रणालीतून व्यक्तीसापेक्ष राजकारण बळकट होत जाऊन तळागळातल्यांचं प्रतिनिधीत्व फाट्यावर मारल्या गेलं असतं. हे सगळं न होऊ देता नेतृत्वाचा समोतल साधायचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे संसदीय लोकशाही. म्हणून बाबासाहेबानी भारताला जो संविधान दिला तो संसदीय लोकशाहीचा. कारण संसदीय लोकशाहीत तळागळातून आलेल्या नेतृत्वाद्वारे पंतप्रधान निवडल्या जातो. एकंदरीत भारतातील संसदीय लोकशाही प्रणाली ही अनेक जातीत विभागलेल्या लोकांना एकसंध ठेवणार तसेच सत्ते प्रतिनिधीत्व देणार या उदात्त हेतूने स्विकारली गेली.
पण ही संसदीय लोकशाही पार नेहरुच्या काळातच राम म्हणाली व चालू झाली हायकमांड शासित लोकशाही. संसदेत निवडून गेलेला सांसद काय म्हणतो किंवा त्याला काय म्हणायचे आहे याला काडीचे महत्व नाही. पक्षाचे हायकमांड जे सांगतील संसदेत तेच पोपटाप्रमाणे बोलायचे एवढच त्या सांसदाना माहीत असतं. मागच्या पन्नास-साठ वर्षात ही हायकमांड पद्धती ईतकी खोल खोल रुजली सध्याचे खासदार हेच विसरले की संसदीय लोकशाही म्हणजे नेमकं का? हायकमांडनी सांगितलेली ड्यूटी संसदेत चोख बजावणे म्हणजेच संसदीय लोकशाही होय अशी प्रगाढ श्रद्धा असणारी ही पिढी आमच्या संसदीय लोकशाहीचे पार ठिक-या उडवत आहे. म्हणजे बाबासाहेबाना जे नको होतं, ते व्यक्ती सापेक्ष राजकारण आमच्या सगळ्यांच्या नकळत देशात कधीच रुजलं. नेतृत्व विभागणीची बाबासाहेबांची एकूण आयडीया पार धुडीस मिळाली असून हायकमांड नावाची व्यक्ती ही सांसदांच्या आडून राज्य करत असते. अन गंमत म्हणजे या हायकमांडवाल्या पद्धतीला आम्ही संसदीय लोकशाही म्हणतो. केवढा हा विनोद!
त्यापेक्षा थेट मतदाराद्वारे निवडल्या जाणारी अध्यक्षीय प्रणाली काय वाईट होती? उलट त्यामुळे अध्यक्षीय पदासाठी उमेदवार उभं करताना किमान कुवतीचा उमेदवार द्यावा लागला असता. त्यातून राष्ट्रहीत करण्याची जबाबदारीही अंगावर येऊन पडली असती.  सर्वोच्च पदावर असलेल्या माणसावर पक्षाच्या हायकमांडपेक्षा मतदाराचा धाक व नियंत्रण असतं.  जिथे मतदाराचा धाक असतो तिथे सुशासन अनिवार्य बनते. हायकमांडनी मुजोरी केल्यास मतदार काय करु शकतो हे सगळेच जाणून असल्यामूळे हायकमांड प्रणाली बाळसं धरतच नाही. पण अगदी याच्या उलट संसदीय प्रणालिनी किमान भारतात तरी धुधारी तलवारीचेच काम केले... एकिकडे लोकशाहीचा गळा कापला व मतदारांचा विश्वासही गमावला. 
जातीत व अल्पसंख्यांकात विभागलेले मतदार व्यापक दृष्टीकोनाच्या अभावातून आपल्याच जातीतल्या उमेदवाराला निवडून देऊ लागले. यातून राजकारण बिघडले तरी तळागळातल्याना प्रतिनिधीत्व मिळत गेले. एका अर्थान उपेक्षीताना  नेतृत्व देण्याचे  बाबासाहेबांचे स्वप्न ईथवर खरे झाल्याचे दिसते. पण हाच निवडून आलेला उमेदवार संसदेत मात्र हायकमांड्च्या निर्णयाला बांधील बनला. त्यामुळे संसदीय लोकशाहीचा मूळ उद्देशच उध्वस्थ झाला. वर वर पाहता जरी तळागळातले व अल्पसंख्यांकाचे प्रतिनिधी संसदेत दिसले तरी हे सगळे हायकमांडला बांधील. म्हणजे संसदीय प्रणालीच्या नावाने चालणारी ही हायकमांड प्रणीत हुकूमशाहीच झाली. आपण मात्र गपगुमान या हुकूमशाहीला संसदीय लोकशाही म्हणत मिरवत आहोत.  
चक्क अर्ध शतक उलटून गेल्यावर अचानक भाजपने मोदीला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला. या नंतर सर्वत्र प्रचंड बोंबाबोंब सुरु झाली. या सर्व बोंबाबोंबीत एक  तक्रारीचा सूर होता तो म्हणजे निवडणूकी आधी उमेदवार घोषीत करणे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. ही गोष्ट खरी आहे पण या रडीच्या सूरामागचा खरा उद्देश संविधानाचे संरक्षण नव्हतेच... तर खरं दुखणं हे होतं की या पद्धतीमुळे हायकमांड नावाची हुकूमशाही मोडीत निघणार आहे.   आता बुद्धीवाद्यांचा थयथयाट काही थांबता थांबेना...  आम्ही कसे संसदीय पद्धतीने पंतप्रधान निवडातो वगैरे बाता हाणत आहेत. पण प्रत्येक निर्णय हायकमांड घेत असून संसदेत आम्ही ज्याला कोणाला निवडून देतो ते  हायकमांडच्याच आदेशाने... हे  सांगायला मात्र पद्धतशीरपणे विसरतात.
नेहरु घराण्यानी सुरुवात केलेली ही हायकमांड पद्धती सर्वच्या सर्वच राजकारण्यानी कवटाळली. का बरं? वर्चस्ववाद नि सरंजामशाही वृत्ती ठासून ठासून भरलेले हे सगळे राजकारणी संसदीय पद्धतीचा स्विकार करणे अशक्य असून त्याना फक्त हुकूमशाहीतच स्वारस्य आहे.  त्यामुळे सर्व पक्षात ही हायकमांड संस्कृती रुजली, म्हणजे एका अर्थाने संसदीय लोकशाहीच्या तोंडाला काळं फासण्याचे काम राजकारण्यानी केले.
बाळासाहेब ठाकरे तर स्वत:चा उल्लेख रिमोट कंट्रोल असाच करत. म्हणजे ते खुल्लम खुल्ला सांगत की लोकशाहीच्या नावानी मी हायकमांडरुपी अनभिषीक्त राजा आहे. तिकडे दक्षीणेत एम. जी. आर., एन. टी. आर. पासून करुनानिधी व जयललीता पर्यंतचा सगळाच इतिहास हायकमांडांचा आहे. लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, मायावती, मोमता बॅनर्जी हे सगळे आपापल्या पक्षाचे हायकमांड असून संसदीय लोकशाहीला रोज हरताळ फासत असतात. आपल्या  महाराष्ट्रात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे सगळे हायकमांड पद्धतीनेच राजकारण करतात. 
वर उल्लेखित सर्वच्या सर्व पक्ष हे हायकमांड प्रणालीने चालणारे असून त्यांच्या पक्षातील आमदार-खासदार हे निवडूण दिलेल्या मतदारांचे प्रतिनिधी अजिबात नसून पक्षाच्या हायकमांडचे नोकर असतात. संसदेत जे काही बोलायचे नि करायचे ते केवळ हायकमांडच्या मर्जितलेच. मग त्या मर्जीत तुमच्या मतदाराच्या उत्कर्षाचा काही हिस्सा आला तर तुम्ही नशीबवान... नाहीतर मतदार गेला उडत. हायमांड बोले... वो फायनल! असं सगळं आहे.
बाबासाहेबाना संसदीय लोकशाहीतून जे साधायचे होते ते या हायकमांड शासित लोकशाहीनी हाणून पाडले. मग त्यातून मतदार राजकारणाप्रती उदासीन होत गेला. मग हळू हळू त्यानी मतदान करणेच सोडून दिले.  कारण आपण निवडून दिलेला प्रतिनिधी स्वत:चे हक्क नि अधिकार हायकमांडके गहाण टाकतो म्हटल्यावर लोकाना लोकप्रतिनिधी हा आधुनिक राजकारणातील गुलाम वाटू लागला.  मग हायकमांड कोणत्याही शेंबड्याला सत्तेब बसवू लागली. अगदी पंत असो, कोकणातला गुंड ना-या असो की आयाळ नसलेला सिंह असो.
संसदीय लोकशाहीमुळे दोन परिणाम झाले. नावाला जरी ही लोकशाही असली तरी एका हायकमांड द्वारे देश चालविल्या जाऊ लागला. म्हणजे हुकूमशाहीचे हे नवे वर्जन आम्हाला मिळाले. दुसरं या हायकमांड प्रणीत हुकूमशाहीमुळे मतदार उदासीन होत गेला व त्याने मतदानच करणे थांबविले.
आता मात्र नरेंद्र मोदीना पंत्रप्रधान पदाचा उमेदावर  घोषीत केल्यामुळे या संसदीय हुकूमशाहीला आव्हान मिळाले आहे. सामान्य मतदाराला त्याच्या मताचा थेट इंपॅक्ट पहायला आवडतो व त्यामुळे बहुतेक २०१४ मध्ये मतदानाचे प्रमाण वाढेल. हा लोकशाहीचा नवा वर्जन नवे पॅरामिटर सेट करेल की नाही हे निकाला नंतरच कळेल. पण त्यामुळे हायकमांड शासित संसदीय हुकूमशाहीला हादरे बसणार एवढं निश्चित. हायकमांडला स्वत:चे अधिकार कमी होताना पहावे लागेल. चांगला उमेदवार देणे एक अनिवार्य गोष्ट बनेल. राजकारणात स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला किंमत येईल. गुंड व मवाली उमेदवार पक्षाला भोवनार...

मोदी निवडून आल्यास विकास होईल की नाही सांगता येत नाही... पण हायकमांड संस्कृतीचा पाडाव नक्कीच सुरु होईल. कारण मतदानपुर्व पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव घोषीत करणे म्हणजे "हायकमांडशाहीला दिलेलं आव्हान होय." 

--जयभीम

सलग सत्तेतून येते बेफिकीरी!

कॉंग्रेसचं राज्य चांगलं की वाईट? जर असा प्रश्न विचारला तर सहज उत्तर देता येणार नाही पण चेकलिस्टवर कॉंग्रेसच्या एकूण राजकारणाची तपासणी केल्यास हल्लीचं बोकाळलेलं भ्रष्टाचार नि राजकरण्यांची उदासीनता पाहता कॉंग्रेसचं राज्य वाईटच म्हणावं लागेल. पण कॉंग्रेस नको तर मग कोण? असा प्रश्न लागूनच येतो व त्याचं उत्तर डाव्यांच्यांत असलेली वैचारीक विसंगती नि विस्खटलेलं नेतृत्व पाहता भाजप असेच म्हणावे लागेल.  पण भाजप म्हटल्यावर ठसठशीत उमटतं ते म्हणजे त्यानी आजवर जपलेलं हिंदुत्व. हे हिंदूत्व आहे तोवर भाजपच्या नावाने सामान्य माणूस दचकतच राहील. त्यातल्या त्यात दलित व मुस्लीम समाज तर भाजपाच्या सत्तेच्या निव्वड केल्पनेनी सुद्धा अस्वस्थ होतो. यामागे भाजपाची भगवी भुमिका कारणीभूत असून समाजाचं हे रिएक्शन नैसर्गिक आहे.  नरेंद्र मोदी काही असले तरी त्यांची विकास पुरुष म्हणून जी प्रतीमा आज निर्माण झाली आहे (मग ती मिडीयानी केली असली तरी)त्याला प्रतिउत्तर म्हणून तोडीचा नेता देण्यात कॉंग्रेसला अपयश आले हे सुद्धा तेवढच खर. राहूल गांधीचं सौम्य नि संयमी नेतृत्व तसं लोकाना भावलहीं असतं, पण कॉंग्रेसच्या पुढा-यानी सलग सत्तेतून आलेल्या बेफिकीरीतून, समाजकारण नि विकासाच्या प्रति पराकोटीची उदासीनता दाखवत जनसामान्याला कॉंग्रेसच्या प्रती उदासीन करुन सोडलं. आता ही उदासीनता  कॉंगेसला भोवनार एवढं नक्की. 
आजच्या या उदासीनतेच्या वातावरणात सौम्य नि संयत नेतृत्व म्हणजे राहूल गांधी हे कॉंगेसला मारकच ठरत असून विरोधी पक्षानी उभं केलेलं तडाखेबंद व आक्रमक नेतृत्व नव्या पिढीला तरी आकृष्ट करत आहे. अत्यंत गाफील बनलेल्या व सुस्तावलेल्या कॉंगेसच्या राजकारण्यांमुळे लोकाना आता आक्रमक नि तडाखेबंद नेतृत्व आजमावून पाहण्याची खुमखुमी झाली नाही तरच नवलं. तसं कॉंगेसचा पारंपारीक मतदार पक्का आहे. तो कधीच भाजप व इतराना मत देत नाही, पण नव्या दमानी मतदानकेंद्रावर धडकणारा तरुण ही आजवरची पारंपारीक समिकरणं बदलून टाकेल असं दिसतय.
२०१४ च्या निवडनूकांत भाजपनी सत्ता काबिज केली तरी फार काही दिवे लावणार नाही हे जाहीरच आहे पण त्यातून एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे यापुढे कॉंगेसपक्ष आपला आळस झटकून कामाला लागेल. पारंपारीक मतदारांच्या भरवश्यावर न बसता नव्या मतदारांचा नि बदलत्या समिकरणांचा अभ्यास करुन सुदृढ राजकराणाची सुरुवात करेल. आजवरचे आयतोबा व खायतोबांचे तिकट बाद करुन खरोखरच काम करणा-या कार्यकर्त्याना पक्षात महत्वाचे स्थान देणे सुरु होईल,(होईल का? न झाल्यास कॉंगेस संपणार एवढच!) यातून बाहुबली व घराणेशाहीलाही एका अर्थाने लगाम बसेल. 
परवा मिलिंद देवरा आपल्या मतदार संघात गेले तेंव्हा लोकानी अक्षरशा शिव्या हासडून देवराला पिटाळले. सगळ्यांचं म्हणनं हेच होतं की देवरा साहेब निवडून आल्यानंतर एकदाही आपल्या मतदार संघाकडे फिरकले नाहीत. मागच्या पाच वर्शात याना आपल्या मतदार संघाची साधी आठवणही झाली नव्हती नि आज निवडणूका तोंडावर आल्यावर हे थोबाड धरुन इकडॆ आले... वगैरे प्रचंड सुरु होतं. हे काय होतं? मतदारांचा राग होता. कशामुळे? तर सलग सत्तेतून त्यांचा नेता बेफिकीर बनल्यामुळे.  म्हणजे आता या नेत्याना यांची बेफिकीरी नडणार एवढं मात्र खरं. म्हणजे यांच्या विरोधात जो कोणी निवडून येईल तो लायक आहे म्हणून नाही तर सध्याच्या नेत्याच्या विरोधात होणा-या मतदानाचा तो परिणाम असेल. अगदी असचं जिथे जिथे खदखदणे सुरु आहे तिथे तिथे विरोधात मतदान होणार...
आजवरची गोष्ट निराळी होती. मतदार मुका, आंधळा, बहिरा होता.  जातीच्या नावानी मतदान करणारा होता व आजही आहेच. कॉंगेसच्या प्रती प्रचंड आदर बाळगणारा होता. हे सगळं खरं असलं तरी, दोन निवडणूकीत पाच वर्षाचा काळ लोटत असतो. या पाच वर्षाच्या काळात नव्या दमाचा मतदार उभा होत असतो. हा तरुण मतदार  कसा विचार करतो याचा विचार झालाच पाहिजे. सध्या मोदी नावाचं घोंगावणारं वादळ तरुणाना प्रचंड भुरळ घालत आहे. नव्याने होणारी मतदार नोंदणी लक्षणीय असून हा तरुण मतदार कॉंगेसच्या एकूण उदासीनतेपायी कंटाळलेला आहे. मोदीच्या नावानी दंगलखोर म्हणून कितीही खळे फोडले तरी तरुण मतदाराला भुतकाळाच्या भुताटकीत अडकवून ठेवणे अशक्य आहे. नव्या पिढीची मानसिकता वेगळी असून झालं गेलं विसरुन नवा प्रयोग अजमावयाला ती तयार असते. जुन्या जखमाना कवटाळून आयुष्य काढणारी पिढी संपत असून, जखमांवर समयसुचकतेची पट्टी बांधून नव्याने झेप घेणारी ही पिढी तौलनिकदृष्ट्या जास्त व्यवहारी आहे, प्रक्टीकल आहे.  अस्मिताचं दळण फार दिवस दळता येणार नाही एवढा बदल नक्कीच झाला आहे. तो होऊ नये असं वाटणारे राजकारणी निव्वड मुर्ख असून वेळीच त्यानी स्वत:ला नाही बदलं तर तरुण त्याना बदलणार ही गोष्ट अटळ आहे.
२०१४ मध्ये मोदी नावाचा प्रयोग अजमावण्यासाठी तरुण मतदार उत्सूक आहे तर या उत्सूकतेला एनकॅश करण्यासाठी भाजपही तेवढ्याच शिताफिनं फासे फेकतो आहे. त्यात तडाखेबंद मोदी समोर राहूल गांधी हे नेतृत्व कमी पडत आहे हे वेगळच दुखणं. वृत्तवाहिन्यांच्या चाचण्या सुद्धा भाजपचं पारडं जड असल्याचे समिकरण मांडत आहेत. एकूण वातावरण पाहता २०१४ मध्ये कुणाला बहुमत मिळॊ अथवा ना मिळॊ पण भाजपं सर्वात जास्त जागा मिळवेल असे चित्र आहे.

हे घडण्याचे कारण भाजपची ती लायकी आहे म्हणून नव्हे तर सलग सत्तेतून कॉंगेसमध्ये आलेल्या बेफिकीरीचा तो परिणाम असेल. 

-----
जयभीम

शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

कॉंग्रेसचं अस्तित्व भाजपमुळेच!

राजकीय पक्ष चालवायचे म्हटले की त्याच्यामागे थिंकटॅंक असावाच लागते. पक्षाची धोरणं, मतदाराना लुभावण्यासाठी लागणारी आश्वासनं, जाहिरनाम्याचा भुलभुलैय्या व अस्मितेची समिकरणं मांडत पक्षाला विजय मिळवुण देण्यासाठी जे अखंडपणे लढत असतात ते म्हणजे  पक्षचं थिंकटॅंक. मग या थिंकटॅंकमध्ये त्या त्या क्षेत्रातले दिग्गज व तज्ञ असतात.  मागच्या पन्नास साठ वर्षात कॉंग्रेसनी सत्तेत राहण्याची जी काही चिकाटी दाखविली आहे ते त्यांच्या बलाढ्य नि निपून थिंकटॅंकमुळ्चे हे सत्य की अर्ध्यसत्य? माझ्या मते सत्यच पण या सत्याला अजुन एक बाजू आहे ती म्हणजे विरोधी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या थिंकटॅंकची चुकलेली भुमिका. कॉंगेसचा प्रतिस्पर्धी म्हणून भाजप हा पक्ष उभा करताना भाजपच्या थिंकटॅंकनी कॉंगेसचं बलस्थान असलेला “पुरोगामीत्वाचा” बिल्ला कायम दुर्लक्षीला... अन इथेच भाजप प्रतिस्पर्धी म्हणून कमी पडत गेला. जेंव्हा जेंव्हा कॉंगेसला इतर मुद्दे भोवले व बाहेर फेकली गेली त्या नंतर तेवढ्याच ताकदीने कॉंग्रेसनी परत उसळी मारल्याचा इतिहास आहे. मागच्या साठ-सत्तर वर्षात तीन पिढ्या सरकल्या तरी कॉंगेस मात्र अजुनही सत्तेत कायम... याचं कारण वर वर पाहता असं दिसत की कॉंगेसनी जी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली हे त्याचं फलीत आहे. पण माझं मत थोडसं वेगळं आहे. पुरोगामीत्व हे कॉंग्रेसचं बलस्थान नक्कीच आहे व याच शस्त्रानी कॉंग्रेसने आजवर विरोधकाना गारद केले. पण हे शस्त्र विरोधकांनी न बाळगणं हे सुद्धा दुसरं कारण आहे. म्हणजे विरोधकांची चुकलेली भुमिका कॉंगेसला बलाढ्य करत गेली.
खर तर आजही देशात कॉंग्रेसला बहुमत नाहीये. एकुण फक्त ११ राज्यातच कॉंग्रेस सत्तेत आहे. तरी दिल्लीत शेर-दा पुत्तर बसला आहे, हे कसं काय? कॉंगेसनी कितीही आव आणला तरी स्थानिकानी देश पातळीवर कॉंगेसला मोडीत काढलं. याची सुरुवात झाली इंदीरा गांधीच्या काळात.  इंदिरा गांधीच्या आणिबाणी नंतर देशभरात स्थानिक पक्षांची लाट उसळली. आजच्या घडीला तसा राष्ट्रिय पक्ष म्हणायला एकही पक्ष नाही. प्रत्येक राज्यातील स्थानिक पुढा-यानी कॉंग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाला आव्हान देत आपापले स्थानिक पक्ष बलाढ्य बनवत नेले व त्यातुनच राष्ट्रीय पक्षाना स्थानिक पातळीवर आपलं अस्तित्व गमवावं लागलं. मग करुणानीधी, जयललीता, चंद्रबाबू नायडू, मायावती, मुलायमसिंग, नितिश कुमार, लालूप्रसाद, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी असे अनेक स्थानिक नेत उदयास आले जे थेट दिल्लीवाल्याना दरडावू लागले. एवढं झालं तरी मागच्या ६० वर्षात केंद्रात सर्वाधीक काळ सत्तेत राहण्याची अफलातून किमया कॉंग्रेसनी करुन दाखविली.  या किमयाचे किमयागार कोण? तर पुरोगामित्वाचा बिल्ला.  संयत नि धोरणात्मक खेळी खेळण्याचे सगळे डावपेच थिंकटॅंक कडूनच पुरविले जातात. आजही कॉंग्रेसचं थिंकटॅंक अव्वलच. दोन-तीन भुंकणारे कुत्रे सोडले तर कॉंग्रेसचे एकूण डावपेच हे थेट खुर्चीवर दावा सांगणारे ठरतात व आजवर तेच होत आलं आहे.
जसं कॉंग्रेसचं थिंकटॅंक आहे अगदी तसच भाजपचही थिंकटॅंक आहे. कॉंग्रेसच्या थिंकटॅंकनी सुरुवातीपासून पुरोगामीत्वाचा लेबल पक्षाला चिटकवून ठेवण्यात यश मिळविले. अगदी याच्या विरुद्ध भाजपचं थिंकटॅंक मात्र मागच्या तीन-चार दशकातं प्रचंड गोंधळलेला दिसत होता. संघाचा प्रभाव असलेला हा थिंकटॅंक सुरुवातीपासूनच हिंदूत्वाच्या मुद्द्याला चिकटून आहे. शहा बानोच्या निमित्ताने मुस्लिमानी उभ्या देशाला घाम फोडला व  राजीव गांधीनी कट्टरपंथीयाच्या धाकाने स्त्रीयांच्या विरोधात जाणारा कायदा पास करवून घेतला. घटस्फोटीत मुस्लीम स्त्रीला पोटगी मिळविण्याचा अधिकार राजीव गांधीच्या या नव्या कायद्यामुळे संपुष्टात आला. याचा विरोध म्हणून समान नागरी कायद्याची मागणी परत एकदा उचल खाल्ली व त्यातून भाजपचं हिंदुत्व धारधार व टोकाचं बनत गेलं. वातावरण अजुन तापत गेलं कारण एकुण परिस्थीत तशी होती. मग यातूनच राम मंदीराचं भिजत पडलेलं घोंघळं भाजपच्या थिंकटॅंकनी पेट्रोलनी पेटवावं तसं पेटवलं. शहा बानो प्रकरणानी हिंदू धगधगत होताच व याचा एकुण परिणाम असा झाला की देशात हिंदूत्वाची लाट आली नि शेवटी बाबरी उध्वस्त करुन उसळलेया दंग्यात अनेक जिवांची होळी करत गोध्राकांड  पर्यंतचा काळा इतिहास लिहून गेली.  महाराष्ट्रातील सेनेचं राज्य व वाजपेयी नावाचं अत्यंत संयत नेतृत्व या देशानी पाहिला तो याच काळात.
या नंतर काळ बदलला. इथला मतदार हिंदूत्वाच्या मुद्याला फारसा महत्व देत नव्हता. भाजपाची एका मागून एक हार होत गेली. त्यात मिडीयाचंही अचानक महत्व वाढत गेलं. मग मोदीच्या नावानी गळा काढत भाजपाला कोंडीत धरणे विरोधकांचं नित्याचं कार्य ठरलं. या सगळ्यात प्रमोद महाजन सारखा भाजपाचा लढवय्याही हरवला. रामाचा मुद्दा राजकारणात तेवढा उपयोगाचा नाही हे भाजपालाही तोवर कळून चुकले होते. मग भाजपनी हळूच रामाच्या कानात रामराम म्हटलं पण लोकांच्या पुढे मात्र “आपण तसं काही म्हटलच नाही” असं म्हणत वेळ मारुन नेली. एकंदरीत हिदुत्वाच्या मुद्द्यावरुन राष्टीय पातळीवर चमकलेलं भाजप हळू हळू बॅकफूटवर येऊ लागला. पण हे सगळं चालू असताना ईकडे कॉंग्रेसचा “पुरोगामीत्वाचा बिल्ला” मात्र मागच्या ६०-६५ वर्षा पासून कायम चकाकतच राहिला याकडे डावपेचात्मक दृष्टिकोणातून नजर गेलीच नाही. कॉंगेसवर घाराणेशाहीचे आरोप झाले, आणिबाणीचा डाग बसला, आपरेशन ब्ल्यू स्टार,  इंदिरा गांधीची हत्या, शिख दंगली, बोफोर्स  अशा अनेक कांडानी नाकी नऊ आणले... नंतर तर भ्रष्टाचाराचं पेटंटच कॉंग्रेसला मिळालं तरी सुद्धा या सगळ्या काळोखात कॉंग्रेसचा पुरोगामित्वाचा बिल्ला मात्र कायम चकाकतच गेला. अन प्रांता प्रांतात उदयास आलेल्या स्थानीक पक्षांच्या नव्या समिकरणातही या एका बिल्ल्यानी कॉंग्रेसला कायम सत्ताधीश ठेवलं.
हिंदुत्वाच्या गुर्मीत जगणा-या भाजपला आता कुठे या बिल्याचं महत्व कळू लागलं.  मागच्या दोन चार वर्षात भापच्य थिंक टॅंकनी प्रचंड मेहनत घेत असाच एक बिल्ला आपल्याकडेही हवा म्हणून नवी रणनिती आखून काम सुरु केल्याचे दिसते. मग त्या दिशेनी अनेक प्रयत्नही सुरु झाले.  मोदीची सदभावना त्यातलाच एक प्रकार आहे की गोध-या वरील उतारा हे मात्र अजुन स्पष्ट झाले नाही. पण २०१४ च्या निवडणूकांची मोर्चेबांधणी व मोदीला पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून मोदीनी जो सभांचा धडाका लावला, त्या संभांमधूण होणारे भाषण नीट ऐकल्यास भाजपचे मुद्दे व रणनीती बदलली आहे हे स्पष्ट दिसते. रामाच्या मुद्याला बगल तर दिलीच पण हिंदूत्वाचा मुद्दाही प्रांत पाहून बोलल्या जातो. मागच्या मुंबईतील सभेच पुरोगामी महाराष्ट्राचा धसका घेत हिंदूत्व अजिबात उच्चारला नाही. तिकडे उत्तरेत मात्र हिंदूत्वाचं टोकदार भाषण नसलं तरी अगदीच बगलही दिली जात नाही. त्याच बरोबर मुस्लीमांच्या मनातून भाजपची हिंदूत्ववादी ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत.  
इकडे कॉंग्रेस मात्र दिग्गी-तिवारीच्या बेताल वक्तव्यामुळे तरुणांच्या मनातून उतरत असून त्याना आवर न घातल्यामूळे सोनी गांधी यांच्या बद्दलही मनात अढी निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे सत्तेत टिकून राहण्याचे खरे कारण कॉंग्रेस पुरोगामी होती म्हणून नव्हे तर भाजपं प्रतिगामी व जातीयवादी होता म्हणून होय. म्हणजे भारतीय मदराकडे पुरोगामी नावाचा बिल्ला गळ्यात असलेले दोन पर्याय आजवर उभे नव्हते म्हणून कॉंगेसचे निभावत आले आहे. पण जर का भाजपनी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली व ती येनकेन लोकानी मन्य केली तर काही न करता कॉंग्रेसचा घात होईल. आजवर कॉंग्रेस टिकले ते भाजपच्या टोकदार जातीयवादी व भगव्या वृत्तीमुळे. भाजपच्या हिंदुत्ववादातून मुस्लीम व दलीत मदतार तर दुरावत गेलाच पण पुरोगामी मतदार मग तो कोणत्याही समाजाचा/जातीचा असो तो ही दुरावत गेला. राष्ट्रीय  पातळीवरील राजकारणाचे भाजपचे हे चुकलेले समिकरण कॉंगेसला नेहमीच फायद्याचे ठरत गेले.
२०१४ च्या निवडणूकीत भाजपानी एकूण जो पवित्रा घेतला तो संपुर्ण पुरोगामित्वाचा नसला तरी कॉंगेसच्या सत्तेत टिकण्याचे गमक असलेले हे पुरोगामित्व आता स्विकारणे अपरिहार्य आहे एवढे भाजपने ओळखले आहे. राष्ट्रीय  पातळीवरील राजकारणात अत्यंत मोलाचं ठरलेलं हे पुरोगामित्व जसजसं भाजपकडे वाढत जाईल तसं तसं कॉंगेसचा प्रतिस्पर्धी अधिक बलाढ्य होत जाईल.  म्हणजे भाजपचं पुरोगामित्व हे कॉग्रेसला ख-या अर्थाने शह देण्याचं काम करेल. आजवर विरोधकाकडील पुरोगामित्वाच्या अभावामुळे कॉंगेस हा भारतीय राजकारणाच्या शर्यतीतील  एकमेव पक्ष असायचा व तोच जिंकायचा. त्यामुळे मागच्या सहा-सात दशकात कॉंगेसनी सत्तेत टिकून राहण्याची चिकाटी दाखविली. आता प्रतिस्पर्धी सुद्धा पुरोगामीत्वाचं हत्यार घेऊन येतोय असे दिसते.
भाजपचं पुरोगामी नसणं हे कॉंगेसच्या विजयाचं गमक असून, भाजपाच्या पुरोगामी बनण्याने भारतीय राजकरणात ख-या अर्थाने कॉंगेसच्या पुढे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा असेल. म्हणजे तेंव्हा लढा अटीतटीचा होईल.

म्हणून म्हणतो, कॉंगेसचं अस्तित्व हे विरोधी पक्षाच्या अपुरोगामीपणामुळे टिकून राहीलं.

-----
जयभीम

नमो : चायवाला चीफ मिनिस्टर!

कॉंग्रेस पक्ष हा फक्त पुरोगामीच नाही तर अत्यंत सभ्य, विनयशील नि  प्रगल्भ लोकांचा पक्ष आहे. ६५०० जातींमध्ये विभागलेल्या देशाला मागच्या पाऊन शतका पासून चालविण्याची किमया कॉंग्रेसनेच करुन दाखविली आहे. मधले एक दोन अपवाद सोडले तर ईथली सत्ता कायमच कॉंग्रेसकडे राहीली.  जातीयवादी घटकांचे अनेक घात झेलत कॉंग्रेसनी इथल्या माणसला सांभाळले  व ते करताना तारेवरची कसरत केली. यशवंतराव चव्हानां पासून शरद पवारांसारखे दिग्गज कॉंग्रेसचे सोबती राहीले आहेत. विनयशिलता व सभ्यता ही कायमच कॉंग्रेस पक्षाची ओळख राहीली आहे. सेनेचे अध्यळ बाळ ठाकरे अगदी फाटक्या तोंडाचे, त्यामुळे महाराष्ट्रातील संयत नेतृत्व पवार यांची विनयशीलता अजुनच उठून दिसली. केंद्रात  वाजपेयींचा एक अपवाद सोडला तर बाकी सगळे भगवे नि डावे प्रचंड आक्रमक. या सगळ्या अक्रमकांच्या मध्ये कॉंग्रेस नेहमीच आपल्या प्रगल्भ वर्तनाचे दर्शन घडवत राहीला आहे.  पण हल्ली मात्र दिग्गी-तिवारीची जोडी जेंव्हा पासून बरळायला लागली तेंव्हा पासून कॉंगेसची एकूण प्रतिमा बदलत आहे, मलीन होत आहे. या अशा भुंकणा-या कुत्र्याना मोकाट सोडल्यामूळे सोनीया गांधी यांच्या बद्दलचा आदरही कमी होत आहे.
मागच्या आठवड्यात कॉंग्रेसच्या मणीशंकरनी मोदीला उद्देशून म्हटले की “हवं तर मोदीनी आमच्या सभेत चहाचा स्टॉल लावावा” अन स्वत:च फिदी फिदी हसून घेतलं. काहीच कारण नसताना उगीच  भाजपला डिवचले. संघ व भाजप याआधी नेहमीच असल्या डिवचण्याना जशास तसे उत्तर देत आला आहे. पण यावेळी मात्र यावरुन पलटवार करण्यापेक्षा या वाक्याच भांडवल करुन चक्क कॉंगेसला गिरीबांची टर उडविणारा श्रीमंतांचा पक्ष असं प्रोजेक्ट करण्याची अफलातून शक्कल  भाजपने लढविली आहे. मणिशंकरच्या या कमेंट नंतरच्या सभेतून बोलताना मोदी ठासून ठासून सांगू लागले की “बघा, मी एक चहावाला असल्यामूळे या कॉंग्रेसला पहावत नाही. माझ्या सोबत बसायला याना कमिपणा वाटतो, या पक्षाला माझ्या सारखे गरीब व चहा विकणारे लोक तुच्छ वाटतात. हा पक्ष गरीबांना कसा बोलतो बघा....” वगैरे मोदींचे सुरु झाले. खरं तर कॉंगेसला किंवा मनीभाऊला अपेक्षीत होते की यावरुन भाजपं काहीतर वजनदार कमेंट मारेल व मग त्याना आपण कोंडीत धरु. पण मोदीनी चक्क चहावाला स्टेटस Accepted म्हटलं व आता तोच धागा  धरुन डाव उलटवायला सुरुवात केली.  "मी एक चहावाला, गरीब चीफ मिनिस्टर" म्हणत कॉंग्रेसला गरीब विरोधी पक्ष म्हणत रान पेटविणे सुरु झाले. मोदीचे  हे वाक्य कोणाला अपील होवो न होवो पण देशातल्या तमाम चहावाल्याना तरी अपील होतच असेल ना... म्हणजे येणा-या निवडणूकीत भाजपानी तमाम चहावाल्यांचे वोट जमेस धरायला हरकत नाही... अन चहावाल्यांचे वोट गमावण्यास कारणीभूत आहेत कॉंगेसचे मणिभाऊ.
बाकी काही असो...मी एकच म्हणेन... भाजप झाली हुशार बाप्पा!!!


टीप:- हा बाप्पा म्हणजे गणपतीचा नव्हे तर आमच्या विदर्भातली ईश्टाईल हय. 

मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

AK - 45 ( अरविंद केजरीवाल, वय-४५)

अरविंद केजरीवाला नावाचं जे राजकीय वादळ उठलं ते शमवता शमवता कॉंगेसच्या नाकी नऊ आले व भाजपा पार घायाळ झालाय. मोदी नावाचं वादळ कॉंग्रेसच्या विरोधात देशभर घोंगावत असताना चार राज्यात मात खाल्लेली कॉंग्रेस मेटाकुटीला आली नसली तरी अवस्था फार बिकट आहे. मोदीच्या दिवसा आड होणा-या तडाखेबंद सभा त्यात अजुन भर घालत आहेत.  मोदीला सडेतोड उत्तर देणे ही काळाजी गरज ठरली आहे. मोदीच्या विरोधात उतरविण्यासाठी तुल्यबळ नेताही कॉंग्रेसला गवसेना... परवाच्या कॉंग्रेसच्या  सभेत देशभरातील कार्यकर्ते आपल्याला पंतप्रधान पदाचा नेता/उमेदवार मिळेल या आशेनी आले होते पण अधीकचे तीन सिलेंडर घेऊन नेत्या विनाच परतावे लागले. थोडक्यात मोदीच्या तोडीचा नेता नाही हा संदेश देशभर गेला व ते कॉंग्रेसच्या हिताचे नक्कीच नाही. ही सगळी कसरत चालू असताना केजरीवाल नावाचं वादळ कॉंग्रेसला उसंत देईना... केजरीवालचं एकूण वागणं हे कॉंग्रेसला डिवचणारं आहे. तरी येऊ घातलेल्य निवडणूकांच्या तोंडावर केजरीवालच्या विरोधातील निर्णय आततायी व अपरीपक्वतेचं पाऊल ठरु नये म्हणून कॉंग्रेस केजरीवालचे सगळे नखरे खपवून घेत आहे. किंबहुना केजरीवाल सुद्धा ही एकूण रणनिती जाणून आहे व निवडणूका नंतर फार उड्या मारता येणार नाही, काय तो धुमाकुळ आत्ताच घालून घ्या असा केजरीचा होरा दिसतो. निवडणूका नंतर खरा केजरीवाल काय आहे ते आपल्याला कळेलच.  दिल्लीचा काया पालट करणे हे उद्दिष्ट गाठायचे म्हटल्यास आरे ला कारे करुन चालणार नाही, तर जरा धोरनात्मक व संयत खेळी खेळ्त सत्तेत राहुन विकास करण्याचा शहाणपणा निवडणूकां नंतर केजरीलला दाखवावा लागेल. तसे न केल्यास सरकार पडणार हे मात्र पक्कं. 
पण सध्या ज्या प्रश्नावर केजरीवालनी धरणे आंदोलनाचे शस्त्र उपसले ते पाहता केजरीची मागणी अनाठायी आहे असे अजिबात नाही. वेश्या व्यवसाय व ड्रग्सचा धंधा करणा-यांच्या विरोधा दिल्ली  पोलिस कारवाई करण्यास तयार नाहीत. खुद्द मंत्री उभं राहून रेड टाकतात व घरातून ड्रग्स मिळते तरी पोलिस अधिकारी मंत्र्याना वारंट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत कारवाईस दाखविलेली असमर्थता म्हणजे गुन्हेगारांचे समर्थनच.  दिल्लीतील गुन्हेगारी वाढीस पोलिसच जबाबदार असल्याचा यापेक्षा मोठा अजुन कोणता पुरावा हवा? जर मंत्र्याच्या तोंडादेखत गुन्हेगाराला पोलिस पाठिशी  घालत असतील तर तर इतर वेळी पोलिस व गुन्हेगार एकमेकाना कवटाळतात हे उघडच. त्याच बरोबर या काळ्या धंध्यांचे लाभार्थी पोलिस व नेते आहेत हे सुद्ध उघडच आहे. परवा ज्या पोलिस अधिका-यानी गुन्हेगारांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवत आपण लाचखोर आहोत याचे चक्क पुरावे दिले त्याना जाग्यावर सस्पेंड करायला हवे होते. पण केंद्र सरकार तसं करत नाही याचा अर्थ सरकारही दिल्लीतील गुन्हेगारी कमी करण्यास फारशी उत्सूक दिसत नाही. केजरीवालची मागणी काय तर अशा करप्ट अधिका-याना निलंबित करा किंवा यांची बदली करा... मागणी रास्तच आहे. पण केंद्र सरकार मात्र वेगळाच हट्ट करत आहे नि वरुन केजरीवाल हाच हट्टी आहे म्हणून बरळत आहे.  त्याच बरोबर मुख्यमंत्री कधी धरणा धरत असतो का वगैरेही गप्पा हाणून झाल्या. मग आजवरचे कोण कोणते मुख्यमंत्री स्वत:च्याच सरकार विरोधात या आधी आंदोलने केली याची उजळनी करत डॉ. बी. सी. रॉय व अजय मुखर्जी ही विस्मरणात गेलेली नावे नव्या पिढीला माहित करुन देण्यात आली.  एकूण मागणी काय तर दिल्ली पोलिसांची जबाबदारी नैतिकतेच्या कसोटीवर घासून काढण्याची मागणी केजरीवालकडून होत आहे व ती मागणी योग्यच आहे.
या सगळ्या दरम्यान किरण बेदी नावाची बाई अधेमधे काहीतरी बरळत असते. भाजपाचे कार्यकर्ते तर चक्क बाप नावाच्या टोप्या लेवून माकड उड्या मारुन परतले. केजरीवाल नावाच्या राजकीय वादळाशी कॉंग्रेस सध्या बचावात्मक पवित्रा घेत लोकसभेची खेळी बिघडणार नाही त्या दृष्टीने पावलं उचलत आहे तर केजरीच्या दमदार राजकीय उडीनी दिल्लीत घायाळ झालेला भाजप मात्र आपची बदनामी करत सुटला आहे. पण कॉंग्रेस किंवा भाजप हे दोघेही दिल्लीतील पोलिसांची अकाऊंटॅबिलिटी यावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ हे दोघेही आड मार्गाने का असेना पण पोलिसांच्या काळ्या कमाईतले लाभार्थी आहेत हेच खरे.
या घटकेला केजरीवालची मागणी त्या तीन करप्ट अधिका-यांचे निलंबन एवढीच असली तरी लवकरच ती मागणी दिल्ली पोलिस राज्याच्या अखत्यारित आणण्या पर्यंत जाईल हे जाणून असलेले केंद्र सरकार गोत्यात आले म्हणावे लागेल. केजरीवाल दिल्लीत भाजपासाठी कर्दनकाळ ठरला असून कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली.  आप एक असं दुखण बनलय ज्याला धरलं तर चावते अन सोडलं तर पळते... पण हा खेळ फार फार तर निवडणूकां पर्यंतच सहन केल्या जाणार... म्हणून त्या आधी केजरीवाल जमेल तेवढे चावणे-पळने करुन घेत आहे. अन या खेळात निवडणूका आधी  मिळेल तेवढे पदरी पाडून घेण्याची ही शक्कल आहे.

केजरीवालच्या रुपाने भारतीय राजकारण कात टाकणार हे दिसतच आहे. आपच्या विजयामुळे शहरी भागातला  तरुण वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहित झाला आहे. काल पर्यंत मोदी हवा की मोदी नको अशी स्थीती होती. त्या नंतर राहूल की मोदी अशी स्थीती निर्माण करण्याचा कॉंग्रेस द्वारे प्रयत्न केला जाणार होता पण तो फसणार की काय याची कॉंग्रेसला भिती दिसते. अचानक उडी मारुन आलेले केजरीवाल मोदी व कॉंग्रेस दोघांच्याही वाट्याचे तरुण मतदार पळवणार हे दिसतच आहे. या सगळ्या घडामोडीमधे मोदीच्या विरोधात तुल्यबळ नेता उभा करणे कोणालाच जमले नाही. ही एकुण परिस्थीती पराजीत मनस्थीतीची लक्षणं व  लढण्या आधीच हार स्विकारल्याचा संकेत आहे. थोडक्यात आपच्या दुखण्यासकट मोदीचं पारडं जड आहे ते आहेच.  
मोदीनी कॉंग्रेसला घाम फोडला पण केजरीमुळे मोदीला घाम फुटला आहे ही गोष्टही तेवढीच खरी. कॉंग्रेसला एकहाती घेण्याचं भाजपचं स्वप्न केजरीमुळे नेस्तानाबूत होताना दिसत आहे. ज्या तरुणांच्या वोटवर भाजपचा डोळा होता त्यातल्या मोठ्या वर्गाला आप खुणावत आहे.  बाकी काही म्हणा... पण AK-45 च्या पुढे भाजप घायाळ व कॉंग्रेस हतबल  झालीये हे मान्यच करावे लागेल. २०१४ च्या निवडणूका ख-या अर्थाने रंगणार आहेत.

****
जयभीम

शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

सोनीया गांधीनी झग्ग लेवून दारू वाटावी!

मोदी नावाचे वादळ कॉंग्रेसिना प्रचंड अस्वस्थ करत आहे हे उघडच आहे पण त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील मान्यवर नेते सैरभैर होत वाट्टॆल ते बरळत आहेत ही गोष्ट मात्र कॉंग्रेसचे पतन करणार हे मात्र खरे. दिग्गी व मनिष नावाची दोन बेअक्कल माणसं अत्यंत खालच्या थराला जाउन कमेंट करत असतात. मी मागे त्यांच्यावर “भुंकणारी दोन कुत्री” नावानी एक पोस्ट लिहली होती. त्याच बरोबर जयरामही अधेमधे बरळत असतात पण आज मणीशंकर अय्यरनी जी काही ओकारी ओकली ती कोणत्याही नेत्याला न शोभणारी असून  कॉंग्रेसची उरली सुरली इज्जत टांगली गेली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी असून तुल्यबळ नेत्याला तो मान देत बोलावे याचेही भान दिसत नाही. देशातील एवढ्या मोठ्या पदाच्या प्रतिस्पर्ध्याशी बोलताना, त्यावर कमेंट करताना त्या पदाचा नि व्यक्तीचा मान राखूनच बोलले जावे ही बेसीक विनयशीलता कॉंग्रेस विसरला दिसतो.  शरद पवारांसारख्या अत्यंत विनम्र नेत्याशी ज्या लोकांचे उठणे बसणे आहे त्यांच्यात एवढी सुद्ध विनयशीलता असू नये या मागे थेट बाईचे अभय आहे हेच खरे.  इतरांकडून एटीकेट्स न पाळणे एकदाचे मान्यच पण सरकारी पदावर आरुढ नि जबाबदार व्यक्तीनी सुद्धा पदाला शोभेल अशी भाषा न वापरणे  ही मात्र लांछनास्पद बाब आहे. मनिष तिवारी, दिग्गी व मणीशंकर अय्यर हे काही गल्ली बोळातले मवाली नाहीत की त्यानी काहिही बोलावं... भारताची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्या पक्षातील व  महत्वाच्या पदावरील ही माणसं आपल्या पदाचा व अपेक्षीत विनयशीलतेचा विचार न करता जे काही बोलतात ते पाहता सोनीया गांधी यानी आपली नैतिक बांधिलकी म्हणून या तीघाना पिटाळायला हवे होते. पण आता असे वाटू लागले आहे की याना अभय देऊन असे करण्यात सोनीयांचाच हात आहे.
जर तसे नसते ते यांची एवढी हिंम्मत झालीच नसती. पण या एकूण वर्तनातुन जागतिक पातळीवर आपली छी-थू होत असेल तर त्याला या तिकडीपेक्षा सोनीया गांधीच जास्त जबाबदार आहेत.
“मोदीनी हवं तर कॉंग्रेसच्या बैठकीत चहाचा स्टॉल लावावा”
आहे की नाही कमाल? तुमचं पद काय, तुम्ही बोलता काय? काही भान असवं की नाही? मोदी हे अत्यंत गरीब घराण्यातून आले असून कोणे एकेकाळी ते चहा विकायचे हा इतिहास सर्वाणाच माहीत आहे. हा त्यांचा जुना व्यवसाय ती काळाची गरज होती. पण आज त्या व्यवसायावरुन मोदीला हिणविणे म्हनजे तो जातीयवादच ठरतो. मग अगदी याच मोजपट्टीने मोजायचे म्हटल्यास सोनीया गांधी कोणे काळी हॉटेलात वेट्रेस म्हणून काम करायच्या व तर्र झालेल्या ग्राहकांच्या ग्लासात दारु ओतून एक छानसी स्माईल द्यायच्या. आता जर भाजपाकडून असं स्टेटमेंट आलं की... “उद्या जर कॉंग्रेस हारलीच तर सोनीया बाईनं  आमच्या पार्टीत डीनर सर्व्ह करावा”  तर कॉंग्रेसला चालेल का? नाही ना. मग अगदी तशाच धाटणीचा शेरा कॉंग्रेसचे जबाबदारी मंत्री मारतात व सोनीयाबाई मूग गिळून बसते याला काय म्हणावे.

सोनीया गांधी यांच्या बद्दल जो काही आदर आहे तो अशा छुप्या नि विकृती खेळ्यांमूळे नक्कीच कमी होणार. पुढच्या काळात या सगळ्या गोष्टींचा कॉंगेसला परिणाम भोगावा लागणारच आहे. नाही भोगावं लागलं तरी सोनीया गांधी यानी तीन कुत्र्यांच्या माध्यमांतून जी वयक्तीक पातळीवरील शेरेबाजी चालविली आहे किंवा आपण त्याना न आवरता मूक संमती दिली आहे ते पाहता सोनीय़ा गांधी या विचारानी विकृत व अत्यंत खालच्या थराला जाणा-या तूच्छ व्यक्ती आहेत हेच सिद्ध होते. या निष्कर्षावर प्रतिवादच होऊ शकत नाही.

तीन कुत्र्यांच्या आडून सोनीया गांधीनी जे काही चालविले आहे त्याचा मी निषेध करतो. एवढेच नाही तर सोनीया गांधीला जी भाषा समजते त्या भाषेत शेरा ही देतो की... 
"इतक्या खालच्या पातळीवरील कमेंट करणा-याना पोटात घालणा-या सोनीया गांधी यानी वेट्रेसचा झग्गा लेवून भाजपाच्या बैठकीत दारू वाटावी"

*****
जयभीम

टीप: ही पोस्ट म्हणजे कानपिचक्या समजावे. कॉंग्रेसचा मी पारंपारीक मतदारही आहे व समर्थकही.

क्रिकेट - तीन लाकडं, अकरा माकडं :- ब्रिगेडचा झोल!

संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यानी पुरोगामीपणाचा कितीही आव आणला तरी वेळोवेळी त्यांचा जातीयवादीपणा उसळून येतोच. नुकत्याच पार पडलेल्या जिजाऊ महोत्सवात परत एकदा असाच जातीयवाद उसळला व आता ब्रिगेडचे नेते-कार्यकर्ते तोंड लपवत पळत आहेत. त्याला कारणही तसेच आहे... संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ या संघटना पुरोगामी गटात सामिल होताना बामणाना शिव्या घालणे हा एककलमी कार्यक्रम हाती घेउन नाचू लागल्या होत्या. मग पुरोगाम्यानाही हे ब्रिगेड नाच आपल्या तालाशी सुसंगत वाटलं. मग निळेपुरोगामी व भगवे-ब्रिगेडी मिळून  सूरतालाचा जबरी फ्यूजन करत अनेक नवे नाच नाचून घेतले. मग नुसतं नाचणं नाही तर मग काही अफलातून गाणी-मणी सुद्धा रचून-गाऊन झाले. त्यातलच एक गाणं(घोषणा) होतं क्रिकेटचा तिरस्कार करणारं. क्रिकेट  हा बनिया-बामणांचा खेळ असून देशाच्या तरुणाईला वाम मार्गाला लावत आहे अशी आरोळी करताना क्रिकेटच्या खेळाला “तीन लाकडं, अकरा माकडं” अस म्हणून ब्रिगेडच्या नेत्यानी लोकाना काहीतर अफलातून शोढ लावल्याचा व त्याचा आस्वाद घेण्यासाठी गळ घालू लागली. काहीतरी नवीन आलं की लगेच चाखायची सवय लागलेला आम-आदमी ब्रिगेडच्या सभेत हाजर झाला.  मग ही आकरा माकडं कोण? तर बनिये व बामण होतं... असं म्हटल्यावर प्रचंड टाळ्य़ा पडायच्या. तसा हा शोध नवीन नव्हता म्हणा त्याचा दावा करणारे नवीन होते. मग यातून अशीही एक पिढी निघताना मी पाहिली जी क्रिकेट पाहत नसे. क्रिकेटच्या नादी लागून परिक्षा तोंडावर असताना स्वत:चं नुकसान करणारे अनेक विध्यार्थी मी स्वत: पाहिले असल्यामुळे ब्रिगेडच्या स्लोगनमुळे होणारा परिणाम एका अर्थाने सुखावणारा होताच... पण लवकरच निराशी झाली. कारण ब्रिगेडला तत्व व  नितीमुल्ये ही सोयी नुसार बदलणारी चड्डी वाटतात हे जुणं दुखणं आहेच.  कधीही व केंव्हाही परस्पर विरोधी तत्वज्ञानाला लोंबकळत कार्यकर्त्यांचा व निष्ठावंताचा प्रचंड गोंधळ उडविण्यात ब्रिगेडचा हतखंडा आहे. मग यावेळीही तसच घडलं.
आजवर जो क्रिकेट ब्रिगेडीना माकडांचा खेळ वाटायचा त्यात अचानक यांचा मराठा पोरगा झडकला. कालवर जो क्रिकेट ब्रिगेडच्या नजरेत तुच्छ होता तोच खेळ अचानक इतका महत्वाचा होऊन गेला की मराठा सेवा संघाने या वर्षीचा “मराठा विश्वभुषण” हा पुरस्कार चक्क त्या मराठा माकडाला म्हणजेच विजय झोल याला जाहीर केला. ब्रिगेडची नितीमुल्ये, चळवळीचे मापदंड व पुरस्काराचे निकष हे कधीही व कशीही बदलू शकतात याचं हे जातीवंत उदाहरण आहे. मला विजय झोल बद्दल अजिबात आकस नाही तर उलट कौतुकच वाटतं, पण त्याच्या नावानी ब्रिगेडनी जो काही झोल केला त्यावर आक्षेप आहे. कालवर मराठा पोरगा खेळत नव्हता तेंव्हा जो खेळ तुम्हाला माकडांचा वाटायचा त्यात तुमचा पोरगा चमकल्या चमकल्या अचानक तो खेळ तुम्हाला संघटनेचा सर्वोच्च पुरस्कारायोग्य जर वाटत असले तर याचा अर्थ उद्या एखादा मराठा भाटगिरी व वेदमंत्र किंवा वेदांवर जागतीक भाषण गिषण दिल्यास व चार पेपरातून चमकल्यास तुम्हाला त्या वेदांचा पुडका येणार नाही याची काय गॅरंटी? किंवा एखाद्या मंदीराने-मठाने मराठ्याला उचलून शंकराचार्य बनविल्याश उद्या तुम्ही जातीयवादी तत्वज्ञानाचं पुरस्कार करणार नाही याची काय शाश्वती? कालवर क्रिकेटच्या खेळाडूना माकडं म्हणणारी ब्रिगेड स्वत:च माकड उड्या मारत एका क्रिकेट खेळाडूला पुरस्कार देते या कोलांट उडीला काय म्हणावे? की तुमची प्रत्येक कोलांट उडी लोकानी सीर-आंखोपर म्हणात तुमचं कौतूक करायचं? थोडक्यात झोलच्या रुपात ब्रिगेडचा झोल परत एकदा अधोरेखीत झाला.

एकंदरीत प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर ब्रिगेड व मराठा सेव संघ या संघटनां कोणतेही पक्के धोरण नाही अन नीतिमुल्ये नाही... जेंव्हा जे सोयीचे वाटले तेंव्हा ते उचलून एनकॅश करणे हे यांचं  एकमेव शाश्वत तत्वज्ञान आहे. दुसरी गोष्ट अशी की ही संघटना पुरोगामीत्वाचा कितीही आव आणत असली तरी जातीसाठी माती खाणारी संघटना असून झोलच्या निमित्ताने प्रचंड झोल करत उभ्या जिजाऊ उत्सवात ब्रिगेडनी परत एकदा माती खाली. यापुढेही माती खाण्याचे अनेक कार्यक्रम आपण पाहणार असून मी जमेल तसे त्यांचे अपडेट्स देईनच.

*****
जयभीम

गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

नामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली!

एक विद्रोही कवी नि पॅंथरचे संस्थापक, यांच्या मृत्यूने आंबेडकरी चळवळीतील(कम्युनिस्ट धार्जिण्य) एक सच्चा शिपाई हरवला  असे म्हणता येईल. अमेरीकेतल्या ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवर मुंबईत पॅंथर संघटना उभी केली ती ढसाळ व ढालेनी. दादासाहेब गायकवाडानी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यावर रिपब्लिकनच्या रुपात घोंगावणारी आंबेडकरी समाजाची राजकीय चळवळ शांत झाली... विझून गेली.  त्यामुळे आंबेडकरी समाजात सत्तरच्या दशकात सर्वत्र असुरक्षीततेचा सूर व नेत्यांच्या गद्दारी विरुद्ध नाराजिचा लावा धगधगत होता. चळवळ ज्याच्या जगण्याचं अविभाज्य अंग बनलं होतं तो आंबेडकरी चळवळीविना अस्वस्थ होता. नेमकं तेंव्हाच ढसाळांचा निळा वाघ ’पॅंथर’ मुंबईतून गरजला. मग अशा वेळी नुकतेच्या जन्मलेल्या पॅंथर नावाच्या या निळ्या वाघाला घराघरातून दानागोटा मिळाला व हा हा म्हणता हा निळा पॅंथर प्रत्येक घरातून डरकाळी फोडताना दिसू लागला. अशा या पॅंथरचे जनक म्हणजे ढसाळ व ढाले. लगेच पॅंथर संघटनेची ताकट इतकी वाढली की सत्तरच्या दशकात ढसाळांच्या डरकाळीने उभा महाराष्ट्र हादरायचा... एवढा तो पॅंथरचा दरारा. पण लवकरच एक गुपीत बाहेर पडलं ते म्हणजे ढसाळ हे विचाराने कम्युनिस्ट निघाले अन आंबेडकरी जनता हबकली. याच कारणामुळे ढालेनी त्यांच्याशी फारकत घेतली व पॅंथर बरखास्त करण्याची घोषणा केली. उभा आंबेडकरी समाज बाबासाहेबाना आपला वैचारीक बाप मानतो त्या विचारासाठी जगतो.  पण ढसाळ मात्र दोन बापांचा वैचारीक वारसा सांगू लागले. बाबासाहेबांच्या जोडीला हळूच कार्ल मार्क्सला उभं केलं व आता जयभीमच्या जोडीला लाल सलामचा नारा उभा झाला. हेच आंबेडकरी जनतेला नापसंद पडले. आंबेडकरी जनता बाबासाहेबांशी वैचारीक पातळीवर एवढी एकनिष्ठ आहे की सरमिसळ करण्या-या नेत्याला पिटाळून लावते. ढसाळांशी नेमकं हेच घडलं. ढसाळांच्या लेखी हा एक प्रयोग होता तर आंबेडकरी समाजाच्या नजरेत तो एक अक्षम्य गुन्हा होता. अन अनावधानाने म्हणा की नेतेगिरीच्या गुर्मीत म्हणा पण गुन्हा घडला होता व ढसाळाना त्याची किंमत मोजावीच लागणार होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की साम्यवादाकडे झुकलेल्या ढसाळाना आंबेडकरी समाजानी कायमचं घरी बसवलं.
तिकडे कार्ल मार्क्सचा वारसा सांगणारी ब्रम्हो-कम्युनिस्टांची पिल्लावळ मात्र ढसाळांच्या या नव्या घोषणेने उड्या मारू लागली. पुढे कम्युनिस्ट ढसाळानी भगव्यांच्या कंपूत सामिल होऊन अनेक प्रयोग केलेत जे सगळेच्या सगळे फसले. अशा प्रकारे पॅंथर ढसाळांचा आंबेडकरी नेता म्हणूण मृत्यू झाला तो सत्तरच्या दशकातच... उरला तो फक्त साहित्यिक ढसाळ. पुढे साहित्यिक ढसाळानी अनेक प्रयत्न केले पण आंबेडकरी समाजानी त्याना चळवळ्या म्हणून कधीच स्विकारले नाही तर वळवळ्या म्हणून कायम नाकारले. कार्ल मार्क्सच्या पिल्लावळानाही पुढे जाऊन ढसाळ ओझं वाटू लागले. कारण त्यांची सगळी गणितं आंबेडकरी समाजानी हाणून पाडली होती. ढसाळाना कम्युनिस्टांच्या कंपूत तेंव्हाच मान सन्मान मिळाला असतात जेंव्हा ते निळी फौज लाल सलामच्या मागे उभी करु शकले असते... पण ते जमलं नाही... मग ढसाळांचं लाल चलवळीच्या दृष्टीनी मुल्य शुन्य... ढसाळाच्या खांद्यावरुन आंबेडकरी समाजाची शिकार करण्याची स्वप्न उध्वस्थ झाल्यावर कम्युनिस्टानी ढसाळाना टांग दाखविली. मग परत एकदा ढसाळानी आंबेकरी चळवळीतुन आपलं गमावलेलं स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली पण बाबासाहेबांच्या विचाराशी एकदा फारकत घेतली की त्याला चळवळीत स्थान नसते हे जनतेने दाखवुन दिले. त्यामुळे पुढची हयात समाना सारख्या दलित विरोधी शिवसेनेच्या दैनिकांतून स्तंभ लिहण्यात गेली.
ढसाळ खरंतर एक दर्जेदार कवी नि साहित्यिक होते. त्यांच्या लेखणीतून उतरणारा  प्रत्येक शब्द मनाचा वेध घेणारा तर कधी प्रस्थापित विचाराना सुरुंग लावणारा... कधी झोपलेल्याना गदागदा हलविणारा तर कधी कल्पनाविलासाच्या  डोंगराना  उध्वस्थ करणारा. आजवरच्या मराठी किंबहुना भारतीय साहित्याला एका वेगळ्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं ते ठसाळाच्या कवितेनी. आजवरचे सगळे प्रस्थापीत समिकरणाना छेद देत साहित्याला नव्या दिशा दिल्या त्या ढसाळानी... साहित्यिक ढसाळाची कुवत एवढी की साहित्याच्या साचेबद्द सीमा तडातडा तुटल्या. आजवर बंदिस्त असलेल्या साहित्यानी मोकळा श्वास घेत अभिजनांच्या मोजपट्टीला बाद ठरवत स्वत:ची साहित्यिक मोजपट्टी निर्माण केली. त्या मोजपट्टीने मुल्य ठरविलं जाऊ लागलं. पुढे या नव्या मोजपट्टीतल्या साहित्यात भर पडत गेली ती ढसाळांमुळेच. त्यानी मराठी साहित्याला नवा चेहरा नि विचार दिला. संत तुकारामा नंतर विद्रोहाचा  उद्रेक कवितेतून उतरविण्याचा खरा प्रयोग जर कुणी केला तर तो ढसाळानी. तुकारामा नंतर विद्रोही काव्य लिहणारे आजवरचे एकमेव महान कवी म्हणून ज्याना गौरवावं असं व्यक्तीमत्व म्हणजे नामदेव ढसाळ. ज्यांच्या काव्यातून उद्रेक उसळतो ते म्हणजे ढसाळ.
पण हाच साहित्यिक ढसाळ राजकारणाच्या व संघटनात्मक चळवळीच्या मैदाना मात खातो... बाबासाहेबांचा विचार व कार्ल मार्क्सचा विचार या दोन विचाराना एकत्र जोडुन एक नवा प्रयोग करण्याच विचार ढसाळाना भोवला व नेता ढसाळ सपाटून आपटला तो कायमचाच. 
दोन बापांचा वारसा त्याना महागात पडला हेच खरे. 
आज ज्यांचा मृत्यू झाला ते आंबेडकरी चळवळीने नाकारलेले कम्युनिस्ट व कन्फ्युज्ड नेतृत्व होते व चळवळ्या म्हणून ज्याची ओळख फार पुर्वीच मिटली अशी व्यक्ती होय. आता काही अर्ध-शहाने आमचा नेता गेला म्हणून उर बडवत आहेत ते केवळ अज्ञानामुळे...

तरी एक महान कवी नि साहित्यिक म्हणून उभा देश त्याना अनेक वर्ष हृदयात जपेल हे ही तेवढच खरं.

मी नामदेव ढसाळाना भावपुण श्रद्धांजली अर्पण करतो.

-जयभीम.

मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

राजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या!

रामदास आठवलेनी जातीयवादी पक्षाच्या गोटात शिरून राजकीय आत्महत्या केली. समस्त आंबेडकरी समाजाशी गद्दारी करत भगव्यांच्या दारात भिक्षा पात्र घेऊन उभा असलेला रामदास रामाचे दास्य करण्या वाचून अजुन काही करु शकणार नाही हेच खरे. पण त्याच्य जोडीला शेतक-याचा नेता म्हणविनारा राजू शेट्टी यानी आज वाज्या गाज्यात संघाची चड्डी घातली अन समस्त शेतक-यानी तोंडात बोटं घातली. जातीयवाद्याच्या गोटात शिरुन पुरोगाम्यांशी लढण्याचा विचार करणारे हे राजकीय रातकिडे शेवटी संघाचा सूर लावणारे जातकिडे निघाले.  भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराची कीड लागली म्हणून दिवस रात्र तार स्वरात हिंडणारे संघाचे नि सेनेचे जातकिडे हे विसरतात की स्टींग ऑपरेशनद्वारे भ्रष्टाचाराचे बुरखे फाडण्याची सुरुवात तुमच्याच एका नेत्यापासून झाली होती. स्वच्छ प्रतिमेचा आव आणणारे व प्रगतीचे गाण गाणारे भगवे हे विसरतात की नितीन गडकरीच्या पुर्ती समूहातील प्रचंड घोटाळे व गोपिनाथ मुंडेच्या जिभेतून  निसटलेले निवडणूकीचे कोटीचे आकडॆ म्हणजे समस्त भगव्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. तरीही मेरी ही लाल म्हणत माकड उड्या मारणारे चड्डीवाले व त्यांचे लाल टिळ्याचे सोंगाळे बाता काय मारतात तर म्हणे यांचा लढा स्वच्छ प्रतिमेच्या आग्रहासाठी व देशाच्या विकासासाठी आहे.
चला एकदा माणून चालू की ही लोकं आर्थिक विकास साधून दाखवतीलही... पण आर्थीक प्रगती म्हणजे समाजाचा विकास होय का? अजिबात नाही. सामाजीक वातावरण दहशतीचं असल्यावर पैसा कोण्या कामाचा? आर्थिक विकास ही माणसाची जणू एकमेव गरज असून तो प्रश्न सुटला की सगळे प्रश्न सुटतात असा आवा आणणारे हे भगवे सामाजीक सुरक्षितते बद्दल ब्र शब्द बोलत नाही.  माणसाकडे पैसा नसतानाही वा अत्यल्प पैशातही तो सुखानी जगू शकतो. कारण पैसा हा गरजांशी निगडीत असून गरजांशी तोडजोड करत जगणे माणसाला चांगलेच ठाऊक आहे. पण मानवी हक्क नाकारात जातीयवाद बोकाळला गेला व उरात धडकी भरणारी दहशत घेऊन एखादा माणूस चैनीने झोपू शकेल का? अशक्य आहे. मग आजचे हे भगवे जे विकासाच्या बाता मारत आहेत यांच्या एकुण मनोवृत्तीचा ज्याना अंदाज आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे की भगवा राज्य म्हणजे दहशतीचे राज्य. आज उभा गुजरात दहशतीत जगतो आहे. तिथला दलीत व मुस्लीम संवर्णांच्यापुढे गुलामा सारखा वागतो आहे. आर्थिक विकास साधलेल्या(?) गुजरातेतील दहशतीत जगणा-या माणसांच्या आयुष्यातील ही पोकळी कुठल्याही पैशानी भरुन निघणार नाही. पण अगदी याच्या उलट महाराष्ट्रातील तळागळातला माणूस पैशानी थोडं मागे असला तरी भगव्या दहशती पासून तो मुक्त आहे ही जमेची बाजू नाही का? की आर्थीक विकासाच्या नावाखाली भगवी दहशत विकत घ्यायची?
यावेळी नरेंद्र मोदीनी मुंबईत सभा घेतली तेंव्हा एका शब्दानी हिंदूत्वाचा मुद्दा काढला नाही.  पण अगदी याच्या उलट तिकडे उत्तर प्रदेशात मात्र प्रत्येक सभेतून हिंद्त्वाच्या गर्जना होताना दिसतात. याचा अर्थ काय? याचाच अर्थ असा की ईथल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेतून माणसाचा वैचारीक विकास झाला हे त्याना कळले. म्हणजेच इथल्या शासनानी निव्वड आर्थीक विकासच नाही तर  माणसाचा वैचारीक विकास घडवला असून तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरोगामी धोरणाचा परिणाम आहे हे मोदी व समस्त भगवे जाणून होते. देशातील इतर भागातील मतदार अशा पुरोगामी शासनाच्या अभावामुळे आजही मुर्ख असून तिकडे हिंदूत्वाचा मुद्दा रेटता येतो व तो खपतो सुद्धा. पण महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राजकारणाच्या पलिकडे जाऊन फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा फुलविला व त्यातून पुरोगामी माणूस निर्माण केला नि जपला आहे. त्या पुरोगामी माणसापुढे आंधळे व भगवे मुद्दे उभे करायला मुंबईच्या सभेत मोदीची छाती झाली नाही ही आहे ख-या अर्थाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची कमाई....

आता थोडसं राजु शेट्टी बद्दल:
राजु शेट्टीला आपण सगळे शेतक-यांचा नेता म्हणून ओळखतो. एवढेच नव्हे तर शेतक-यांसाठी लाठ्या काठ्या खात राजू शेट्टीने जी चळवळ उभी केली  त्यातून शिवार ते संसद असा दैदिप्यमान प्रवास करुन आज राजू शेट्टी खासदार बनले... किंबहुना लोकानी त्याना बनविले. असे हे राजू शेट्टी नेमके आले कुठून तर... शरद जोशींच्या शेतकरी चळवळीतून आले. शरद जोशी स्वत:ला पुरोगामी मानत असत व सेना-भाजपाला ते नेहमी "जातीयवादी गिधाडं" असं संबोधत असत. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहीला. पण एक दिवस जोशींचा बुरखा टरकन फाटला व ते सेना-भाजपाला पाठिंबा दयायला निघाले. यावरुन राजून शेट्टीनी विरोध दर्शविला. फुले-शाहू-आंबेडकराचा पुरोगामी विचार जपणारा राजू शेट्टी आपल्या गुरुवरच उलटला व जातीयवादी गिधाडाशी मैत्री नको म्हणत वेगळी चूल मांडली. राजू शेट्टीच्या या स्वाभिमानी व बाणेदार कृतीला मुजरा करत पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य माणूस आता राजू शेट्टीच्या पाठीशी उभा झाला. त्यातून उदय झाला राजू शेट्टी नावाच्या नवा झंझावाताचा... पण आज जरासं पक्ष स्थिरावल्यावर हाच राजू शेट्टी त्याच जुन्या गिधाडांशी मैत्री करायला निघाला ज्यांच्या विरोधात दंड थोपटून स्वत:चं राजकीय अस्तित्व उभारलं होतं. म्हणजे पुरोगामीत्वाचा आव निव्वड पक्ष बळकटीसाठी आणला होता एवढेच... व कालची जातीयवादी गिधाडं आज राजू शेट्टी याना अचानक मित्र वाटू लागली आहेत... हा झाला राजू शेट्टी यांचा संक्षिप्त  इतिहास. 


आता परत सेना भाजपचं काय ते बघू. मुंबईच्या सभेत महार्जना करताना मोदीच्या घषात अडकलेला हिंदूत्व म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या  अथक परिश्रमातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरुगामीत्वाची पावती होती. कारण मोदी व सेना-भाजप हे चांगल्या प्रकारे जाणतात की इथला माणूस कसा आहे. अन राजू शेट्टी अशा पुरोगामी महाराष्ट्राला भगव्यांच्या दावणीला बांधायला निघाले या सारखी लज्जस्पद गोष्ट नाही. अत्यंत भ्रष्ट अशा भाजप-सेनेचे पाय चाटत हेच ते अमृत व तिर्थ आहे म्हणून गुणगाण गाणारे दास व शेतक-यांचे बाप्पे ख-या अर्थाने स्वताचाच घात करत आहेत. या पुरोगामी महाराष्ट्राला खोट्या व बनावट  विकासाची भुरळ पडेल असे दिसत नाही. पण दुर्दैवाने पडलीच तर भगव्या दहशतीचे व जातीयवादाचे चटके बसल्या शिवाय राहणार नाही. किंवा एकेकाळच्राया राजू शेट्टीच्या भाषेत सांगायचे तर ही जातीयवादी गिधाडं आमचे लचके तोडणार.   शेट्टी हे शेतक-यांचे नेते आहेत. इथला शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण नेहमी वाचत आलोय. आज राजू शेट्टीने महायुतीत प्रवेश केल्यावर मी एवढेच म्हणेण... एका शेतक-यानी केली राजकीय आत्महत्या...!!!

५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण!

धूम-३ नावाचा सिनेमा मी पहिलेला नाही नि वाचलेली परिक्षणं पाहता... पाहणे शक्यही नाही. त्यामुळे मी जे लिहतोय ते धूमचे परिक्षण नाही हे ही आधीच जाहीर करतो.  मग मी धूम-३ बद्दल काय लिहणार आहे? तर या सिनेम्यानी आज ५०० कोटीच्या कमाईचा आकडा पार केला. हे जाहीर करताना मिडीयाला उकड्या फुटल्या तर मी मात्र हळहळलो. कांद्याचा भाव ८० वर गेला की ओरडा करणारे शहरी लोकं (कारण खेड्यातली लोकं ओरडले तरी कोणी दखल घेत नाही व जे  खेड्यात असुनही  ओरडत नाही म्हणजे ते नक्कीच कांद्याचे उत्पादक असण्याची शक्यता असते. म्हणजे दोन्ही केस मध्ये खेड्यातील माणूस महागाईवर ओरडताना दिसत वा दाखवल्या जात नाही) ६००-८०० रुपये मोजून दर शुक्रवारी सिनेमे बघतात. तेंव्हा मात्र याना महागाई आठवत नाही... किंव अगदी याच धर्तीवर ही लोकं कधी एखाद्या सिनेमा गृहापुढे उभं राहून “आजकाल सिनेमे किती महाग झालेय... आमची लहान लहान मुलं बिचारी जांघा व मांड्या दाखविणा-या आयटम डान्सना मुकत आहेत” वगैरे म्हणत एखाद्या मल्टिप्लेक्सचा निषेध केल्याचे मी आजवर ऐकले/पाहिले नाही. त्याच बरोबर कांद्याचा भाव वाढला की  माईक धरुन धुमाकुळ घालणारे व दिसेल त्याला विचारत सुटणारे मिडीयावाले चुकूनही कधी मल्टिप्लेक्सच्या दारात उभं राहून तिकीट महाग झालं यावर आपलं काय मत आहे?” असा त्यांचा खानदानी  प्रश्न विचारतील तर शप्पथ... आता कोणी म्हणेल ती जिवनावश्यक वस्तू थोडीच आहे? बरोबर! ते मलाही माहित आहे... मलाही तेच म्हणायचं आहे... जी गोष्ट जिवनावश्यक नाही त्यावर आजची तरुणाई व श्रीमंत लोकं एवढा पैसा उधळतात की दर महिन्याला एक सिनेमा शंभर कोटीच्या घरात कमाई करतो हे कशाचं लक्षण आहे?  एवढा पैसा उधळणारा आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गातून आलेला दिसतो. भारतातील समस्त श्रीमंतानी किती कुंथून कुंथून सिनेमे पाहिले तरी सिनेमा ५०० कोटीच्या घरात जाणार नाही. मध्यम वर्गानी प्रतिसाद दिल्या शिवाय १८ दिवसात असा अवाढव्य आकडा पार करणे अशक्य आहे.
कांद्याचे भाव वाढले की ओरडतो तो मध्यम वर्गच पण हाच मध्यम वर्ग पोराना सिनेम्यासाठी ८०० रुपये देताना मात्र कचरत नाही... ही मनोवृत्ती  म्हणजे आत्ममग्न व स्वकेंद्रित समाजाची भर पडत  आहे याचा संकेत नव्हे का? त्यातून आजचा मध्यमवर्गीय तरुणही पैशाच्या बाबतीत बेबंध वागत चालला अन ही वृत्ती समाजाला व ओघाने देशाला मारक ठरणार हे कुणालाच का कळत नाही. त्यात अजुन भर काय तर आपल्या देशात क्रेडीट कार्डवर जगणारे कर्जकिडे मोठ्या प्रमाणात जन्माला येत आहेत. मागच्या दशक भरात या कर्जकिड्याना सदा डोक्यावर कर्ज घेऊन दिखाऊ जिवन जगण्याची सवय पडली आहे. एकुणच ही अमेरीकन संस्कॄतीची लागण इकडेही झाली एवढेच नव्हे तर प्रचंड बोकाळत चालली हेच  खरे.
आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात एका आठवड्यात सिनेमा हीट की फ्लॉप याचा निकाल लागतो... पण त्याच्या जोडीला १०० कोटीचा क्लब गाठणारे सिनेमे हा एक नवाच प्रकार मागच्या पाचेक वर्षात पहायला मिळत आहे. आज धूम बाबानी ५०० कोटीची कमाई फक्त १८ दिवसात केली हा या नव्या क्लब संस्कृतीचा कळस आहे. विचार करण्यासारखी गोष्ट काय तर हा कळस चढवितो कोण? आजचे तरुण! ते ही मध्यम वर्गीय.

देशातील बेरोजगारी टोकाला जात आहे... शेतकरी आत्महत्या करत आहे. मजूर व कामगार मुश्कीलिने रोजचे ३५ रुपये खर्च करु शकत आहे अन  अशा अवस्थेत भारतातील मध्य वर्गातील तरुण मात्र १८ दिवसात ५०० कोटी रुपये सिनेम्याच्या नावानी फुंकतो आहे... खरच माझा देश लाज वाटावी अशा विविधतेने नटलेला आहे, अजुन काय!!!