शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

नमो : चायवाला चीफ मिनिस्टर!

कॉंग्रेस पक्ष हा फक्त पुरोगामीच नाही तर अत्यंत सभ्य, विनयशील नि  प्रगल्भ लोकांचा पक्ष आहे. ६५०० जातींमध्ये विभागलेल्या देशाला मागच्या पाऊन शतका पासून चालविण्याची किमया कॉंग्रेसनेच करुन दाखविली आहे. मधले एक दोन अपवाद सोडले तर ईथली सत्ता कायमच कॉंग्रेसकडे राहीली.  जातीयवादी घटकांचे अनेक घात झेलत कॉंग्रेसनी इथल्या माणसला सांभाळले  व ते करताना तारेवरची कसरत केली. यशवंतराव चव्हानां पासून शरद पवारांसारखे दिग्गज कॉंग्रेसचे सोबती राहीले आहेत. विनयशिलता व सभ्यता ही कायमच कॉंग्रेस पक्षाची ओळख राहीली आहे. सेनेचे अध्यळ बाळ ठाकरे अगदी फाटक्या तोंडाचे, त्यामुळे महाराष्ट्रातील संयत नेतृत्व पवार यांची विनयशीलता अजुनच उठून दिसली. केंद्रात  वाजपेयींचा एक अपवाद सोडला तर बाकी सगळे भगवे नि डावे प्रचंड आक्रमक. या सगळ्या अक्रमकांच्या मध्ये कॉंग्रेस नेहमीच आपल्या प्रगल्भ वर्तनाचे दर्शन घडवत राहीला आहे.  पण हल्ली मात्र दिग्गी-तिवारीची जोडी जेंव्हा पासून बरळायला लागली तेंव्हा पासून कॉंगेसची एकूण प्रतिमा बदलत आहे, मलीन होत आहे. या अशा भुंकणा-या कुत्र्याना मोकाट सोडल्यामूळे सोनीया गांधी यांच्या बद्दलचा आदरही कमी होत आहे.
मागच्या आठवड्यात कॉंग्रेसच्या मणीशंकरनी मोदीला उद्देशून म्हटले की “हवं तर मोदीनी आमच्या सभेत चहाचा स्टॉल लावावा” अन स्वत:च फिदी फिदी हसून घेतलं. काहीच कारण नसताना उगीच  भाजपला डिवचले. संघ व भाजप याआधी नेहमीच असल्या डिवचण्याना जशास तसे उत्तर देत आला आहे. पण यावेळी मात्र यावरुन पलटवार करण्यापेक्षा या वाक्याच भांडवल करुन चक्क कॉंगेसला गिरीबांची टर उडविणारा श्रीमंतांचा पक्ष असं प्रोजेक्ट करण्याची अफलातून शक्कल  भाजपने लढविली आहे. मणिशंकरच्या या कमेंट नंतरच्या सभेतून बोलताना मोदी ठासून ठासून सांगू लागले की “बघा, मी एक चहावाला असल्यामूळे या कॉंग्रेसला पहावत नाही. माझ्या सोबत बसायला याना कमिपणा वाटतो, या पक्षाला माझ्या सारखे गरीब व चहा विकणारे लोक तुच्छ वाटतात. हा पक्ष गरीबांना कसा बोलतो बघा....” वगैरे मोदींचे सुरु झाले. खरं तर कॉंगेसला किंवा मनीभाऊला अपेक्षीत होते की यावरुन भाजपं काहीतर वजनदार कमेंट मारेल व मग त्याना आपण कोंडीत धरु. पण मोदीनी चक्क चहावाला स्टेटस Accepted म्हटलं व आता तोच धागा  धरुन डाव उलटवायला सुरुवात केली.  "मी एक चहावाला, गरीब चीफ मिनिस्टर" म्हणत कॉंग्रेसला गरीब विरोधी पक्ष म्हणत रान पेटविणे सुरु झाले. मोदीचे  हे वाक्य कोणाला अपील होवो न होवो पण देशातल्या तमाम चहावाल्याना तरी अपील होतच असेल ना... म्हणजे येणा-या निवडणूकीत भाजपानी तमाम चहावाल्यांचे वोट जमेस धरायला हरकत नाही... अन चहावाल्यांचे वोट गमावण्यास कारणीभूत आहेत कॉंगेसचे मणिभाऊ.
बाकी काही असो...मी एकच म्हणेन... भाजप झाली हुशार बाप्पा!!!


टीप:- हा बाप्पा म्हणजे गणपतीचा नव्हे तर आमच्या विदर्भातली ईश्टाईल हय. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा