बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.

Image result for bjpमध्यप्रदेशात आता ’येससर/येस मॅडम’ ऐवजी हजेरी देताना ’जय हिंद’ म्हणण्याचा फतवा काढण्याता आला म्हणे. एवढच नाही तर शालेय स्तरावर शिक्षकांनी १ आक्टोबर पासून याची अमलबजावणी करण्याची रंगीत तालिमही सुरु केल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. सत्ता हाती आल्यावर माणसे कशी मस्तवाल आणि आंधळी होतात हे नुसते वाचले होते, पण भाजपच्या रुपात मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. मला आधी उगीच वाटायचं की भाजपं हा हिंदुत्ववादी पक्ष आहे.  हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू धर्माला माननारा, अंधश्रद्धाना कवटाळून बसणारा, माणसापेक्षा देवा-दगडाना पुजणारा, जगातील तमाम औषधीपेक्षा गोमुत्र हे सर्वात जालिम औषध असून ते कोणत्याही आजारावर रामबाण म्हणून काम करतं यावर प्रगाढ श्रद्धा असलेला. आजही पृथ्वी ही भुजंग नागाच्या खांद्यावर असून होणारे भुकंप हे भुकंप नाहीतच तर नाग जेंव्हा केंव्हा खांदे पालटतो तेंव्हा पृथ्वीला कंप येतात असे समजणारा.  अशा एकसे बढकर एक विनोद जपणारा व हे विनोद इतरानी विनोदी वृत्तीने घेऊ  नये यासाठी प्राण पणाला लावून झगडणारा म्हणजे हिंदू. तर माझी जी काही हिंदू बद्दलची आजवरची समजूत होती ती अशी, अन भाजप या पक्षातले कार्यकर्ते ते नेते वरील परिभाषेत फिट्ट बसणारे असा समज होता. पण आता मात्र तो समज अगदीच छोटूसा ठरावा असे एकसे बढकर एक कारनामे भाजपाई लोकं करत आहेत. त्यामुळे आता मला भाजपायी लोकं हे भुतलावरील सर्वात मोठे माठ असल्याची प्रचिती येत आहे. म्हणजे राजकारणी कसे असु नये हे जर कोणाला सांगायचं असेल तर कोणत्याही भाजपवाल्याला धरा अन हे बघा असं असू नये म्हणून सांगा, एवढी किर्ती भाजपवाल्यानी मागली तीन वर्षात कमावली आहे.  
खरंतर भाजपचा एकुण करंटेपणा आधिपासूनच माहित होता, पण मोदीच्या रुपात  भाजप जी काही कात टाकताना दिसली ते पाहून आता भाजपची पुढची पिढी मागास हिंदूच्या एकूण साच्यातून बाहेर पडत नव्या विचाराचा गाडा हाकणार असे वाटून गेले होते. हे मलाच नाही तर तमाम भारतीयांना व तरुणाना वाटले. त्याचा पक्का पुरावा म्हणजे २०१४ पासून भारतात भाजपाला मतदानातून मिळणारं यश हे होय. ६५-७० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसच्या एकूण कार्यशैली व उदासीन वृत्तीला कंटाळलेल्या तरुणानी मोदी-शहाच्या जोडीने उभी केलेली नवी टीम भाजप आपल्या देशाचं काहितरी भलं करेल अशी आशा लावून बसली. नुसती बसली नाही तर मतदानातून भाजपाच्या पाठीशी आपला भक्कम पाठिंबा उभा केला.

भाजप मात्र लोकांच्या भावनांचा वेध घेण्यात नेमकी चुकत गेली. प्रत्येक विजयागणिक भाजपनी हिंदुत्वाला शरण जाताना तमाम नव्या परिवर्तनवादी मतदात्यांच्या थोबाडीत मारत गेली. आपल्या विजयाचे शिल्पकार केवळ हिंदू असल्याचा गैरसमज अधिकाधिक घट्ट होत गेला नि भाजपला विजयामागील नेमकं तर्कशास्त्र समजावून घेण्याची व त्यावर चिंतन मनन करुन त्यानुरुप पुढील वाटचालिची आखणी करण्याची गरजच वाटली नाही. उलट आपण हिंदूत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेची पायरी चढल्याचा काही हिंदुत्वावादी संघटनानी घंटानाद चालु ठेवला व भाजपला तेच खरे वाटू लागले. यातून तत्पुरते नुकसान त्या बदल घडवू पाहणा-या मतदारांचे झाले, पण भाजप नावाच्या पक्षाचे मात्र कायमचे नि दीर्घकालीन नुकसान होत आहे. पण होणारा नुकसान किती प्रमाणात आहे याचं नेमकं मोजमाप या टप्प्यावर करता येत नसल्यामुळे भाजपं अधिक गाफील होत असून त्यातून चुकांवर चुका घडत आहेत. जेंव्हा या चुकांची शिक्षा फर्मावली जाईल तेंव्हा भाजपच्या हातात डॅमेज कंट्रोलसाठी कोणतेच पर्यार उरलेले नसणार, वेळ पूर्णपण निसटून गेलेली असेल.
भाजपं सत्तेत आल्यावर स्वत:च्याच पायावर धोंडे मारुन घेणारे अनेक निर्णय घेत स्वत:चे भविष्य पोखरुन टाकण्याचा धडाकाच लावला. त्यात गोमासबंदी, लोकप्रतिनिधीवर टिका केल्यास देशद्रोहाचा गुन्हा, वंदे मातरम, काश्मिर प्रकरण असे एकसे बढकर एक धोंडे शोधून शोधून स्वत:च्या पायावर आपटणे सुरु ठेवले. यातून दुखावला गेलेला मतदार हा प्रचंड संयमी व योग्य वेळेवर घाव घालणारा असतो. तो येणा-या निवडणूकांमधुन काय सांगायचे ते सांगेलच पण आता मात्र गपगुमान राहण्यापलिकडे त्याच्याजवळ पर्याय नाही. हा पर्याय नसणे म्हणजे भाजपनी स्वत:चं अवलोकन न करता मोकाट वागावं असं अजिबात होत नाही, पण दुर्दैवाने आज तेच होत आहे.
भाजपनी सध्या जो काही शाळेच्या पातळीवर भगविकरणाचा प्रकार चालविला व लहनग्या पोरांना ’जय हिंद’ म्हणायला भाग पडत आहे ही प्रचंड संताप आणणारी गोष्ट आहे. आज ना  उद्या याचा हिशेब मतपेटीतुन होईलच. पण तो करण्याआधी भाजपनी शेखचिल्लीपणा टाकून देत भानावर यावे. राजकीय पक्षांनी असे जातीयपणे वागणे राजकारणाच्या नितिमुल्यांना धरुन नाही. तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर कोणतिही मुल्य जपता येतात, पण एकदा सत्तेत बसलात की समावेश होऊन सत्ता हाकायची असते हे अगदी राजकारणातलं बेसीक प्रिन्सीपल आहे. भाजपं मात्र सत्तेच्या मस्तीत इतका मस्तवाल झालाय की तो बेबंध होऊन वागताना दिसत आहे. यातून एवढच म्हणता येईल... भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा