शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

दिल्लीमे 'आप' सबका बाप!मोदी लाटेने देशाचे राजकारण ढवळून निघालेले असताना व अनेक दिग्गजानी सपाटून मार खाल्यावर मोदीची ताकद मान्य करत भारतीय राजकारणात तुल्यबळ शत्रूचा उदय  झाल्याचे स्विकारुन नव्या डावपेचाची आखणी कशी करावी याचा प्रचंड गोंधळ उडालेला असताना,  दिल्लीत मात्र अरविंद केजरीवाल नावाचा एक दिडफूट्या ५६” छातीत धडकी भरविणारे कारनामे करत आहे. सामान्य कार्यकर्ता ते कॉंग्रेसचा कर्दनकाळ ठरलेला केजरीवाल दिल्लीतील एक भगोडा ईथ पर्यंत विविध बारसे होऊन माध्यमांचे गोंजारणे ते फटके अशा नाना अनुभवातून परत एकदा आपली ताकद आजमावण्यास/दाखविण्या सज्ज झालेला आहे. खरतर माणूस पक्षाला मत देत नसतो हे मागील ६५ वर्षाच्या इतिहासातून सिद्ध होते. नेहरु, इंदिरा, जेपी(जनता पार्टीचा प्रयोगकर्ता),परत इंदिरा, सहानुभूतीतून राजीव मग  वाजपेयी असा चेह-यांचा इतिहास आहे.  व्ही.पी. सिंग, गुजराल, देवेगौडा व नरसिंहराव सारखे जे अपवाद घडलेत ते कोणकडेच प्रभावी चेहरा नसल्याने उदासीन मतदानातून हे ओळख नसलेले चेहरे पद उपभोगून गेले. त्याला नरसिंहराव एक अपवाद होते एवढेच. वरील सगळा इतिहास पाहता मतदार पक्षाला मत देत नसतो तर प्रोमिसींग फेसला मत देत असतो हे जाहीर आहे. तो प्रोमिसींग फेस आज भाजपकडे होता व त्यानी राष्टिय राजकारणात बाजी मारली. दिल्लीत मात्र भापकडे मतदाराला  भुरळ घालणारा तो चेहरा नाही. अरविंद नावाचे वादळ मात्र चारी दिशाना घोंगावत सुटले असून कॉंग्रेसनी अघोषीत पराजय स्विकारलेलेच आहे. एकूण काय तर दिल्लीच्या निवडणूकीत मेन मटेरीअलच अब्सेंट आहे तो म्हणजे चेहरा. अन योगायोगाना हा मटेरीअल फक्त आपकडे असल्यामुळे भाजपचा विजयरथ दिल्लीत अडविला जाईल या भितीनी भाजपचे धाबे दाणानले आहे.
चेह-या शिवाय निवडणूक जिंकणे अशक्य असल्याची खात्री असलेल्या भाजपनी बेदीच्या रुपात आयात उमेदवार उभा केला. नुसता उभा केला नाही तर चक्क मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले. यातून जुने कार्यकर्ते व नेते दुखावणे ओघानेच आले व आता हीच किरण बेदी  दिल्ली भाजपतील दुफळीचे कारण ठरत आहे. भाजपतील अंतर्गत विरोध जितका तीव्र तितकीच केजरीची जिंकण्याची शक्यता जास्त. केजरीच्या तोडीचा चेहरा म्हणून बेदीला दिलेला प्रवेश भाजपचा घात करुन जाणार आहे. यात अजून एक कोन असा की कॉंग्रेसनी या सगळ्या परिस्थीतीचे भान ठेवत आपच्या बाजूनी आपली उरली सुरली ताकद उभी केली तर  भाजपचा पराजय नक्कीच होईल.
मोदी हा लबाड असून भगव्या अजेंड्यांचा प्रतिनिधी आहे हे हळूहळू उलगडू लागले आहेच, पण त्याच बरोबर साधू संतांनी मागच्या पाच सहा महिन्यात जो बेछूट व बेतालपणा सुरु केला आहे ते पाहता आता भाजपची उतरती चालू झाली असून त्याची सुरुवात दिल्लीतून होणार एवढे नक्की.
पण महत्वाचा मुद्दा हा आहे की दिल्लीत बेदी-केजरीवाल या दोघात जास्त डिझर्वींग कोण? जवळपास सगळेच विद्वान सत्ताधा-यांची बाजू घेत बेदीचे गुणगाण गात सुटलेत पण मला तरी केजरीवाल हा बेदीपेक्षा दहापट डिझर्व्हींग वाटतो. माध्यमे ही नेहमीच प्रस्थापितांच्या बाजूनी चाकरी करणे पसंद करतात हा इतिहास आहे. सत्तेत असणारा आमचा बाप ही माध्यमांची भुमीका असते. कालवर कॉंग्रेसचे गुणगाण गाणारी माध्यमे आता हळूच भाजप व मोदीचा सूर आवळू लागली आहेत. दिल्लीका भगोडा म्हणून जी काही मोहिम विशिष्ट् वाहिन्यानी चालविली आहे तो याचाच भाग असून भाजप याचा पद्धतशीरपणे वापर करत आहे. माध्यमाना हाताशी धरुन केजरीवालची चालविलेली टीकाच भाजपला घेउन बुडणार आहे. एखाद्याची प्रचंड टीका चालविल्यास तटस्थ लोकांची सहानुभूती त्याच्या बाजुनी उभी होत असते. मोदीचा उदय अशाच टीकेतून झाला याचा भाजपला इतक्या लवकर विसर पडावा याचे नवल वाटते.
अरविंद केजरीवालनी थोडी नादानी जरूर केली, पण हा माणूस आहे सच्चा. अन दिल्लीत त्याच्या सच्चाईची झलक मागच्यावेळेस लोकानी पाहिलेली आहे. करप्शनचा नायनाट करण्याची कुवत फक्त अन फक्त केजरीवालमधे आहे. मोदी व भाजप जरी अच्छे दिनचे स्वप्न दाखवत असले तरी करप्शनवर कारवाई करण्यात फारसे इंटरेस्टेड नाहीत. किंबहूना काळ्या पैशाच्या बाबतीत भाजपनी घेतलेला यूटर्न सगळ्यानाच  दुखावून गेला. मोदीचा विकास दारी येईल तेंव्हा येईल. पण सध्यातरी केजरीचा भ्रष्टाचार विरोधी लढा दिल्लीत मोदीला पुरुन उरणार आहे.
***