शनिवार, १३ जानेवारी, २०१८

सुप्रिम कोर्टातले चार चिल्लर!StatsImage result for 4 judges accused chief justiceकाल सुप्रिम कोर्टाचे ४ न्यायधिश न्या. चेल्लमेश्वर, न्या. गोगोई, न्या. लोकूर व न्या. कुरियन यांनी पत्रकार परिषद घेऊन देशभर खळबळ उडवून दिली. त्यानंतर दिवसभर तमाम मीडिया नि राज्यकर्ते लोकशाही कशी धोक्यात आली वगैरे दळण दळत होते. कधी नव्हेत ते थेट सुप्रिम कोर्टातल्या जजेसनी मीडियाचे पाय धरल्यामुळे “आता काही या देशाचं खरं नाही” चा आव आणत सर्वत्र बौद्धिक धुमाकूळ सुरु झाला. लोकसत्तानी तर चक्क ते पत्रच छापून टाकलं जे या चौघांनी चीफ जस्टीसना लिहलं. चीफ जस्टीसना लिहलेलं पत्र वाचल्यांवर लगेच लक्षात येतं की फार काही घडलं नसून या सिनियर या चौकडिने आपल्या इगोमुळे हे प्रकरण नको तेवढं पेटवलं. दिलेल्या पत्राप्रमाणे त्यांच्या प्रमूख दोन तक्रारी आहेत. १) चीफ जस्टीस मर्जीतल्या कनिष्ठ न्यायाधिशांकडे महत्वाची प्रकरणे सोपवित आहेत. २) मेमोरॅंडम ऑफ प्रोसेजर फालो केल्या जात नाही. ही दोन कारणं नक्कीच महत्वाची आहेत. पण हे पहिल्यांदाच होत आहे असे नाही. हे तर ज्युडिशिअरीतलं जुनं दुखणं आहे. या विरोधात आत्ताच अचानक एवढा जोर कसा काय आला हा महत्वाचा प्रश्न आहे. ही चौकडी जेंव्हा पासून नोकरीत आहे तेंव्हा पासून आजवरचा ज्युडिशिअरीचा इतिहास तपासल्यास हे दुखणं यांनी अनेक वर्षा पासून अनुभवलेलं आहे हे सिद्ध होतं. पण आजवर हेच जजेस मुकाट्याने हे दुखणं सहन करत होते. पण काल मात्र अचानक ते जगाच्यापुढे मांडण्याचा यांना मोह झाला. मी मोह हा शब्द मुद्दाम वापरत असून हिंमत वा धैर्य हा शब्द जाणीवपूर्वक टाळत आहे. कारण हिंमत/धैर्य हा शब्द लढण्याच्या कृतीसाठी वापरला जातो तर मोह हा शब्द स्वार्थ साधण्यासाठी वापरला जातो. काल या चौकडिनी केलेले बंड, लढण्याची कृती नव्हती तर आता रिटायर होता होता कमुनिस्टांसाठी थोडसं मटेरियल देऊन स्वत:ची निवृत्ती नंतरची चळवळीत सोय लावून घेण्याच्या स्वार्थातून केलेला प्रताप होता.
ज्युडिशिअरीवर शासनाचा प्रभाव ही नवी गोष्ट नाहीच. प्रत्येकवेळी जेंव्हा सरकार बदलले तेंव्हा हा प्रकार झाल्याचे दिसतेच. अगदी इंदिरा गांधी यांनी न्या. रे यांची केलेली नेमणूक असो वा त्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळी निवडलेले चीफ जस्टीस असो. शासन व ज्युडिशिअरी यांच्यात कायमच एक छुपं साटंलोटं राहिलं आहे. लालू जेंव्हा जेलातून सुटला तेंव्हा त्यांनी सोनिया गांधी यांना चक्क स्वत:ची आई घोषीत करुन टाकलं होतं. त्यातून काय संकेत मिळायचा तो देशाला मिळाला होताच. असे कित्येक उदाहरण देता येतील ज्यातून हे सिद्ध होतं की शासन व न्याय व्यवस्था यांच्यात एक विशिष्ट मर्यादे पर्यंत कायमच साटलोटं राहिलं आहे. प्रत्येक दुष्ट कृतीचा एक आवाका असतो. त्यातून येणारे दुष्परीणाम एका टप्या पर्यंत Tolerable असतातच व ते Tolerate केले जातात. या मागील हेतू एवढाच असतो की बंडातून फार काही साध्य होणे तसे दुरच पण उलट ती संस्था बदनाम होण्याचीच शक्यत आधीक असते. जगात कोणतीच मशिनरी ही १००% दोषरहित असूच शकत नाही हे वास्तव असून त्याचाच भाग म्हणून एका टप्प्या पर्यंत काही दोष खपवून घेणे शहाणपणाचे असते. हे असे दोष सामाजिक सजगतेतून हळू हळू कमी करत न्यायचे असतात. मीडिया वगैरेत तांडव करुन नुसताच धिंगाणा होतो. दोष तसेच राहून जातात.  
काल या चार चौकडिने जो काही प्रताप केला तो नुसता थिल्लरपणा तर होताच पण त्याहीपेक्षा घातक बाजू ही की त्यांची पत्रकार परिषद संपताच न्या. चेल्लमेश्वर यांच्या घरी कमुनिस्ट नेते डी. राजा जाऊन पोहचले. चेल्लमेश्वर हे मुळचे आंध्र प्रदेशचे व तिथे कमुनिस्ट चळवळीचा कायमच मोठा प्रभाव राहिला आहे. वरुन हे चेल्लमेश्वर लवकरच निवृत्त होणार आहेत. सध्या देशभरात कमुनिस्टांनी जी उसळी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे ते पाहता न्या. चेल्लमेश्वरांना यापुढील आयुष्य त्या चळवळीसाठी घालविण्याचा मोह झाला असल्याची दाट शक्यता आहे. पण त्यासाठी केलेले बंड मात्र नक्कीच त्यांच्या पेशाला व ज्युडिशिअरीला शोभणारे नव्हते.  
मीडियाला बोलावून या चौघानी काल वाजागाजा करत जे आरोप ठेवले त्या आरोपांचं स्वरुप पाहता ते मोघम स्वरुपाचे आरोप असून अशा आरोपातून ठोसं असा काही निर्णय येत नसतो व काही बदलही घडत नसतो. तात्पुरता धुराळा मात्र जरुर उडविल्या जातं. हे सगळं या चौघांनाही नीट माहीत आहे तरी मोघम आरोपांच्या माध्यमातून बंडाचा आव आणल्या गेला. त्यातून काही साधलं गेलं तर नाहीच पण उगीच न्यायसंस्था शंकेच्या टप्यात येऊन गेली. अत्यंत सन्माननीय ठिकाणी जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने कसे वागू नये याचं उत्तम उदाहरण ही चौकडी आहे. आरोपांत जर सिरीयसनेस असता तर ते मीडियाकडे मांडायचे नसतात तर त्याला ठोस पुरावा जोडून संसदेत मांडायचं असतं. लढा जर लढायचाच होता वा न्यायव्यवस्थेतील दोष दूर करायचेच होते तर मग तसा पद्धतशीरपणे लढा उभारत चीफ जस्टीसच्या विरोधात महाभियोग चालविण्यासाठी संविधानिक मार्गाने जायचे असते. पण यातलं काही एक करण्याची यांची तयारी नाही. नुसता धुराळा उडविणे एढच यांना करायचं होतं. कालचं सगळं प्रकरण या लोकांचा थिल्लरपणा होता व तो करणारे अत्यंत सन्माननिय संस्थेचे चार चिल्लर होते, एवढच!

बुधवार, १० जानेवारी, २०१८

लाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे!Image result for lal salamभीमा कोरेगावच्या निमित्ताने सध्या लाल सलामला देशभर तात्पुरती उभारी मिळाली असून त्याला पूर्णपणे एन्कॅश करण्याचं काम कमुनिस्टांनी चालविलं आहे. लोहा गरम है हतोड मारदो तत्वाला धरुन मग जिग्नेश मेवानीने ९ जानेवारीला दिल्लीत मोर्चा काढला तर त्याच पुण्यात परत एकदा यांच्या चिल्ले पिल्ले संघटनांनी  जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात आता कन्हैया कुमारला बोलविण्याचे जाहीर केले आहे. हा सगळा प्रकार आततायीपणाचा असून संघटनेची मरगळ झटकण्यासाठी सध्याच्या परिस्थीतीचा व सामाजीक असंतोषाचा वापर करुन घ्यायची कोणतीच कसर लाले सोडणार नाही असे दिसते. शनिवारवाड्याची “एल्गार परिषद” झाल्यावर आयोजक नि वक्ते यांचा संबंध नक्षलवाद्यांशी जोडला गेला. तसा तपासही सुरु झाला, पण बुद्धीजिवी लोकं मात्र हे साफ  नाकारत असून नक्षलवादाचं सोयीचं Interpretation करुन लाल्यांना निर्दोषत्व बहाल करत आहेत.मुळात नक्षलवादी म्हणजे रानात बंदूका धरुन लढणारा असं interpretation केलं जातं पण ते चूक आहे. नक्षलवादी म्हणजे रानात उभा असलेला सशस्त्र लढवय्या नाहीच मुळी. रानातला बंदुकधारी हा नक्षल चळवळीचा सगळ्यात खालचा सदस्य आहे. शस्त्रधारी सदस्याला नक्षल चळवळीत ना निर्णय घेण्याचा अधिकार असतो ना विचार करण्याचा अधिकार असतो. तो तर संघटनेतील वरच्या सदस्यांच्या आदेशाचे पालन करणारा एक खालच्या पातळीवरचा चळवळ्या आहे. मग प्रश्न उठातो की रानात बंदूक धरुन हिंडणारा नक्षली जर या चळवळीतला सर्वात खालचा सदस्य आहे व त्याला चळवळीतल्या एकूण निर्णयात कोणताच अधिकार नसतो वा सहभाग नसतो तर मग नक्षल चळवळ नक्की आहे तरी काय?
नक्षलवाद हे कमुनिस्ट चळवळीचं भारतीय वर्जन आहे.
मुळात नक्षलवाद ही मुख्य चळवळ नसून ती जागतीक पातळीवर चालविल्या जाणा-या कमुनिस्ट चळवळीची भारतीय आवृत्ती (वर्जन) आहे. जगात कमुनिस्ट चळवळीचा पाया कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंतानी घातला. त्यात त्यानी स्पष्ट लिहलं की कामगारांची हुकूमशाही आणणे हा या चळवळीचा उद्देश असून संपत्तीचे समान वाटप हे ध्येय आहे. त्यातून वर्गभेद मिटून समाजाचा दुखणं जाईल अशी त्याची मांडणी आहे. मग त्यातून प्रेरीत होऊन जगभरातील कामगारांनी कमुनिस्टचा लाल झेंडा हाती घेऊन लढा उभारला व त्यात पहिलं यश रशियात मिळविलं गेलं.
रशियन आवृत्ती: कामगार चळवळ
लाल लढ्याची मांडणी कार्ल मार्क्सनी केली तरी त्याची खरी अमंलबजावनी लेनीनने केली. लेनीनने लाल लढा उभारतांना रशीयातील तमाम कामगारांना एकत्र करुन लढा उभारला. एवढच पुरेसं नव्हतं हे ओळखलेल्या लेनीनने कामगारांना भांडवलदाराच्या विरोधात भडकवितांनाच राजकीय आघाडी उघडून झारच्या विरोधात भडकवत नेलं. लाल लढा जरी कामगारांच्या नावाने उभा झाला तरी त्याचा उद्देश सत्ता होता व त्यासाठी दुसरी आघाडी होती.  झार नि भांडवलशाही असे दोन शत्रू व त्यांच्याशी लढण्यासाठी कामगार नि राजकीय पक्ष असे दोन आघाड्या उघडण्यात आल्या व रशियात क्रांती घडवून आणली गेली. या एकूण लढ्यात सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की लेनीनच्या लढ्यात रशियातील शेतकरी याचा सहभाग नव्हता. लेनीन तर शेतक-यांना चक्क शिव्या हासडायचा. रशियन लढ्यात शेतकरी लाल-सलाम वाल्यांचा विरोधक जरी नसला तरी सोबती नव्हता. शेतकरी हा लेनीन व त्याच्या लाल्यांद्वारे सर्वाधिक तिरस्कार केल्या गेलेला गट होता. त्यामुळे रशियन क्रांतीत रशियन शेतक-याचं कोणतच योगदान नव्हतं ही नोंद करुन ठेवणारी बाब आहे. तर हे झालं रशियन मॉडेल.
चीनी आवृत्ती: शेतकरी चळवळ
लेनीनच्या लढ्याचं व कमुनिस्ट चळवळीचा शिरकाव चीनमध्ये झाला. कामगारांची क्रांती म्हणत चीनमध्ये घुसलेला हा लाल लढा पार नापास झालेला होता. कारण चीन व रशीया यातील परिस्थीतीत मूलभूत फरक होता. चीन हा कामगारांचा देश नव्हता तर तो पक्का शेतक-यांचा देश होता. रशियन क्रांती शेतक-यांना शिव्या हासडत घडलेली होती. ती जशीच्या तशी चीनमध्ये राबविणे शक्य नव्हते. इथला सगळाच समाज शेतकरी. अन लाल सलामच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे सगळे बुर्ज्वा ठरत होते.  थोडक्यात इथे क्रांती करायची तर लाल सलामच्या मूलभूत तत्वज्ञानात थोडा बदल करुन त्याची स्थानिक पातळीवर सूट होणारी आवृत्ती चीनी लोकांसामोर मांडणे गरजेचे होते. अन योगा योगांने माओ हा शेतकरी कुटूंबातून आलेला कमुनिस्ट लढवय्या होता. त्याचा रशियन कमुनिस्टांना मोठा उपयोग झाला. माओनी चायनीज साहित्यात कुठेच शेतक-यांचा इतिहास व लेखन का नाही म्हणत रान उठविले होते. तिथेल्या साहित्यात व पुस्तकात फक्त हुजूर लोकांचाच इतिहास सांगण्याची पद्धत होती. त्यामुळे कोणत्याच पुस्तकातून वा इतिहासातून तोवर शेतक-याचा उल्लेख झालेला नव्हता. माओनी बरोबर हा धागा धरुन शेतक-यांच्या देशात शेतक-याचा इतिहास असायलाच हवा. आम्ही आमचा इतिहास लिहू. राजे व सत्ताधारी लोकांचा तिरस्कार आधीच होता, आता जोडीला शेतक-यांचा इतिहास ही "अस्मिता" उभी केली गेली. त्यातून मग  रान पेटविले व तमाम शेतकरी अस्मितेच्या प्रश्नासाठी लाल लढ्यात उडी मारू लागले. खरंतर शेतक-यांची अस्मिता वापरुन माओनी लाल लढा अधीक तीव्र करत नेला. मग त्यातून सत्ताधारी, राजे व लष्करी अधिका-यांच्या विरोधात देश पेटला व  चीनमध्ये "अस्मितेची" क्रांती घडली. पण त्या अस्मितेला नेमकं टिपून लाल क्रांतीसाठी वापरणारे माओ खरे हुशार. पुढे हेच माओ ती अस्मिता पार विसरुन जातात व लाल क्रांती घडली म्हणून सत्तारोहणाच्या भाषणात कामगारांची हुकूमशाही अशा मथळ्याखाली भाषण ठोकतात. थोडक्यात रशियन लाल क्रांती कामगारांची होती तर चीनची क्रांती शेतक-यांची अस्मिता पेटवून घडविली होती.
भारतीय आवृत्ती: नक्षलवाद चळवळ
लाल क्रांती चीन मध्ये यशस्वी झाल्यावर तमाम लाल्यांच्या अंगात स्फूरण चढले व आता पुढचा टार्गेट भारत असं म्हणत इथल्या कमुनिस्ट पिल्लावळांनी जोर लावला. सुरुवातीचे ५०-६० वर्षे कामगारांना घेऊन ही चळवळ शहरी भागात चालविली गेली. पण संपकरी वृत्ती स्वत:ला मारक ठरली व लाल्यांची कामगार चळवळ त्यांच्याच लोकांना देशोधडीला लावून उध्वस्थ झाली. म्हणजे कमुनिस्ट चळवळीची रशियन आवृत्ती भारतात फेल गेली. तरी हे सगळे कामगार नेते मृतावस्थेतील चळवळीला कोणी वाली मिळतो का म्हणून भटकत होतेच. त्याच दरम्यान बंगालमधील ’नक्षलबारी” नावाच्या एका लहानशा गावी चारु मुजूमदार नावाच्या एका तरुणाने स्थानिक जमीनदाराविरुद्ध शेतक-यांना धरुन सशस्त्र उठाव केला व या चळवळीने चीनी आवृत्तीच्या दिशेने प्रवास सुरु केला. मग तमाम शेतक-यांचा प्रश्न घेऊन हा लढा उभारला गेला. त्याच दरम्यान तेलंगणाता पिपल्स वार गृप व अशा अनेक छोट्या मोठ्या कमुनिस्ट संघटना उदयास आल्या. प्रत्येकांनी स्थानिक पातळीवर काम चालविले होते. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कार्ल मार्क्सची विचारधारा होती. भारतात लाल लढा मात्र कामगार पातळीवर आणि शेतक-यांचा पातळीवरही फेल गेला होता. 
कमुनिस्ट चळवळीला रशिया किंवा चीन या देशात सत्ता मिळवितांना खूप मोठा लढा उभारावा लागला खरा पण त्यातिल पॉझिटीव्ह बाजू ही की तिथे हा लढा खूप मोठा बनत गेला. त्यातून सत्ते पर्यंत पोहचता आले. पण भारतात मात्र १०० वर्षे प्रयत्न करुनही लढाच नीट उभा राहिला नाही. याचं कारण कमुनिस्टांना इथे सत्ता बदल घडविण्याची कुवत बाळगणा-या उद्रेकाची नाड सापडली नव्हती. स्वातंत्रपूर्व काळात रशियन मॉडेल म्हणजेच कामगारांना धरुन चालविलेली लाल चलवळ ५०-६० वर्ष खाऊन बसली व हाती काहीच लागले नाही. त्या नंतर चारू मुजूमदार व त्या विचारसरणीतून उभी झालेली शेतकरी व तत्सम वर्ग यांच्या बाजूने उभी झालेली लाल चळवळही (नक्षलवादी) नुसतीच वळवळ बनून राहीली. म्हणजे कमुनिस्ट चळवळीचा चायनीज मोडेलही भारतात नापास झाला होता. थोडक्यात नक्षलवाद म्हणजे काय? तर शेतक-यांना धरुन उभी केलेली भारतीय लाल चळवळ होय. 
शेतक-यांसाठी उभारलेली लाल चळवळ म्हणजे नक्षलवाद ही कामगारांची लाल चळवळ यापेक्षा वेगळी होती. कामगारांची लाल चळवळ संपाचा हत्यार घेऊन आली होती. पण शेतक-यांची लाल चळवळ(नक्षलवाद) मात्र थेट हत्यार घेऊन जमिनदारांचे मुडदे पाडू लागली. या दोन्ही चळवळीत हा भूलभूत फरक होता. याच्या जोडीला कमुनिस्टांची राजकीय चळवळ मैदानात होतीच. म्हणजे एकाचवेळी कमुनिस्टांच्या तीन वेगवेगळ्या चळवळी या देशात होत्या. कामगार चळवळ, शेतक-यांसाठी उठाव करणारी नक्षल चळवळ आणि राजकीय़ चळवळ या प्रमुख तीन चळवळीच्या व्यतिरिक्त अनेक छोठे मोठे लाल विचारी गृप इथे होतेच.  तिकडे चीनला कायमच भारताशी छुपे युद्ध करायचे होते व त्यासाठी या तीन लाल शक्तींना एकत्र आणणे गरजेचे होते. मग त्यातूनच पहिला प्रयोग झाला व तमाम छोटे-मोठे लढवैय्ये संघटनांना नक्षलवादी चळवळीत विलीन करुन नक्षलवादी चळवळीचे नाव २००८ मध्ये माओवादी असे करण्यात आले. हे नाव धारण केल्यावर लाल सलामचा चीनशी असलेला संबंध सुस्पष्ट झाला. त्या नंतर चीनी कमुनिस्टांनी समविचारी इतर घटक जसे की कामगार चळवळ नि राजकीय चळवळ यांचा माओवादी चळवळीशी समन्वय घडविण्याचे व ते एकमेकांना पुरक म्हणून काम करतील याची सोय लावली. अन अशा प्रकार भारतीय लाल चळवळ विविध गटात विभागूनही एक मेकांना पुरक बनून काम करु लागली.
ही लाल चळवळ प्रामुख्याने चार भागात विभागलेली आहे.  १) विचारवंत २) फायनान्सर ३) एन.जी.ओ. व ४) सशस्त्र क्रांतिकारी.  पहिले तिघेही शहरी भागात राहणारे असून त्यातील विचारवंत हे खरे सुत्रधार नि समन्वयक असतात. यातील खाशीयत अशी की हे  तिघेही चळवळीचे गुप्त घटक असून ते कधिही पुढे येत नाहीत. चळवळीची आखणी, निर्णय, पैसा व एकूण उचापती हे सगळं हेच लोकं ठरवत असतात. या चळवळीचा चौथा व सर्वात कमी अधिकार असलेला किंवा थोडक्यात सांगकाम्या स्वरुपाचा घटक म्हणजे रानात बसलेला यांचा सशस्त्र गट... ज्याला आपण आपल्या बुद्धीनुसार नक्षलवादी म्हणतो. याचे अधिकार इतके कमी आहेत की अगदी कंत्राटदारांकडून वसूल केलेली खंडणी सुद्धा तो स्वत:कडे ठेवू शकत नाही तर ती वरचे अधिकारी व संघटनेकडे पाठवित असतो. म्हणजे आपण ज्याला नक्षलवादी म्हणून गैरसमज करुन घेतो तो नक्षल चळवळीतील सर्वात खालचा व दुय्यम स्वरुपाचा कार्यकर्ता आहे. या चळवळीचे खरे सुत्रधार कधीच रानात जात नसून ते शहरी भागात उजळ माथ्यने फिरत असतात. ते चीन व तिथल्या सत्तेशी संधान बांधून आहेत. येणारा पैसा व शस्त्रे याचं सगळं नियोजन शहरातून हीच लोकं करत असतात. त्याच बरोबर विविध गटात विभागलेल्या कमुनिस्ट चळवळीला हे शहरी सुत्रधार एकत्र आणून चळवळ अधिक भक्कम करत असतात. रानातल्या चळवळ्यावर पूर्ण फोकस करतांना आपण या शहरी विंग कडे फारसं लक्ष देत नाही. पण रानातल्या तुकडीला बळ देण्याचं, पैसा व शस्त्र पुरविण्याचा सगळा कारभार शहरातून होत असतो. थोडक्यात नक्षलवादी म्हणजे रानातला बंदूकधारी नसून शहरी भागात बसलेले राज्यकर्ते, विचारवंत, फायनान्सर, एन.जी.ओ. आणि चीनच्या कमुनिस्टांशी संधान बांधून क्रांती घडवू पाहणारे सुत्रधार आहेत. या सगळ्यांना, जे लाल क्रांतीच्या विचारांनी प्रेरीत होऊन कार्ल मार्क्सला अपेक्षीत साम्यवादी सत्ता आणायची आहे, त्यांना नक्षलवादी म्हणायचे असते. नुसत्या रानातल्या बंदुकधा-याला नाही. या नक्षलवाद्यांनी आधी लाल क्रांतीचा रशियन मॉडेल व नंतर चायनीज मॉडेल राबवून पाहिले व दोन्ही मॉडेल भारतात अयशस्वी झाले.
नवी भारतीय आवृत्ती: निळ्या विचारात लाल मिसळण.
रशियन व चायनीज दोन्ही मॉडेल फेल ठरल्यावर कमुनिस्ट चळवळ मूळ भारतीय वृत्ती व चळवळीचा अभ्यास करु लागली. या मातीत उद्रेकाची कुवत बाळगणारा घटक नेमका कोण? याच्या शोधात लाल कार्यकर्ते लागले. त्यात मग त्यांना दिसला आंबेडकरी समाज. हा समाज इतकी ताकद बाळगतो की त्याच्या निळ्या रक्तात जर हा लाल लावा ओतला व त्याचा बुद्धीभेद करुन शासनाच्या विरोधात पेटविले तर भारतात कमुनिस्ट क्रांती घडू शकते. म्हणजे कमुनिस्टांचा रशियन मोडेल व चीनी मॉडेल दोन्ही मॉडेल भारतात गैरलागू असून लाल क्रांतीसाठी निळ्या विचारधारेत लाल क्रांती मिसळून एक नवा मॉडेल तयार केल्यास, त्यातून सत्ता हस्तगत होऊ शकते हे यांनी ओळखले. अन मग हळूच निळ्या चळवळीत घुसण्य़ासाठी यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर सुरु केला.
मग त्यासाठी राजकीय मैदानात परास्त होऊन पडलेल्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात आले. त्यानंतर कोरेगाव भीमाचा वापर करण्यात आला व आंबेडकरी समाजाला आपले वाटेल असा कमुनिस्ट विचारात फेरफार करुन लाल चळवळ आमच्या समाजा समोर सादर होऊ लागली. लाल्यांचा हा डाव ओळखलेले काही आंबेड्करी स्वत:ला यापासून दूर ठेवून आहेत. पण ज्यांना कमुनिस्टांचा डाव कळला नाही ते साधेभोळे मात्र लाल सलामच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. याची प्रचिती पुण्यातल्या एल्गार परिषदेत झाली. आता तर कमुनिस्टांनी पूर्ण जोर लावून निळा विचारधारेत लाल विचारधारा मिसळ्याचे काम सुरु केले आहे. ही सरमिसळ जितकी अधिक होत जाईल तितकी आंबेडकरी चळवळ खिळखिळी होऊन लाल चळवळ भक्कम होत जाणार. मग एकदा लाल विचार पुरेसा रुजला की आंबेडकरी सामाजाला धरुन काल क्रांती उभारता येईल. चीनमध्ये शेतक-यांचा इतिहास का नाही म्हणत शेतकरी अस्मिता पेटवून लाल क्रांती घडविण्यात आली होती. चीनी शेतक-याला कार्ल मार्क्सच्या विचाराशी काही देणे घेणे नव्हते. कमुनिस्टांनी स्थानिक प्रश्न पेटवून त्या आडून लाल क्रांती घडविली होती. भारतातही अगदी त्याच वाटेने लाल्यांचा प्रवास सुरु झालाय. आंबेडकरी व इतर बहुजन समाजाची अस्मिता पेटविण्याचे काम सुरु झाले आहेत. या अस्मितेच्या आडून लाल क्रांती घडविण्याचा डाव आहे. अगदी तसेच जसे चीनमध्ये केले. आणि कमुनिस्टांचा हा भारतीय मॉडेल जर यशस्वी झाला तर मात्र भारतात क्रांती होणे अटळ आहे. कारण आंबेडकरी समाज मुळात चळवळ्या आहे. पण बाबासाहेबांच्या विचारावर चालतो तोवर हा समाज कोणासाठीच घातकी नाही. पण का एकदा निळ्या विचारात लाल विचाराची मिसळण झाली की त्यातून उठणारा वादळ इतका उद्रेकी असेल की कोणतीच व्यवस्था त्यापुढे टिकणार नाही. निळ्या रक्तात मिसळलेली लाल क्रांती कमुनिस्टांचा तो भारतीय मॉडेल असेल जो फेल जाणे तसे अशक्यच.  दुर्दैवाने हा मॉडेल ऊभा झाल्यास क्रांती अटळ आहे.  

-जयभीम

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

संभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या!Image result for bhide gurujiभीमा कोरेगावच्या निमित्ताने यावेळेस दोन गोष्टी अधोरेखीत झाल्या, एक म्हणजे मीडियांनी बातम्या देण्यात प्रचंड लबाडी केली. तिकडे आमच्या लोकांना रक्तबंबाळ होईस्तोवर मारले जात असतांना दिवसभर एक बातमी सुद्धा दाखविली गेली नाही. व दुसरी गोष्ट म्हणजे दलितांवर हल्ला करणारे भगवे नि त्यांचे सुत्रधार यांना आजूनही पोलिसांनी अटक केली नाही. थोडक्यात भाजप सरकार भगव्यांचा पाठीराखा बनून उभा आहे.  आजचा भाजप २० वर्षा आधीच्या भाजप पेक्षा खूप वेगळा आहे. हिंदू अजेंडा घेऊन नव्वदीमध्ये राजकीय धुमाकुळ घालणारा भाजपा दोन दशकाच्या प्रवासात अधीक समावेशक नि प्रगल्भ झाला असे वाटू लागले होते. किंबहूना सत्तेची चव चाखल्यावर ती प्रगल्भता येतेच. समावेशक राजकारण नाकारल्यास लोकं तुम्हाला सत्ताधारी म्हणून नाकारतात हे वास्तव भाजपनी मागील दोन अडीच दशकातील प्रवासात खूप व्यवस्थीत अनुभवले आहे. तरी एखादी संस्था वा संघटना आपल्या मूळ स्वभावाला सोडत नाही हे भीमा-कोरेगाव प्रकरणातून परत एकदा अधोरेखीत झाले आहे.
मनोहर भिडे:
भीमा कोरेगावची दंगल मनोहर भिडे(संभाजी हे नाव यांनी बहुजनांना उल्लू बनविण्यासाठी धारण केले आहे) यांनीच घडविली असे तमाम आंबेडकरी म्हणत असून मनोहर भिडे यांच्या विरुद्ध तक्रारही देण्यात आली आहे. यावर पत्रकारांनी भिडेने गाठून विचारणा केली असता भिडे म्हणाले की मी दंगल काळात त्या भागात नव्हतो. मी तर दूर कुठेतरी होतो वगरे उत्तर दिले. झालं भिडेंचं दंगलीच्या दिवशी कोरेगावात नसणं जणू त्यांचं निर्दोषत्वाचा पुरावा असल्यासारखं मीडियांनी ही बातमी युक्तीवादासकट दाखवणे सुरु केले. दंगलीच्या दिवशी भिडे तिथे नव्हते... मग तुम्ही त्यांचं नाव घेताच कसे? ते तर दुस-या गावी होते... मग त्यांचं नाव गोवलच कसं जातं? वगैरे मीडियाची पोपटपंची चालू झाली. एवढंच असतं तर एकदाचं ठीक होतं. पण मीडिया याच्याहे पुढे गेला व सांगू लागला की हा भिडे कसा वयोवृध्द आहे. तो आजही कसं अनवाणी पायांनी चालतो. तो अजही कसं सायकलनी किंवा फक्त लाल डब्यानीच प्रवास करतो वगैरे भिडेची वकिली मीडियांनी करायला सुरु केली. मला साधं कळत नाही. अरे सायकलनी प्रवास करणे याचा गुन्हेगार नसणे यातलं कोरिलेशन काय? सायकलनी प्रवास करणे ही गुन्हेगारी वृत्ती घालविण्याची थेरपी आहे का? हा भिडे सकाळी उठून १५० दंड बैठका मारतो वगैरे बातम्या सांगता. त्याचा निर्दोषत्वाशी काय संबंध? एस. टी. नी प्रवास केल्याने याचे गुन्हे कसे काय गळून पडतात हे मीडिया जरा समजावून सांगेल का? हा भिडे एकाच वेळी जेवण करतो वगैरे सांगुन झाले. एक वेळा जेवणाशी मारामा-या न करणे याचा काय संबंध? म्हणजे भिडेची वकिली करतांना तमाम भगवी वृत्ती शेन खाल्यागत बोलत होती.
काहींचं तर असं म्हणण होतं की  F.I.R. दाखल कसे काय करता? त्यासाठी पुरावे द्यायला हवेत. या भिडेच्या विरुद्ध कोणताच पुरावा नसताना पोलिसांनी तक्रार घेतलीच कशी वगैरे मुर्ख युक्तीवाद मीडिया व भिडे भक्तांनी चालविला होता. भिडे हा माणूस उदयन भोसले, फडणवीस ते चक्क मोदी पर्यंत आपलं वजन राखून आहे. त्याचाच हा परिणाम होता. नाहीतर आपला मीडिया इतका बेअक्कल नाही. अरे तक्रारदारांनी पुरावा द्यायचा नसतोच मुळी... तक्रारकर्त्यांनी नुसती तक्रार द्यायची असते. मग त्या तक्रारीला धरुन पुरावे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे.  भिडे व याची टोळीं मागील अनेक वर्षा पासून त्या परिसरात भगवा विष कालविण्याचे काम पद्धतशीरपणे चालवित होती. त्याचा परिणाम म्हणून शौर्यदिनी दलितांवर हल्ला झाला. या हल्ल्याला मीडियांनी शाब्दीक चालाखी करत दंगल म्हटले. मुळात दंगल म्हणजे दोन्ही गट एकमेकांना मारण्यासाठी  भिडतात त्याला म्हटले जाते. ईथे तसं अजिबात नव्हत. आंबेडकरी समाज तर श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता. दबा धरुन बसलेल्या भगव्यांनी नियोजनबद्द हल्ला चढवून आंबेडकरी समाजात दहशत निर्माण केली. याला हल्ला न म्हणता मीडियांनी चक्क दंगल म्हणून बातम्या सोडल्या. झालं... लोकांना वाटू लागलं की दोन्ही कडून राडा झाला. काही कारण नसतांना आमचा समाज बदनाम झाला. यामागे मीडियाची चलाखी होती. खरेतर वास्तव तसे नव्हतेच. इथे एक पक्ष पूर्ण बेसावध होता तर दुसरा पक्ष तयारीने हल्ला चढवितो. त्यामुळे ही दंगल नव्हती तर सुनियोजीत हल्ला होता. त्याला चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे खरंतर मीडियांनी जाहीर माफी मागावी.
तर असा हल्ला घडविण्याचे काम अचानक झालेले नाही. भिडे व त्याच्या लोकांनी कित्येक दिवसांपासून तिकडे त्याची तयारी चालविली होती. स्थानिकांच्या मदतीने रस्त्या लगतच्या घरांमधे तिस-या माळ्या पर्यंत दगळं साठविण्यात आले. मग नेमकी वेळ साधून हल्ला चढविला गेला. अचानक झालेल्या हल्याने गोंधळ उडाला व सगळे सैरभैर होऊन पळू लागले तेंव्हा रस्त्याच्या दोन्ही कडेनी असलेल्या घरांच्या गच्चीवरुन दगडांचा वर्षाव सुरु झाला. अत्यंत बेसावध आणि निहत्ये असलेल्या आंबेडकरी समाजाची अशा प्रकारे भगव्या गुंडानी केलेली ही मारहाण अमाणूष तर आहेच पण यांच्या मनात आमच्या बद्दलचा असलेला द्वेष सांगणारीही आहे. त्यात एका दलित तरुणाचा मृत्यू झाला. असा हल्ला अचानक होऊ शकत नाही हे जाहीर आहे. एवढं नियोजन केलं गेलं म्हणजे याला कोणीतरी म्होरक्याही आहे. तो म्होरक्या नुसता लल्लूपंजू नसून भगव्या विचारधारेचा कडवा नि प्रभाव राखून असणारा कोणीतरी मोठाच इसम आहे एवढं प्रायमा फेसी दिसतच आहे. अन जेंव्हा केंव्हा असं घडतं तेंव्हा प्रायमाफेसीच्या आधारे शंका असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास करायचा असतो ही सामान्य पद्धत आहे. पण भिडेचा हात असल्याचं लक्षात आल्यावर पोलिस नेहमीच्या पद्धतीने तपास करत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे. शासनाचा जातीयवाद दाखविणारी आहे. 
ईथे या प्रायमा-फेसी सिचूएशनला चक्क तक्रारीची जोड आहे. स्थानिकांनी या भागात मागील काही दिवसांपासून भगव्या गुंडाच्या हालचाली नि त्यांच्या संघटनांचा अविचारी प्रचार याच्या आधारे भिडे या इसमाच्या विरुद्ध तक्रार दिली. म्हणजे १ जानेवारीच्या हल्ल्याचा संभाव्य सुत्रधार म्हणून भिडे या कडव्या भगव्याचं नाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिलं आहे. या आधारे पोलिसांना हल्याचा छळा लावण्याच्या Standard Procedure नुसार भिडे नावाच्या भगव्याला ताब्यात घेऊन चौकशी करायला हवे होते. या हल्यात भिड्याचं हात आहे की नाही त्याचे पुरावे पोलिसांनी गोळा करायला हवे होते. पण पोलिस मात्र भिडेला ताब्यातच घेत नाहीत. ही दिरंगाई भिडेला दिलेलं फेव्हर आहे. पोलिस जितकं उशीर करतील भिडेला तितका अधिक वेळ मिळेल व पुरावे नि पुराव्या पर्यंत पोहचणारे धागे दोरे मिटविण्याचे काम भिडे व त्याचे गुंड निपटून घेतील. थोडक्यात पोलिसांना या हल्ल्यातील संभाव्य गुन्हेगार माहीत असुनही इथे पुरावे गोळा करण्यासाठी त्याला ताब्यात घेतले जात नाही. म्हणजे पोलिसांनाच भिडेच्या विरोधात पुरावे नको आहेत. भिड्याला लवकर ताब्यात घेतल्यास सज्जड पुरावे हाती लागण्याची शक्यताच अधिक. तसे झाल्यास भगव्यांचा दंग्यातला हात सिद्ध होईल व भिडेला जेलात जावे लागेल. हे घडू नये म्हणून पुरावे मिटविणे गरजेचे आहे. पुरावे मिटवायचे म्हटले की भिडेला ताब्यात न घेणे किंवा दिरंगाई करणे हा पोलिसी डाव ठरतो. अन पोलिस तेच करत आहेत.
देवेंद्र फडणवीस ते तमाम भगवे नि संघाचे नेते भिडेच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. या सगळ्यांचा एकच युक्तीवाद चालू आहे तो म्हणजे हल्ला झालेल्या ठिकाणी भिडे नव्हते. मग या लॉजिकनी बघायचे म्हटल्यास मुंबईत बॉम्ब फोडले तेंव्हा दाऊद इब्राहीम तर भारतातच नव्हता. मग त्याला निर्दोष मानायचे का? माणूस कुठे असतो त्याला महत्व नसते. तो जिथेकुठे असतो तिथून तो काय शिजवतो यावर त्याचा गुन्हा ठरत असतो. भिडे नावाचा भगवा गुंड कुठे होता यावरुन त्याचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही. त्यांनी असलेल्या ठिकाणावरुन आपल्या माणसांद्वारे काय शिजवलं यावरुन त्याचा गुन्हा ठरतो. त्यासाठी आधी भिडेला ताब्यात घेऊन चौकशी व्हायला हवी. चौकशीत पोलिसांनी पुरावे गोळा करायचे असतात व ते त्यांनी करायला हवेत. अन मग त्यातून भिडे काय आहे ते कळेलच. पण भिडेला ताब्यात न घेणे हे एका अर्थाने पोलिस भिडेच्या बाजूनी असून त्याला मदत होईल अशा पद्धतीने वागत आहेत. तक्रार दाखल होऊनही भिडेला ताब्यात न घेणे ही पोलिसांची लबाडी आहे. तक्रार कर्त्यानीच पुरावे द्यावे असं म्हणणारे तमाम टाळकी लोकांची दिशाभूल करत आहेत. तक्रारकर्त्यानी पुरावे दयायचे नसतात तर तक्रार आल्यावर त्या आधारे ते पोलिसांनी गोळा करायचे असतात. 
ABP माझाच्या एक्लूझीव्ह इन्टरव्ह्यूत तर हा भिडे म्हणतो की कोरेगावात कारनामा करणारे माझ्या संगठणेचे कार्यकर्ते नव्हते पण ते आमचेच हिंदू होते. या वाक्यात Implied संदेश हा आहे की त्या कार्यकर्त्यांना हा भिडे आपले मानतो. याच बरोबर एकबोटे व घुगे बद्दल विचारल्यावर हा म्हणतो की मी घुगेला अजिबात ओळखत नाही. पण लगेच हे सुद्धा म्हणतो की हा महान माणूस जो कोणी असेल त्याचा मला अभिमान आहे. याचाच अर्थ घुगेचं हल्यातील योगदान एवढीच त्यांच्या बद्दलची आत्ताची माहिती.... व त्याच आधारे घुगे भिडेला महान वाटतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आंबेडकरी समाजाला मारणारा हा भिडेच्या नजरेत लगेच महान बनतो. मग त्याची कोणतीच पार्श्वभूमी माहीत नसली तरी व ती काही असली तरी तो दलितांना मारतो एवढं पुरेसं असतं. यातून हा भिडे नुसता बदमाश नाही तर खूनी व दंगलखोर वृत्तीचा माणूस आहे हे स्पष्ट होते. माहात्मा फुल्यांबदल यांनी जी ओकारी ओकली त्या बद्दल जेंव्हा वार्ताहार विचारतो तेंव्हा भिडेला उत्तर सुचतच नाही. मग वार्ताहारच Lead Question(ज्यात उत्तराचा संकेत असतो असा प्रश्न) विचारतो तो प्रश्न असा "फुलेंबद्दल आपण चुकीचं बोललात की बोललेल्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने छापण्यात आलं?" जेंव्हा वार्ताहार हा लीड क्वेशन देतो तेंव्हा मात्र भिडे मोठ्या चतुराईने म्हणतो की "चुकीच्या पद्धतिने छापण्यात आलं हे तुम्ही हृदयात कायम साठवून ठेवा". आहे की नाही लबाडी. याला ताब्यात घेऊन तपास केल्यास बरच काही हाती लागण्याची शक्यता आहे.
फडणवीसांनी थोडी लाज बाळगावी नि भिडेंला ताब्यात घेण्याचे आदेश द्यावे. भिडेची कसून चौकशी केली जावे म्हणजे भीमा कोरेगाव हल्यातील सुत्रधार कोण ते लोकांसमोर येईल व एकदाचं सगळ्यांना कळेल की तिथे दंगल झाली नव्हती तर निरपराध व निहत्ये आंबेडकरी समाजावर हल्ला झाला होता. व प्रायमा-फेसी या हल्ल्याचा सुत्रधारे मनोहर भिडे हाच दिसतो आहे. शासनानी सर्वात आधी या भिडेला ताब्यात घ्यावे. बास!

-जयभीम.