सोमवार, २८ जुलै, २०१४

महाराष्ट्र सदनातील सैतान : अर्शद हराम !!!

शिवसैनिक म्हटला की राडेबाज ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. ठाक-याच्या तालिमीत तयार झालेले हे राजकीय गुंड म्हणजे कायम महाराष्ट्राच्या पुरोगामी वारस्यावर कलंक ठरत गेले व त्यांचा इतिहास हा सदैव जातीयवादी राहिला नि राहील यातही शंका नाही. पण नुकताच महाराष्ट्र सदनातील जेवणावरुन दिल्लीत जो धुराडा उडाला व त्यात एका मुस्लीमाला रोजाचा उपवास असताना पोळी चारलीच कशी म्हणून मिडीयाने जो काही थयथयाट चालविला आहे तो मात्र शिवसेनेसाठी ’खाया पिया कुछ नही, और गिलास तोडा बाराणेका’ असला प्रकार झाला आहे. खरंतर सच्चा शिवसैनिक हा नेहमीच राडेबाज व जातीयवादी असतो. त्यातल्या त्यात मुस्लीम द्वेष तर ठासून भरलेला असतो. अन मुस्लीमाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही, तो म्हणजे शिवसैनिक. मुस्लीमाची खोड मोडण्यात पराकोटीची धन्यता मानतो तो शिवसैनिक... अन मुस्लीमाची कशी खोड मोडली याच्या कथा मग अनेक वर्षे कट्ट्यावर नि नाक्यावर बसून रंगविल्या जातात याचा मी स्वत: साक्षीदार आहे...  पण दिल्लीत मात्र ध्यानीमनी नसताना अचानक एका मुस्लीमाशी गाठ पडली व अजिबात छेड न काढताही मुस्लीम द्वेष केल्याचा ठपका शिवसैनिकावर बसला. ख-या अर्थाने पहिल्यांदा एका शिवसैनिकावर निर्दोष असताना ठपका ठेवण्यात आले असे मलातरी वाटते. आयुष्यात पहिल्यांदा एका शिवसैनिका बद्दल मला सहानुभूती व खंत वाटते आहे. ही झाली एक बाजू.
आता दुसरी बाजू अशी की तो जो कोणी अर्शद बिर्शद नावाचा मुस्लीम कर्मचारी कॅंटीनचे काम पाहात होता त्याला अन्नाचा दर्जा दाखविण्यासाठी खासदाराने जी काही बळजबरी केली ती मलातरी योग्यच वाटते. कारण ही पोळी चारण्याच्या दोन तीन दिवसा आधीपासून महाराष्ट्र सदनातील जेवण व गैरसोयींबद्दलच्या तक्रारी वृत्त पत्रांतून झळकत होत्याच. इतर गैरसोयी बद्दल मल्लीक जबाबदार आहेच पण जेवणाची सोय अर्शदच्या अखत्यारित असल्यामुळे चांगले जेवण देणे ही त्याची ड्यूटीच होती.  मराठी थाळीतली वरण जी पाण्या सारखी असल्याचे अनेक वृत्तवाहिन्यांनी दाखवले त्यात अर्शदचा रोल महत्वाचा ठरतो हे अजिबात नाकारता येत नाही.  अनेकांच्या तक्रारी नि कुरबुरी सुरु होत्या. म्हणजे सदनातील जेवण व त्याचा दर्जा या बद्दल थोडी काळजी घेणे एक पगारी माणूस म्हणून तरी अर्शदची जबाबदारी होतीच. त्यानी ती सांभाळली का? नाही. म्हणजे पवित्र महिन्यात या पठ्यानी काय केलं? तर आपल्या कर्त्यव्यास चुकला. ज्या कामासाठी याला पगार दिला जात होता ते काम म्हणजे ग्राहकाना चांगले जेवण देणे... मग एक सच्चा मुसलमान म्हणून यानी प्रत्येक ग्राहकाची जातीने काळजी घ्यायला हवी होती. पवित्र महिन्याच्या मुहुर्तावर तर अधीकची काळजी घेत प्रत्येकाच्या तक्रारींवर जातीने लक्ष घालायला हवे होते. आपण जे अन्न देतो त्या बद्दल ग्राहकाचे मत किमान रॅंडमली तरी आजमावून त्यावर उपाय करायला हवे होते. पण यानी तर उलटाच कारभार चालविला होता. ’तू जे वाढतोस ते बेचव आहे’ म्हटले की रोजाच्या नावाने पठ्ठा हात वर करायचा. मग बिचारा ग्राहकराजा रंकासारखा फील करुन गुमान निघून जात असे. थोडक्यात अर्शद चक्क रमजानच्या महिन्यात बैमानी करत होता... या निकषावर याला रोजा धरण्याचा अधिकार तरी उरतो का? हा त्या मुल्ला मौलविना माझा प्रश्न आहे. पैसे मोजून जेवणारे ग्राहक असंतुष्ट होऊन तक्रारी केल्यावर काळजी घेण्या ऐवजी पोळी कोंबेस्तोवर बेफिकीरी दाखवली ती अर्शदनी. शेवटी एका ग्राहकाने चक्क कॅमेरॅवर न तुटणारी पोळी दाखविली व तूच जरा तोडून दाखव म्हटले तर लगेच हा ओरडा करतो की रोजा होता... एकिकडे रोजा धरायचा व  पैसे मोजणा-या ग्राहकाशी बैमानी करायची, हे सगळं अल्लाला चालते की कसे? अन चालत नसेल तर मग रोजानी मिळालेलं पुण्य ग्राहकाशी केलेल्या बैमानीमुळे टिकतं का? की रोजाच्या काळात पैसे मोजणा-या ग्राहकाला चांगले जेवण देणे बंधनकारक नसते की काय? थोडक्यात रमजानच्या महिन्यात अर्शद नुसता अल्लाशी नाही तर ग्राहक व स्वत:च्या व्यवसायाशीही बैमानी केली...  अन वरुन बोंबा काय मारतो तर मी रोजा ठेवला होता... तर मग घरी बसायचं ना. व्यवस्थापक म्हणून तुझी जबाबदारी बनते की शिजविलेले अण्ण चाखून पाहणे. आता हा पट्टा रोजाच्या नावाखाली चाखत  नसेल तर मग अन्नाची चव बिघडनार नाही तर काय?

ज्या प्रोफेशनमुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं, आपलं घर चालतं त्या प्रोफेशनशी गद्दारी करणारा हा अर्शद माझ्या नजरेत मुसलमान तर नाहीच पण रमजानच्या महिन्यात ग्राहकांशी बैमानी करणारा   सैतान नि हराम आहे.


टीप: मल्लीक हा सैतानाचा सैतान आहे. पुढच्या निवडणूकीत समस्त भगवे एकत्र येऊन सैतान हटावोचा महायज्ञ चालविणार असल्यामुळे आता मी त्यावर नाही बोलले तरी चालेल. (भगवे खुष हूवे होंगे नै!) 

1 टिप्पणी:

  1. निधर्मी राज्यव्यवस्थेत,सर का री कार्यालयात धार्मिकता पाळणे आणि वरुन परत गहजब करणे हाच गुन्हा ठरवायला हवा

    उत्तर द्याहटवा