शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

पानसरे पुरोगामी ना प्रतिगामी, ते कम्युनिस्ट होते.

Image result for govind pansareगोविंद पानसरे पुरोगामी होते हे ऐकून/वाचून हसावं की रडावं अशी अवस्था झाली. गोविंद पानसरेना गोळी लागल्यावर अवघा महाराष्ट्र हळहळला पण मला मात्र काहीच वाटले नाही... म्हणजे अजिबात काही वाटले नाही. त्याची दोन कारणे आहेत. एक तर गोंविद पानरे व्यक्तीगत पातळीवर काहिही असले तरी त्यानी आयुष्यभर जोपासलेला वैचारीक वारसा हा कार्ल मार्क्सचे पितृत्व सांगणारा असून या चळवळीचा इतिहास रक्तानी माखलेला आहे. अशा चळवळीचा सैनिक म्हणून पानसरे हे सुद्धा खुनी व रक्तपाती चळवळीचे वारसदारच ठरतात.  त्यानी स्वत: कोणाचा खून केला नसला तरी खूनी चळवळीचा वारसा पुढे नेणा-याचे सहकारी म्हणून ते आरोपीच ठरतात. सामाजीक नि वैचारीक  जिवनातील रक्तपाती इतिहास स्वत:वर उलटताना व्यक्तीगत कार्याची पावती देऊन पानसरेना सूट देता येत नाही.  पानसरे ना प्रतिगामी होते ना पुरोगामी... ते कम्युनिस्ट होते. ते स्वत:चा वैचारिक बाप ’कार्ल मार्क्स’ याना मानत असत. आणि एकदा मार्क्सचे वैचारिक पितृत्व स्विकारले की तुमची चळवळीची एक स्वतंत्र दिशाही नि स्वतंत्र वैचारीक बैठक ठरते ती म्हणजे कम्युनिजम. आणि कम्युनिस्ट हा फक्त आणि फक्त कम्युनिस्ट असतो... तो ना पुरोगामी असतो ना प्रतिगामी. यांची जात स्वतंत्र असते.   
 कम्युनिस्टानी भांडवलशाहीच्या विरोधात मजूराची बाजू घेत जगभर चळवळ उभी केली. कार्ल मार्क्सनी कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रकाशीत केले ते वर्ष होते १८४८. हे वर्ष अत्यंत महत्वाचे आहे कारण याच वर्षी आमच्या महाराष्ट्रात मा. फुले यानी मुलींची पहिली शाळा काढली. बघा ईथेच दोन चळवळीतील भिन्नता अधोरेखीत होते. १८४८ मध्ये कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रसिद्ध करुन कार्ल मार्क्स सांगतात की मजूर वर्गानी क्रांती करुन हुजूर वर्गाचा खून पाडला पाहिजे/कापून काढले पाहिजे व सर्व आर्थीक सत्ता आपल्या हाती घेतली पाहिजे. आर्थीक समता आणून सामाजीक समतोल साधला पाहिजे... आणि यालाच कम्युनिस्ट विचार म्हणतात. वरवर पाहता हा विचार प्रचंड प्रोमिसींग व परिवर्तनीय वाटतो. समाजाप्रती असलेला कळवळ अधोरेखीत करणाराही वाटतो.  
पण अगदी त्याच  वर्षी म्हणजे १८४८ ला भारतात फुलेनी अत्यंत प्रक्षोभक सामाजीक परिस्थीतीवर उपाय सांगताना शिक्षण घ्या असा सल्ला देत वैचारील लढ्याची बिजे रोवली. याच लढ्याला पुढे शाहू व आंबेडकरानी भारताच्या काना कोप-यात नेऊन पोहचविले. समाजाला सुशिक्षीत करुन वैचारीक लढ्यास सज्ज केले. अन या वैचारीक लढ्यालाच आपण आज पुरोगामी लढा म्हणतो. कार्ल मार्क्सनी असला वैचारीक लढा सांगितलाच नाही. त्यानी क्रांतीचा मार्ग सांगितला व मजूरानी हुजुराना कापून काढण्याचा मार्ग सांगितला. मग त्या विचाराचे पाईक श्री. गोविंद पानसरे पुरोगामी कसे काय ठरतात? कन्फ्युशिअस म्हणतो... “जर वर्षातच पीक हवे तर बी पेरा, पंधरा वर्षाचं नियोजन असेल तर झाडे लावा नि १०० वर्षाचं नियोजन असेल तर समाजाला सुशिक्षीत करा”  फुले व बाबासाहेबांच्या लढ्यानी हजारो वर्षाची दूरदृष्टी ठेवून समाजाला सुशिक्षीत करण्याची चळवळ उभी केली ज्याला पुरोगामी चळवळ म्हटली जाते. कार्ल मार्क्सनी हजारो तर सोडाच दोन वर्षाचेही  नियोजन सांगितले नाही.  मालकाना कापून तात्काळ सत्ता हाती घेणारी रक्तरंजीत चळवळ सांगितली. मग दोन चळवळीत इतका मुलभूत सैद्धांतिक फरक असताना गोविंद पानसरे पुरोगामी कसे काय ठरतात?
पुरोगामी चळवळ रचनात्मक कार्यबांधणीला वाहून घेते. मुलभूत सामाजीक बदल घडवून विषमता पिटाळण्यावर विश्वास ठेवते. त्याची सुरुवात शिक्षणापासू करते आणि अहिंसेच्या मार्गाने संविधानाचे पालन करत पुढे सरकते. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावे याचा आग्रह धरते. पैशाच्या पलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून दोघात समानता यावी यासाठी झटते. समस्त समाजानी एकमेकाशी बंधुत्वाने वागावे हे शिकवते. त्याच बरोबर कोणावरही अन्याय होवू नये म्हणून निपक्ष: न्यायाची मागणी करते. हा सगळा बदल घडवून आणण्यासाठी काही पिढया झोकून देण्यास पुरोगामी चळवळ तयार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय वर आधारीत समाज रचना निर्माण करण्यासाठी झटणारी चळवळ म्हणजे पुरोगामी चळवळ. 
विचार उत्कर्षाचा दूरागामी, चळवळ ती पुरोगामी! असं म्हटलं जाते.
पण कम्युनिजमचं नेमकं उलटं आहे. “चला उठा, भांडवलदाराना कापून क्रांती करु या कारण आर्थीक असमतोल पिटाळला की समाज सुखी होतो” यावर नितांत श्रद्धा  बाळगणारी ही चळवळ... जिचे पानसरे एक सैनिक होते. मग वरिल ध्येयप्राप्तीसाठी कम्युनिस्टानी जगभरात कापाकापी केली. कम्युनिजम मध्ये विचाराला विचाराने उत्तर देण्याची पद्धत नाही... तर वैचारीक विरोधकाचा खुलेआम कत्तल करण्याचा वारसा आहे. मग अशा वारस्याचे वारसदार पानसरे ह्यांच्या सोबत जे घडले तो आपसी मामलाच आहे. ईथे मात्र काही अर्धे हडकुंडे लगेच ओरडतात .... हा विचाराचा विचाराशी लढा नव्हेच.... वगैरे...
मी म्हणतो हो.... कम्युनिस्टतरी कुठे विचाराचा विचारानी लढा देतात. ते तर विरोधकाला थेट गोळ्या घालतात अन क्रांती असे नाव देतात...  मग त्यांच्याशीही तेच घडणारे जे ते करतात. एकतर अशा तमाम दांभिक विचारवंतानी जगभरातील कम्युनिस्ट चळवळ नीट अभ्यासावी किंवा वैचारीक लेख नावाखालील दांभिकता थांबवावी.... म्हणे काय तर पानसरे पुरोगामी.
बांधवानो गोविंद पानसरेना पुरोगामी म्हणून प्रोजेक्ट करणा-या विचारवंताना हे विचारा की फुले-शाहू-आंबेडकरांचे रचनात्मक कार्य शेजारच्या घरात आकार घेत असताना कार्ल मार्क्सचे वैचारीक पितृत्व स्विकारणारे पानसरे पुरोगामी कसे काय ते सांगा म्हणा! पानसरेना प्रमोट करताना नेमकं कोणाला काउंटर केले जात आहे? कम्युनिस्ट चळवळीला पुरोगामी म्हटल्यास पुरोगामी चळवळीत गोंधळ उडणार नाही का? मग यातून कोणाचं फावणार आहे व कोणती चळवळी खिळखिळी होणार आहे? याचाही विचार झाला पाहिजे.
एकच म्हणेन... पानसरे ना पुरोगामी होते ना प्रतिगामी, ते कम्युनिस्ट होते.