मंगळवार, ७ जुलै, २०१५

रजनी कांती- हवाला रॅकेट


Image result for black moneyनरेंद्र मोदीनी सत्तेत येताना अनेक घोषणा दिल्या त्यातील एक म्हणजे काळा पैसा/व्यवहार संपविणे.  मग विदेशातील पैसे आणणे वगैरे त्याचा एक भाग होता. आता वर्ष उलटलं तरी त्या दिशेने पाऊल पडताना दिसत नाही. उलट गुजराती लोकांचं रजनिकांती नावाचं हवाला रॅकेट मागच्या वर्ष भरात जोरात काम करु लागलय. देशाच्या एकुण ८०+ शहरांतून हे गुज्जूभाई हवाला चालवित आहेत. मी या रजनिकांतीच्या पुण्याच्या एजंटला ओळखतो. हवाला संपविण्याच्या दृष्टीने माझं योगदान म्हणून रजनिकांती हवाला रॅकेटचे सगळे डिटेल्स/पुरावे सी.बी.आय. गृह मंत्रालय, आजतक व द हिंदू या सर्वाना पाठविले सुद्धा. पण गुज्जू भाईंचं वजन ईतकं जास्त आहे की वरील  हवाला एजंटवर कारवाई तर सोडाच पण साधी चौकशिही होताना दिसत नाही.

रजनिकांतीचा पुण्यातला हवाला एजंट तर चक्क दगडू शेठच्या समोर असलेल्या सर्वात मोठ्या इमारतीत दुकान थाटून बसला आहे. त्याचं नाव आंगळीया असून फ्ल्ट्/शॉप नं. २१२, दुसरा मजल्यावर(अगदी समोरच्या इमारतीत) बसून चक्क पोलिसांच्या पुढे व त्यांच्या आशिर्वादाने हवाला रॅकेट चालवितो. आपण मोठ्या आशेनी मोदीकडे पाहतोय की हा माणूस हवाला रॅकेट मोडीत काढेल. पण मी स्वतः रजनीकांती नावाच्या हवाला रॅकेटची तक्रार सी.बी. आय. ते गृह मंत्रालया पर्यंत करुन सुद्धा त्यावर कारवाई होताना दिसत नाही. अगदी पुणे कमिशनर कडे सुद्दा मी तक्रार केली असून आजवर काही उत्तर आलेले नाही. थोडक्यात हवाला बद्दल नुसती हवा केली जाते... कारवाई नाही. सध्या ललित मोदी व हवाला प्रकरण काँग्रेस तर्फे प्रचंड तापवलं जात आहे. मिडीयाही मोठा आव आणताना दिसतो. पण देशातच चालविल्या जात असलेला गुज्जू भाईंचा हवाला रॅकेट जो रोज करोडोची उलाढाल करते त्याची माहिती देऊन सुद्धा सरकार, पोलिस, मिडिया व विरोधीपक्ष कोणाला काही देणेघेणे नाही असे दिसते.

गुज्जूभाई व हवाला रॅकेट की जय हो!

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

पानसरे पुरोगामी ना प्रतिगामी, ते कम्युनिस्ट होते.

Image result for govind pansareगोविंद पानसरे पुरोगामी होते हे ऐकून/वाचून हसावं की रडावं अशी अवस्था झाली. गोविंद पानसरेना गोळी लागल्यावर अवघा महाराष्ट्र हळहळला पण मला मात्र काहीच वाटले नाही... म्हणजे अजिबात काही वाटले नाही. त्याची दोन कारणे आहेत. एक तर गोंविद पानरे व्यक्तीगत पातळीवर काहिही असले तरी त्यानी आयुष्यभर जोपासलेला वैचारीक वारसा हा कार्ल मार्क्सचे पितृत्व सांगणारा असून या चळवळीचा इतिहास रक्तानी माखलेला आहे. अशा चळवळीचा सैनिक म्हणून पानसरे हे सुद्धा खुनी व रक्तपाती चळवळीचे वारसदारच ठरतात.  त्यानी स्वत: कोणाचा खून केला नसला तरी खूनी चळवळीचा वारसा पुढे नेणा-याचे सहकारी म्हणून ते आरोपीच ठरतात. सामाजीक नि वैचारीक  जिवनातील रक्तपाती इतिहास स्वत:वर उलटताना व्यक्तीगत कार्याची पावती देऊन पानसरेना सूट देता येत नाही.  पानसरे ना प्रतिगामी होते ना पुरोगामी... ते कम्युनिस्ट होते. ते स्वत:चा वैचारिक बाप ’कार्ल मार्क्स’ याना मानत असत. आणि एकदा मार्क्सचे वैचारिक पितृत्व स्विकारले की तुमची चळवळीची एक स्वतंत्र दिशाही नि स्वतंत्र वैचारीक बैठक ठरते ती म्हणजे कम्युनिजम. आणि कम्युनिस्ट हा फक्त आणि फक्त कम्युनिस्ट असतो... तो ना पुरोगामी असतो ना प्रतिगामी. यांची जात स्वतंत्र असते.   
 कम्युनिस्टानी भांडवलशाहीच्या विरोधात मजूराची बाजू घेत जगभर चळवळ उभी केली. कार्ल मार्क्सनी कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रकाशीत केले ते वर्ष होते १८४८. हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे कारण याच वर्षी आमच्या महाराष्ट्रात मा. फुले यानी मुलींची पहिली शाळा काढली. बघा ईथेच दोन चळवळीतील भिन्नता अधोरेखीत होते. १८४८ मध्ये कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रसिद्ध करुन कार्ल मार्क्स सांगतात की मजूर वर्गानी क्रांती करुन हुजूर वर्गाचा खून पाडला पाहिजे/कापून काढले पाहिजे व सर्व आर्थीक सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. आर्थीक समता आणून सामाजीक समतोल साधला पाहिजे... आणि यालाच कम्युनिस्ट विचार म्हणतात. वरवर पाहता हा विचार प्रचंड प्रोमिसींग व परिवर्तनीय वाटतो. समाजाप्रती असलेला कळवळ अधोरेखीत करणाराही वाटतो.  
पण अगदी त्याच  वर्षी म्हणजे १८४८ ला भारतात फुलेनी अत्यंत प्रक्षोभक सामाजीक परिस्थीतीवर उपाय सांगताना शिक्षण घ्या असा सल्ला देत वैचारील लढ्याची बिजे रोवली. याच लढ्याला पुढे शाहू व आंबेडकरानी भारताच्या काना कोप-यात नेऊन पोहचविले. समाजाला सुशिक्षीत करुन वैचारीक लढ्यास सज्ज केले. अन या वैचारीक लढ्यालाच आपण आज पुरोगामी लढा म्हणतो. कार्ल मार्क्सनी असला वैचारीक लढा सांगितलाच नाही. त्यानी क्रांतीचा मार्ग सांगितला व मजूरानी हुजुराना कापून काढण्याचा मार्ग सांगितला. मग त्या विचाराचे पाईक श्री. गोविंद पानसरे पुरोगामी कसे काय ठरतात? कन्फ्युशिअस म्हणतो... “जर वर्षातच पीक हवे तर बी पेरा, पंधरा वर्षाचं नियोजन असेल तर झाडे लावा नि १०० वर्षाचं नियोजन असेल तर समाजाला सुशिक्षीत करा”  फुले व बाबासाहेबांच्या लढ्यानी हजारो वर्षाची दूरदृष्टी ठेवून समाजाला सुशिक्षीत करण्याची चळवळ उभी केली ज्याला पुरोगामी चळवळ म्हटली जाते. कार्ल मार्क्सनी हजारो तर सोडाच दोन वर्षाचेही  नियोजन सांगितले नाही.  मालकाना कापून तात्काळ सत्ता हाती घेणारी रक्तरंजीत चळवळ सांगितली. मग दोन चळवळीत इतका मुलभूत सैद्धांतिक फरक असताना गोविंद पानसरे पुरोगामी कसे काय ठरतात?
पुरोगामी चळवळ रचनात्मक कार्यबांधणीला वाहून घेते. मुलभूत सामाजीक बदल घडवून विषमता पिटाळण्यावर विश्वास ठेवते. त्याची सुरुवात शिक्षणापासू करते आणि अहिंसेच्या मार्गाने संविधानाचे पालन करत पुढे सरकते. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावे याचा आग्रह धरते. पैशाच्या पलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून दोघात समानता यावी यासाठी झटते. समस्त समाजानी एकमेकाशी बंधुत्वाने वागावे हे शिकवते. त्याच बरोबर कोणावरही अन्याय होवू नये म्हणून निपक्ष: न्यायाची मागणी करते. हा सगळा बदल घडवून आणण्यासाठी काही पिढया झोकून देण्यास पुरोगामी चळवळ तयार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय वर आधारीत समाज रचना निर्माण करण्यासाठी झटणारी चळवळ म्हणजे पुरोगामी चळवळ. 
विचार उत्कर्षाचा दूरागामी, चळवळ ती पुरोगामी! असं म्हटलं जाते.
पण कम्युनिजमचं नेमकं उलटं आहे. “चला उठा, भांडवलदाराना कापून क्रांती करु या कारण आर्थीक असमतोल पिटाळला की समाज सुखी होतो” यावर नितांत श्रद्धा  बाळगणारी ही चळवळ... जिचे पानसरे एक सैनिक होते. मग वरिल ध्येयप्राप्तीसाठी कम्युनिस्टानी जगभरात कापाकापी केली. कम्युनिजम मध्ये विचाराला विचाराने उत्तर देण्याची पद्धत नाही... तर वैचारीक विरोधकाचा खुलेआम कत्तल करण्याचा वारसा आहे. मग अशा वारस्याचे वारसदार पानसरे ह्यांच्या सोबत जे घडले तो आपसी मामलाच आहे. ईथे मात्र काही अर्धे हडकुंडे लगेच ओरडतात .... हा विचाराचा विचाराशी लढा नव्हेच.... वगैरे...
मी म्हणतो हो.... कम्युनिस्टतरी कुठे विचाराचा विचारानी लढा देतात. ते तर विरोधकाला थेट गोळ्या घालतात अन क्रांती असे नाव देतात...  मग त्यांच्याशीही तेच घडणारे जे ते करतात. एकतर अशा तमाम दांभिक विचारवंतानी जगभरातील कम्युनिस्ट चळवळ नीट अभ्यासावी किंवा वैचारीक लेख नावाखालील दांभिकता थांबवावी.... म्हणे काय तर पानसरे पुरोगामी.
बांधवानो गोविंद पानसरेना पुरोगामी म्हणून प्रोजेक्ट करणा-या विचारवंताना हे विचारा की फुले-शाहू-आंबेडकरांचे रचनात्मक कार्य शेजारच्या घरात आकार घेत असताना कार्ल मार्क्सचे वैचारीक पितृत्व स्विकारणारे पानसरे पुरोगामी कसे काय ते सांगा म्हणा! पानसरेना प्रमोट करताना नेमकं कोणाला काउंटर केले जात आहे? कम्युनिस्ट चळवळीला पुरोगामी म्हटल्यास पुरोगामी चळवळीत गोंधळ उडणार नाही का? मग यातून कोणाचं फावणार आहे व कोणती चळवळी खिळखिळी होणार आहे? याचाही विचार झाला पाहिजे.
एकच म्हणेन... पानसरे ना पुरोगामी होते ना प्रतिगामी, ते कम्युनिस्ट होते.


   

शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

दिल्लीमे 'आप' सबका बाप!मोदी लाटेने देशाचे राजकारण ढवळून निघालेले असताना व अनेक दिग्गजानी सपाटून मार खाल्यावर मोदीची ताकद मान्य करत भारतीय राजकारणात तुल्यबळ शत्रूचा उदय  झाल्याचे स्विकारुन नव्या डावपेचाची आखणी कशी करावी याचा प्रचंड गोंधळ उडालेला असताना,  दिल्लीत मात्र अरविंद केजरीवाल नावाचा एक दिडफूट्या ५६” छातीत धडकी भरविणारे कारनामे करत आहे. सामान्य कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा कर्दनकाळ ठरलेला केजरीवाल दिल्लीतील एक भगोडा ईथ पर्यंत विविध बारसे होऊन माध्यमांचे गोंजारणे ते फटके अशा नाना अनुभवातून परत एकदा आपली ताकद आजमावण्यास/दाखविण्या सज्ज झालेला आहे. खरतर माणूस पक्षाला मत देत नसतो हे मागील ६५ वर्षाच्या इतिहासातून सिद्ध होते. नेहरु, इंदिरा, जेपी(जनता पार्टीचा प्रयोगकर्ता),परत इंदिरा, सहानुभूतीतून राजीव मग  वाजपेयी असा चेह-यांचा इतिहास आहे.  व्ही.पी. सिंग, गुजराल, देवेगौडा व नरसिंहराव सारखे जे अपवाद घडलेत ते कोणकडेच प्रभावी चेहरा नसल्याने उदासीन मतदानातून हे ओळख नसलेले चेहरे पद उपभोगून गेले. त्याला नरसिंहराव एक अपवाद होते एवढेच. वरील सगळा इतिहास पाहता मतदार पक्षाला मत देत नसतो तर प्रोमिसींग फेसला मत देत असतो हे जाहीर आहे. तो प्रोमिसींग फेस आज भाजपकडे होता व त्यानी राष्टिय राजकारणात बाजी मारली. दिल्लीत मात्र भापकडे मतदाराला  भुरळ घालणारा तो चेहरा नाही. अरविंद नावाचे वादळ मात्र चारी दिशाना घोंगावत सुटले असून कॉंग्रेसनी अघोषीत पराजय स्विकारलेलेच आहे. एकूण काय तर दिल्लीच्या निवडणूकीत मेन मटेरीअलच अब्सेंट आहे तो म्हणजे चेहरा. अन योगायोगाना हा मटेरीअल फक्त आपकडे असल्यामुळे भाजपचा विजयरथ दिल्लीत अडविला जाईल या भितीनी भाजपचे धाबे दाणानले आहे.
चेह-या शिवाय निवडणूक जिंकणे अशक्य असल्याची खात्री असलेल्या भाजपनी बेदीच्या रुपात आयात उमेदवार उभा केला. नुसता उभा केला नाही तर चक्क मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. यातून जुने कार्यकर्ते व नेते दुखावणे ओघानेच आले व आता हीच किरण बेदी  दिल्ली भाजपतील दुफळीचे कारण ठरत आहे. भाजपतील अंतर्गत विरोध जितका तीव्र तितकीच केजरीची जिंकण्याची शक्यता जास्त. केजरीच्या तोडीचा चेहरा म्हणून बेदीला दिलेला प्रवेश भाजपचा घात करुन जाणार आहे. यात अजून एक कोन असा की कॉंग्रेसनी या सगळ्या परिस्थीतीचे भान ठेवत आपच्या बाजूनी आपली उरली सुरली ताकद उभी केली तर  भाजपचा पराजय नक्कीच होईल.
मोदी हा लबाड असून भगव्या अजेंड्यांचा प्रतिनिधी आहे हे हळूहळू उलगडू लागले आहेच, पण त्याच बरोबर साधू संतांनी मागच्या पाच सहा महिन्यात जो बेछूट व बेतालपणा सुरु केला आहे ते पाहता आता भाजपची उतरती चालू झाली असून त्याची सुरुवात दिल्लीतून होणार एवढे नक्की.
पण महत्वाचा मुद्दा हा आहे की दिल्लीत बेदी-केजरीवाल या दोघात जास्त डिझर्वींग कोण? जवळपास सगळेच विद्वान सत्ताधा-यांची बाजू घेत बेदीचे गुणगाण गात सुटलेत पण मला तरी केजरीवाल हा बेदीपेक्षा दहापट डिझर्व्हींग वाटतो. माध्यमे ही नेहमीच प्रस्थापितांच्या बाजूनी चाकरी करणे पसंद करतात हा इतिहास आहे. सत्तेत असणारा आमचा बाप ही माध्यमांची भुमीका असते. कालवर कॉंग्रेसचे गुणगाण गाणारी माध्यमे आता हळूच भाजप व मोदीचा सूर आवळू लागली आहेत. दिल्लीका भगोडा म्हणून जी काही मोहिम विशिष्ट् वाहिन्यानी चालविली आहे तो याचाच भाग असून भाजप याचा पद्धतशीरपणे वापर करत आहे. माध्यमाना हाताशी धरुन केजरीवालची चालविलेली टीकाच भाजपला घेउन बुडणार आहे. एखाद्याची प्रचंड टीका चालविल्यास तटस्थ लोकांची सहानुभूती त्याच्या बाजुनी उभी होत असते. मोदीचा उदय अशाच टीकेतून झाला याचा भाजपला इतक्या लवकर विसर पडावा याचे नवल वाटते.
अरविंद केजरीवालनी थोडी नादानी जरूर केली, पण हा माणूस आहे सच्चा. अन दिल्लीत त्याच्या सच्चाईची झलक मागच्यावेळेस लोकानी पाहिलेली आहे. करप्शनचा नायनाट करण्याची कुवत फक्त अन फक्त केजरीवालमधे आहे. मोदी व भाजप जरी अच्छे दिनचे स्वप्न दाखवत असले तरी करप्शनवर कारवाई करण्यात फारसे इंटरेस्टेड नाहीत. किंबहूना काळ्या पैशाच्या बाबतीत भाजपनी घेतलेला यूटर्न सगळ्यानाच  दुखावून गेला. मोदीचा विकास दारी येईल तेंव्हा येईल. पण सध्यातरी केजरीचा भ्रष्टाचार विरोधी लढा दिल्लीत मोदीला पुरुन उरणार आहे.
***