शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

लाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.Image result for prakash ambedkarकाल म्हटल्या प्रमाणे लाल सलामचा आंबेडकरी चळवळीत जो शिरकाव होत आहे तो शिरकाव निव्वड ब्राह्मण द्वेषातून होऊ दिला जात आहे. पण लाल सलामची मूलभूत मांडणी व त्यांची विचारसरणी याचा विचार केल्यास आर.एस.एस.मधून येणा-या संभाव्य धोक्यापेक्षा लाल सलामचा धोका अधीक तीव्र नि विनाशकारी आहे. जगभरात जिथे कुठे लाल सलामची(कमुनिस्टांची) सत्ता आहे वा ते वरचढ झाले आहेत तिथे सगळ्यात आधी मानवी मुल्ये नाकारली गेली आहेत. रशिया, चीन वा आजून कोणतेही कमुनिस्ट राष्ट्र असो, जेंव्हा लाल सलामनी सत्ता हाती घेतली तेंव्हा तिथे सगळ्यात आधी मूलभूत हक्कावर बंधी आली व ती सर्व ताकत लावून टिकविली गेली. संविधान वगैरे प्रकार लाल सलामला अजिबात मान्य नसून पॉलित-ब्युरोची पोलादी पकड यात लोकशाही नि मानवी मुल्ये तुडविले जातात हा जगभरातला इतिहास आहे. लाल सलाम वाल्यांची मोडस ओपरेंडी ठरलेली आहे. आधी कामगारांना हाताशी धरुन चळवळ उभी करा. त्यानंतर शेतकरी व इतर वर्ग जोडत न्या. सत्ताधा-यांविषयी लोकांना पेटवा आणि त्यातून मग रक्तरंजित क्रांती घडवत सत्ता ताब्यात घ्या. मात्र ही मोडस आपरेंडी भारतात फेल गेली. मग काही वर्षे चिंतन व मनन करुन आता कमुनिस्टांनी जय-भीम ला सोबत घेण्याचे ठरविले. मग बाबासाहेबांचे गुणगाण गात लाल सलाम त्यांच्या कार्यक्रमांतून जयभीम म्हणू लागले. जयभीमवाल्यांना खेचण्यासाठी एवढं पुरेसं असतं. मग जोडीला आर.एस.एस. ला झोडपणे सुरु झाले. यामुळे तर जयभीमवाले भारावूनच गेले. संघाचा धाक दाखविला की आंबेडकरी माणूस डोकं गहाण टाकून रस्त्यावर उतरतो हे एक दूर्दैवी सत्य आहे. पण इथे मात्र ज्याच्या सोबतीने रस्त्यावर उतरतो तो लाल सलाम संघापेक्षा हजारोपटीने विघातकी आहे याचं कोणालाच भान राहिलेलं नाही. अशाच भान सुटलेल्या नेत्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो प्रकाश आंबेडकर यांचा.
मुळात प्रकाश आंबेकरांचा स्वभाव जरा इगोइस्टीक आहे. त्यामुळे त्यांची कायमच अडचण झाली आहे. भाजप वगैरे तर वैचारीक बैठक जुडत नाही म्हणून ठीक आहे, पण त्यांचं कॉंग्रेस सारख्या पक्षाशी सुद्धा फारसं जमलं नाही. आठवले, गवई, ढसाळ व कवाडे वगैरे नेत्यांनी जो काही रिपब्लिकन ऐक्याचा प्रयत्न केला त्यात खोडा घालण्याचे काम प्रकाश आंबेडकरांच्या इगोने बजावले. त्यातून मग इतर नेते कॉंगेसच्या तंबूत दाखल होऊ लागले व प्रकाश आंबेडकर एकटे पडत गेले. इतर नेते मंत्री-संत्री पदं उपभोगतांना प्रकाश आंबेडकरांना मात्र स्वबळावर साधी आमदारकी कधी नशिबी आली नाही. अकोल्यात तसा त्यांचा प्रभाव जरुर होता पण स्वबळावर नेमका किती याची चाचणी व्हायची होती. ती जेंव्हा झाली तेंव्हा प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातली ताकद ही नुसती स्थानिक निवडणूकां पुरती असून विधानसभा व लोकसभेच्या लढतीत प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातली ताकद नुसतं बढेजावपणा आहे हे सिद्ध होत गेले. एकूण काय तर आंबेडकरी चळवळीतील प्रकाश आंबेडकर हे नाव नुसताच फुगा बनून राहिला व इतर आंबेडकरी नेते मात्र सरकार दरबारी पदं भुषवू लागली. या सगळ्याला प्रकाश आंबेडकर यांचा इगो कारणीभूत होता. यातूनच मग त्यांचा नव्या जोडिदाराचा शोध सुरु झाला व तिकडून लाल-सलामच्या तंबुतून जयभीमचा नारा ऐकू आल्यावर आंबेडकरांचा शोध संपला.
वर म्ह्टल्या प्रमाणे लाल सलामवाले आंबेडकरी चळवळीत घुसू पाहत होते तर आंबेडकर चळवळीतील नेता प्रकाश आंबेडकर नव्या चळवळ्यांच्या शोधात होते. कारण आंबेडकरी जनतेने प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व मतदानाच्या पेटीतून साफ नाकारलं होतं. त्यामुळे यांची राजकीय कारकीर्द भुईसपाट झाली. त्यातून उठण्यासाठी कोणाचीतरी गरज होतीच. तिकडे लाल सलामवाल्यांनाही आंबेडकरी चळवळीत घुसायचे होते. दोघांचीही वेळ खराब होती व त्यामूळे दोन्ही विचारधारांना एकमेकांची गरज होती. स्वत:ची संघटना भक्कम करण्याच्या स्वार्थातून प्रकाश आंबेडकरांनी कमुनिस्टांशी दोस्ती केली. ईथेच आंबेडकरी चळवळीशी सर्वात मोठा घात झाला, पण तो झाला हे कळायला आजून काही वर्षे जावी लागतील. सध्या मात्र या मैत्रीचा हनीमून पिरीयड सुरु असून लाल-सलाम व जयभीमचा नारा एका मंचावरुन देणारे तमाम कार्यकर्ते येणा-या विनाशाचं बेधूंद होऊन स्वागत करीत आहेत हे आंबेडकरी चळवळीचं दुर्दैव.
कमुनिस्टांच्या विविध संघटना व जे.एन.यू. मधील टाळकी यांनी प्रकाश आंबेडकरांना देशभर त्यांचं व्यासपिठ उपलब्ध करुन दिल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लाल सलामचा पुडका आला असून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला लाल सलामच्या दावणीला बांधण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत. पण या दोन चळवळींमध्ये मूलभूत फरक आहे व तो एकमेकांशी ताळमेळ खात नाही ही गोष्ट प्रकाश आंबेडकर विसरलेत. त्यापेक्षा भाजपच्या गटात उडी मारणारे जोकर आठवले एकदाचे परवडले. खूप अक्कल असण्यापेक्षा ती नसणे कधीकधी परवडते हे आठवलेंच्या बाबतीत मी मान्य करतो. त्यांनी किमान देशद्रोही वृत्तीशी मैत्री केलेली नाही एवढा दिलासा नक्कीच आहे.राहिला जातीयवादी वृत्तीचा...भाजपची राजकीय लालसा जातीयवादावर लगाम लावण्याचे काम करीत राहिल. त्याचं फार लावून घ्यायची गरज नाही.
राजकीय नेतृत्व आमान्य असलं तरी वैयक्तीक पातळीवर आंबेडकरी समाजाला प्रकाश आंबेडकरांबद्दल काही प्रमाणात कायमच आदर राहिला आहे. पण त्यांनी राजकीय स्वार्थापायी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा जो दूरुपयोग चालविला आहे त्याची किंमत मोजायची वेळ जेंव्हा केंव्हा येईल तेंव्हा प्रकाश आंबेडकरांना अंगाखांद्यावरचं विकून भिकेला लागावं लागेल एवढं नक्की. लाल सलामचा आंबेडकरी चळवळीत जो शिरकाव चालू आहे, त्याला फक्त नि फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार असून त्यांच्यामुळे आंबेडकर चळवळीची मूलभूत मांडणी विस्खटीत होत आहे. आंबेडकर चळवळ ही संविधानाला मानणारी नि स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वावर चाचणारी संघटना आहे. लाल सलामला मुळात संविधानच मान्य नाही. हा बेसीक फरक लक्षात घ्या. लाल सलामला साम्यवादी शासन मान्य असून त्यात सगळ्यात आधी मूलभूत अधिकार नि स्वातंत्र्य नाकारले जाते. अशा मूलभूत अधिकार नाकारणा-या संघटनांच्या सोबतीने प्रकाश आंबेडकर नेमकं काय साधायचा प्रयत्न करीत आहेत? स्वत:चा राजकीय स्वार्थ संविधानापेक्षा अचानक मोठा कसा काय होऊ शकतो? उदया लाल-सलामच्या जोडीने समजा क्रांती झालीच व प्रकाश आंबेडकर सत्तेत आलेच तर सगळ्यात आधी संविधान हटविले जाईल. मग प्रकाश आंबेडकर त्यांच्याच आजोबाने लिहलेलं संविधान हटविण्याच्या पापात हातभार लावणार आहेत की कसे? आर.एस.एस. हा संविधान विरोधी आहे म्हणून प्रचार करणारे आंबेडकर ज्यांच्या सोबतीने जात आहेत ते कमुनिस्ट तर देश ही संकल्पनाच मान्य करीत नाहीत. त्यांच्या मते तर जागतीक कामगार हाच देश असतो. मग त्या निकषावर भारत देश जागतीक कामगार असा बनताना सर्वात आधी संविधान पेटविले जाईल त्याचं काय? दुसरा मुद्दा कमुनिस्टांना देशात कामगारांची हुकूमशाही हवी आहे... लाल सलाम म्हणतांना कामगारांची हुकूमशाही हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. मग ही कामगारांची हुकूमशाही प्रकाश आंबेडकरांना चालणार आहे का? नसेल तर मग कमुनिस्टांना आंबेडकरी चळवळीत घुसू देण्याचे कारण काय? किंवा स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थापोटी कमुनिस्टांशी संधान बांधणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही ठरत नाही का? संघाला संविधान द्रोही दाखवून लोकांमध्ये भिती निर्माण करत ख-या संविधानद्रोही लाल-सलामशी मैत्री करणारे प्रकाश आंबेडकर देशाच्या विनाशाची पायाभरणी करीत नाहीत का? 
कमुनिस्टांशी संधान बांधून लाल सलाम म्हणत हिंडणारे नवे आंबेडकरवादी जन्मास घालणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही व दोशद्रोही ठरतात. त्यांचा हा गुन्हा अक्षम्य असून लाल सलामशी केलेली मैत्री देशाचा घात करते की सजग नागरिकांमुळे त्यांचाच आत्मघात होतो हे येणारं काळच सांगेल. तरी आजच्या घडिला लाल सलामशी केलेल्या दोस्तीमुळे प्रकाश आंबेडकर माझ्या नजरेत तरी देशद्रोहीच ठरतो. बास!    

५ टिप्पण्या:

 1. Ramteke .. the fools like you are not supporting Ambedkarite movement but holding it back by writing such BJP/RSS supporting articles.
  Your phone number mentioned in this blog 9834 117 996 is not working, otherwise I'd have called you personally and told you about the ground facts !!!
  In your article, you are supporting beggars like Athwale but you don't understand what self respect is.
  If you think you have the guts for real discussion, put your working cell number here then we can have a real discussion !!!

  उत्तर द्याहटवा
 2. छान लेख . लाल सलाम चा धोका वेळीच ओळखावा

  उत्तर द्याहटवा
 3. ज्या दिवशी लाल सलाम उरावर बसेल नं तेव्हा सगळे दिवास्वप्न उडुन जातील

  उत्तर द्याहटवा