शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

मोदीची बायको, इत्ता गहजब कायको?

भारतीय राजकारणात कधी नव्हे तेवढं वादळ उठवून देणारं रांगळं व्यक्तीमत्व म्हणजे नरेंद्र मोदी. खरं तर मोदी विरुद्ध कोणीच नाही... हो मोदी विरुद्ध कोणी नाही असाच हा लढा आहे. मोदी हवा किंवा मोदी नको अशी परिस्थीती आहे. मोदी हवा की राहूल? किंवा मोदी हवा की केजरीवाल किंवा मोदी हवा की ममता? असं कुठलच समिकरण उभं होऊ शकलं नाही एवढी मोदीची लाट या देशात आली. मग ती कोणी मान्य करो अथवा ना करो. भारतीय राजकारणात पहिल्यांदाच अशी स्थीती निर्माण झाली की अमूक एक व्यक्ती हवी किंवा नको अशा दोन मतप्रवाहात उभा देश विभागला गेला आहे. या आधी इंदीरा हटाव म्हणत सतरा टोळक्यानी एकत्र येऊन नारा दिला होता तेंव्हा गरीबी हटाव म्हणत उभ्या ठाकलेल्या इंदिराच्यावेळी जवळपास असाच अनुभव भारतीयानी अनुभवला होता. पण तेंव्हा इंदिराच्या विरोधात तोडीचे विरोधकही दिसले... मोदीच्या बाबतीत तसा तीव्र विरोध करणारा तुल्यबळ नेता विरोधकाना अजुनतरी गवसला नाही. कालच ९१ जागांवर झालेल्या मतदानातील विक्रमी वाढ पाहता विरोधक प्रचंड धास्तावलेले दिसत आहेत. मोदीच्या विरोधात प्रचार करायला गोध्राकांड व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मुद्दा हाती नसल्याने विरोधक हताश व निराश झाल्याचे दिसत आहेत. नुकत्याच प्रकाशीत जाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा जरी असला तरी भाजपने अत्यंत शिताफिने शब्दाची मांडनी करत “संविधानिक मार्गाने मंदीर बनवू” असे म्हटले. त्यामुळे “बघा... हे मंदिराच्या बाता करत आहेत” वगैरे ओरडा करायलाही स्कोप उरला नाही. कारण ’संविधानिक मार्गाने’ या दोन शब्दानी विरोधकांच्या तलवारींची धार बोथट करुन टाकली. अशा परिस्थीती परवा मोदीनी बडोद्यातून भरलेल्या अर्जात बायकोचे नाव “जशोदाबेन” असे लिहल्यावर कॉंग्रेस व विरोधकानी एकच गिल्ला केला.
मोदी विवाहीत की अविवाहीत या मुद्द्यावर राजकारणी व मिडीयाचे बरेच दिवसापासून रवंथ चालू आहे. ४५ वर्षा पुर्वीच मला बायको नको म्हणून घराबाहेर पडलेल्या मोदीच्या बायकोला शोधून काढून “मोदीची बायको सापडली... मोदीची बायको सापडली” म्हणत माकड उड्या मारणा-या मिडीयाच्या सुरात सूर मिसळणारे राजकारणी म्हणजे नैतिक अध्यपत:नाचा अस्सल नमूना होय.
आज दि. ११ एप्रिल २०१४ च्या टाईम्स ऒफ इंडियाच्या पहिल्या व अकरा नंबर पानावर मिळून(एकत्री) संपुर्ण पान भर होईल एवढी माहिती छापली आहे. या माहिती प्रमाणे जशोदाबेन मोदीचे बंधू कमलेश म्हणतात...  त्यांच्या बहिणीचा विवाह १९६८ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबत झाला. त्या नंतर दोन अडीच वर्षात मोदीनी घर सोडले व तेंव्हा पासून यशादाबेन ही माहेरीच राहते आहे. मोदीनी त्या काळात यशोदाबेनला शिकायला लावले व शिक्षीका म्हणून सरकारी नोकरी करण्यास प्रोत्साहनही दिले. त्या आता ६२ वर्षाच्या असून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. गंमत म्हणजे यशोदाबेन व त्यांच्या नात्यातल्यांची अजिबात तक्रार नसून सुद्धा मिडीया व राजकारणी मात्र याला चुनावी मुद्दा बनवून कसे मोदीचे नामोहरम करता येईल याच्या प्रयत्नात आहेत. 
नरेंद्र मोदीचा जन्म १७ सप्टे १९५०चा असून कमलेशभाई म्हणतात त्या प्रमाणे लग्न  १९६८ ला झाले. हे लग्न सप्टेबरच्या आधी झाले की नंतर ते लिहलेले नाही... पण जर का लग्न सप्टेबरच्या आधी झाले असेल तर मग मोदीना वयाची १८ वर्षे पुर्ण व्हायची होती. मुलाचे लग्नाचे वय २१ असावे लागते(तेंव्हा किती होते माहित नाही) अन मोदीचे वय तर १८ सुद्धा पुर्ण झालेले नव्हते. म्हणजे मोदीचा यशोदाबेन सोबतचा विवाह बालविवाह ठरतो. जर तो विवाह बालविवाह ठरत असेल तर मोदी कायदेशीररित्या त्या विवाहास बांधील नव्हते व आजही नाहीत. कायद्याच्या भाषेत तो विवाह VOID MARRIAGE म्हणून बाद ठरतो.  ही झाली एक बाजू...
या लग्नाची दुसरी बाजू अशी की १९६८ मध्ये लग्न झाले व दोन अडीच वर्षात मोदी घर सोडून निघून गेले. तेंव्हा पासून आजवर जवळपास ४५ वर्ष मोदी व यशोदाबेन यांच्यात कोणतेच संबंध नाही. आजच्या घडीला मोदी रोज पेपरातून व टी.व्ही.तून झडकत असतात पण त्या काळात मात्र ते असे झडकत  नव्हते. तीन वर्षे हिमालयात काढली व उरलेली वर्षे संघाच्या प्रचारात... या दरम्यान घराशी संपुर्ण नाते तोडले होते. म्हणजे एकूण परिस्थीती पाहता त्या काळात मोदी कुठे आहे, कसा आहे, जिवंत आहे की मेला याचा कुठलाच पत्ता जशोदाबेनला नव्हता अशी शक्यता आहे. तसे असल्यास सलग सात वर्षे नव-याचा ठावठिकाणा नाही या ग्राउंडवर यशोदाबेनला बायडिफॉल्ट घटस्फोट मिळून विवाह बाद ठरला.  अन जर पत्ता असला नि यशोदाबेनला मोदीशी संसार करायचा होता असे गृहीत धरले तरी वयाची २१ पुर्ण झाल्यावर १८ व्या वर्षी आई-वडलानी लावून दिलेलं लग्न नाकारण्याचा मोदीला संविधानिक अधिकार होता व आहे. त्यामुळे मोदीनी बालिग झाल्या नंतर हा विवाह नाकारल्यास सर्व ग्राउंड्सवर कायदा मोदीच्या बाजूनेच उभा राहतो. हा झाला कायद्याच्या भाषेतील युक्तीवाद...
आता नैतिक बाजूचा बाऊ करणा-यांचे मत बघू या...
मिडीया व दिग्गीराजे मिळून मोदीविरोधी दळण दळतच आहेत. काल एका मिडीयावाल्याने दिग्गीसमोर माईक धरुन मोदीच्या विवाहा बद्दल तुमचे काय म्हणणे आहे असे विचारल्यावर दिग्गी म्हणाले “मोदीनी आपल्या विवाहीत पत्नीला जी वागणूक दिली व ज्या प्रकारे ते आजवर खोटे बोलत राहिले ते पाहता भारतीय स्त्री मतदारांचा मोदीवरील विश्वास उडाला आहे” वगैरे झाडून मोकळा. अरे दिग्गीभाऊ... भारतीय स्त्री मतदाराना काय मोदीशी लग्न करायचे आहे का? दिग्गीचं प्रचंड कन्फ्यूजन झालेलं दिसतेय. भारतीय स्त्रीया मतदान करताना संबंधीत उमेदवारातील नवरोबाचे गूण तपासतात की नेतोबाचे हेच दिग्गीला कळलेले दिसत नाही. अन नैतिकता म्हणाल तर बालिग(मेजर) झाल्यावर बालविवाह नाकारण्याचा मोदीला संविधानिक अधिकारही आहे व नैतिक अधिकारही. उलट मी म्हणतो समस्त स्त्री मतदाराना मोदी बद्दल सहानुभूती वाटायला हवी.  कारण समाजिक चालिरीतीच्या नावाखाली एका १७ वर्षाच्या पोराचा लग्नाच्या नावाने बळी देण्यात आला. या लग्नामुळे जशोदाबेनचे आयुष्य उध्वस्थ झाले असे जरी प्राथमिक चित्र दिसले तरी एका मोदी नावाच्या तरुणाचेही आयुष्य तेवढेच उध्वस्थ झाले ही बाजूही तेवढीच खरी आहे. ते मोदी होते म्हणून दोन अडीच वर्शानेच का असेना पण हा विवाह झुगारण्याची हिंमत दाखविली... त्या बद्दल आपण सर्वानी मोदीचे स्वागतच केले पाहिजे. वयाच्या १९ व्या वर्षी मोदीनी दाखविलेल्या या हिंमतीच्या नि सामाजीक रुढीच्या विरोधातील विद्रोहाच्या मुळाशी पराकोटीची देशभक्ती होती हे सुद्धा एक  निर्विवाद सत्य आहे. 

बरं त्या जशोदाबेनला मिडीयाने विचारले की तुमची मोदी बद्दल काय तक्रार... बिक्रार?  तेंव्हा मोदी पंतप्रधान व्हावे अशी माझी ईच्छा असून मी त्यासाठी एक वेळचा उपवास करत आहे. आमच्यात कुठलीच वितुष्टी नसून ४५ वर्षा आधीचे लग्न व तेंव्हाची ताटातूटी याला आता काही अर्थ नसून मी स्वत:चे आयुष्य सुखाने जगत आहे असे उत्तर दिले. अन प्रॅक्टीकली ४५ वर्षा पुर्वीचा बालविवाह आणि तेंव्हाचा गृहत्याग... हा विषय आज कुठल्याही एंगलनी स्टॅंड करत नाही हेच खरे. पण राजकीय डुक्कराना चिखलात लोळणे प्रचंड आवडत असल्यामुळे मोदीला चिखलात ओढण्याची मल्लीनाथी सुरु आहे... अजुन काय!

अन हो... सगळ्यात महत्वाचं... मोदीचं लग्न ही त्यांची वयक्तीक बाब असून त्यात नाक खुपसण्याची काही गरज नाही. म्हणून म्हणतो... मोदीची बायको, इत्ता गहजब कायको?

-जयभीम

५ टिप्पण्या:

 1. १५ वर्ष वयानंतर लग्न नाकारण्याचा अधिकार फक्त स्त्रीला आहे. पुरुषाला नाही. [हिंदू विवाह कायदा कलम १३(२)(४)] त्यामुळे मोदींचा विवाह नाकारण्याचा अधिकार वगैरे संविधानिक वगैरे झूट.
  दुसरी गोष्ट, जर कुठलेही लग्न नकाराचे असेल [कलम १३ नुसार] तर रीतसर कायदेशीर डायव्होर्स घ्यावा. इतकी वर्षे लग्न लपवून आता सांगण्यात काय हशील?(उलट सगळेच हसशील)
  आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट, हा मोदींचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हा प्रश्न भारतातील स्त्रियांना सोडाच मलासुद्धा पडला आहे जो माणूस आपल्या बायकोचे अधिकार नाकारतो तो माणूस म्हणून कसा असेल? अर्थात हे मला मान्य आहे कि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय उलथापालथी झाल्या आहेत हे आपल्याला ठाऊक नाही.
  आणि मोदि तुम्हाला आवडतात म्हणून त्यांची कुठलीही गोष्ट तुम्हाला गोड लागते आहे. इथे अमीर खान किंवा राहुल गांधी असता तर तुम्हीच गझहब केला असता. नाही का?

  उत्तर द्याहटवा
 2. हर्शद,
  तुम्ही जो कलम सांगितला तो हिंदू मॅरेज एक्ट प्रमाणे लग्न झाले असल्यास घटस्फोट घेण्यासाठीचा आहे.
  पण जर झालेले लग्नच हिंदू मॅरेज एक्ट प्रमाणे NULL & VOID ठरत असेल तर घटस्फोट कशाचा घेणार? नल एन्ड व्हॉड लग्नाचा घटस्फोट घ्यावा लागतो असं संपुर्ण कायद्यात कुठेही लिहलेलं नाहीये.

  Null & Void चा अर्थच असा होतो की विवाह बेकायदा असून तो बाद ठरतो.

  उत्तर द्याहटवा
 3. Disagree.
  Here the man wants to be PM. So he cannot use legal technicality to get away. He has moral responsibilities also.

  He is putting his wife’s name on legal form that means he is not rejecting his marriage. So why is not formally divorced his wife OR called her to stay with him.

  If he is so single minded for his passion (you said country love), that makes him dangerous guy. He can pull nuclear button on Pakistan or China. Because he is single minded and do not care if people are going to suffer of his actions.

  I do not think he loves country and all country men. He loves only RSS and religion.

  Where was Modi when BJP opposed anti superstition bill in Maharashtra. They don’t care if poor and illiterate people suffering. Protecting religious institution is their first priority. So one more time he do not love his country and people.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. So, Mr Abhijeet, you are unhappy because Modi doesn't divorce his wife nor asks her to stay with him. According to you there is no other feasible way of existence. This is funnier than the stand taken by the Congress (of a False affidavit)

   Being single minded for his passion, according to you is dangerous - as much as to pull (push?) the nuclear button. This is a deduction in logic, that could be put in the best possible way as "Ludicrous". If a determined mind is a criterion, you would call many a great people dangerous.

   Now, testing everything done / not done by everybody against a reference-grid of the Anti-superstition Bill - - - is what you have earlier called "so single minded" and hence dangerous.

   हटवा
 4. It is difficult to expect to see any reason from brainwashed people by RSS and BJP. But still let me try.

  I don't know and don't care what congress say. Not sure why you felt it funny. So just walk away and forget wife is the way you like?

  Yes Modi is single minded about religion and don't care about people. He will sure prefer to protect religious institutions no matter how much destructions he will have to do. He has demonstrated it. Common sense does not matter for these fanatic peoples.

  Why rss and bjp people have to drag religion in politics. Aren't we done with these systems designed to exploit people. Can’t we see where Pakistan is, because it is based on religion? If we make India as Hindu country we will also go down like Pakistan.

  I mentioned superstition bill to indicate real color ob BJP. They opposed it to protect interest of bunch of few. Everybody knows people suffer because of these stupid customs in society.

  उत्तर द्याहटवा