सोमवार, ८ जानेवारी, २०१८

संभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या!Image result for bhide gurujiभीमा कोरेगावच्या निमित्ताने यावेळेस दोन गोष्टी अधोरेखीत झाल्या, एक म्हणजे मीडियांनी बातम्या देण्यात प्रचंड लबाडी केली. तिकडे आमच्या लोकांना रक्तबंबाळ होईस्तोवर मारले जात असतांना दिवसभर एक बातमी सुद्धा दाखविली गेली नाही. व दुसरी गोष्ट म्हणजे दलितांवर हल्ला करणारे भगवे नि त्यांचे सुत्रधार यांना आजूनही पोलिसांनी अटक केली नाही. थोडक्यात भाजप सरकार भगव्यांचा पाठीराखा बनून उभा आहे.  आजचा भाजप २० वर्षा आधीच्या भाजप पेक्षा खूप वेगळा आहे. हिंदू अजेंडा घेऊन नव्वदीमध्ये राजकीय धुमाकुळ घालणारा भाजपा दोन दशकाच्या प्रवासात अधीक समावेशक नि प्रगल्भ झाला असे वाटू लागले होते. किंबहूना सत्तेची चव चाखल्यावर ती प्रगल्भता येतेच. समावेशक राजकारण नाकारल्यास लोकं तुम्हाला सत्ताधारी म्हणून नाकारतात हे वास्तव भाजपनी मागील दोन अडीच दशकातील प्रवासात खूप व्यवस्थीत अनुभवले आहे. तरी एखादी संस्था वा संघटना आपल्या मूळ स्वभावाला सोडत नाही हे भीमा-कोरेगाव प्रकरणातून परत एकदा अधोरेखीत झाले आहे.
मनोहर भिडे:
भीमा कोरेगावची दंगल मनोहर भिडे(संभाजी हे नाव यांनी बहुजनांना उल्लू बनविण्यासाठी धारण केले आहे) यांनीच घडविली असे तमाम आंबेडकरी म्हणत असून मनोहर भिडे यांच्या विरुद्ध तक्रारही देण्यात आली आहे. यावर पत्रकारांनी भिडेने गाठून विचारणा केली असता भिडे म्हणाले की मी दंगल काळात त्या भागात नव्हतो. मी तर दूर कुठेतरी होतो वगरे उत्तर दिले. झालं भिडेंचं दंगलीच्या दिवशी कोरेगावात नसणं जणू त्यांचं निर्दोषत्वाचा पुरावा असल्यासारखं मीडियांनी ही बातमी युक्तीवादासकट दाखवणे सुरु केले. दंगलीच्या दिवशी भिडे तिथे नव्हते... मग तुम्ही त्यांचं नाव घेताच कसे? ते तर दुस-या गावी होते... मग त्यांचं नाव गोवलच कसं जातं? वगैरे मीडियाची पोपटपंची चालू झाली. एवढंच असतं तर एकदाचं ठीक होतं. पण मीडिया याच्याहे पुढे गेला व सांगू लागला की हा भिडे कसा वयोवृध्द आहे. तो आजही कसं अनवाणी पायांनी चालतो. तो अजही कसं सायकलनी किंवा फक्त लाल डब्यानीच प्रवास करतो वगैरे भिडेची वकिली मीडियांनी करायला सुरु केली. मला साधं कळत नाही. अरे सायकलनी प्रवास करणे याचा गुन्हेगार नसणे यातलं कोरिलेशन काय? सायकलनी प्रवास करणे ही गुन्हेगारी वृत्ती घालविण्याची थेरपी आहे का? हा भिडे सकाळी उठून १५० दंड बैठका मारतो वगैरे बातम्या सांगता. त्याचा निर्दोषत्वाशी काय संबंध? एस. टी. नी प्रवास केल्याने याचे गुन्हे कसे काय गळून पडतात हे मीडिया जरा समजावून सांगेल का? हा भिडे एकाच वेळी जेवण करतो वगैरे सांगुन झाले. एक वेळा जेवणाशी मारामा-या न करणे याचा काय संबंध? म्हणजे भिडेची वकिली करतांना तमाम भगवी वृत्ती शेन खाल्यागत बोलत होती.
काहींचं तर असं म्हणण होतं की  F.I.R. दाखल कसे काय करता? त्यासाठी पुरावे द्यायला हवेत. या भिडेच्या विरुद्ध कोणताच पुरावा नसताना पोलिसांनी तक्रार घेतलीच कशी वगैरे मुर्ख युक्तीवाद मीडिया व भिडे भक्तांनी चालविला होता. भिडे हा माणूस उदयन भोसले, फडणवीस ते चक्क मोदी पर्यंत आपलं वजन राखून आहे. त्याचाच हा परिणाम होता. नाहीतर आपला मीडिया इतका बेअक्कल नाही. अरे तक्रारदारांनी पुरावा द्यायचा नसतोच मुळी... तक्रारकर्त्यांनी नुसती तक्रार द्यायची असते. मग त्या तक्रारीला धरुन पुरावे शोधण्याचं काम पोलिसांचं आहे.  भिडे व याची टोळीं मागील अनेक वर्षा पासून त्या परिसरात भगवा विष कालविण्याचे काम पद्धतशीरपणे चालवित होती. त्याचा परिणाम म्हणून शौर्यदिनी दलितांवर हल्ला झाला. या हल्ल्याला मीडियांनी शाब्दीक चालाखी करत दंगल म्हटले. मुळात दंगल म्हणजे दोन्ही गट एकमेकांना मारण्यासाठी  भिडतात त्याला म्हटले जाते. ईथे तसं अजिबात नव्हत. आंबेडकरी समाज तर श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता. दबा धरुन बसलेल्या भगव्यांनी नियोजनबद्द हल्ला चढवून आंबेडकरी समाजात दहशत निर्माण केली. याला हल्ला न म्हणता मीडियांनी चक्क दंगल म्हणून बातम्या सोडल्या. झालं... लोकांना वाटू लागलं की दोन्ही कडून राडा झाला. काही कारण नसतांना आमचा समाज बदनाम झाला. यामागे मीडियाची चलाखी होती. खरेतर वास्तव तसे नव्हतेच. इथे एक पक्ष पूर्ण बेसावध होता तर दुसरा पक्ष तयारीने हल्ला चढवितो. त्यामुळे ही दंगल नव्हती तर सुनियोजीत हल्ला होता. त्याला चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे खरंतर मीडियांनी जाहीर माफी मागावी.
तर असा हल्ला घडविण्याचे काम अचानक झालेले नाही. भिडे व त्याच्या लोकांनी कित्येक दिवसांपासून तिकडे त्याची तयारी चालविली होती. स्थानिकांच्या मदतीने रस्त्या लगतच्या घरांमधे तिस-या माळ्या पर्यंत दगळं साठविण्यात आले. मग नेमकी वेळ साधून हल्ला चढविला गेला. अचानक झालेल्या हल्याने गोंधळ उडाला व सगळे सैरभैर होऊन पळू लागले तेंव्हा रस्त्याच्या दोन्ही कडेनी असलेल्या घरांच्या गच्चीवरुन दगडांचा वर्षाव सुरु झाला. अत्यंत बेसावध आणि निहत्ये असलेल्या आंबेडकरी समाजाची अशा प्रकारे भगव्या गुंडानी केलेली ही मारहाण अमाणूष तर आहेच पण यांच्या मनात आमच्या बद्दलचा असलेला द्वेष सांगणारीही आहे. त्यात एका दलित तरुणाचा मृत्यू झाला. असा हल्ला अचानक होऊ शकत नाही हे जाहीर आहे. एवढं नियोजन केलं गेलं म्हणजे याला कोणीतरी म्होरक्याही आहे. तो म्होरक्या नुसता लल्लूपंजू नसून भगव्या विचारधारेचा कडवा नि प्रभाव राखून असणारा कोणीतरी मोठाच इसम आहे एवढं प्रायमा फेसी दिसतच आहे. अन जेंव्हा केंव्हा असं घडतं तेंव्हा प्रायमाफेसीच्या आधारे शंका असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास करायचा असतो ही सामान्य पद्धत आहे. पण भिडेचा हात असल्याचं लक्षात आल्यावर पोलिस नेहमीच्या पद्धतीने तपास करत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे. शासनाचा जातीयवाद दाखविणारी आहे. 
ईथे या प्रायमा-फेसी सिचूएशनला चक्क तक्रारीची जोड आहे. स्थानिकांनी या भागात मागील काही दिवसांपासून भगव्या गुंडाच्या हालचाली नि त्यांच्या संघटनांचा अविचारी प्रचार याच्या आधारे भिडे या इसमाच्या विरुद्ध तक्रार दिली. म्हणजे १ जानेवारीच्या हल्ल्याचा संभाव्य सुत्रधार म्हणून भिडे या कडव्या भगव्याचं नाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिलं आहे. या आधारे पोलिसांना हल्याचा छळा लावण्याच्या Standard Procedure नुसार भिडे नावाच्या भगव्याला ताब्यात घेऊन चौकशी करायला हवे होते. या हल्यात भिड्याचं हात आहे की नाही त्याचे पुरावे पोलिसांनी गोळा करायला हवे होते. पण पोलिस मात्र भिडेला ताब्यातच घेत नाहीत. ही दिरंगाई भिडेला दिलेलं फेव्हर आहे. पोलिस जितकं उशीर करतील भिडेला तितका अधिक वेळ मिळेल व पुरावे नि पुराव्या पर्यंत पोहचणारे धागे दोरे मिटविण्याचे काम भिडे व त्याचे गुंड निपटून घेतील. थोडक्यात पोलिसांना या हल्ल्यातील संभाव्य गुन्हेगार माहीत असुनही इथे पुरावे गोळा करण्यासाठी त्याला ताब्यात घेतले जात नाही. म्हणजे पोलिसांनाच भिडेच्या विरोधात पुरावे नको आहेत. भिड्याला लवकर ताब्यात घेतल्यास सज्जड पुरावे हाती लागण्याची शक्यताच अधिक. तसे झाल्यास भगव्यांचा दंग्यातला हात सिद्ध होईल व भिडेला जेलात जावे लागेल. हे घडू नये म्हणून पुरावे मिटविणे गरजेचे आहे. पुरावे मिटवायचे म्हटले की भिडेला ताब्यात न घेणे किंवा दिरंगाई करणे हा पोलिसी डाव ठरतो. अन पोलिस तेच करत आहेत.
देवेंद्र फडणवीस ते तमाम भगवे नि संघाचे नेते भिडेच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत. या सगळ्यांचा एकच युक्तीवाद चालू आहे तो म्हणजे हल्ला झालेल्या ठिकाणी भिडे नव्हते. मग या लॉजिकनी बघायचे म्हटल्यास मुंबईत बॉम्ब फोडले तेंव्हा दाऊद इब्राहीम तर भारतातच नव्हता. मग त्याला निर्दोष मानायचे का? माणूस कुठे असतो त्याला महत्व नसते. तो जिथेकुठे असतो तिथून तो काय शिजवतो यावर त्याचा गुन्हा ठरत असतो. भिडे नावाचा भगवा गुंड कुठे होता यावरुन त्याचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही. त्यांनी असलेल्या ठिकाणावरुन आपल्या माणसांद्वारे काय शिजवलं यावरुन त्याचा गुन्हा ठरतो. त्यासाठी आधी भिडेला ताब्यात घेऊन चौकशी व्हायला हवी. चौकशीत पोलिसांनी पुरावे गोळा करायचे असतात व ते त्यांनी करायला हवेत. अन मग त्यातून भिडे काय आहे ते कळेलच. पण भिडेला ताब्यात न घेणे हे एका अर्थाने पोलिस भिडेच्या बाजूनी असून त्याला मदत होईल अशा पद्धतीने वागत आहेत. तक्रार दाखल होऊनही भिडेला ताब्यात न घेणे ही पोलिसांची लबाडी आहे. तक्रार कर्त्यानीच पुरावे द्यावे असं म्हणणारे तमाम टाळकी लोकांची दिशाभूल करत आहेत. तक्रारकर्त्यानी पुरावे दयायचे नसतात तर तक्रार आल्यावर त्या आधारे ते पोलिसांनी गोळा करायचे असतात. 
ABP माझाच्या एक्लूझीव्ह इन्टरव्ह्यूत तर हा भिडे म्हणतो की कोरेगावात कारनामा करणारे माझ्या संगठणेचे कार्यकर्ते नव्हते पण ते आमचेच हिंदू होते. या वाक्यात Implied संदेश हा आहे की त्या कार्यकर्त्यांना हा भिडे आपले मानतो. याच बरोबर एकबोटे व घुगे बद्दल विचारल्यावर हा म्हणतो की मी घुगेला अजिबात ओळखत नाही. पण लगेच हे सुद्धा म्हणतो की हा महान माणूस जो कोणी असेल त्याचा मला अभिमान आहे. याचाच अर्थ घुगेचं हल्यातील योगदान एवढीच त्यांच्या बद्दलची आत्ताची माहिती.... व त्याच आधारे घुगे भिडेला महान वाटतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आंबेडकरी समाजाला मारणारा हा भिडेच्या नजरेत लगेच महान बनतो. मग त्याची कोणतीच पार्श्वभूमी माहीत नसली तरी व ती काही असली तरी तो दलितांना मारतो एवढं पुरेसं असतं. यातून हा भिडे नुसता बदमाश नाही तर खूनी व दंगलखोर वृत्तीचा माणूस आहे हे स्पष्ट होते. माहात्मा फुल्यांबदल यांनी जी ओकारी ओकली त्या बद्दल जेंव्हा वार्ताहार विचारतो तेंव्हा भिडेला उत्तर सुचतच नाही. मग वार्ताहारच Lead Question(ज्यात उत्तराचा संकेत असतो असा प्रश्न) विचारतो तो प्रश्न असा "फुलेंबद्दल आपण चुकीचं बोललात की बोललेल्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने छापण्यात आलं?" जेंव्हा वार्ताहार हा लीड क्वेशन देतो तेंव्हा मात्र भिडे मोठ्या चतुराईने म्हणतो की "चुकीच्या पद्धतिने छापण्यात आलं हे तुम्ही हृदयात कायम साठवून ठेवा". आहे की नाही लबाडी. याला ताब्यात घेऊन तपास केल्यास बरच काही हाती लागण्याची शक्यता आहे.
फडणवीसांनी थोडी लाज बाळगावी नि भिडेंला ताब्यात घेण्याचे आदेश द्यावे. भिडेची कसून चौकशी केली जावे म्हणजे भीमा कोरेगाव हल्यातील सुत्रधार कोण ते लोकांसमोर येईल व एकदाचं सगळ्यांना कळेल की तिथे दंगल झाली नव्हती तर निरपराध व निहत्ये आंबेडकरी समाजावर हल्ला झाला होता. व प्रायमा-फेसी या हल्ल्याचा सुत्रधारे मनोहर भिडे हाच दिसतो आहे. शासनानी सर्वात आधी या भिडेला ताब्यात घ्यावे. बास!

-जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा