बुधवार, १६ जुलै, २०१४

पुणे विद्यापिठाचे नामांतर हे बहुजन ब्रॅंडीग...!!!पुणे विद्यापिठाचे नामांतर झाल्यानंतर अनेक चर्चा झळताना दिसत आहेत. सोशल मिडियावरचा महापूर सोडला तरी स्वत:ला विख्यात, विद्वान वगैरे समजणारेही हळूच गरळ ओकताना “नावापेक्षा क्वालिटी बद्दल विचार केला असता तर जास्त बरे झाले असते” टायपचे डॉयलॉग मारुन नेमकं मनात काय आहे याचा अंदाजही देतात... व मी विरोध वगैरे नाही रे बाबा केला असा पुरोगामी आवही आणतात. मग होतं काय की सामान्य माणसाला वाटू लागतं की खरोखरच की... नावात काय आहे? विद्यापिठाचा दर्जा हा जास्त महत्वाचा असतो... त्यावर लक्ष दिलेच पाहिजे... थोडक्यात नामांतराचे विरोधक २% लोकांवर का असेना पण क्वालिटीच्या माध्यमातून विष कालवूनच जातात. मग हा टक्का हळू हळू वाढायला लागतो व क्वालिटीचं पिल्लू मग तरुणाna प्रोडक्टीव वाटून नामांतर दुय्यम वाटू लागतो.  मग कोणतातरी पगारी दलाल माईक घेऊन रस्त्यावर हिंड्त अशा तरुणाना गाठून “बघा, तरुणांचा सगळ कल क्वालिटीवर आहे. नामांतर हे राजकरण्याचे खूळ होते” वगैरे सायंकाळची महाबातमी म्हणून पुढचे कित्तेक सायंकळ वाजवत राहतो.
मुळात नाव आणि क्वालिटी हे दोन्ही एकच विषय आहेत का? अजिबात नाही. बर मग नाव आणि क्वालिटी हे परस्पर पुरक विषय तरी आहेत का? म्हणजे एक दुस-याला पर्यायी किंवा रिप्लेस करतात का? तसेही नाही. नाव हा वारसा सांगतो व तो पिढ्यान पिढ्याची ओळख  असतो तर क्वालिटी हे त्या पिढ्यान पिढ्याच्या प्रवासातील बदलता (फ्लोअटींग) घटक आहे. क्वालिटीत घसरण होताना दिसल्यास क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटच्या उरावर बसून ती सुधारत येते. क्वालिटी ही दुय्यम गोष्ट नक्कीच नाही. उलट क्वालिटीच सर्वात महत्वाची असते. ती सांभाळणे सगळ्यात कठीण काम असून त्यासाठी अहोरात्र झगडावे लागते. एकदा काय क्वालिटी घसरली की प्रचंड नुकसान होतं... कोणाचं होतं? ते मोजता येणारा नाही एवढा विविध पातळ्यांवर विविध लोकांचं नुकसान होतं... एवढी महत्वाची असते ही क्वालिटी. पण... तरी सुद्धा क्वालिटीला चेहरा नसतो... क्वालिटीला नाव नसतं... क्वालिटीला ओळख नसते. ओळख तर एका नावाला असते.  म्हणून क्वालिटीत केलेल्या सुधारणांमुळे ज्या नावाची ओळख सर्वदूर जाणार असेल ते नाव तेवढ्या लायकीचे असावे वा तुमच्या मातीचा, समाजाचा वारसा सांगणारे असावे हे सर्वात महत्वाचे.
पुणे विद्यापिठाची क्वालिटी ही अखंड चालणारी प्रक्रिया असून सातत्याने पुढे सरकणा-या पिढ्यांचे त्यात योगदान होते व असणार. या प्रदीर्घ प्रक्रियेत क्वालिटीचा ग्राफ खालीवर होणे हे ही आलेच.  पण या क्वालिटी मेकर्सना चेहरा कधीच नसतो, तो असतो नावाला.  मग त्या नावाला ईथल्या मातीचा सुगंध असावा, या संस्कृतीचा वारसा असावा ही गोष्ट निर्विवाद आहे.  सावित्रीबाईचे नाव या सर्व निकष व अटींवर खरे उतरणारे आहे.
क्वालिटीचा खूप बाऊ करणा-यानी एक आठवण ठेवावे. जगातल्या सगळ्या ब्रॅंड्सची क्वालिटी खाली वर होत असते... त्यावर उपायही केले जात असतात पण नाव मात्र चिरकाल उरते. सनपूर्वचे तक्षशीला विद्यापीठ कसे होते, त्याची क्वालिटी काय होती हे कोणालाच माहीत नाही. सगळी ताकद लावून संशोधन केले तरी ठामपणे “नेमकी अशी होती” असे म्हणताही येणार नाही. तरी सुद्धा तक्षशीला हे नाव मात्र अजरामर आहे. नालंदा विद्यापिठाचेही तेच झाले. आज कोणीही छातीठोकपणे नालंदाच्या क्वालिटी बद्दल बोलू शकणार नाही... पण नालंदा विश्वविद्यालय हे नाव मात्र येणा-या अनेक पिठ्या आमचा पुरातन वारसा म्हणून मोठ्या गौरवाने सांगत राहणार. अगदी हीच गोष्ट पाश्चिमात्य राष्ट्रांची सुद्धा आहे. विश्वविख्यात विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ ओक्स्फोर्ड सुद्धा किमान हजार वर्ष जुनी आहे.  क्वालिटीच्या कसोटीवर तपासायचे म्ह्टल्यास तिथेही चढ उतार आहेत. अनेक आरोप-प्रत्यारो, पासून  ताटातूटी पर्यंतचा इतिहास आहे. तरी नाव मात्र अजराम झाले. या हजार वर्षाच्या कालावधीतील झालेल्या क्वालिटी फ्लक्चूएशन्सशी कोणाला देणेघेणे नसते. या नावाच्या हजार वर्षाची परंपरा गौरवशाली ठरते. क्वालिटी ठरविण्याचं  पॅरामिटर नाव नक्कीच नाही, पण उद्या मुबलक व योग्य सोयी उपलब्ध झाल्यात नि क्वालिटी सुधारली तर  जगभर जेंव्हा ओळख सांगयाची वेळ येईल तेंव्हा ती नावानी सांगायची असते... याच नावाला पुढे ब्रॅंड असे नाव पडते. बहुजन समाज या विद्यापिठाचं नाव जगभर नेणार आहे...  अन पुण्यातील बहुजनांचा ब्रॅंड सावित्रीबाई पेक्षा दुसरं कोणतं असूच शकत नाही.


पुणे विद्यापिठाचे नामांतर हे बहुजन ब्रॅंडीग आहे. राहीला प्रश्न क्वालिटीचा... येणा-या पिढ्या बघतील त्याचं. शेवटी क्वालिटी कंट्रोल ही अखंड चालणारी प्रक्रीया असते.

===

1 टिप्पणी: