गुरुवार, ३ जुलै, २०१४

गो-याच्या गोट्या : सेक्स तेंव्हा काम नाही, काम तेंव्हा सेक्स नाही.

बैलाच्या गोट्या मारणे (फोडणे) हे माझ्या गावाकडच्या शेतक-याला करावं लागणारं सर्वात अवघड काम. मी लहानपणी बैलाच्या गोट्या मारायच्या कामात  मदतनीस म्हणून हातभार लावला. आज अचानक त्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून हा ब्लॉग पाडत आहे.  फेबूवर अनेक शेतकरी भेटले... "बैलाच्या गोट्या कधी मारल्यात का?" असं विचारल्यावर मात्र हे शेतकरी उडालेच. कित्येकाना तर गोट्या मारणे काय प्रकार असतो हेच माहीत नाही. उन्हाळा संपून पावसाळा लागायला आला की आमच्याकडे गोट्या मारणे सुरु होते. वासरु तरुण होतो त्याला आमच्याकडे गोराम्हणतात तर याच वयाचं मादी पिल्लू म्हणजे आमच्या भाषेत बाकड(भाकड नाही, तो वेगळा प्रकार आहे). तर एकदा का प्रजनन सुरु झाले की बाकड गाय बनते. तसच गोरा म्हणजे हल्लीच्या भाषेत टीनएज्ड/तरुण वासरु.  उन्हाळा संपत येऊन मे-जुन लागला की गावातले सगळे गोरे गायींच्या पाठी असतात. याला आमच्या भाषेत खास शब्द आहे तो म्हणजे वेद्दांग... वेद्दांग म्हणजे हीटवर आलेल्या गायीच्यामागे अनेक गो-हे लागणे व बळी तो कानपिळी च्या तत्वानी गायीशी सेक्स करणे. तर आपला गोठा जास्तीत जास्त गजबजलेला असावा या गरजेपायी शेतकरी गो-याला एकदोन वर्षे तरी त्याला सूट देतो.... म्हणजे गो-याच्या गोट्या मारल्या जात नाही. दोन-तीन वर्षे मज्जा करुन झाली की मग त्याला गायीच्या कळपातून काढून नांगराला जुंपायचे असते.
पण गायीवर चढणा-या गो-याला थेट जर नांगराला जुंपले तर त्याच्यातील न संपलेलं रोमान्स, कष्टाचे काम करण्यास अजिबात तयार होत नाही. त्यामुळे हे गोरे नांगर ओढतच नाही. म्हणून मग नांगराला जुंपण्या आधी गो-याच्या गोट्या मारायच्या असतात. माझे मोठे वडील (आमच्याकडे ’मोठेबाबा’ म्हणतात) गोट्या मारण्यातले तज्ञ होते. गावात अशी दोन-तीनच तज्ञ व्यक्ती होती ज्यांच्या हातून गोट्या फोडल्यावर गो-याला कमीत कमी त्रास होत असे. मग काय... गोट्या मारुन घेणा-याची झुंबड उडत असे. आमच्या रानात दूर दुरून लोकं आपले गोरे घेऊन गोट्या मारायल येत असत.  मे-जून आला की गोट्या मारण्याचा सिझनच असे. खूप उन्हात गोट्या मारल्यास गोरा दगावण्याची शक्यता असल्यामुळे जरा एक पाऊस पडला (त्या काळात मे २० च्या दरम्यान पाऊस पडत असे. आजकाल जून २० ला सुद्धा पावसाचा पत्ता नसतो)  की गोरे असणारे शेतकरीगोटया मारायच्या कामाला लागत. मग काय पहिला पाऊस पडला की मोठेबाबा आम्हा पोराटोराना मदतीला घेत अन गोट्या मारणे सुरु...
गायींसोबत रोमान्स करणा-या गो-याला थेट मोठ्यावडलाच्या गोट्याखान्यात उभे केले जाई. मग मोठेबाबा आपली अवजारं, हत्यारं घेऊन दाखल होतं. गो-याचे पुढचे पाय घट्ट बांधले जाई, नंतर मागचे पायही घट आवळून बांधले की दोन-तीन धडधाकट माणसानी गो-याला जमिनीवर पाडायचे, त्या नंतर गो-याच्या मानेवरुन एक मोठी लाकडी फडी दाबण्याचे काम चार-पाच बलदंड माणसे करीत. बांधलेल्या पायावरही अशाच दोन फड्या दाबल्या जात. पोटावरुनही अशीच एक पडी दाबली जाई. एकूण तीन फड्या तर मला आठवतात. अशा प्रकारे गो-यावर संपुर्ण ताबा मिळविल्यावर मोठेबाबाचा रोल सुरु होई. गो-याच्या दोन्ही गोट्याना काहीतरी औषध वगैरे लावून घेत. त्या नंतर गोट्या धरण्याचा बांबूचा चिमटा गोट्यांमध्ये अडकवून, चिमट्याची दुसरी बाजू घट्ट धरत. मग तो चिमटा हळू हळू खाली सरकवत आणून एकदा गोट्या घट चिमट्याच्या पकडीत आले की खाली एक लाकडी फडी ठेवायची. त्या फडीवर गो-ह्याच्या गोट्या ठेवून एका खास किसमच्या हतोड्याने गो-याच्या गोट्या फोडल्या जात. जेंव्हा गोट्या फुटत तेंव्हा बिचार गो-हा जो काही किंचाळत असे त्या किंकाळ्या आजही कानात ताज्या आहेत. त्या नंतर लगेच पालापाचोळ्याचा लेप औषध म्हणून लावल्या जाई. गोट्या फोडणे खरंतर गो-याचा पुनर्जनम असावा असे वाटे.  आम्हा पोराटोरांचं काम काय तर चिमट दे, आता परत घे, आता औषध दे, आता परत घे... एवढच.
गोट्या फोडल्यावर गो-याला काही मिनटं तसच दडपून धरले जाई. काही वेळानंतर गो-याला सोडले जाई. तास दिड तासात गो-याच्या गोट्याना सूज येऊन तीप्पट मोठे झालेले दिसत. पुढचे काही दिवस बिचा-या गो-याला चालता सुद्धा येत नसे. पण काही दिवसताच ही सूज उतरली की गो-याच्या आंब्यापेक्षा मोठ्या असलेल्या गोट्या लिंबाएवढ्या होऊन जात. ही प्रक्रिया पूर्ण होणे म्हणजे गो-याचा बैल होणे. याचाच दुसरा अर्थ गो-हा यापुढे सेक्स करण्याचा लायीकीचा नसतो. थोडक्यात गोट्या फोडल्यावर गो-याचा बैल झालेला असतो. या नंतर दोन मुख्य बदल होतात...
पहिले म्हणजे यापुढे हा गोरा कधीच सेक्स करत नाही...!!!
दुसरा बदल म्हणजे आता नांगराला, बैलबंडीला जुंपा... मुकाट्याने काम करु लगतो...!!!
पारंपारीक शेतक-याचा मुलगा म्हणून आम्हाला अगदी बालवयातच एक तत्वज्ञान शिकवले जाते ते म्हणजे... 
सेक्स करणारा बैल काम नाही करत, अन काम करणारा बैल सेक्स नाही करत. या नियमाला धरुन आमच्याकडे गो-याच्या गोट्या फोडल्या जातात. 
कधी कधी असाच विचार चमकून जातो की हा नियम माणसाला लावला तर... पाच वर्षात भारत सुपर पॉवर बनणार, नै !!!५ टिप्पण्या:

 1. Marathvadyat tyala AAnd ( Egg) Chimatne mhantat.
  ani he kam vheternry Dr. kiva releted lok kartat

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मराठवाडा भारीये...!
   आमच्याकडेपण आता डॉक्टर येतात.
   वरील लेख माझ्या लहाणपणीच्या आठवणीतला आहे.

   हटवा
 2. एक गम्मत वाटली ती म्हणजे सध्या सगळीकडे दलित आणि इतर ठिकाणी गोऱ्यांनी आफ्रिकन कळ्यांवर केलेल्या अत्याचारावर बराच उहापोह झाला आहे. पण वरील प्रकारातून असे दिसते की माणूस स्वतः जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा सगळ्यांचा वापर करून घेतो. फक्त ते जेंव्हा आपल्या फायद्या साठी असते तेंव्हा काही वाटत नाही पण आपणच त्यात अडकलो की ते नको वाटते.

  प्रतिक्रिया छापली नाही तरी चालेल पण तुमचे मत आईकून घ्यायला आवडेल. इमेल आहे salil.gumaste@hotmail.com

  dhanywad

  सलील गुमास्ते,
  यू के

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. सलील साहेब,
   खरं आहे, माणसा सारखा कृर व निर्दयी प्राणी नाही.
   मी स्वत: हे काम करायचो. आता फार वाईट वाटते.

   हटवा
 3. हे मात्र खरं आहे.खूप त्रास होतो त्या घोर्याला मीही केली आहे मदत.

  प्रत्युत्तर द्याहटवा