बुधवार, १५ जानेवारी, २०१४

नामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली!

एक विद्रोही कवी नि पॅंथरचे संस्थापक, यांच्या मृत्यूने आंबेडकरी चळवळीतील(कम्युनिस्ट धार्जिण्य) एक सच्चा शिपाई हरवला  असे म्हणता येईल. अमेरीकेतल्या ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवर मुंबईत पॅंथर संघटना उभी केली ती ढसाळ व ढालेनी. दादासाहेब गायकवाडानी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यावर रिपब्लिकनच्या रुपात घोंगावणारी आंबेडकरी समाजाची राजकीय चळवळ शांत झाली... विझून गेली.  त्यामुळे आंबेडकरी समाजात सत्तरच्या दशकात सर्वत्र असुरक्षीततेचा सूर व नेत्यांच्या गद्दारी विरुद्ध नाराजिचा लावा धगधगत होता. चळवळ ज्याच्या जगण्याचं अविभाज्य अंग बनलं होतं तो आंबेडकरी चळवळीविना अस्वस्थ होता. नेमकं तेंव्हाच ढसाळांचा निळा वाघ ’पॅंथर’ मुंबईतून गरजला. मग अशा वेळी नुकतेच्या जन्मलेल्या पॅंथर नावाच्या या निळ्या वाघाला घराघरातून दानागोटा मिळाला व हा हा म्हणता हा निळा पॅंथर प्रत्येक घरातून डरकाळी फोडताना दिसू लागला. अशा या पॅंथरचे जनक म्हणजे ढसाळ व ढाले. लगेच पॅंथर संघटनेची ताकट इतकी वाढली की सत्तरच्या दशकात ढसाळांच्या डरकाळीने उभा महाराष्ट्र हादरायचा... एवढा तो पॅंथरचा दरारा. पण लवकरच एक गुपीत बाहेर पडलं ते म्हणजे ढसाळ हे विचाराने कम्युनिस्ट निघाले अन आंबेडकरी जनता हबकली. याच कारणामुळे ढालेनी त्यांच्याशी फारकत घेतली व पॅंथर बरखास्त करण्याची घोषणा केली. उभा आंबेडकरी समाज बाबासाहेबाना आपला वैचारीक बाप मानतो त्या विचारासाठी जगतो.  पण ढसाळ मात्र दोन बापांचा वैचारीक वारसा सांगू लागले. बाबासाहेबांच्या जोडीला हळूच कार्ल मार्क्सला उभं केलं व आता जयभीमच्या जोडीला लाल सलामचा नारा उभा झाला. हेच आंबेडकरी जनतेला नापसंद पडले. आंबेडकरी जनता बाबासाहेबांशी वैचारीक पातळीवर एवढी एकनिष्ठ आहे की सरमिसळ करण्या-या नेत्याला पिटाळून लावते. ढसाळांशी नेमकं हेच घडलं. ढसाळांच्या लेखी हा एक प्रयोग होता तर आंबेडकरी समाजाच्या नजरेत तो एक अक्षम्य गुन्हा होता. अन अनावधानाने म्हणा की नेतेगिरीच्या गुर्मीत म्हणा पण गुन्हा घडला होता व ढसाळाना त्याची किंमत मोजावीच लागणार होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की साम्यवादाकडे झुकलेल्या ढसाळाना आंबेडकरी समाजानी कायमचं घरी बसवलं.
तिकडे कार्ल मार्क्सचा वारसा सांगणारी ब्रम्हो-कम्युनिस्टांची पिल्लावळ मात्र ढसाळांच्या या नव्या घोषणेने उड्या मारू लागली. पुढे कम्युनिस्ट ढसाळानी भगव्यांच्या कंपूत सामिल होऊन अनेक प्रयोग केलेत जे सगळेच्या सगळे फसले. अशा प्रकारे पॅंथर ढसाळांचा आंबेडकरी नेता म्हणूण मृत्यू झाला तो सत्तरच्या दशकातच... उरला तो फक्त साहित्यिक ढसाळ. पुढे साहित्यिक ढसाळानी अनेक प्रयत्न केले पण आंबेडकरी समाजानी त्याना चळवळ्या म्हणून कधीच स्विकारले नाही तर वळवळ्या म्हणून कायम नाकारले. कार्ल मार्क्सच्या पिल्लावळानाही पुढे जाऊन ढसाळ ओझं वाटू लागले. कारण त्यांची सगळी गणितं आंबेडकरी समाजानी हाणून पाडली होती. ढसाळाना कम्युनिस्टांच्या कंपूत तेंव्हाच मान सन्मान मिळाला असतात जेंव्हा ते निळी फौज लाल सलामच्या मागे उभी करु शकले असते... पण ते जमलं नाही... मग ढसाळांचं लाल चलवळीच्या दृष्टीनी मुल्य शुन्य... ढसाळाच्या खांद्यावरुन आंबेडकरी समाजाची शिकार करण्याची स्वप्न उध्वस्थ झाल्यावर कम्युनिस्टानी ढसाळाना टांग दाखविली. मग परत एकदा ढसाळानी आंबेकरी चळवळीतुन आपलं गमावलेलं स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली पण बाबासाहेबांच्या विचाराशी एकदा फारकत घेतली की त्याला चळवळीत स्थान नसते हे जनतेने दाखवुन दिले. त्यामुळे पुढची हयात समाना सारख्या दलित विरोधी शिवसेनेच्या दैनिकांतून स्तंभ लिहण्यात गेली.
ढसाळ खरंतर एक दर्जेदार कवी नि साहित्यिक होते. त्यांच्या लेखणीतून उतरणारा  प्रत्येक शब्द मनाचा वेध घेणारा तर कधी प्रस्थापित विचाराना सुरुंग लावणारा... कधी झोपलेल्याना गदागदा हलविणारा तर कधी कल्पनाविलासाच्या  डोंगराना  उध्वस्थ करणारा. आजवरच्या मराठी किंबहुना भारतीय साहित्याला एका वेगळ्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं ते ठसाळाच्या कवितेनी. आजवरचे सगळे प्रस्थापीत समिकरणाना छेद देत साहित्याला नव्या दिशा दिल्या त्या ढसाळानी... साहित्यिक ढसाळाची कुवत एवढी की साहित्याच्या साचेबद्द सीमा तडातडा तुटल्या. आजवर बंदिस्त असलेल्या साहित्यानी मोकळा श्वास घेत अभिजनांच्या मोजपट्टीला बाद ठरवत स्वत:ची साहित्यिक मोजपट्टी निर्माण केली. त्या मोजपट्टीने मुल्य ठरविलं जाऊ लागलं. पुढे या नव्या मोजपट्टीतल्या साहित्यात भर पडत गेली ती ढसाळांमुळेच. त्यानी मराठी साहित्याला नवा चेहरा नि विचार दिला. संत तुकारामा नंतर विद्रोहाचा  उद्रेक कवितेतून उतरविण्याचा खरा प्रयोग जर कुणी केला तर तो ढसाळानी. तुकारामा नंतर विद्रोही काव्य लिहणारे आजवरचे एकमेव महान कवी म्हणून ज्याना गौरवावं असं व्यक्तीमत्व म्हणजे नामदेव ढसाळ. ज्यांच्या काव्यातून उद्रेक उसळतो ते म्हणजे ढसाळ.
पण हाच साहित्यिक ढसाळ राजकारणाच्या व संघटनात्मक चळवळीच्या मैदाना मात खातो... बाबासाहेबांचा विचार व कार्ल मार्क्सचा विचार या दोन विचाराना एकत्र जोडुन एक नवा प्रयोग करण्याच विचार ढसाळाना भोवला व नेता ढसाळ सपाटून आपटला तो कायमचाच. 
दोन बापांचा वारसा त्याना महागात पडला हेच खरे. 
आज ज्यांचा मृत्यू झाला ते आंबेडकरी चळवळीने नाकारलेले कम्युनिस्ट व कन्फ्युज्ड नेतृत्व होते व चळवळ्या म्हणून ज्याची ओळख फार पुर्वीच मिटली अशी व्यक्ती होय. आता काही अर्ध-शहाने आमचा नेता गेला म्हणून उर बडवत आहेत ते केवळ अज्ञानामुळे...

तरी एक महान कवी नि साहित्यिक म्हणून उभा देश त्याना अनेक वर्ष हृदयात जपेल हे ही तेवढच खरं.

मी नामदेव ढसाळाना भावपुण श्रद्धांजली अर्पण करतो.

-जयभीम.

३ टिप्पण्या:

  1. I was waiting to read your comment on this since I read the news about Mr. Namdev Dhasal's death. In the news papers they use polished language. Your comment enlighten it. But he was a great poet as poetry came from his experiences and from the life what he saw. Abhay (USA number : 510-200-0354)

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा