बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

फडणवीसांना उसंत द्या, भाजपच त्यांचा पराजय करेल.


Image result for fadnavisदेवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री असल्याचा सामान्य मराठी माणसाचा समज आहे. अन काही प्रमाणात तो खराही आहे. कारण फडणवीस हे व्यक्ती म्हणून खरच चांगले आहेत. त्यामुळेच ते तमाम मराठी तरुणाना भावतात. पण चांगलं व्यक्तीमत्व अन चांगला राजकारणी या दोन्ही गोष्टी समान नाही. चांगला माणूस हा अपरिपक्व राजकारणी असू शकतो किंवा अगदी त्याच्या उलट एक चांगला राजकारणी आहे माणूस म्हणून नापास असू शकतो. त्यामुळे चांगला माणूस हा चांगला राजकारणी असतोच असा समज करुन घेणे तसे चुकीचेच. फडणवीस बद्दल नेमकं हेच घडत आहे. फडणवीस बद्दल माझं मत असं आहे की He is the man of personal qualities, but not a public qualities. म्हणजे वयक्तीक पातळीवर ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत, पण नेता म्हणून ब-याच आघाड्यावर कमी पडतात. यापलिकडे राजकारणात अजून एक डायमेन्शनचा विचार झाला पाहिजे तो म्हणजे पक्षाचं तत्वज्ञान... प्रत्येक पक्षाचं आपलं एक स्वतंत्र तत्वज्ञान असतं. मग हे तत्वज्ञान तमाम नेत्यांनी पक्षाचा अजेंडा या नावाखाली रेटायचं असतं. हे करत असताना अनेक ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाचा बळी जात असतो. अन इथून सुरु होते एका पराजयाची सुरुवात. पण ती सुरुवात सुरु झाले हे कळायला इतका वेळ जातो की थेट पराजय तुमच्या नजरेच्या टप्यात येऊन उभा होतो. तेंव्हा मग ना परत वळता येत न पराजयाच्या भुताला पिटाळता येत.
फडणवीसांच्या बाततीत अगदी असाच प्रवास सुरु झाला आहे. फडणवीस हे Man of the personal quality मध्ये मोडतात. मी अगदी धरमपेठेतील(नागपूर) त्यांच्या खास कार्यकर्त्यांपासून अनेक दलित बांधवांसोबत असलेल्या त्यांच्या उत्तम ट्यूनिंगचा साक्षीदार आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांच्या एकूण वागणूकीत त्यांच्या Personal Qualities दिसत असतात. त्यामुळे ते माणूस म्हणून लोकांना आवडून जातात. अन मग आपला मुख्यमंत्री असाच असावा वगैरे लोकांना वाटू लागतं. पण इथेच आपली चूक होते. कारण Personal Qualities ना पक्षधोरण हरेक त्या ठिकाणी मात देते जिथे पक्षाचं धोरण रेटणं गरजेचं होऊन बसतं. याचा अर्थ Man of Personal Qualities च्या जोडीला चांगले धोरण असलेला पक्ष असणे तेवढेच गरजेचे असते. अन भाजपच्या धोरणां बद्दल बोलायची गरजच नाही. कट्टर हिंदुत्ववादी विचारातून जन्मलेला हा पक्ष राजकीय फायद्यासाठी थोडा Flexible झाल्याचा आव जरी आणत असला तरी त्याची हिंदूत्वाची खोड काही जात नाही. अन मग हिच खोड Man of Personal Qualities ला मारक ठरते जाते. म्हणजे देवेंद्र फडणवीचा पराभव जर कोणी करणार असेल तर तो विरोधी राजकारण्यांफेक्षा स्वपक्षाचे धोरणच करणार आहे. त्यामुळे विरोधकांना फक्त थोडं दमानं घ्यायची गरज आहे, एवढच.
सत्तेत आल्यापासून भाजपचं धोरण फडणवीसाच्या आतील Man of Quality ला अनेक ठिकाणी मारक ठरलेलं आहे. संघाची चड्डी घालून जडणघडण झाली असली तरी फडणवीस जिथे राहतात व जिथून त्यांचं राजकारण सुरु झालं त्या धरमपेठेत आंबेडकरी समाज मोठा प्रभाव बाळगून आहे. त्यामुळे फडणवीस तसे संघातले पुरोगामीच... पण असा माणूस मुख्यमंत्री झाल्यावर अचानक गोमांसबदी घालतो, लोकप्रतिनिधीविरुद्ध बोलल्यास देशद्रोहाचा गुन्हा ठरविणारा कायदा मांडतो, प्रकाश मेहटाला पाठिशी घालतो अशा अनेक घटना आहेत जो महाराष्ट्रातील तमाम तरुणाना बुचकळ्यात टाकतात. कारण या तमाम घटना Man of Qualities हारल्याचा संकेत देतात. म्हणजे तुम्ही कितीही गुणी माणूस निवडून द्या, पक्षाचं धोरण अशा माणसाला पुरून उरतं. म्हणजे माणसाच्या वयक्तीक गुणवत्तेला पक्षाचं धोरण कायम नडत असतं. त्यामुळे भाजपनी कितीही आव आणला तरी त्यांचा स्थायीभाव काही सुटणारा नाही. म्हणजे हिंदूत्व, मुस्लीम द्वेष, अन बुवा बाबांची पोपटपंछी हे सगळं भाजपाच्या आत्म्याला असे काही चिकटलेले आहेत की अधून मधून त्यांचा आवाज घुमतो तो घुमतोच... मग जेंव्हा केंव्हा तो घुमतो तेंव्हा फडणवीसांसारखे  भाजप राजकारणी ज्यांची ख्याती Man of Qualities म्हणून जनमाणसात आहे, ती दोन मिनटात धुळीस मिळते. एकदा स्वपक्षाच्या पापातूनच चांगले नेते गारद करणे सुरु झाले की मग विरोधकांना फार कष्ट करायची गरज नसते. अन हे घडण्यासाठी भाजप सत्तेत अजून काही वर्षे टिकून राहणे गरजेचे आहे. भाजपं जेवढा सत्तेत राहील तेवढा त्यांचा आतील आवाज जास्त जोमाने उसळणार. सत्तेची मस्ती एकदा चढायला लागली की माणसाचे तर्क व नितीमुल्ये धुसर होत जातात. मग त्यातून स्वत:चा –हास सुरु होतो. हा –हास घडावा असे जर वाटत असेल तर तेवढी मस्ती चढावी इतकं राजकीय सत्ताउपभोगही घडायला हवा. मग भाजपं स्वत:च स्वत:ला मारक अशा कारवाया करत जाणार. मग त्यातून एकेकाचा बळी पडणे सुरु होणार व शेवटचा बळी फडणवीस हे असणार एवढं नक्की. तमाम विरोधकांनी एकच करावे. फडणवीस व कंपूच्या मागे हात धुवून लावण्यापेक्षा त्यांना जरा उसंत द्यावी. म्हणजे हे लोकं बेफिकीर होऊन राजकारण करतील. एकदा का अंगात बेफिकीरी आली की चुका होणे आलेच. चुकांची गिणती मात्र आपण ठेवावी. एकदा का ती गिणती पुरेशी भरली की मग भाजपचा परायज मोठी गोष्ट नाही. 

म्हणून म्हणतो, फडणवीसांना उसंत द्या, भाजप त्यांचा पराजय जरूर करेल.


-जयभीम

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

भारतात मुस्लीम असुरक्षीत, म्हणून रोहिंग्याना राहू द्या!

Image result for rohingya muslimsवरचं वाक्य़ काहितरी विचित्र वाटतय ना.. खरय, ते विचित्रच आहे, पण ते माझं वाक्य नाही, तर तमाम भारतीय तथाकथीत सेक्यूलर-बुद्धिमंतान्चं आहे.  भारताला आज ख-या अर्थाने जर कुणापासून धोखा असेल तर या पाखंडी बुद्दिवाद्यांकडून आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून स्युडो-सेक्युलरद्यांचा असा काही तोल गेलाय की ते सेक्युलरिजम नावाचं तत्वज्ञान झोडताना आपल्या मागील वाक्याचा पुढील वाक्याशी काही ताळमेळ आहे की नाही याचही भान ठेवत नाहीत. रोहिंग्याना भारतात आश्रय द्यावा असा  पोटतिडकिने ओरडा करताना भारतानी कसं मानवतावादी मुल्यं जपायला हवं वगैरे तत्वज्ञान पाजळणे सुरु होते. रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशात उपरे म्हणूनच जगत आलेले पुर्वाश्रमीचे बांग्लादेशी घुसखोर. त्यामुळे त्यांना म्यानमारात अजूनही सिटिझनशीप मिळालेली नाही.  मग उप-यांनी उपकृत केलेल्या देशात किंमान त्याचं भान ठेवत जगायला हवं पण ते इस्लामी रक्तात थोडीच असतं. मग स्थानिकांशी कायमच वाजत राहिलं.  पुढे पुढे याचं रुपांतर दंग्यात व हिंसक चळवळीत होऊ लागल्यावर स्थानिक बौद्धांना रोहिंग्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक वाटू लागले. परंतू  शांततावादी बौद्धानी बराच काळ संयमानी व दमानी घेऊन बघितलं. पण रोहिंग्यानी या संयमाचं Interpretation नेमकं उलटं केलं व बौद्धांच्या सहिष्णूतेला कमजोरी समजून आपला उपद्रव चालू ठेवला. जेंव्हा मुस्लीमांचे उत्पात वाढतच गेले तेंव्हा, एका टप्प्यावर सगळं असह्य होऊन बसलं. स्थानीक बौद्धांच्या मनात रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात राग निर्माण होणे नैसर्गीक होते व त्याचा भडका उडण्याची वेळ येऊन ठेपली. फक्त या खदखदीला एक दिशा देणा-या नेतृत्वाची गरज होती अन अशात एक भंते पुढाकार घेतात. त्या भंतेचं नाव आहे अशीन वीरथू.

भंते अशीन वीरथू

खरं तर या आधीपासून भंते अशीन वीरथू हे अत्यंत तडफदार बौद्ध नेतृत्व म्हणून म्यानमारात प्रसिद्ध होतेच, पण ती ओळख धम्माशी संबंधीत होते. रोहिंग्या प्रकरणामुळे जरा त्याच Interpretation जातीयवादी, कट्टरपंथी असं होऊ लागलं. खरं तर ते बौद्ध धर्माची मुल्ये जपणारे शांततावादी आहेत. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुमच्या मुळावर कोणीतरी उठला तरी तुम्ही शांत बसून राहावे. शेजारुन घुसखोरी करुन आलेले रोहिंगे जेंव्हा स्थानीक बौद्धांच्या जिवावर उठले तेंव्हा चिटपूट घटनांचा प्रतिकार झाला पण रोहिंग्यांचे उपद्रव वाढत गेले तेंव्हा स्थानिकांना एका नेतृत्वाची गरज होती व  भंते वीरथूने  यांनी ती जागा घेतली व रोहिंग्या मुस्लीमांच्या विरोधात चळवळ उभी केली. काहिवेळा ज्याला जी भाषा समजे ती भाषा बोलणे फार गरजेचे असते, अन्यथा डॉयलॉग एकतर्फी होत राहतो व त्यातून एका पक्षाचं प्रचंड नुकसान होत जातं.  हे जाणून असलेले भंते यांनी रोहिंग्या मुस्लिमाना जी भाषा समजते त्या भाषेत प्रतिक्रिया दिली. चिथावनीखोर, हिंसक व अल्लाच्या नावानी मस्तवाल झालेला रोहिंग्या सुरुवातीला स्थानिकांकडून प्रतिकार येताच आजून हिंसक बनला. ही त्यांची मोडस ओपरेंडी आहे. पण अशातच मग स्थानिकांच नेतृत्व भंते वीरथूंकडे गेलं. त्यातून मग मुसलमानाला समजणा-या भाषेत उत्तर दिले गेले अन रोहिंग्यांची दाणादाण उडाली. पुढे म्यानमारमध्ये रोहिंग्या विरुद्ध स्थानिक बौद्ध हा संघर्ष इतका पेटला की रोहिंग्याला देश सोडून पळावं लागलं. तर असे हे खाल्या ताटाला लाथ मारणारे रोहिंगे मुसलमान. इथे तिकडची स्टोरी संपली.
भारतात पळून आलेल्या रोगहिंग्यांवरुन  इकडे दुसरी स्टोअरी सुरु झाली. सगळ्यात आधी इथले मुस्लीम प्रेमी ऊर बडवत रोहिंग्याना कवटाळायला धावले. हे मानवतावादी काय म्हणतात तर, सरकारने या रोहिंग्याना आमच्या देशात राहू द्यावे. म्हणजे १०-१५ वर्षानंतर आम्हाला लाथा घालायची सोय आपण स्वत:च करुन घ्यायची. हा कोणता शहाणपणा आहे ते मला कळत नाही. अगदी न्यायसंस्थेनेही या प्रकरणात उडी मारावे इथपर्यंत प्रकरण गेले. नशीब की सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहून रोहिंग्याना परत पाठविले जाणारच असे ठणकावले. या नंतर परत एकदा तेच... मुस्लीम प्रेमाचा पूर  यायला लागला...खास करुन डावे अन सेक्यूलर म्हणवून घेणा-यांकडून काहूर माजविणे सुरु झाले. अन सगळ्यात वाईट तर तेंव्हा वाटलं जेंव्हा शशी थरूर सारखा माणूस फक्त कॉंग्रेसीपणा जपणासाठी बुद्धी गहाण टाकून रोहिंग्याची तळी उचलतो. हा माणूस आपली बुद्धी शाबूत ठेवून बोलण्यासाठी ओळखला जायचा, पण हल्लीचे त्यांचे बोलणे ऐकले की त्यांचा प्रवास स्युडो-सेक्यूलरच्या दिशेने सुरु झाल्याची खात्री पटते. आता तर म्यानमार रोहिंग्याना परत न्यायला तयार झालाय, त्यामुळे खरंतर कोणालाच लुडबुड करायला जागा नाही. तरी आमचे मुस्लीम प्रेम एवढे ऊतू चाललेय की आम्हाला रोहिंगे हवेतच, मग अगदी म्यानमार त्याना परत नेणार असेल तरी आम्हाला ते हवेतच. हा हट्ट आहे, मग त्याला लॉजिक बिजिकची गरज नसते... हट्ट हा हट्ट असतो, तो फक्त करायचा असतो, बस.
तर, रोहिंग्यांचं काय करायचं ते सरकार करेलच, पण त्यांच्यासाठी पोटतिडकीने ओरडणा-यांची मला कमाल वाटते.  मात्र  ही लोकं लबाडी करताना आपण काय बोलतो याचंही भान ठेवत नाही. बघा ना ते एकिकडे म्हणतात की "हा देश  अत्यंत असुरक्षीत बनला असून, इथे मुसलमानाना जिवाचा धोखा आहे"   बरं... मग हाच देश रोहिंग्यासाठी कसा काय सुरुक्षीत आहे याचं उत्तर मात्र ते देत नाहीत.  अगदी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी  यांनीसुद्धा पदभार सोडल्यावर (संपल्यावर) अशाच शब्दात प्रतिक्रिया दिली. डावे, पत्रकार, कलावंत, विचारवंत ते अगदी उपराष्ट्रपती पर्यंत सगळ्यांनी या देशाला व जगाला "भारतात मुस्लीम असुरक्षीत आहे" हे पटवून देण्यासाठी जमेल तेवढे  प्रयत्न केले.  यातून जगाला जर असे वाटायला लागले की भारत हा खरच मुसलमानांसाठी असुरक्षीत आहे तर त्यात नवल नाही. किंबहुना आता काही देशांना ते खात्रीशीरपणे वाटतही असेल, असो.  पण मग अचानक तोच भारत देश ह्याच विचारवंत, कलावंत, पत्रकार इ. मंडळींना रोहिंग्यांसाठी अत्यंत सुरक्षीत जागा वाटू लागते. मग ते रोहिंग्यांसाठी इथे आश्रय मिळावा म्हणून सरकारवर दबाव टाकू लागतात. अचानक हा देश रोहिंग्यांना ठेवण्याइतपत सुरक्षीत कसा काय बनतो ते मला कळत नाही. म्हणजे सरकारला झोडायचे तर देश असहिष्णू अन मुस्लीमांचे लाड करायचे तर मग देश सहिष्णू... अहे की नै गंमत. खालील दोन वाक्यांची गंमत बघा...  १) भारत हा मुस्लीमांसाठी असुरक्षीत/असहिष्णू आहे किंवा २) रोहिंग्याना इथे राहू द्यावं इतका तो सुरक्षीत/सहिष्णू आहे. ही दोन्ही वाक्य एकाच वेळी खरी नाही असू शकत. हमिद अन्सारी ते अमिर खान पर्यंत सगळे जेंव्हा म्हणतात की भारत देश हा मुस्लीमांसाठी असुरक्षीत आहे तेंव्हा जर ते खरे असेल तर रोहिंग्यासाठीही तो असुरक्षीतच असायला हवा. जर तसे नसेल तर मग हमीद अन्सारी, अमिर खान ते तमाम पुरोगाम्यांचा दावा ते स्वत:च खोडून काढत आहेत. जर भारत सहिष्णू नसेल तर मग आधीच इथला मुस्लीम जोखीम पत्करुन जगत असताना नव्या मुस्लीमांची भर टाकायचे कारण काय? म्हणजे रोहिंग्यांचा काटा भारतातही काढला जावा असे या सगळ्यांना वाटत आहे काय? अन जर तसे वाटत असेल तर मग हे सगळे मानवतावादी मानवतेचे घोर अपराधी नाहीत काय. भारतीय  डावे, पत्रकार, विचारवंत इ. एकाचवेळी  परस्पराशी विसंगत असलेली दोन वाक्यं म्हणतोय. भारतात मुस्लीम असुरक्षीत आहे.... भारतात रोहिंग्याना राहू द्या. अन स्वतःचं हस करुन घेत आहेत. मला तर काही कळत नाहिये... तुम्हीच विचार करुन बघा.... काय खरं काय खोटं ते...!!!

-जयभीम

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

खोलेंची स्वयंपाकीन, मराठा कावा!

घरात स्वयंपाकासाठी बामण बाई हवी हे खोलेंचं वाक्य अन घरात जावयी म्हणून स्वजातीय मराठा पाहिजे ही लग्नाची जाहीरात या दोन गोष्टीत गुणात्मक फरक तसा अजिबात नाही. मग खोलेबाई दोषी कशा?  अन खोले जातीयवादी असतील तर सेम लॉजिनी तमाम मराठेही तेवढेच जातीयवादी आहेत. मग जातीयवादी म्हणून बाईच्या नावानी शिमगा का सुरू आहे? केवळ त्या बामण आहेत म्हणून? सेम गुन्ह्यासाठी मराठा हा का टार्गेट केल्या जात नाही? की मतपेटीचे गणित आम्हाला तसे करु देत नाही? अगदी ईथे मिडीया सुद्धा तावातावाने खोलेबाईंच्या विरुद्ध नको तेवढा आव आणताना दिसला, हाच मिडीया मात्र सेम कृती बद्दल कधी मराठा व तत्सम उच्चवर्णीयांच्या अगदी याच पॅटर्नच्या गुन्हयाविरुद्ध कधी अवाक्षर बोलताना दिसला नाही. म्हणजे या देशातील विचारवंत, लेखक, चळवळे, राजकारणी ते अगदी मिडीया हे सगळेच सोयीचा खेळ खेळत असतात. लोकांना त्यातून भ्रमित करणे व स्वत:ची पाठ स्वत:च किंवा एकमेकांची पाठ थोपटणे असे सुरु आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले असून ते चार भिंतीच्या आत कसं वापरायचं हे ज्यानी त्यानी ठरवायचं असतं. खोलेबाईची एकूण वागणूक वरील तरतुदीला धरूनच आहे. ईथे मात्र काही लोक संविधानाचा वापर सोयीने करताना दिसत आहेत. खरंतर खोले प्रकरणात यादव बाईनी खोलेंचं कांन्स्टिट्युशनल राईट वायोलेट केलय. कारण आपल्या घरातील विधी कसा करावा हा खोलेबाईचा धार्मिक व व्यक्तीगत अधिकार आहे. तो यादव बाईमुळे जर मोडला गेला असेल तर ख-या विक्टीम खोलेबाई ठरतात, यादव बाई नाही. एकूण प्रकरण पाहता प्राईमाफेसी तरी यादवबाईच दोषी दिसतायेत. कारण तेच... घरात जावयी स्वजातीयच हवा ही मराठा व इतर उच्चवर्णीयांची जितकी खाजगी बाब आहे, तेवढीच खाजगी बाब खोलेंची बामण स्वयंपाकीनाची आहे.

समजा मुसलमानानी एखादा स्वयंपाकी ठेवला व त्यानी वर्षभर चारलेलं मांस हे हलालीचं होतं  तसेच अगदी मुसलमनी पद्धतीचं होतं तरी तो स्वयंपाकी मुसलमान नव्हताच  हे जेंव्हा कळतं तेंव्हा ती फसवणूक ठरते.  मुसलमानाच्या खाण्यापिण्याच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याचं उल्लंघन ठरतेच. म्हणजे फसवणूक हा Punishable Offense सुद्धा ठरतं. अन यादव बाईंची कृती Offense ठरावी अशीच आहे. सेम जैनांच्या बातीतही म्हणता येईल की जर एखादी व्यक्ती जैन असल्याचं सांगून त्यांच्या घरात शिरते अन अगदी जैन पद्धतीचं जेवण बनवून वाढते तरी जेंव्हा हे कळतं की ती स्वयंपाकीन जैन नाही तेंव्हा ती फसवणूकच ठरते. थोडक्यात एखाद्याच्या घरी कोणतं जेवणं शिजावं ही पूर्णपणे त्याची व्यक्तीगत बाब असताना जर कोणी समधर्मीय असल्याचं सांगुन कोणाच्या किचन पर्यंत शिरत असेल तर, जातीय बाब वगळली तरी, व्यक्तीगत अधिकाराचं उल्लघंन आहेच. अन हे उल्लघंन करण्याचा अधिकार तसा कोणालाच नाही. अगदी किचनवाला बामण असला तरी नाही, वा किचनमध्ये घुसणारा मराठा असला तरी नाही. त्यामुळे खोलेबाईंनी केलेली तक्रार ही Justifiedच आहे. कारण चार भिंतीच्या आतील विधी, सवयी नि वर्तन याला सार्वजनिक नियमांच्या टप्यात तोवर नाही आणता येत जोवर ते इतरांसाठी Nuisance (उपद्रव) ठरत नाही. मेधा खोलेंचं चार भिंतीच्या आतील विधी धार्मीक तर खानपानाच्या सवयी व्यक्तीगत बाबीत मोडण-या असून त्याला सार्वजनिक वर्तनाचे निकस लावणे तर्कविसंगत आहे. कोणाच्या घरी कोणी काय करावं हा ज्याचात्याचा वयक्तीक मामला आहे. खोलेंना जर वाटतं की माझ्या घरचं जेवण सोवळ्यात बनावं... अन ते बामणानीच बनवावं तर ही डिमांड करण्याचा बाईना तसा अधि्कार आहे. अगदी मराठे पेपरात ’स्वजातीय जावयी हवा’ म्हणून  जो प्रकार करतात त्याच धाटनिची डिमांड खोले बाईंची आहे. स्वजातीय जावयासाठी मराठे जसे दोषी नाहीत, अगदी त्याच न्यायाने खोलेबाईसुद्धा दोषी नाहीत. या परिस्थितीत यादवबाईची कृती मात्र असमर्थनीय ठरते. खरंतर खोलेनी माफी मागीतल्यावर प्रकरण संपायला हवं होतं. पण झुंडशाहीनी मध्ये उडी टाकून प्रकरण पेटवायचं ठरवलय. ही खरच दुर्दैवी बाब आहे.
यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
या एकुण प्रकरणात खोलेच्या आडून ब्राम्हण टार्गेट केल्या जात आहे. हा तसाही पुरोगाम्याचा आवडता छंद आहे. अरे ब्राह्मण आधीच 3.5% त्यातले अधिकांश सुधारीत आहेत. मग जे एक्का दुक्का खोले टाईप उरतात त्यांचं उपद्रव मुल्य तसं नगण्यच. पण याच्या उलट मराठ्यांची संख्या अजस्त्र... त्यात कर्मठ मराठेही गावोगवी आहेत. हे सगळं पाहता मराठ्यांचा जातीयवाद अधिक उपद्रवी नि समाज घातकी आहे. कोणत्याही खेड्यात जा, गावात जा अन पहा, तिथे दलीतांवर अत्याचार करणारा एकही ब्राह्मण नाही तर बहुतांश हे मराठेच आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणात जर कोणी जातीयवाद पाळत असेल तर तो मराठा आहे, ब्राह्मण नाही.  त्यामुळे आवाज उठलाच तर मराठ्यांच्या विरोधात उठायला पाहिजे. पण तसं होऊ नये म्हणून मराठ्यांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. याला मराठा कावा यापेक्षा वेगळं काय म्हणता येईल.

- जयभीम

तळटीप:  संघ आणि हिंदुत्ववाद्यानो, माझा लेख हा तुमच्या बाजूनी नाहिये. हा निव्वळ मराठ्यांचा जातीयवाद दाखविण्यापुर्ती मर्यादीत आहे. कृपया मला फोन करु नका. मी कधीच तुमच्या गटातला होऊ शकत नाही. प्लीज.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.

Image result for bjpमध्यप्रदेशात आता ’येससर/येस मॅडम’ ऐवजी हजेरी देताना ’जय हिंद’ म्हणण्याचा फतवा काढण्याता आला म्हणे. एवढच नाही तर शालेय स्तरावर शिक्षकांनी १ आक्टोबर पासून याची अमलबजावणी करण्याची रंगीत तालिमही सुरु केल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. सत्ता हाती आल्यावर माणसे कशी मस्तवाल आणि आंधळी होतात हे नुसते वाचले होते, पण भाजपच्या रुपात मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. मला आधी उगीच वाटायचं की भाजपं हा हिंदुत्ववादी पक्ष आहे.  हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू धर्माला माननारा, अंधश्रद्धाना कवटाळून बसणारा, माणसापेक्षा देवा-दगडाना पुजणारा, जगातील तमाम औषधीपेक्षा गोमुत्र हे सर्वात जालिम औषध असून ते कोणत्याही आजारावर रामबाण म्हणून काम करतं यावर प्रगाढ श्रद्धा असलेला. आजही पृथ्वी ही भुजंग नागाच्या खांद्यावर असून होणारे भुकंप हे भुकंप नाहीतच तर नाग जेंव्हा केंव्हा खांदे पालटतो तेंव्हा पृथ्वीला कंप येतात असे समजणारा.  अशा एकसे बढकर एक विनोद जपणारा व हे विनोद इतरानी विनोदी वृत्तीने घेऊ  नये यासाठी प्राण पणाला लावून झगडणारा म्हणजे हिंदू. तर माझी जी काही हिंदू बद्दलची आजवरची समजूत होती ती अशी, अन भाजप या पक्षातले कार्यकर्ते ते नेते वरील परिभाषेत फिट्ट बसणारे असा समज होता. पण आता मात्र तो समज अगदीच छोटूसा ठरावा असे एकसे बढकर एक कारनामे भाजपाई लोकं करत आहेत. त्यामुळे आता मला भाजपायी लोकं हे भुतलावरील सर्वात मोठे माठ असल्याची प्रचिती येत आहे. म्हणजे राजकारणी कसे असु नये हे जर कोणाला सांगायचं असेल तर कोणत्याही भाजपवाल्याला धरा अन हे बघा असं असू नये म्हणून सांगा, एवढी किर्ती भाजपवाल्यानी मागली तीन वर्षात कमावली आहे.  
खरंतर भाजपचा एकुण करंटेपणा आधिपासूनच माहित होता, पण मोदीच्या रुपात  भाजप जी काही कात टाकताना दिसली ते पाहून आता भाजपची पुढची पिढी मागास हिंदूच्या एकूण साच्यातून बाहेर पडत नव्या विचाराचा गाडा हाकणार असे वाटून गेले होते. हे मलाच नाही तर तमाम भारतीयांना व तरुणाना वाटले. त्याचा पक्का पुरावा म्हणजे २०१४ पासून भारतात भाजपाला मतदानातून मिळणारं यश हे होय. ६५-७० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसच्या एकूण कार्यशैली व उदासीन वृत्तीला कंटाळलेल्या तरुणानी मोदी-शहाच्या जोडीने उभी केलेली नवी टीम भाजप आपल्या देशाचं काहितरी भलं करेल अशी आशा लावून बसली. नुसती बसली नाही तर मतदानातून भाजपाच्या पाठीशी आपला भक्कम पाठिंबा उभा केला.

भाजप मात्र लोकांच्या भावनांचा वेध घेण्यात नेमकी चुकत गेली. प्रत्येक विजयागणिक भाजपनी हिंदुत्वाला शरण जाताना तमाम नव्या परिवर्तनवादी मतदात्यांच्या थोबाडीत मारत गेली. आपल्या विजयाचे शिल्पकार केवळ हिंदू असल्याचा गैरसमज अधिकाधिक घट्ट होत गेला नि भाजपला विजयामागील नेमकं तर्कशास्त्र समजावून घेण्याची व त्यावर चिंतन मनन करुन त्यानुरुप पुढील वाटचालिची आखणी करण्याची गरजच वाटली नाही. उलट आपण हिंदूत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेची पायरी चढल्याचा काही हिंदुत्वावादी संघटनानी घंटानाद चालु ठेवला व भाजपला तेच खरे वाटू लागले. यातून तत्पुरते नुकसान त्या बदल घडवू पाहणा-या मतदारांचे झाले, पण भाजप नावाच्या पक्षाचे मात्र कायमचे नि दीर्घकालीन नुकसान होत आहे. पण होणारा नुकसान किती प्रमाणात आहे याचं नेमकं मोजमाप या टप्प्यावर करता येत नसल्यामुळे भाजपं अधिक गाफील होत असून त्यातून चुकांवर चुका घडत आहेत. जेंव्हा या चुकांची शिक्षा फर्मावली जाईल तेंव्हा भाजपच्या हातात डॅमेज कंट्रोलसाठी कोणतेच पर्यार उरलेले नसणार, वेळ पूर्णपण निसटून गेलेली असेल.
भाजपं सत्तेत आल्यावर स्वत:च्याच पायावर धोंडे मारुन घेणारे अनेक निर्णय घेत स्वत:चे भविष्य पोखरुन टाकण्याचा धडाकाच लावला. त्यात गोमासबंदी, लोकप्रतिनिधीवर टिका केल्यास देशद्रोहाचा गुन्हा, वंदे मातरम, काश्मिर प्रकरण असे एकसे बढकर एक धोंडे शोधून शोधून स्वत:च्या पायावर आपटणे सुरु ठेवले. यातून दुखावला गेलेला मतदार हा प्रचंड संयमी व योग्य वेळेवर घाव घालणारा असतो. तो येणा-या निवडणूकांमधुन काय सांगायचे ते सांगेलच पण आता मात्र गपगुमान राहण्यापलिकडे त्याच्याजवळ पर्याय नाही. हा पर्याय नसणे म्हणजे भाजपनी स्वत:चं अवलोकन न करता मोकाट वागावं असं अजिबात होत नाही, पण दुर्दैवाने आज तेच होत आहे.
भाजपनी सध्या जो काही शाळेच्या पातळीवर भगविकरणाचा प्रकार चालविला व लहनग्या पोरांना ’जय हिंद’ म्हणायला भाग पडत आहे ही प्रचंड संताप आणणारी गोष्ट आहे. आज ना  उद्या याचा हिशेब मतपेटीतुन होईलच. पण तो करण्याआधी भाजपनी शेखचिल्लीपणा टाकून देत भानावर यावे. राजकीय पक्षांनी असे जातीयपणे वागणे राजकारणाच्या नितिमुल्यांना धरुन नाही. तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर कोणतिही मुल्य जपता येतात, पण एकदा सत्तेत बसलात की समावेश होऊन सत्ता हाकायची असते हे अगदी राजकारणातलं बेसीक प्रिन्सीपल आहे. भाजपं मात्र सत्तेच्या मस्तीत इतका मस्तवाल झालाय की तो बेबंध होऊन वागताना दिसत आहे. यातून एवढच म्हणता येईल... भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

"बंधू आणि भगिनिनो"च्या पलिकडेही काही आहे का?


११ सप्टेंबर १८९३ रोजी म्हणजे बरोबर आजच्या दिवशी स्वामी विवेकानंदाने अमेरीकेत जाउन "बंधू आणि भगिनिनो” म्हटले अन त्याचा जगभर गाजावाजा होऊन तमाम भारतीयांचे ऊर ५६ इंची होऊन गेले. ही कथा मी लहानपणापासून  ऐकत आलो अन माझेही लहानसे ऊर दर वर्षी आहे त्यापेक्षा कित्येक इंचाने मोठे होत जायचे. मग शाळेत दर वर्षी विवेकानंद जयंती/पुन्यतिथी व आजुन कोणते निमित्य होऊन यावर बोलायची संधी मिळाली की गुरुजींच्या मदतीने एखादे भाषण लिहून घेऊन मग ते शाळेच्या व्यासपिठावरुन(?) ठोकायचे हे माझे नित्याचे झाले होते. मग त्यावर पडणा-या टाळ्य़ा व नंतर शिक्षकांकडून होणारं कौतूक पाहिल्यावर तर हे विवेकानंद प्रकरण वर्षातून जास्तीत जास्त वेळ का रिपीट होत नाही म्हणून दु:खही वाटायचं. तर हे झालं शालेय जिवनातील विवेकानंद. पण मग जरा मोठा झाल्यावर मी कॉलेजात दाखल झालो व माझ्या वक्तृत्व कलेला अजून झाळाळी येत गेली व मी विवेकानंदाच्या मर्यादीत साठ्याच्या बाहेर पडून आपला वकृत्व साठ्याचा आवाका वाढविण्याच्या नादात मग टिळक, सानेगुरुजी, गांधी, नेहरू ते अगदी कम्युनिजम व मार्क्स, लेनीन व माओ पर्यंतचे जुगाडू भाषण ठोकायला लागलो. यात त्या आयडिओलॉजिशी काही देणं घेणं नसायचं, टाळ्या मिळविणे हा एकमेव उद्देश असायचा.
पण याच काळात माझी आंबेडकरी चळवळीशी नाड जुडली नि वैचारीक जडणघडण होताना वक्तृत्व कला अधिक तेजाळत गेली त्यातून मला अनेक नव्या दिशा सापडल्या. मग एखादे वाचन हे नुसते कौतूक करवुन घेण्यासाठी करायचे नसते तर त्यातील गाभा समजून घ्यायचा असतो हा नविनच प्रकार अनुभवत गेलो. हा टप्पा ख-या अर्थाने माझ्या वैचारीक मशागतीचा होता. त्यामुळे तमाम आंबेडकरी साहित्याचा व लेखकांचा मी सदैव ऋणी राहिन.
पण एकदा या टप्यातून गेल्यावर मग जेंव्हा मी स्वामी विवेकानंद वाचला तेंव्हा मला माझीच गंमत वाटली. कारण विविकानंदाच्या बुद्धिमत्तेचा जो प्रचार मी लहानपणापासून ऐकत आलो त्याची पडताळणी करत वाचणे सुरु झाले. आणि मग मला माझेच हसू यायचे. कारण विवेकानंद यांची किर्ती फक्त “बंधू आणि भगिनिनो” या दोन शब्दानी दिलेली असून त्यापलिकडे त्यांचं स्वत:चं असं फारसं काहीच नाही हे सत्य उमगत गेलं. गंमत म्हणजे वरील दोन  शब्द म्हणजे विवेकानंदाची निर्मिती नसून माझ्या पुर्वजांचा वारसा आहे. थोडक्यात काय तर विवेकानंद हे माझ्या पुर्वजांचा वारसा वापरुन किर्तीमान झालेत. कारण बंधू आणि भगिनिनो या पलिकडे विवेकानंदाची अजून एखादी कर्तबगारी असावी हे मलातरी दिसलेले नाही. असल्यास प्लीज सांगा!
तर स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या पुर्वजांनी पारंपारिक पद्धतिने जपलेल्या बंधू आणि भगिनिनोचं एनकॅशमेंट करणारे चतूर स्वामी होते. त्या चतूरपणाचं मी कौतूक करतो व त्या आजच्या शिकागो भाषणाच्या १२४ व्या वर्षपुर्तीच्या शुभेच्छा देतो.

भाऊच्या गणपतीच्या निमित्याने!Image result for bappaतसं पाहिलं तर भाऊ कदम प्रकरण आता संपलय, पण त्या निमित्याने जी चर्चा झाली त्या बद्दल एक दोन युक्तीवाद नेटवर असणे गरजेचे वाटले म्हणून  हा ब्लॉग पाडत आहे. तर भाऊ कदमानी घरी गणपती बसवला अन तमाम आंबेडकरवाद्यांनी त्यावर तुटून पडत आपला रोष व्यक्त केला. कदमानी चूक झाल्याचे कबूल करत प्रकरण संपविले. पण त्या दरम्यान जे युक्तीवाद झडले त्यात दोन प्रकारचे नवीन प्रश्न उभे झाले असून  त्यांचा प्रतिवाद करणे आवश्यक आहे. त्यातला पहिला म्हणजे बाबासाहेबांनी संविधानात सर्वाना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे भाऊ कदमांचे हे स्वातंत्र्य आंबेडकरी समाजानी  मान्य करावे अन त्याचा आदरही करावा. अन दुसरा युक्तीवाद म्हणजे बाबासाहेबानी तर प्रबोधनाचा मार्ग सांगितला आहे, तेंव्हा बहिष्कार घालणे हे आंबेडकरी परंपरेला धरुन आहे का? तर...

हवा तो धर्म पाळण्याचा अधिकार भाऊ कदमाना नाही काय?
याचं स्पष्ट उत्तर आहे, अजिबात नाही. कारण संविधानानी तो अधिकार हवा तो धर्म पाळण्यासाठी दिला आहे, लबाड्या करण्यासाठी नाही. म्हणजे काय, तर भाऊना जर हिंदू धर्म आवडत असेल तर त्यानी स्पष्टपणे तो स्विकारावा अन संविधानिक तरतुदीचा फायदा घ्यावा असा त्या संविधानीक तरतुदीचा अर्थ आहे. पण भाऊनी नेमकं काय केलं तर बौद्ध समाजाचा घटक म्हणून स्वकीयांमध्ये वावरायचे. म्हणजे त्यातून ते बौद्ध असल्याचं नुसतं भासवतच नव्हते तर तसं भासवल्यामुळे जे फायदे (आर्थीक, सामाजीक, धार्मीक व मानसन्मान हे सगळं एकत्र करुन) मिळत गेले ते उपभोगलं. अन तिकडे गणपती बसवून हिंदू असल्याचही भासवत गेले अन त्यातुनही कमर्शीअल फायदे (सिनेमा व मनोरंजन व्यवसायातील इतर फायदे) मिळवित राहिले. म्हणजे कदमांचं वर्तन बघता एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे त्यांना एकतर बौद्ध धर्माचा व्यवसायीक वाटचालीत अडथळा व कमीपणा वाटत असे किंवा हिंदू भासविल्यास अधिक कमर्शीअल फायदे मिळतील असा कयास असावा. दोन्ही केसमध्ये कदम हे फ्रॉड्युलंटली वागत होते हे स्पष्ट होते. त्याना खरच जर बौद्ध धर्माची अडसर वाटत होती तर तीच वरील संविधानाची तरतून वापरत त्यानी तो धर्म सोडायला हवा होता. किंवा हिंदु धर्म अधिक प्रिय होता तर हिंदू धर्म स्विकारुन गणपती बसवायचा असता. पण यातलं एकही न करता आपल्या धार्मीक आयडेंटिटीला अधिक अंधूक करत नेलं आणि सोयी नुसार दोन्ही धर्मांचा साधक असल्याचा जो काही प्रकार भाऊ कदमांनी केला तो हिंदू धर्मात  मान्य असेलही पण बौद्ध धर्माला अशी लबाडी अमान्य आहे.  मुळात बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची देव आणि दैव आधारीत तत्वज्ञान नाकारुन उदयास आला. त्यातील काही गोष्टी राहून गेल्या, ज्यामुळे लोकं बौद्ध धर्मात हिंदुत्वाची सरमिसळ करत राहिले त्याचा बंदोबस्त २२ प्रतिज्ञा देऊन बाबासाहेबानी केला. त्या प्रतिज्ञांप्रमाणे हिंदू देव दिवींचे कोणतेच कार्य करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. तरी एखाद्याला आंबेडकरी आई-वडलांच्या पोटी जन्मल्यावर देवांवर प्रेम जडल्यास त्याला बौद्ध धर्म सोडून संविधानिक स्वातंत्र्य वापरत हिंदु बनता येते. त्यांनी खुशाल ते करावं. बास.

दुसरा मुद्दा: बाबासाहेबांनी तर प्रबोधनाचा मार्ग सांगितला आहे, बहिष्कार घालणं कितपत योग्य आहे?
यावर खरंतर खूप बोलण्याचं काहीच कारण नाही. फक्त काय, तर वरील प्रश्न विचारणारे मुळात वैचारीक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार करत असतात, एवढच. कारण प्रबोधन करायचं असं जेंव्हा म्हटलं जातं, तेंव्हा त्याचा अर्थ असा होतो की जो अज्ञानी आहे व ज्याला आंबेडकरी विचार कळत नाही त्याचं प्रबोधन करुन बाबासाहेबांच तत्वज्ञान त्याला पटवून देणे हे अभिप्रेत असते. पण कदमांच्या केस मध्ये प्रबोधन १००% गैरलागू आहे. कारण कदम अज्ञानी नसून अतिहुशार आहेत. ते हवं तेंव्हा मी बौद्ध असं म्हणतात व दुसरीकडे जाऊन हिंदू असल्याचाही आव आणतात. ही कृती ते खूप चालाखीने वागत असल्याचं सिद्ध करते. त्यामुळे ते प्रबोधनास डिस्कालिफाय होतात अन एका अर्थाने दोन्ही धर्माशी खेळलात म्हणून गुन्हेगार ठरतात. आता एकदा माणूस गुन्हेगार ठरला की मग ओघानेच तो शिक्षेस पात्र ठरत असतो. मग ती शिक्षा कोणती तर भाऊं कदमावर बहिष्कार घालावा.... अन ती न्यायच आहे.
थोडक्यात आंबेडकरी चळवळ ही जरी प्रबोधनानी जाणारी असली तरी त्या चळवळीशी जाणून बुजून लबाडीने वागल्यास पुढची व्यक्ती प्रबोधनास डिसक्वालीफाय होते व त्यावर बहिष्कार टाकणे हे लॉजिकल आहे.  त्यामुळे भाऊ कदमांवर ज्या प्रकारे आंबेडकरी लोकांनी बहिष्कार टाकला ते योग्यच. अन तेवढ्याच तत्परतेने आपली चूक कबूल करत भाऊ कदमानी क्षमा मागितल्यामुळे आता त्यांच्या बद्दल कोणताही किंतू परंतू मनात न ठेवता त्यांच्याशी स्नेहाने वागणेही तेवढेच महत्वाचे.

कदमांच्या निमित्ताने अजून एक गोष्ट निरिक्षणात आली ती म्हणजे ब-याच लोकांचं असं म्हणनं होतं की तुम्हीतरी २२ प्रतिज्ञांचे पूर्णपणे कुठे पालन करता. या प्रश्नावर मात्र आमचे लोकं गोंधळून जाताना दिसले. कारण खरच आपण २२ प्रतिज्ञांचे पूर्णपणे पालन करत नाही हे आतून पटत असल्यामुळे मग तो प्रश्न विचारणारे वरचढ होताना दिसले. एखादी व्यक्ती वरील प्रश्न विचारुन मला कोंडित पकडते तेंव्हा माझा युक्तीवाद काहिसा असा असतो. ...

जगात एकही मुस्लीम संपूर्ण कुराणचे पालन करत नाही, तरी सुद्धा तो मुस्लीम असतोच ना...
जगात एकही क्रिश्चन संपूर्णपणे बायबलचे अनुकरण करत नाही तरी तो ईसाई असतोच ना...
जगात एकही हिंदू संपूर्णपणे ३३ कोटी देव व त्यांचे विविध ग्रंथ (वेद, पुराणे, गीता वगैरे) चे पालन करत नाही तरी तो हिंदू असतोच ना..
मग अगदी याच न्यायांने २२ प्रतिज्ञांचे संपूर्ण पालन नाही केले तरी आम्हाला वाटते की आम्ही बौद्ध आहोत तर पुढच्यांनी ते स्विकारावे, एवढेच.
याही पलिकडे जाऊन युक्तीवाद करायची वेळ आल्यास असे म्हणता येईल की एखादा डॉ. MBBS झाला म्हणजे त्यानी संपूर्ण वैद्यकशास्त्र आत्मसात केले आहे असे नसते, तरी तो वैद्य म्हणवतोच ना. अगदी त्याच लॉजिकने आम्ही संपूर्ण २२ प्रतिज्ञा नाही पाळल्या तरी काही पाळल्यास आम्ही बौद्ध ठरतोच. १००% २२ प्रतिज्ञा पाळल्याच पाहिजे वगैरे निकष आम्हाला लावणा-यांनी हे कायम लक्षात ठेवावे की जगात एखाद्या व्यक्तीला एखादया विशिष्ट विचारधारेचा अनुयायी मानण्यासाठी त्या विचारधारेचे १००% पालन केले जावे असे निकष लावले जात नाहीत. मग आमच्याच बाबतीत २२ प्रतिज्ञांचा १००% निकष लावण्याचा हट्ट धरणे हे कितपत योग्य आहे. आमच्या समाज बांधवानी जमेल तेवढ्या प्रतिज्ञा पाळल्या तरी पुरेसे आहे. २२ च्या २२ पाळल्याच पाहिजे  वगैरे अतार्कीक आहे. हा, एवढं म्हणू शकतो की आम्ही आज जेवढ्या पाळतो त्यापेक्षा अधिक पाळण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. अन हे प्रयत्न करत राहणे बौद्ध म्हणविण्यासाठी पुरेसे आहे.

जयभीम.