गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

खोलेंची स्वयंपाकीन, मराठा कावा!

घरात स्वयंपाकासाठी बामण बाई हवी हे खोलेंचं वाक्य अन घरात जावयी म्हणून स्वजातीय मराठा पाहिजे ही लग्नाची जाहीरात या दोन गोष्टीत गुणात्मक फरक तसा अजिबात नाही. मग खोलेबाई दोषी कशा?  अन खोले जातीयवादी असतील तर सेम लॉजिनी तमाम मराठेही तेवढेच जातीयवादी आहेत. मग जातीयवादी म्हणून बाईच्या नावानी शिमगा का सुरू आहे? केवळ त्या बामण आहेत म्हणून? सेम गुन्ह्यासाठी मराठा हा का टार्गेट केल्या जात नाही? की मतपेटीचे गणित आम्हाला तसे करु देत नाही? अगदी ईथे मिडीया सुद्धा तावातावाने खोलेबाईंच्या विरुद्ध नको तेवढा आव आणताना दिसला, हाच मिडीया मात्र सेम कृती बद्दल कधी मराठा व तत्सम उच्चवर्णीयांच्या अगदी याच पॅटर्नच्या गुन्हयाविरुद्ध कधी अवाक्षर बोलताना दिसला नाही. म्हणजे या देशातील विचारवंत, लेखक, चळवळे, राजकारणी ते अगदी मिडीया हे सगळेच सोयीचा खेळ खेळत असतात. लोकांना त्यातून भ्रमित करणे व स्वत:ची पाठ स्वत:च किंवा एकमेकांची पाठ थोपटणे असे सुरु आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले असून ते चार भिंतीच्या आत कसं वापरायचं हे ज्यानी त्यानी ठरवायचं असतं. खोलेबाईची एकूण वागणूक वरील तरतुदीला धरूनच आहे. ईथे मात्र काही लोक संविधानाचा वापर सोयीने करताना दिसत आहेत. खरंतर खोले प्रकरणात यादव बाईनी खोलेंचं कांन्स्टिट्युशनल राईट वायोलेट केलय. कारण आपल्या घरातील विधी कसा करावा हा खोलेबाईचा धार्मिक व व्यक्तीगत अधिकार आहे. तो यादव बाईमुळे जर मोडला गेला असेल तर ख-या विक्टीम खोलेबाई ठरतात, यादव बाई नाही. एकूण प्रकरण पाहता प्राईमाफेसी तरी यादवबाईच दोषी दिसतायेत. कारण तेच... घरात जावयी स्वजातीयच हवा ही मराठा व इतर उच्चवर्णीयांची जितकी खाजगी बाब आहे, तेवढीच खाजगी बाब खोलेंची बामण स्वयंपाकीनाची आहे.

समजा मुसलमानानी एखादा स्वयंपाकी ठेवला व त्यानी वर्षभर चारलेलं मांस हे हलालीचं होतं  तसेच अगदी मुसलमनी पद्धतीचं होतं तरी तो स्वयंपाकी मुसलमान नव्हताच  हे जेंव्हा कळतं तेंव्हा ती फसवणूक ठरते.  मुसलमानाच्या खाण्यापिण्याच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याचं उल्लंघन ठरतेच. म्हणजे फसवणूक हा Punishable Offense सुद्धा ठरतं. अन यादव बाईंची कृती Offense ठरावी अशीच आहे. सेम जैनांच्या बातीतही म्हणता येईल की जर एखादी व्यक्ती जैन असल्याचं सांगून त्यांच्या घरात शिरते अन अगदी जैन पद्धतीचं जेवण बनवून वाढते तरी जेंव्हा हे कळतं की ती स्वयंपाकीन जैन नाही तेंव्हा ती फसवणूकच ठरते. थोडक्यात एखाद्याच्या घरी कोणतं जेवणं शिजावं ही पूर्णपणे त्याची व्यक्तीगत बाब असताना जर कोणी समधर्मीय असल्याचं सांगुन कोणाच्या किचन पर्यंत शिरत असेल तर, जातीय बाब वगळली तरी, व्यक्तीगत अधिकाराचं उल्लघंन आहेच. अन हे उल्लघंन करण्याचा अधिकार तसा कोणालाच नाही. अगदी किचनवाला बामण असला तरी नाही, वा किचनमध्ये घुसणारा मराठा असला तरी नाही. त्यामुळे खोलेबाईंनी केलेली तक्रार ही Justifiedच आहे. कारण चार भिंतीच्या आतील विधी, सवयी नि वर्तन याला सार्वजनिक नियमांच्या टप्यात तोवर नाही आणता येत जोवर ते इतरांसाठी Nuisance (उपद्रव) ठरत नाही. मेधा खोलेंचं चार भिंतीच्या आतील विधी धार्मीक तर खानपानाच्या सवयी व्यक्तीगत बाबीत मोडण-या असून त्याला सार्वजनिक वर्तनाचे निकस लावणे तर्कविसंगत आहे. कोणाच्या घरी कोणी काय करावं हा ज्याचात्याचा वयक्तीक मामला आहे. खोलेंना जर वाटतं की माझ्या घरचं जेवण सोवळ्यात बनावं... अन ते बामणानीच बनवावं तर ही डिमांड करण्याचा बाईना तसा अधि्कार आहे. अगदी मराठे पेपरात ’स्वजातीय जावयी हवा’ म्हणून  जो प्रकार करतात त्याच धाटनिची डिमांड खोले बाईंची आहे. स्वजातीय जावयासाठी मराठे जसे दोषी नाहीत, अगदी त्याच न्यायाने खोलेबाईसुद्धा दोषी नाहीत. या परिस्थितीत यादवबाईची कृती मात्र असमर्थनीय ठरते. खरंतर खोलेनी माफी मागीतल्यावर प्रकरण संपायला हवं होतं. पण झुंडशाहीनी मध्ये उडी टाकून प्रकरण पेटवायचं ठरवलय. ही खरच दुर्दैवी बाब आहे.
यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
या एकुण प्रकरणात खोलेच्या आडून ब्राम्हण टार्गेट केल्या जात आहे. हा तसाही पुरोगाम्याचा आवडता छंद आहे. अरे ब्राह्मण आधीच 3.5% त्यातले अधिकांश सुधारीत आहेत. मग जे एक्का दुक्का खोले टाईप उरतात त्यांचं उपद्रव मुल्य तसं नगण्यच. पण याच्या उलट मराठ्यांची संख्या अजस्त्र... त्यात कर्मठ मराठेही गावोगवी आहेत. हे सगळं पाहता मराठ्यांचा जातीयवाद अधिक उपद्रवी नि समाज घातकी आहे. कोणत्याही खेड्यात जा, गावात जा अन पहा, तिथे दलीतांवर अत्याचार करणारा एकही ब्राह्मण नाही तर बहुतांश हे मराठेच आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणात जर कोणी जातीयवाद पाळत असेल तर तो मराठा आहे, ब्राह्मण नाही.  त्यामुळे आवाज उठलाच तर मराठ्यांच्या विरोधात उठायला पाहिजे. पण तसं होऊ नये म्हणून मराठ्यांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. याला मराठा कावा यापेक्षा वेगळं काय म्हणता येईल.

- जयभीम

तळटीप:  संघ आणि हिंदुत्ववाद्यानो, माझा लेख हा तुमच्या बाजूनी नाहिये. हा निव्वळ मराठ्यांचा जातीयवाद दाखविण्यापुर्ती मर्यादीत आहे. कृपया मला फोन करु नका. मी कधीच तुमच्या गटातला होऊ शकत नाही. प्लीज.

२ टिप्पण्या:

  1. चुक खोलेंची नाही ना मराठ्यांची ना जातीवर आधारीत सवलती घेणार्या दलितांची.प्रत्येक जन स्वतंत्र उपभोगतोय.प्रत्येकाला स्वतंत्र आहे निर्णय घेण्याचा.

    उत्तर द्याहटवा
  2. मी तर म्हणतो विवाह हे केवळ आर्थिक स्थिती किंवा जातीवर होत नही स्वच्छता, संस्कार, राहणीमान, आचार-विचार हे सगळे बघितले जाते त्यामुळे खालच्या जाती (आरक्षण आहे तोपर्यंत सहन करा) बरोबर संबंध जोडणे मुर्खपणाचे होईल.सवर्णाने सवर्ण ते ओबीशी पर्यंत ठिक आहे विवाह कार्य त्याच्याही खाली जाणे म्हणजे स्वत:ची पात्रता वेशीवर टांगण्यातला प्रकार आहे.
    धन्यवाद.

    बाकी खोलेबाईं काय नी मराठा काय दोघेही बरोबर आहेत.

    उत्तर द्याहटवा