सोमवार, २८ जुलै, २०१४

महाराष्ट्र सदनातील सैतान : अर्शद हराम !!!

शिवसैनिक म्हटला की राडेबाज ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. ठाक-याच्या तालिमीत तयार झालेले हे राजकीय गुंड म्हणजे कायम महाराष्ट्राच्या पुरोगामी वारस्यावर कलंक ठरत गेले व त्यांचा इतिहास हा सदैव जातीयवादी राहिला नि राहील यातही शंका नाही. पण नुकताच महाराष्ट्र सदनातील जेवणावरुन दिल्लीत जो धुराडा उडाला व त्यात एका मुस्लीमाला रोजाचा उपवास असताना पोळी चारलीच कशी म्हणून मिडीयाने जो काही थयथयाट चालविला आहे तो मात्र शिवसेनेसाठी ’खाया पिया कुछ नही, और गिलास तोडा बाराणेका’ असला प्रकार झाला आहे. खरंतर सच्चा शिवसैनिक हा नेहमीच राडेबाज व जातीयवादी असतो. त्यातल्या त्यात मुस्लीम द्वेष तर ठासून भरलेला असतो. अन मुस्लीमाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही, तो म्हणजे शिवसैनिक. मुस्लीमाची खोड मोडण्यात पराकोटीची धन्यता मानतो तो शिवसैनिक... अन मुस्लीमाची कशी खोड मोडली याच्या कथा मग अनेक वर्षे कट्ट्यावर नि नाक्यावर बसून रंगविल्या जातात याचा मी स्वत: साक्षीदार आहे...  पण दिल्लीत मात्र ध्यानीमनी नसताना अचानक एका मुस्लीमाशी गाठ पडली व अजिबात छेड न काढताही मुस्लीम द्वेष केल्याचा ठपका शिवसैनिकावर बसला. ख-या अर्थाने पहिल्यांदा एका शिवसैनिकावर निर्दोष असताना ठपका ठेवण्यात आले असे मलातरी वाटते. आयुष्यात पहिल्यांदा एका शिवसैनिका बद्दल मला सहानुभूती व खंत वाटते आहे. ही झाली एक बाजू.
आता दुसरी बाजू अशी की तो जो कोणी अर्शद बिर्शद नावाचा मुस्लीम कर्मचारी कॅंटीनचे काम पाहात होता त्याला अन्नाचा दर्जा दाखविण्यासाठी खासदाराने जी काही बळजबरी केली ती मलातरी योग्यच वाटते. कारण ही पोळी चारण्याच्या दोन तीन दिवसा आधीपासून महाराष्ट्र सदनातील जेवण व गैरसोयींबद्दलच्या तक्रारी वृत्त पत्रांतून झळकत होत्याच. इतर गैरसोयी बद्दल मल्लीक जबाबदार आहेच पण जेवणाची सोय अर्शदच्या अखत्यारित असल्यामुळे चांगले जेवण देणे ही त्याची ड्यूटीच होती.  मराठी थाळीतली वरण जी पाण्या सारखी असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवले त्यात अर्शदचा रोल महत्वाचा ठरतो हे अजिबात नाकारता येत नाही.  अनेकांच्या तक्रारी नि कुरबुरी सुरु होत्या. म्हणजे सदनातील जेवण व त्याचा दर्जा या बद्दल थोडी काळजी घेणे एक पगारी माणूस म्हणून तरी अर्शदची जबाबदारी होतीच. त्यानी ती सांभाळली का? नाही. म्हणजे पवित्र महिन्यात या पठ्यानी काय केलं? तर आपल्या कर्त्यव्यास चुकला. ज्या कामासाठी याला पगार दिला जात होता ते काम म्हणजे ग्राहकाना चांगले जेवण देणे... मग एक सच्चा मुसलमान म्हणून यानी प्रत्येक ग्राहकाची जातीने काळजी घ्यायला हवी होती. पवित्र महिन्याच्या मुहुर्तावर तर अधीकची काळजी घेत प्रत्येकाच्या तक्रारींवर जातीने लक्ष घालायला हवे होते. आपण जे अन्न देतो त्या बद्दल ग्राहकाचे मत किमान रॅंडमली तरी आजमावून त्यावर उपाय करायला हवे होते. पण यानी तर उलटाच कारभार चालविला होता. ’तू जे वाढतोस ते बेचव आहे’ म्हटले की रोजाच्या नावाने पठ्ठा हात वर करायचा. मग बिचारा ग्राहकराजा रंकासारखा फील करुन गुमान निघून जात असे. थोडक्यात अर्शद चक्क रमजानच्या महिन्यात बैमानी करत होता... या निकषावर याला रोजा धरण्याचा अधिकार तरी उरतो का? हा त्या मुल्ला मौलविना माझा प्रश्न आहे. पैसे मोजून जेवणारे ग्राहक असंतुष्ट होऊन तक्रारी केल्यावर काळजी घेण्या ऐवजी पोळी कोंबेस्तोवर बेफिकीरी दाखवली ती अर्शदनी. शेवटी एका ग्राहकाने चक्क कॅमेरॅवर न तुटणारी पोळी दाखविली व तूच जरा तोडून दाखव म्हटले तर लगेच हा ओरडा करतो की रोजा होता... एकिकडे रोजा धरायचा व  पैसे मोजणा-या ग्राहकाशी बैमानी करायची, हे सगळं अल्लाला चालते की कसे? अन चालत नसेल तर मग रोजानी मिळालेलं पुण्य ग्राहकाशी केलेल्या बैमानीमुळे टिकतं का? की रोजाच्या काळात पैसे मोजणा-या ग्राहकाला चांगले जेवण देणे बंधनकारक नसते की काय? थोडक्यात रमजानच्या महिन्यात अर्शद नुसता अल्लाशी नाही तर ग्राहक व स्वत:च्या व्यवसायाशीही बैमानी केली...  अन वरुन बोंबा काय मारतो तर मी रोजा ठेवला होता... तर मग घरी बसायचं ना. व्यवस्थापक म्हणून तुझी जबाबदारी बनते की शिजविलेले अण्ण चाखून पाहणे. आता हा पट्टा रोजाच्या नावाखाली चाखत  नसेल तर मग अन्नाची चव बिघडनार नाही तर काय?

ज्या प्रोफेशनमुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं, आपलं घर चालतं त्या प्रोफेशनशी गद्दारी करणारा हा अर्शद माझ्या नजरेत मुसलमान तर नाहीच पण रमजानच्या महिन्यात ग्राहकांशी बैमानी करणारा   सैतान नि हराम आहे.


टीप: मल्लीक हा सैतानाचा सैतान आहे. पुढच्या निवडणूकीत समस्त भगवे एकत्र येऊन सैतान हटावोचा महायज्ञ चालविणार असल्यामुळे आता मी त्यावर नाही बोलले तरी चालेल. (भगवे खुष हूवे होंगे नै!) 

बुधवार, १६ जुलै, २०१४

पुणे विद्यापिठाचे नामांतर हे बहुजन ब्रॅंडीग...!!!पुणे विद्यापिठाचे नामांतर झाल्यानंतर अनेक चर्चा झळताना दिसत आहेत. सोशल मिडियावरचा महापूर सोडला तरी स्वत:ला विख्यात, विद्वान वगैरे समजणारेही हळूच गरळ ओकताना “नावापेक्षा क्वालिटी बद्दल विचार केला असता तर जास्त बरे झाले असते” टायपचे डॉयलॉग मारुन नेमकं मनात काय आहे याचा अंदाजही देतात... व मी विरोध वगैरे नाही रे बाबा केला असा पुरोगामी आवही आणतात. मग होतं काय की सामान्य माणसाला वाटू लागतं की खरोखरच की... नावात काय आहे? विद्यापिठाचा दर्जा हा जास्त महत्वाचा असतो... त्यावर लक्ष दिलेच पाहिजे... थोडक्यात नामांतराचे विरोधक २% लोकांवर का असेना पण क्वालिटीच्या माध्यमातून विष कालवूनच जातात. मग हा टक्का हळू हळू वाढायला लागतो व क्वालिटीचं पिल्लू मग तरुणाna प्रोडक्टीव वाटून नामांतर दुय्यम वाटू लागतो.  मग कोणतातरी पगारी दलाल माईक घेऊन रस्त्यावर हिंड्त अशा तरुणाना गाठून “बघा, तरुणांचा सगळ कल क्वालिटीवर आहे. नामांतर हे राजकरण्याचे खूळ होते” वगैरे सायंकाळची महाबातमी म्हणून पुढचे कित्तेक सायंकळ वाजवत राहतो.
मुळात नाव आणि क्वालिटी हे दोन्ही एकच विषय आहेत का? अजिबात नाही. बर मग नाव आणि क्वालिटी हे परस्पर पुरक विषय तरी आहेत का? म्हणजे एक दुस-याला पर्यायी किंवा रिप्लेस करतात का? तसेही नाही. नाव हा वारसा सांगतो व तो पिढ्यान पिढ्याची ओळख  असतो तर क्वालिटी हे त्या पिढ्यान पिढ्याच्या प्रवासातील बदलता (फ्लोअटींग) घटक आहे. क्वालिटीत घसरण होताना दिसल्यास क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटच्या उरावर बसून ती सुधारत येते. क्वालिटी ही दुय्यम गोष्ट नक्कीच नाही. उलट क्वालिटीच सर्वात महत्वाची असते. ती सांभाळणे सगळ्यात कठीण काम असून त्यासाठी अहोरात्र झगडावे लागते. एकदा काय क्वालिटी घसरली की प्रचंड नुकसान होतं... कोणाचं होतं? ते मोजता येणारा नाही एवढा विविध पातळ्यांवर विविध लोकांचं नुकसान होतं... एवढी महत्वाची असते ही क्वालिटी. पण... तरी सुद्धा क्वालिटीला चेहरा नसतो... क्वालिटीला नाव नसतं... क्वालिटीला ओळख नसते. ओळख तर एका नावाला असते.  म्हणून क्वालिटीत केलेल्या सुधारणांमुळे ज्या नावाची ओळख सर्वदूर जाणार असेल ते नाव तेवढ्या लायकीचे असावे वा तुमच्या मातीचा, समाजाचा वारसा सांगणारे असावे हे सर्वात महत्वाचे.
पुणे विद्यापिठाची क्वालिटी ही अखंड चालणारी प्रक्रिया असून सातत्याने पुढे सरकणा-या पिढ्यांचे त्यात योगदान होते व असणार. या प्रदीर्घ प्रक्रियेत क्वालिटीचा ग्राफ खालीवर होणे हे ही आलेच.  पण या क्वालिटी मेकर्सना चेहरा कधीच नसतो, तो असतो नावाला.  मग त्या नावाला ईथल्या मातीचा सुगंध असावा, या संस्कृतीचा वारसा असावा ही गोष्ट निर्विवाद आहे.  सावित्रीबाईचे नाव या सर्व निकष व अटींवर खरे उतरणारे आहे.
क्वालिटीचा खूप बाऊ करणा-यानी एक आठवण ठेवावे. जगातल्या सगळ्या ब्रॅंड्सची क्वालिटी खाली वर होत असते... त्यावर उपायही केले जात असतात पण नाव मात्र चिरकाल उरते. सनपूर्वचे तक्षशीला विद्यापीठ कसे होते, त्याची क्वालिटी काय होती हे कोणालाच माहीत नाही. सगळी ताकद लावून संशोधन केले तरी ठामपणे “नेमकी अशी होती” असे म्हणताही येणार नाही. तरी सुद्धा तक्षशीला हे नाव मात्र अजरामर आहे. नालंदा विद्यापिठाचेही तेच झाले. आज कोणीही छातीठोकपणे नालंदाच्या क्वालिटी बद्दल बोलू शकणार नाही... पण नालंदा विश्वविद्यालय हे नाव मात्र येणा-या अनेक पिठ्या आमचा पुरातन वारसा म्हणून मोठ्या गौरवाने सांगत राहणार. अगदी हीच गोष्ट पाश्चिमात्य राष्ट्रांची सुद्धा आहे. विश्वविख्यात विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ ओक्स्फोर्ड सुद्धा किमान हजार वर्ष जुनी आहे.  क्वालिटीच्या कसोटीवर तपासायचे म्ह्टल्यास तिथेही चढ उतार आहेत. अनेक आरोप-प्रत्यारो, पासून  ताटातूटी पर्यंतचा इतिहास आहे. तरी नाव मात्र अजराम झाले. या हजार वर्षाच्या कालावधीतील झालेल्या क्वालिटी फ्लक्चूएशन्सशी कोणाला देणेघेणे नसते. या नावाच्या हजार वर्षाची परंपरा गौरवशाली ठरते. क्वालिटी ठरविण्याचं  पॅरामिटर नाव नक्कीच नाही, पण उद्या मुबलक व योग्य सोयी उपलब्ध झाल्यात नि क्वालिटी सुधारली तर  जगभर जेंव्हा ओळख सांगयाची वेळ येईल तेंव्हा ती नावानी सांगायची असते... याच नावाला पुढे ब्रॅंड असे नाव पडते. बहुजन समाज या विद्यापिठाचं नाव जगभर नेणार आहे...  अन पुण्यातील बहुजनांचा ब्रॅंड सावित्रीबाई पेक्षा दुसरं कोणतं असूच शकत नाही.


पुणे विद्यापिठाचे नामांतर हे बहुजन ब्रॅंडीग आहे. राहीला प्रश्न क्वालिटीचा... येणा-या पिढ्या बघतील त्याचं. शेवटी क्वालिटी कंट्रोल ही अखंड चालणारी प्रक्रीया असते.

===

गुरुवार, १० जुलै, २०१४

ग्रेट माडिया : जेवणातील अळी आणि त्याचा बाऊ!आज फेसबुकवर अनिकेत आमटेनी टाकलेले फोटो पाहून मला लहानपणचे वसतीगृहाचे दिवस आठवले. सन १९८६-८७ चा काळ. मी एटापल्लीच्या समूह निवासी वसतीगृहात (स.नि.व.) होतो. साधारण १५०-२०० मुलं-मुली एवढी संख्या पटावर असायची. त्यातले तीस-चाळीस दिवाळी पर्यंत पळून जायचे. रानात मोकाट फिरणा-या जिवाना वसतीगृह व शाळा हे बंदीस्त, शिक्शा व नीरस आयुष्य वाटे... एवढ्या मुलांचा स्वयंपाक करायला चैतू नावाचा एक हेड कूक होता/आहे व सोबतीला दोन स्त्रीया मदतनीस म्हणून होत्या. रोजचा जेवणाचा मेनू ठरलेला... दोन पोळ्या, वरन आणि भात, बास! पण जेवणारे 150 च्या वर, बिचारे तीन जण मिळून करुन करुन करणार काय...तांदुळ, दाळ गोदामात भरून असीयचे व स्वयंपाकासाठी घेताना साफसफाईत दुर्लक्ष झालं की  जेवणात अळ्या मिळायच्या. खास करुन भातात. आम्ही पोरं रानातली… मुंग्या माकोळे खात जगलेली... जेवणात अळी आली की ती काढून बाजूला ठेवून जेवण करायचो. आम्हाला काहीच वाटत नसे. एकदा जेवण झालं की शेजारी ठेवलेल्या अळ्या उचलून ताटात टाकायचो व नळावर जाऊन ताट धुवायचो. अळ्या बाजूला काढत जेवण करणे हा प्रकार नित्याचा होऊन गेला.
एटापल्ली पासून जवळ गेदा नावाचे गाव आहे. तिथे मात्र तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. आमच्यावेळी स.नि.व. मध्ये गेद्याची किमान १०-१५ तरी तेल्याची मुलं शिकायला असायची. हा तेली समाज तसा सधन व शहरी चोचले असणारा. तर ही सग्ळी सधन समाजाची पोरं मात्र अळ्या मिळाल्या की दंगा करायची. थेट चैतूशी जाऊन भांडायची. चैतू मात्र शेरास सव्वाशेर होता. तो काही यांना बधायचा नाही, मग ही वरात वार्डनकडे जायची. पोरं अळ्यांची तक्रार कराय्चे... तर चैतू तीन माणसांवर कामाचं लोड खूप आहे. तांदुळ निवडायला व साफसफाईला माणसं हवीत. तिघाना सगळं जड जातय, आम्ही आधीच खूप काम करतोय  यापेक्षा जास्त काय अपेक्षा करता म्हणून त्याची बाजू मांडायचा. मग यावर तोडगा काढण्यात आला तो म्हणजे स्वयंपाकाच्या कामात पोराना मदतीला घ्यायचं. मग पद्दतशीरपणे पाच पाच पोरांची यादीच लावण्यात आली. रोज स्वयंपीच्या आधी तांदळ डाळ साफ करून देण्याचं काम पोरांवर आलं. जेवणातील अळ्या बंद व्हायचे...पण परिक्षेच्या काळात पोरं कामाला दांडी मारायची. मग चैतू नुसता वरवर हात फिरवून  तांदुळ शिजवायला घ्यायचा. मग काय नेमकं अडचणीच्या वेळी अळ्यांचे भात वाढल्या जाई... परत तेल्यांची तेल्यांची बोंब सुरू...
आम्हाला मात्र तेल्यांचा अतिरेक वाटे. अरे भातात अळ्या असतील तर त्या बाजूला काढून जेवा ना! असं आमचं साधं तत्वज्ञान होतं. स.नि.व. मध्ये शेकडो मुलं शिकायची. त्यातली ९०% ही माझ्या सारखी रानातून आलेली होती. जेवनात अळ्या सपडणे वगैरे आमच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती. त्यामुळे रानटी मुलांची त्या बद्दल कधीच तक्रार नसायची. कारण आम्ही सगळी अत्यंत गरीबितून आलेली पोरं. शेतात काम करताना दुपारचा नाश्ता म्हणून आंबिल बनविली जाते. ही आंबिल शेतात एखाद्या झाडाखाली ठेवून त्यावर पानाचे झाकान अन उडू नये म्हणून त्यावर काठी ठेवायचो. दिवसभर शेतात राबून जेंव्हा आंबिल प्यायला झाडाखाली यायचो तेंव्हा बरेचवेळा या आंबिलीत झुरळ किंवा एखादा रानीतला किडा पडलेला असायचा. मग तो किडा बाजूला काढून फेकला की आंबील प्यायचो...तर हा असा किडे बाजूला काढून आंबिल पिण्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाला होता. त्यामुळे या गोष्टीचा मला कधीच बाऊ करावासा वाटला नाही. अन अगदी माझ्यासारखे विचार करणारे सनिव मध्ये ९०% होते. त्यामुळे तेल्यांची मागणी कायमच अतिरेकी वाटायची.  मी स्वत: अनेकवेळा किडे बाजूला काढून आंबिली पिली व परत शेतात कामावर हाजर...!
आमचं तत्वज्ञान अगदी सोपं... 
"अळी बाजूला काढून जेवल्यास मरत नाही ना... मग जेवा"  
हे तत्वद्न्यान कोण्या विद्वानानी दिलेलं नव्हतं, तर गरिबीतून आलेलं होतं. तर माझं विद्यार्थी जीवन असं होतं. 
तो काळ आता गेला. मी आता पुण्यात चकचकीत आयुष्य जगतोय. सुखसोयी आहेत, बाकी सगळं मस्त चाललय. पण आमच्या घरात काही महीने पेस्ट कंट्रोल नाही केलं की किचनमध्ये झुरळांचा संचार वाढतो. मग ते वरणात, भाजीत कधीमधी उडी मारतातच... असा झुरळ मिळाला तर मी त्याला काढून फेकतो व पोटभर जेवून घेतो. त्या दिवशी बायकोचं जेवण मात्र बोंबलतं!

बुधवार, ९ जुलै, २०१४

पुणे विद्यापीठ नामविस्तार!

पुणे विद्यापिठाचे नामविस्तार विधानसभेत पास झाल्यावर काही लोकाना पोटशूळ उठले असून विद्यापिठाना कोणत्याही व्यक्तीचे नाव देऊ नये असा युक्तीवाद करणारे सर्वत्र हिंडताना दिसत आहेत. विद्यापिठाना फक्त स्थलनाम लागू असावा असा यांचा आग्रह आहे पण आजवर नावावरुन अस्तित्वात असलेल्या अनेक विद्यापिठांविरुद्ध या लोकानी कधी ब्र शब्द उच्चरलेला दिसत नाही. अगदी भारतातच नाही तर जगभरात असे दिसून येते की विद्यापिठाना फक्त स्थलनामच नाही तर व्यक्तीचे नाव देण्याची पद्धत आहे. जगातील नंबर दोनचे विद्यापिठ म्हणून ज्याची ख्याती आहे ते अमेरीकेतील प्रसिद्ध विद्यापिठ हारवर्ड युनिव्हर्सिटी हे व्यक्तीनामाचे सर्वज्ञात उदाहरण आहे. अमेरीकेतील प्रसिद्ध उद्योगपती जॉन हारवर्ड यांचे नाव या विद्यापिठाला दिले असून सन १६३६ पासून हे विद्यापिठ अस्तित्वात आहे.  शैक्षणीक वर्ष २०१३-१४ मध्ये जगात ११ क्रमांकावर असलेली अमेरीकेतीलच येले युनिव्हर्सिटी सुद्धा एलिहू येले याच्या नावे आहे. जगात ३५ व्या क्रमांकावर असलेली McGill University,Canada सुद्धा व्यक्तीच्या नावे आहे. जगात ३६ व्या क्रमांकावर असलेली Karolinska Institute, Sweden सुद्धा त्यांचा राजा Karl तेरावा याच्या नावे आहे. जगात ६५ व्या क्रमांकावर असणारे Rice University, ही सुद्धा अमेरीकेतील व्यक्तीनाम असलेली युनिव्हर्सिटी आहे. ही तर फक्त टॉप-१०० यादीतली नावं आहेत. जे वरील यादीत मोडत नाहीत अशा सगळ्या विद्यापिठांचा अभ्यास केल्यास शेकडो विद्यापीठं सापडतील जी व्यक्तींच्या नावे आहेत.
खरंतर सावित्रीमाईच्या नावाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. भारतातील स्त्रीशिक्षणाचा पाया घालणा-या सावित्रीमाईचे नाव पुणे विद्यापिठाले देणे म्हणजे एका अर्थाने विद्यापिठाचा सन्मान करणे होय. युजीसीच्या साईटवर रामानंद तीर्थ, स्वामी विवेकानंद, कोणतातरी आचार्य, कोणीतरी गुरु, कवी कालीदास, चाणक्य, विनोबा भावे पासून अटलबिहारी वाजपेयी व तिकडे दक्षीणेत तर नटांच्या नावा पर्यंत मजल गेलेली दिसते. या सगळ्यांच्या नावाने विद्यापीठ असू शकते. अमेरीकेत उद्योगपतीच्या नावे असू शकते. तर पुण्यात ज्यानी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला त्या  सावित्रीमाईं नाव पुणे विद्यापिठाला देताना सगळ्याना अभिमान वाटायला हवं होतं, ऊर भरून यायला हवं होतं. माईचं कार्य पाहता त्यांचं नाव देण्यात कोणालाच, कोणतीच अडचण व्हायला नको होती. तरी काहीना मात्र त्रास  होतोय... अन युक्तीवाद काय तर म्हणे व्यक्तीनाम नको...! बरं मग खाली मी ६४ विद्यापिठांची यादी दिली आहे जे स्टेट युनिव्हर्सिटीज असून व्यक्तीच्या नावे आहेत. त्यावर तुम्ही कधी बोललात का? नाही बोललात तर का नाही बोललात? अन एवढे सगळे व्यक्तीनाम असलेले विद्यापीठ देशभर अस्तित्वात असताना नेमक्या सावित्रीमाईच्या वेळीच तुमच्या पोटात का दुखू लागले आहे? असा थेट सवाला आहे.
साधू संत, गुरु-बाबा, भोंदू महाराज व शेंडीधा-यांच्या नावे असलेली विद्यापीठं तुम्हाला भुषणावह वाटतात, पण उदात्त हेतूने समाजात शैक्षणीक क्रांतीचा पाया घालणा-या बहुजन व्यक्तीचे नाव मात्र वर्ज्य...!  का? तर, या व्यक्तीच्या कामाचा अंतीम परिणाम जातीयवाद्यांच्या प्रतिगामी तत्वावर हतोडा चालवित आहे. अनेक पिढ्या पासून बांधलेले सनातनी किल्ले सावित्रीच्या कार्यातून उध्वस्थ होत आहेत. संवर्णांच्या हातून सगळी सत्ता खेचून घेण्याचे व बहुजनांच्या हाती देण्याचे कार्य पार पडत आहे. ही आहेत विरोधाची खरे कारणे. म्हणून काहींच्या पोटात दुखू लागले आहे.  या दुखण्यावर एकच उपाय... जरा जुनी मळमळ ओकून टाका व नव्या विचाराचा स्विकार करा. आहात तसेच रहाल तर त्रास आम्हाला नाही, तुम्हालाच होणार आहे. बघा पटतं का!

भारतात अनेक विद्यापिठाना महान व्यक्तींची नावे दिली आहेत. युजीसी (युनिव्हर्सीटी ग्रांट कमिशन) च्या यादीत खालील विद्यापिठे दिसतात.

सेंट्रल युनिव्हर्सिटीज
१    1   मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सीटी, हैद्राबाद.
       2   हरिसिंग गौर विश्वविद्यालय, सागर (मध्य प्रदेश)
       3   इंदिरा गांधी नॅशनल ट्राईबल युनिव्हर्सीटी, (मध्य प्रदेश)

स्टेट युनिव्हर्सिटीज
       1 Acharaya N.G.Ranga Agricultural University, Hyderabad
       2  Acharaya Nagarjuna University, Guntur
       3 Adikavi Nannaya University, Rajamundry, AP
       4 Damodaram Sanjivayya National Law University, Visakhapattanam.
       5 Dr. N.T.R. University of Health Sciences, Vijaywada.
       6 Dr. Y.S.R. Horticultural Univerity, AP
       7 Jawaharlal Nehru Architecture and Fine Arts University, AP.
       8 Jawaharlal Nehru Technological University, Kukatpalli.
       9 Osmania University, Hyderabad
      10 Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vishwavidyalaya, Ramtek.
      11 Shivaji University, Kolhapur.
      12 Smt. Nathibai Damodar Thackersey Women's University, Mumbai.
      13 Arybhatta Knowledge University, Patana.
      14 Bhupender Narayan Mandal University, Bihar.
      15 Chanakya National Law University, Patana.
      16 Jai Prakash vishwavidyalaya(university), Patana.
      17 Kameshwar Singh.Darbhanga Sanskrit Vishwavidyalaya, Bihar.
      18 Lalit Narayan Mithila University, Bihar.
      19 Maulana Mazharul Haque Arabic & Persian University, Bihar.
      20 Rajendra Agricultural University, Bihar.
      21 Veer Kunwar Singh University, Bihar.
      22 Dharmsinh Desai University, Gujrat
      23 Hemchandracharya North Gujarat University, Gujrat
      24 Krantiguru Shyamji Krishna Verma Kachchh University, Gujrat.
      25 Krishnakumarsinhji Bhavnagar University, Gujrat.
      26 Chaudhary Sarwan Kumar Himachal Pradesh Krishi Vishvavidyalaya, Himachalpradesh.
      27 Dr. Y.S.Parmar University of Horticulture & Forestry, HP
      28 Vinoba Bhave University, Jharkhand.
      29 Shree Sankaracharaya University of Sanskrit, Kerala.
      30 Thunchath Ezhuthachan Malayalam University, Kerala.
      31 Atal Bihari Vajpayee Hindi Vishwavidyalaya, MP
      32 Awadesh Pratap Singh University, MP
      33 Barkatullaah University, MP
      34 Devi Ahilya Vishwavidyalaya, MP
      35 Mahaishi Panini Sanskrit Vishwavidyalaya, MP
      36 Maharishi Mahesh Yogi Vedic Vishwavidyalaya, MP
      37 Makhanlal Chaturvedi Rahtriya Patrakarita National University of Journalism, MP
      38 Rani Durgavati Vishwavidyalaya, MP
      39 Biju Patnaik University of Technology, Orisa.
      40 Fakir Moham University, Orisa.
      41 Shri Jagannath Sanskrit Vishwavidyalaya, Orisa.
      42 Veer Surendra Sai University of Technology, Orisa.
      43 Bidhan Chandra Krishi Vishwavidyalaya, West Bengal
      44 Kazi Nazrul University, WB
      45 Netaji Shubhash Open University, WB
      46 Rabindra Bharati University, WB
      47 Chandr Shekhar Azad University of Agriculture & Technology, UP
      48 Choudary Charan Singh Univeersity, UP
      49 Deen Dayal Upadhyay Gorakhpur University, UP.
      50 Dr. Ram Manohar Lohia Awadh University, UP.
      51 Dr. Shukantla Mishra Uttar Pradesh Viklang Vishwavidyalaya, UP.
      52 Narendra Deo University of Agriculture & Technology, UP.
      53 Sampurnanand Sanskrit Vishwavidyalaya, UP.
      54 Veer Bahadur Singh Purvanchal University, UP.
      55 Alagappa University, TN
      56 Anna University, TN
      57 Annamalai University, TN
      58 Bharathiar University, TN.
      59 Bharathidasan University, TN.
      60 Mother Teresa Women's University, TN.
      61 Tamilnadu Dr. M.G.R.Medical University, TN.
      62 Rani Channamma University, Karnatka.
      63 Vesveswaraiah Technological University, Karnatka.
      64 Vijayanagara Sri Krishnadevaraya University, Karnatka.

टीप:  वरील सर्व युनिव्हर्सिटीज हे युजीसीच्या साईटवरुन घेतले असून मोजक्याच पाच-सहा स्टेटस मधून काढलेली यादी आहे. तुम्ही स्वत: खालील युजीसीच्या वेबसाईटवर जाऊन बाकी यादी पाहू शकता.