शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

क्रिकेट - तीन लाकडं, अकरा माकडं :- ब्रिगेडचा झोल!

संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यानी पुरोगामीपणाचा कितीही आव आणला तरी वेळोवेळी त्यांचा जातीयवादीपणा उसळून येतोच. नुकत्याच पार पडलेल्या जिजाऊ महोत्सवात परत एकदा असाच जातीयवाद उसळला व आता ब्रिगेडचे नेते-कार्यकर्ते तोंड लपवत पळत आहेत. त्याला कारणही तसेच आहे... संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ या संघटना पुरोगामी गटात सामिल होताना बामणाना शिव्या घालणे हा एककलमी कार्यक्रम हाती घेउन नाचू लागल्या होत्या. मग पुरोगाम्यानाही हे ब्रिगेड नाच आपल्या तालाशी सुसंगत वाटलं. मग निळेपुरोगामी व भगवे-ब्रिगेडी मिळून  सूरतालाचा जबरी फ्यूजन करत अनेक नवे नाच नाचून घेतले. मग नुसतं नाचणं नाही तर मग काही अफलातून गाणी-मणी सुद्धा रचून-गाऊन झाले. त्यातलच एक गाणं(घोषणा) होतं क्रिकेटचा तिरस्कार करणारं. क्रिकेट  हा बनिया-बामणांचा खेळ असून देशाच्या तरुणाईला वाम मार्गाला लावत आहे अशी आरोळी करताना क्रिकेटच्या खेळाला “तीन लाकडं, अकरा माकडं” अस म्हणून ब्रिगेडच्या नेत्यानी लोकाना काहीतर अफलातून शोढ लावल्याचा व त्याचा आस्वाद घेण्यासाठी गळ घालू लागली. काहीतरी नवीन आलं की लगेच चाखायची सवय लागलेला आम-आदमी ब्रिगेडच्या सभेत हाजर झाला.  मग ही आकरा माकडं कोण? तर बनिये व बामण होतं... असं म्हटल्यावर प्रचंड टाळ्य़ा पडायच्या. तसा हा शोध नवीन नव्हता म्हणा त्याचा दावा करणारे नवीन होते. मग यातून अशीही एक पिढी निघताना मी पाहिली जी क्रिकेट पाहत नसे. क्रिकेटच्या नादी लागून परिक्षा तोंडावर असताना स्वत:चं नुकसान करणारे अनेक विध्यार्थी मी स्वत: पाहिले असल्यामुळे ब्रिगेडच्या स्लोगनमुळे होणारा परिणाम एका अर्थाने सुखावणारा होताच... पण लवकरच निराशी झाली. कारण ब्रिगेडला तत्व व  नितीमुल्ये ही सोयी नुसार बदलणारी चड्डी वाटतात हे जुणं दुखणं आहेच.  कधीही व केंव्हाही परस्पर विरोधी तत्वज्ञानाला लोंबकळत कार्यकर्त्यांचा व निष्ठावंताचा प्रचंड गोंधळ उडविण्यात ब्रिगेडचा हतखंडा आहे. मग यावेळीही तसच घडलं.
आजवर जो क्रिकेट ब्रिगेडीना माकडांचा खेळ वाटायचा त्यात अचानक यांचा मराठा पोरगा झडकला. कालवर जो क्रिकेट ब्रिगेडच्या नजरेत तुच्छ होता तोच खेळ अचानक इतका महत्वाचा होऊन गेला की मराठा सेवा संघाने या वर्षीचा “मराठा विश्वभुषण” हा पुरस्कार चक्क त्या मराठा माकडाला म्हणजेच विजय झोल याला जाहीर केला. ब्रिगेडची नितीमुल्ये, चळवळीचे मापदंड व पुरस्काराचे निकष हे कधीही व कशीही बदलू शकतात याचं हे जातीवंत उदाहरण आहे. मला विजय झोल बद्दल अजिबात आकस नाही तर उलट कौतुकच वाटतं, पण त्याच्या नावानी ब्रिगेडनी जो काही झोल केला त्यावर आक्षेप आहे. कालवर मराठा पोरगा खेळत नव्हता तेंव्हा जो खेळ तुम्हाला माकडांचा वाटायचा त्यात तुमचा पोरगा चमकल्या चमकल्या अचानक तो खेळ तुम्हाला संघटनेचा सर्वोच्च पुरस्कारायोग्य जर वाटत असले तर याचा अर्थ उद्या एखादा मराठा भाटगिरी व वेदमंत्र किंवा वेदांवर जागतीक भाषण गिषण दिल्यास व चार पेपरातून चमकल्यास तुम्हाला त्या वेदांचा पुडका येणार नाही याची काय गॅरंटी? किंवा एखाद्या मंदीराने-मठाने मराठ्याला उचलून शंकराचार्य बनविल्याश उद्या तुम्ही जातीयवादी तत्वज्ञानाचं पुरस्कार करणार नाही याची काय शाश्वती? कालवर क्रिकेटच्या खेळाडूना माकडं म्हणणारी ब्रिगेड स्वत:च माकड उड्या मारत एका क्रिकेट खेळाडूला पुरस्कार देते या कोलांट उडीला काय म्हणावे? की तुमची प्रत्येक कोलांट उडी लोकानी सीर-आंखोपर म्हणात तुमचं कौतूक करायचं? थोडक्यात झोलच्या रुपात ब्रिगेडचा झोल परत एकदा अधोरेखीत झाला.

एकंदरीत प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक तर ब्रिगेड व मराठा सेव संघ या संघटनां कोणतेही पक्के धोरण नाही अन नीतिमुल्ये नाही... जेंव्हा जे सोयीचे वाटले तेंव्हा ते उचलून एनकॅश करणे हे यांचं  एकमेव शाश्वत तत्वज्ञान आहे. दुसरी गोष्ट अशी की ही संघटना पुरोगामीत्वाचा कितीही आव आणत असली तरी जातीसाठी माती खाणारी संघटना असून झोलच्या निमित्ताने प्रचंड झोल करत उभ्या जिजाऊ उत्सवात ब्रिगेडनी परत एकदा माती खाली. यापुढेही माती खाण्याचे अनेक कार्यक्रम आपण पाहणार असून मी जमेल तसे त्यांचे अपडेट्स देईनच.

*****
जयभीम

८ टिप्पण्या:

 1. काही केलं तरी अडचण, नाही केलं तरी अडचण. तुम्ही सगळे मराठा सेवा संघाचे विरोधक दोन्हीकडून ढोलकं वाजवता. मुळात क्रिकेट संबंधी मराठा सेवा संघाची भूमिका समजून घेतलीत का? मराठा सेवा संघाचा कोणत्याही खेळाला विरोध नाही. कामधंदा सोडून क्रिकेटच्या नादाला लागणार्या बिनडोक मराठा-बहुजनांच्या अतिरेकी क्रिकेट प्रेमाला आळा बसावा म्हणून तशी वक्तव्ये केली गेली. आणि त्याचा फायदा जरूर झाला आहे.

  आणि कशाचाही संबंध कुठेही जोडणे फक्त तुम्हालाच शकते. वेदांचा, क्रिकेटचा आणि विश्वभूषण पुरस्काराचा काय संबंध? तुमच्या माहितीसाठी वेद सांगणारे भामटे मराठेही अस्तित्वात आहेत जसे कि नरेंद्र महाराज, त्याचे कौतुक केल्याचे दाखवून द्या. उलट नरेंद्र महाराजाचे भक्त राज्यभरात मराठा सेवा संघावर केसेस टाकत असतात.

  मुळात मराठा सेवा संघाची भूमिका समजून न घेता टीका करण्याचे फॅड वाढलेले आहे. आणि जर कुणी प्रतिवाद केला तर लगेच जातीवादी मराठे म्हणून बोंब मारायची, ह्या तळ्यात मळ्यात भूमिका सोडून जरा मराठा सेवा संघाचा अभ्यास करा.

  http://goo.gl/j1IXQc

  उत्तर द्याहटवा
 2. सत्यशोधक,
  बरं मग इतर एक दोन खेळाडूंची नावं सांगा ज्यानी तुम्ही पुरस्कार दिलात... म्हणजे आम्ही ते मान्य करु.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मराठा विश्वभूषण पुरस्कारासाठी केवळ खेळ हाच एक निकष नाही. आणि फक्त रूढार्थाने मराठा जातीच्या लोकांना पुरस्कार दिला जात नाही. मराठा सेवा संघाची "मराठा" शब्दाची संकल्पना व्यापक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मराठा-बहुजनांना हा पुरस्कार दिला जातो. सध्या तरी हा पुरस्कार आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला गेला आहे ज्यात रिपिटेशन नाही. भविष्यात आणखी एखाद्या खेळाडूला दिला जाऊ शकतो.

   हटवा
 3. सत्यशोधक,
  तुमचे नाव अन मोबाईल नंबर टाका आधी.
  मग चर्चा करु.
  अन्यथा तुमच्या दोन्ही कमेंट डिलीट कराव्या लागतील. कारण निनावी किंवा फेक नावाच्या कमेंट्स मी प्रकाशीत करत नाही.
  उद्या दुपारी १२ पर्यंत तुमचे डिटेल्स न आल्यास प्रतिक्रिया उडविल्या जातील. कारण तोंड लपवून चर्चा करणा-यांशी मी चर्चा करत नाही.

  उत्तर द्याहटवा
 4. सर , मागे बिग्रेडचा तीन लाकडं, अकरा माकडं हा लेख मी पण वाचला होता , त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणारा विश्वभुषण हा पुरस्कार देन खर अचंबित करणार आहे

  उत्तर द्याहटवा
 5. mla tar ase watatay ki briged/maratha seva sangh hi reservation sathi bramhana shivya det aahe ... Kal parwa kase tyanchya hatat hat ghalun hindat hote aata dusarikade malai disat aahe ti khanyasathi ikde yet aahet... Tumche briged vishai mat sanga

  उत्तर द्याहटवा
 6. काही लोकं "माझी कमेंट प्रकाशीत करा" म्हणून ब्लोगवर सारखं कमेंट टाकत आहेत पण स्वत: मात्र ओळख लपवून बसले आहेत. जे चर्चेचा आव आणतात पण स्वत:ची ओळख सांगण्याची हिंमत नसते अशा चोरांच्या कमेंटस मी छापत नाही. माझ्या ब्लोगवर आधीच तशी पाटी लावली ठेवली आहे. ती अट पुर्ण करणा-यांच्याच प्रतिक्रिया छापल्या जातील.

  उत्तर द्याहटवा