शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

सोनीया गांधीनी झग्ग लेवून दारू वाटावी!

मोदी नावाचे वादळ कॉंग्रेसिना प्रचंड अस्वस्थ करत आहे हे उघडच आहे पण त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील मान्यवर नेते सैरभैर होत वाट्टॆल ते बरळत आहेत ही गोष्ट मात्र कॉंग्रेसचे पतन करणार हे मात्र खरे. दिग्गी व मनिष नावाची दोन बेअक्कल माणसं अत्यंत खालच्या थराला जाउन कमेंट करत असतात. मी मागे त्यांच्यावर “भुंकणारी दोन कुत्री” नावानी एक पोस्ट लिहली होती. त्याच बरोबर जयरामही अधेमधे बरळत असतात पण आज मणीशंकर अय्यरनी जी काही ओकारी ओकली ती कोणत्याही नेत्याला न शोभणारी असून  कॉंग्रेसची उरली सुरली इज्जत टांगली गेली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी असून तुल्यबळ नेत्याला तो मान देत बोलावे याचेही भान दिसत नाही. देशातील एवढ्या मोठ्या पदाच्या प्रतिस्पर्ध्याशी बोलताना, त्यावर कमेंट करताना त्या पदाचा नि व्यक्तीचा मान राखूनच बोलले जावे ही बेसीक विनयशीलता कॉंग्रेस विसरला दिसतो.  शरद पवारांसारख्या अत्यंत विनम्र नेत्याशी ज्या लोकांचे उठणे बसणे आहे त्यांच्यात एवढी सुद्ध विनयशीलता असू नये या मागे थेट बाईचे अभय आहे हेच खरे.  इतरांकडून एटीकेट्स न पाळणे एकदाचे मान्यच पण सरकारी पदावर आरुढ नि जबाबदार व्यक्तीनी सुद्धा पदाला शोभेल अशी भाषा न वापरणे  ही मात्र लांछनास्पद बाब आहे. मनिष तिवारी, दिग्गी व मणीशंकर अय्यर हे काही गल्ली बोळातले मवाली नाहीत की त्यानी काहिही बोलावं... भारताची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्या पक्षातील व  महत्वाच्या पदावरील ही माणसं आपल्या पदाचा व अपेक्षीत विनयशीलतेचा विचार न करता जे काही बोलतात ते पाहता सोनीया गांधी यानी आपली नैतिक बांधिलकी म्हणून या तीघाना पिटाळायला हवे होते. पण आता असे वाटू लागले आहे की याना अभय देऊन असे करण्यात सोनीयांचाच हात आहे.
जर तसे नसते ते यांची एवढी हिंम्मत झालीच नसती. पण या एकूण वर्तनातुन जागतिक पातळीवर आपली छी-थू होत असेल तर त्याला या तिकडीपेक्षा सोनीया गांधीच जास्त जबाबदार आहेत.
“मोदीनी हवं तर कॉंग्रेसच्या बैठकीत चहाचा स्टॉल लावावा”
आहे की नाही कमाल? तुमचं पद काय, तुम्ही बोलता काय? काही भान असवं की नाही? मोदी हे अत्यंत गरीब घराण्यातून आले असून कोणे एकेकाळी ते चहा विकायचे हा इतिहास सर्वाणाच माहीत आहे. हा त्यांचा जुना व्यवसाय ती काळाची गरज होती. पण आज त्या व्यवसायावरुन मोदीला हिणविणे म्हनजे तो जातीयवादच ठरतो. मग अगदी याच मोजपट्टीने मोजायचे म्हटल्यास सोनीया गांधी कोणे काळी हॉटेलात वेट्रेस म्हणून काम करायच्या व तर्र झालेल्या ग्राहकांच्या ग्लासात दारु ओतून एक छानसी स्माईल द्यायच्या. आता जर भाजपाकडून असं स्टेटमेंट आलं की... “उद्या जर कॉंग्रेस हारलीच तर सोनीया बाईनं  आमच्या पार्टीत डीनर सर्व्ह करावा”  तर कॉंग्रेसला चालेल का? नाही ना. मग अगदी तशाच धाटणीचा शेरा कॉंग्रेसचे जबाबदारी मंत्री मारतात व सोनीयाबाई मूग गिळून बसते याला काय म्हणावे.

सोनीया गांधी यांच्या बद्दल जो काही आदर आहे तो अशा छुप्या नि विकृती खेळ्यांमूळे नक्कीच कमी होणार. पुढच्या काळात या सगळ्या गोष्टींचा कॉंगेसला परिणाम भोगावा लागणारच आहे. नाही भोगावं लागलं तरी सोनीया गांधी यानी तीन कुत्र्यांच्या माध्यमांतून जी वयक्तीक पातळीवरील शेरेबाजी चालविली आहे किंवा आपण त्याना न आवरता मूक संमती दिली आहे ते पाहता सोनीय़ा गांधी या विचारानी विकृत व अत्यंत खालच्या थराला जाणा-या तूच्छ व्यक्ती आहेत हेच सिद्ध होते. या निष्कर्षावर प्रतिवादच होऊ शकत नाही.

तीन कुत्र्यांच्या आडून सोनीया गांधीनी जे काही चालविले आहे त्याचा मी निषेध करतो. एवढेच नाही तर सोनीया गांधीला जी भाषा समजते त्या भाषेत शेरा ही देतो की... 
"इतक्या खालच्या पातळीवरील कमेंट करणा-याना पोटात घालणा-या सोनीया गांधी यानी वेट्रेसचा झग्गा लेवून भाजपाच्या बैठकीत दारू वाटावी"

*****
जयभीम

टीप: ही पोस्ट म्हणजे कानपिचक्या समजावे. कॉंग्रेसचा मी पारंपारीक मतदारही आहे व समर्थकही.

४ टिप्पण्या:

  1. रामटेके, अहो झालंय काय तुम्हाला ? बहुदा कॉंग्रेसच्या दिसत असलेल्या संभाव्य पराभवामुळे तुम्ही घाबरून गेलाय . घराच्या राखणीला काही कुत्री लागतातच . कुत्र्याचे स्वभावगुण मालकावर लादून तुम्ही मालकावर इतक्या वाईट पद्धतीने घसरणे मला तरी चुकीचे वाटते . याआधी मोदींवर बोलू नका म्हणून कॉंग्रेसने चूकच केले . त्यात आणि जर या भुंका थांबल्या तर लढण्या आधी तलवार म्यान असा प्रकार होईल. त्यामुळे चाललंय ते ठीक आहे . संघवाले सोनिया गांधीना bargirl म्हणतात म्हणून तुम्ही तसे म्हणणे चुकीचे आहे. बाई चे धाडस खूप आहे. जीवाची भीती असून सुद्धा भारतीयांच्या घाणेरड्या राजकारणात ती जे योगदान देत आहे ते कौतुकास्पदच आहे .

    उत्तर द्याहटवा
  2. नरेंद्र साहेब,
    मला सोनीया गांधी बद्दल आदर असणे व मी कॉंग्रेसचा मतदार असणे या दोन्ही गोष्टीत काडीचाही बदल झालेला नाही व नजीकच्या काळात होण्याची शक्यताही नाही... किमान २०१४च्या मतदाना पर्यंत तरी नक्कीच नाही. याचा अर्थ एखादी गोष्ट पटली नसल्यास कानपिचक्या घेऊ नये असे थोडीच आहे!

    उत्तर द्याहटवा