शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

महाराष्ट्राचा हूक (पवारांची मुलाखत)Image result for raj thackeray sharad pawar interviewपरवा पुण्यात राज ठाकरेंनी पवारांची अभूतपूर्व अशी मुलाखत घेतली. त्यात राजनी आधीच सांगुन टाकले होते की ते नेहमीची प्रश्न न विचारता काहितरी नविन विचारणार. त्यामुळे त्या नव्या प्रश्नांसाठी मी मोठ्या कुतुहलानी अख्खी मुलाखत पाहिली अन शेवट झाल्यावर लक्षात आले की अरेच्चा आपला तर “पपलू झाला” नव्या प्रश्नाच्या चक्करमध्ये मंचावर घडलेला एकूण संवाद हा जुन्या व ज्ञात माहितीचाच रिपिटेड एपिसोड आपण पाहुन घेतला. श्रोता म्हणून फसविल्या गेल्याचं वाटलं. पण नंतर खोलात जाऊन विचार केल्यावर लक्षात आलं की मागच्या पन्नास साठ वर्षात पवार हे मीडियाचं  एक असं टार्गेट राहिलं आहे की त्यांच्या विषयी मीडियांनी सत्य नि वास्तव तर वेळोवेळी छापलच पण त्याही पलिकडे जाऊन ब-या/वाईट घटना व त्यातील पवारांचा अशू शकणारा(संभाव्य) अदृश्य हात ही बाजूही तेवढ्याच ताकदीने मांडत राहिला. त्यामुळे पवारांची सुटलेली माहिती असं काहीच राहिलेलं नाही. जोडीला त्यांची प्रकाशीत आत्मचरित्र्ये वगैरेची गोळाबेरीज करता त्यांच्या बद्दल असलेली माहिती ही खुद्द पवारांना स्वत:बद्दल असलेल्या माहितीपेक्षा थोडी जास्तच निघेल. त्यामुळे पवारांच्या बद्दलच्या माहितीचा भाग इथे संपतो.
या मुलाखतीत राजचा एक प्रश्न मात्र राजची राजकीय सुजबूझची मर्यादा सांगून गेला. याच्या अगदी उलट दिलेल्या उत्तरांनी पवार कसं जनतेची नाड ओळखून आहेत ही गोष्ट अधोरेखीत झाली. तो प्रश्न म्हणजे “महाराष्ट्राचा हूक कोण?”. हा प्रश्न पवारांना नीट समजावा म्हणून राज त्याला थोडं विस्तारीत पद्धतीने मांडतात. ते म्हणतात की सगळा पंजाब गुरुगोविंद सिंगाच्या नावानी एकवटतो, बंगाल टागोराच्या नावानी एकवटतो... आजून कोणी कोणाच्या नावानी एकवटतो. तसं मराठी जनता कोणाच्या नावानी एकवटते. तेंव्हा “शिवाजी महाराज” असं उत्तर येतं. मग राज ठाकरे लगेच प्रश्नाचा उत्तरार्ध मांडतात “जर ते खरं असेल तर मग तुमच्या भाषणांतून फुले-शाहू-आंबेडकर” हे का येत असतं. हूक जर शिवाजी महाराज असतील तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावानी भाषणं का सुरु होतात. त्यावर पवारांनी दिलेलं उत्तर राज ठाकरेला किती कळलं माहित नाही, पण पवारांना मात्र राजकारणातील गरज म्हणून शिवाजी महाराजांच्या मर्यादा कळल्यात हे जाहीर झालं. निव्वड शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात राजकीय सत्ता मिळविली जाऊ शकत नाही हे वास्तव पवार जाणतात. मग सत्ता मिळवून देऊ शकेल असा दुसरा social force काय याचा अचूक शोध पवारांनी घेतला असून महाराजांच्या जोडीला हा सामाजीक फोर्स त्यांनी जोडला. हा त्यांच्या बेरजेच्या गणिताचाच भाग असून त्यामुळे ते मागच्या साठ वर्षात सलग निवडून येत आहेत.
पवारांच्या मुलाखतीतून इतर कोणाला काही मिळाले की नाही माहित नाही पण राजकीय़ मैदानात सपाटून मार खाल्लेल्या राज ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी पवारांनी जणू यशाचा कानमंत्र देऊ केला... अर्थात तो सांकेतीक असल्याने राज यांना ’कानमंत्र’ वाटतो की नाही ही बाब वेगळी. तर तो कानमंत्र म्हणजे “फुले-शाहू-आंबेडकरी” समाजाची बेरीज. जर महाराष्ट्रात राजकीय यश हवे असल्यास निव्वड शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही तर इथला दुसरा social force फुले-शाहू-आंबेडकर हा असून त्याला हाताशी धरल्या शिवाय राजकारण अशक्य आहे हे पवारांनी राजना पटवून दिले. थोरल्या महाराजांनंतर फुल्यांनी मोठी सामाजीक चळवळ उभी केली. शाहूंनी त्याला अधिक बळकट केले तर बाबासाहेबांनी क्रांती घडविली. या सगळ्यांचं सामाजिक बांधणीत मोठं योगदान होतं व त्यांना मानणारा वर्ग आपल्या मराठी भुमीत बहुसंख्येनी असून त्यांना डावलून राजकारण होऊ शकत नाही हे पवारांनी राजला समजावून सांगितले. समजावून सांगितलेलं समल्यास राजची राजकीय भरारी नक्की आहे. पण सेनेच्या मुशीतून निघालेल्या राजच्या डोक्यात ते घुसेल याची शक्यता कमीच.
असो... या निमित्ताने महाराष्ट्राचा हूक कोण हे स्पष्ट झाले. शिवाजी महाराजां बद्दल आदर आहेच, पण त्यांच्या नंतरही समाजात एवढी मोठी माणसं जन्मास आली की त्यांचा येथील समाजमनावर असलेला प्रभाव “हूक” नावाची गोष्ट कोणा एकाकडे न राखता तीचं decentralization घडत गेलं. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे या “हूक” ची monopoly कोणा एका समाजाकडे नसल्यामुळे राजकीय दिग्गजांवर “checks and balance” चं काम समाज बजावत राहिला आहे.  जिथे चेक्स एन्ड बॅलन्सचा अभाव असतो तिथे सत्ताधारी बेफाम वागतात. Abuse of power हे checks and balanceच्या अभावातून अधिकाधिक वाढत जातं. राजकारणी, शासकीय अधिकारी नि इतर शासनकर्त्यांना use of unlimited power पासून रोखण्यासाठी checks and balance असणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी checks and balance हे संविधानिक तरतूद म्हणून आणली जाऊ शकतात. त्याची प्रभावी अमंलबजावणी करवून घेतली जावू शकते. पण एका समाजाला checks and balance च्या रुपात उभं करणं तसं अवघडच. पण महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकर या चळवळीने इथला एक मोठा समाज त्या रुपात उभा केलेला आहे. परवाच्या मुलाखतीत पवार राज ठाकरेंना तेच सजावून सांगत होते. शब्द वेगळे असले तरी पवारांच्या सांगण्याच अर्थ काहिसा असा होता...  "उगीच शिवाजी महाराजांना हूक वगैरे समजून राजकारण करायला जाऊ नका. मी खुद्द तसं कधी केलेलं नाहीये. माझ्याकडे बघून जरा शिका. माझं न ऐकता जर तुम्ही तसं केल्यास  परास्त व्हाल एवढं लक्शात ठेवा. इथे राजकारण करायचे असल्यास व त्यात यश मिळवायचे असल्यास शिवाजी महाराजांच्या जोडीला फुले-शाहू-आंबेडकर घ्यावेच लागतील." थोडक्यात महाराष्ट्राचा हूक पवारांना चांगलं माहित आहे... ते राजना किती समजलं येणा-या काळात कळेलच.

जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा