मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

राजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या!

रामदास आठवलेनी जातीयवादी पक्षाच्या गोटात शिरून राजकीय आत्महत्या केली. समस्त आंबेडकरी समाजाशी गद्दारी करत भगव्यांच्या दारात भिक्षा पात्र घेऊन उभा असलेला रामदास रामाचे दास्य करण्या वाचून अजुन काही करु शकणार नाही हेच खरे. पण त्याच्य जोडीला शेतक-याचा नेता म्हणविनारा राजू शेट्टी यानी आज वाज्या गाज्यात संघाची चड्डी घातली अन समस्त शेतक-यानी तोंडात बोटं घातली. जातीयवाद्याच्या गोटात शिरुन पुरोगाम्यांशी लढण्याचा विचार करणारे हे राजकीय रातकिडे शेवटी संघाचा सूर लावणारे जातकिडे निघाले.  भारतीय राजकारणाला भ्रष्टाचाराची कीड लागली म्हणून दिवस रात्र तार स्वरात हिंडणारे संघाचे नि सेनेचे जातकिडे हे विसरतात की स्टींग ऑपरेशनद्वारे भ्रष्टाचाराचे बुरखे फाडण्याची सुरुवात तुमच्याच एका नेत्यापासून झाली होती. स्वच्छ प्रतिमेचा आव आणणारे व प्रगतीचे गाण गाणारे भगवे हे विसरतात की नितीन गडकरीच्या पुर्ती समूहातील प्रचंड घोटाळे व गोपिनाथ मुंडेच्या जिभेतून  निसटलेले निवडणूकीचे कोटीचे आकडॆ म्हणजे समस्त भगव्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. तरीही मेरी ही लाल म्हणत माकड उड्या मारणारे चड्डीवाले व त्यांचे लाल टिळ्याचे सोंगाळे बाता काय मारतात तर म्हणे यांचा लढा स्वच्छ प्रतिमेच्या आग्रहासाठी व देशाच्या विकासासाठी आहे.
चला एकदा माणून चालू की ही लोकं आर्थिक विकास साधून दाखवतीलही... पण आर्थीक प्रगती म्हणजे समाजाचा विकास होय का? अजिबात नाही. सामाजीक वातावरण दहशतीचं असल्यावर पैसा कोण्या कामाचा? आर्थिक विकास ही माणसाची जणू एकमेव गरज असून तो प्रश्न सुटला की सगळे प्रश्न सुटतात असा आवा आणणारे हे भगवे सामाजीक सुरक्षितते बद्दल ब्र शब्द बोलत नाही.  माणसाकडे पैसा नसतानाही वा अत्यल्प पैशातही तो सुखानी जगू शकतो. कारण पैसा हा गरजांशी निगडीत असून गरजांशी तोडजोड करत जगणे माणसाला चांगलेच ठाऊक आहे. पण मानवी हक्क नाकारात जातीयवाद बोकाळला गेला व उरात धडकी भरणारी दहशत घेऊन एखादा माणूस चैनीने झोपू शकेल का? अशक्य आहे. मग आजचे हे भगवे जे विकासाच्या बाता मारत आहेत यांच्या एकुण मनोवृत्तीचा ज्याना अंदाज आहे त्याना हे चांगलेच माहीत आहे की भगवा राज्य म्हणजे दहशतीचे राज्य. आज उभा गुजरात दहशतीत जगतो आहे. तिथला दलीत व मुस्लीम संवर्णांच्यापुढे गुलामा सारखा वागतो आहे. आर्थिक विकास साधलेल्या(?) गुजरातेतील दहशतीत जगणा-या माणसांच्या आयुष्यातील ही पोकळी कुठल्याही पैशानी भरुन निघणार नाही. पण अगदी याच्या उलट महाराष्ट्रातील तळागळातला माणूस पैशानी थोडं मागे असला तरी भगव्या दहशती पासून तो मुक्त आहे ही जमेची बाजू नाही का? की आर्थीक विकासाच्या नावाखाली भगवी दहशत विकत घ्यायची?
यावेळी नरेंद्र मोदीनी मुंबईत सभा घेतली तेंव्हा एका शब्दानी हिंदूत्वाचा मुद्दा काढला नाही.  पण अगदी याच्या उलट तिकडे उत्तर प्रदेशात मात्र प्रत्येक सभेतून हिंद्त्वाच्या गर्जना होताना दिसतात. याचा अर्थ काय? याचाच अर्थ असा की ईथल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेतून माणसाचा वैचारीक विकास झाला हे त्याना कळले. म्हणजेच इथल्या शासनानी निव्वड आर्थीक विकासच नाही तर  माणसाचा वैचारीक विकास घडवला असून तो कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पुरोगामी धोरणाचा परिणाम आहे हे मोदी व समस्त भगवे जाणून होते. देशातील इतर भागातील मतदार अशा पुरोगामी शासनाच्या अभावामुळे आजही मुर्ख असून तिकडे हिंदूत्वाचा मुद्दा रेटता येतो व तो खपतो सुद्धा. पण महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राजकारणाच्या पलिकडे जाऊन फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा फुलविला व त्यातून पुरोगामी माणूस निर्माण केला नि जपला आहे. त्या पुरोगामी माणसापुढे आंधळे व भगवे मुद्दे उभे करायला मुंबईच्या सभेत मोदीची छाती झाली नाही ही आहे ख-या अर्थाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची कमाई....

आता थोडसं राजु शेट्टी बद्दल:
राजु शेट्टीला आपण सगळे शेतक-यांचा नेता म्हणून ओळखतो. एवढेच नव्हे तर शेतक-यांसाठी लाठ्या काठ्या खात राजू शेट्टीने जी चळवळ उभी केली  त्यातून शिवार ते संसद असा दैदिप्यमान प्रवास करुन आज राजू शेट्टी खासदार बनले... किंबहुना लोकानी त्याना बनविले. असे हे राजू शेट्टी नेमके आले कुठून तर... शरद जोशींच्या शेतकरी चळवळीतून आले. शरद जोशी स्वत:ला पुरोगामी मानत असत व सेना-भाजपाला ते नेहमी "जातीयवादी गिधाडं" असं संबोधत असत. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहीला. पण एक दिवस जोशींचा बुरखा टरकन फाटला व ते सेना-भाजपाला पाठिंबा दयायला निघाले. यावरुन राजून शेट्टीनी विरोध दर्शविला. फुले-शाहू-आंबेडकराचा पुरोगामी विचार जपणारा राजू शेट्टी आपल्या गुरुवरच उलटला व जातीयवादी गिधाडाशी मैत्री नको म्हणत वेगळी चूल मांडली. राजू शेट्टीच्या या स्वाभिमानी व बाणेदार कृतीला मुजरा करत पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य माणूस आता राजू शेट्टीच्या पाठीशी उभा झाला. त्यातून उदय झाला राजू शेट्टी नावाच्या नवा झंझावाताचा... पण आज जरासं पक्ष स्थिरावल्यावर हाच राजू शेट्टी त्याच जुन्या गिधाडांशी मैत्री करायला निघाला ज्यांच्या विरोधात दंड थोपटून स्वत:चं राजकीय अस्तित्व उभारलं होतं. म्हणजे पुरोगामीत्वाचा आव निव्वड पक्ष बळकटीसाठी आणला होता एवढेच... व कालची जातीयवादी गिधाडं आज राजू शेट्टी याना अचानक मित्र वाटू लागली आहेत... हा झाला राजू शेट्टी यांचा संक्षिप्त  इतिहास. 


आता परत सेना भाजपचं काय ते बघू. मुंबईच्या सभेत महार्जना करताना मोदीच्या घषात अडकलेला हिंदूत्व म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या  अथक परिश्रमातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरुगामीत्वाची पावती होती. कारण मोदी व सेना-भाजप हे चांगल्या प्रकारे जाणतात की इथला माणूस कसा आहे. अन राजू शेट्टी अशा पुरोगामी महाराष्ट्राला भगव्यांच्या दावणीला बांधायला निघाले या सारखी लज्जस्पद गोष्ट नाही. अत्यंत भ्रष्ट अशा भाजप-सेनेचे पाय चाटत हेच ते अमृत व तिर्थ आहे म्हणून गुणगाण गाणारे दास व शेतक-यांचे बाप्पे ख-या अर्थाने स्वताचाच घात करत आहेत. या पुरोगामी महाराष्ट्राला खोट्या व बनावट  विकासाची भुरळ पडेल असे दिसत नाही. पण दुर्दैवाने पडलीच तर भगव्या दहशतीचे व जातीयवादाचे चटके बसल्या शिवाय राहणार नाही. किंवा एकेकाळच्राया राजू शेट्टीच्या भाषेत सांगायचे तर ही जातीयवादी गिधाडं आमचे लचके तोडणार.   शेट्टी हे शेतक-यांचे नेते आहेत. इथला शेतकरी आत्महत्या करतोय हे आपण नेहमी वाचत आलोय. आज राजू शेट्टीने महायुतीत प्रवेश केल्यावर मी एवढेच म्हणेण... एका शेतक-यानी केली राजकीय आत्महत्या...!!!

५ टिप्पण्या:

 1. Mr. Ramteke, if Maharashtra Govt is progressive then why farmers committ suicide? Or as per your logic, those suicides are due to BJP/Sena? Can you explain this self contradiction in your statements?

  उत्तर द्याहटवा
 2. अमित साहेब,
  आत्महत्या ह्या नक्कीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उदासीन वृत्तीचे परिपाक आहे. पण त्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही जातीयवाद्याना सत्तेत बसवा.

  उत्तर द्याहटवा
 3. Mr. Ramteke, you have to understand that India is democratic country. Who gets more seats in the Vidhansabha/Loksabha will form Government. Hence when a party wins others have to accept the verdict. Thats the process India has accepted. So calling BJP/Sena as Jatiyvadi will not help. If they win, they will form Government. What you need to understand is the social aspects of this. Why even after 60 years, caste system exists? And who is promoting to keep it like that?

  उत्तर द्याहटवा
 4. Jai him sir thanks to criticised on raju shettee changing stance. Sir any non political organization ;pressor group ;interest group always merge in to polical party .so settee has done as per political manner .we don't need to make any comment.because he represent class struggle.

  उत्तर द्याहटवा
 5. Mulat republican party ani swabhiman party hi navach badlun hya jatiyavadi sena bjp kadun konti nav pakshala sut hotil te nav dila pahije.
  Swabhiman ha athavale saheb ani raju shettisahebani gahan takla ahe ani yache utter hi janta hya nivadnukit tyana nakkich dakhvun deil.

  उत्तर द्याहटवा