मंगळवार, २० मार्च, २०१८

संविधानद्रोही मुस्लीम स्त्रीया.


Image result for against triple talaq billजगात अनेक समाज नि संस्कृत्या आहेत. आज त्यातल्या बहुतांश समाज घटकांनी प्रगती केली नि आधुनिकता स्विकारताना जुन्या चालिरितीना टाकुन दिलं.  पण याचं समाजाचा दोनतीन शतकं मागे जाऊन अभ्यास केल्यास आपल्याला विश्वास बसणार नाही एवढा मुर्खपणा ते जोपासायचे हे दिसते. अगदी युरोपियन, अमेरीकन जापनीज, चायनिज ते भारतीय. हे सगळे आज समाज म्हणून आधुनिक असले तरी दोन तीन शतका आधिचा त्यांचा इतिहास मानवी मुल्यांच्या निकषावर अत्यंत क्रूर, स्त्रीला दासी मानणारा, विविध वर्गभेद जपणारा नि चक्क मानवाला गुलाम म्हणून  बाजारात विकण्या पर्यंत लाजिरवाना प्रकार या आधुनिक समाजाच्या नावे त्याच्या इतिहासात नोंदलेलं सापडतं. पण या समाजानी स्वत:चा विवेक वापरत त्यावर मात केली आणि नवी सामाजिक मुल्ये स्विकारली. त्यामागील भुमिका एकच... माणसाचं जिवन सुखकर करतांना material progress सोबत त्याला अधिकाधीक स्वातंत्र्य नि सन्मानाचं जगणं जगता यावं. अन असं जगणं लाभण्यासाठी त्या अनुरुप समाजरचना उभी करत न्यायची. यासाठी समाजातूनच लढे उभारले गेले नि मग हळूहळू का असेना  पण वरील देशात सन्मानाने जगता येणारी नवी समाज रचना उभी होत गेली.
पण अरबी समाज मात्र त्याला अपवाद ठरत गेला. त्या समाजात असे सामाजिक लढे उभेच राहिले नाही. त्यामुळे सामाजिक बदल घडलाच नाही.  खरं पाहिलं अर इतर देशांच्या तुलनेत अरबी देशांचा (काही अपवाद सोडता) पेट्रोलची लॉटरी लागल्यामुळे पैशाचा प्रश्न सुटला. त्यामुळे खरंतर सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणीक अशा विविध  आघाड्यावर झपाट्याने विकास व्हायला हवा होता. पण तो झाला नाही. याला कारण एकच...इस्लामला घट्ट कवटाळून बसणे. इस्लाम ख-या अर्थाने मानवाला शाप ठरत आहे हे तमाम मुस्लिम समाजाची वाटचाल पाहून सिद्ध होते. अगदी सौदी सारख्य गडगंज श्रीमंत देशाकडे बघूनही हेच सिद्ध होते की नुसता पैसा येणं पुरेसं नसतं तर आलेल्या पैशाचा समाजाच्या उर्कर्षासाठी उपयोग होणे खरी गरज असते. ती अरेबीक मुस्लीम राष्ट्रात होताना दिसत नाही. पुर्वेकडची मुस्लीम राष्ट्रे मात्र या बाबतीत सर्वस्वी भिन्न आहेत. त्यांनी काळाचं भान ठेवत व्यवहार चातुर्य दाखवितांना जे जे विकासाभिमूख आहे ते ते स्विकारलं. त्यात धर्माची आडकाठी होणार नाही एवढी दक्षता घेतली. भारतीय मुस्लीम मात्र बदलत्या काळात अरेबियन मुस्लीमाच्या वाटेनी जाताना दिसतोय.
खरंतर भारतीय मुस्लीम कन्फ्युज्ड मुस्लीम आहे. या समाजावर भारतीय पंरपरेचा पगडा असला तरी धार्मीक श्रद्धा मक्का-मदिनेशी इमान सांगणारी आहे. त्यातून मग त्याच्या इमानाची विभागणी होते. कुराण की भारतीय संविधान असा थेट प्रश्न टाकल्यास मुस्लीम समाजाकडून येणारं उत्तर नुसतंच चतूर नसतं तर लबाडीपूर्ण चतूर असतं. ही चतूरी त्याची फितूरी अधोरेखीत करुन जाते...  अगदी स्पष्ट बोलायचं तर मुस्लीमाला संविधानापेक्षा कुराण कधीही प्रथम स्थानी असतं. हे असं असणं देश व समाजासाठी घातक आहे. त्याची चुणूक अधुन मधुन दिसत असते. पण नुकतच मुस्लीम स्त्रीयांनी मोर्चे काढून जो संविधनद्रोह दाखविला ही अत्यंत दुदैवी वाटचाल म्हणावे लागेल.
तीन तलाख ही पुरुषाच्या हुक्कीला कुराणाने दिलंल वरदान आहे. तर त्याची दुसरी बाजू म्हणजे ही तरतूद मुस्लीम स्त्रीच्या लग्नावर असलेली टांगती तलवार आहे. ही तलवार दूर करण्यासाठी सभागृहात बील (पास झाल्यास कायदा) मांडण्यात आलं. येऊ घातलेल्या नव्या कायद्याद्वारे मुस्लीम नव-याचा तीने वेळा तलाख म्हणून बायकोला हाकलून लावायचा अधिकार बेकायदेशीर ठरणार असून त्यामुळे मुस्लीम स्त्रीच्या विवाहाला कायद्याचा आधार लाभणार आहे. तीन तलाकच्या विरोधात मुस्लीम स्त्रीयांनीच आवाज उठविला ही खूप महत्वाची बाब आहे. ज्या समाजात अत्याचार होतो त्याच समाजातून जोवर उद्रेक उसळत नाही तोवर बाहेरच्यांकडून फारशी ढवळाढवळ होणे अपेक्षीत नसते. जगभारतल्या सामाजिक क्रांत्या पाहिल्यास हाच पॅटर्न दिसतो.  समाजिक लढ्याचा हा पॅटर्न आजवर मुस्लीम धर्मात दिसला नाही... पण सुदैवाने तीन तलाकच्या निमित्याने तो पहावयास मिळाला. जेंव्हा Victim विद्रोहावर उतरतो तेंव्हा प्रस्थापितांची तटबंधी उध्वस्त करत नवा इतिहास घडत असतो. आज न उद्या मुस्लीम स्त्रीनी उचललेला तलाक विरोधी आवाज तमाम विरोध झुगारुन तीन तलाकाचा निकाल लावणार एवढं नक्की. पण याच दरम्यांन त्याच समाजातील स्त्रीयांचा एक गट येऊ घातलेल्या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरतो तेंव्हा मात्र मन खिन्न होतं. या रस्त्यावर उतरण्याच्या बायकांची नक्की मागणी काय? माझ्यावर अत्याचार करा अशा धाटणीची ही मागणी झाली. आता जगात असा कुठला माणूस आहे जो मोर्चा काढून म्हणेल की माझ्यावर अत्याचा करा? कोणीच नाही म्हणणार. पण या मुस्लीम स्त्रीया तर अगदी तेच म्हणत आहेत. कोणताच माणूस जे मागत नाही नेमकी तीच गोष्ट या बायका मागत आहेत. त्यांच्या मोर्चाचा अर्थ असाच निघतो की “त्यांच्या नव-यांकडे असा अधिकार असावा ज्याचा वापर करुन या बायकांना कधिही लाथ घालता यावी” मला लाथ घालण्याचा अधिकार माझ्या नव-याला द्या.... ही नक्की कशाची मागणी आहे? ज्याची कशाची असेल पण ती आत्मसन्मानाची नक्कीच नाही. मग आत्मसन्मान नको म्हणणारी मुस्लीम स्त्री ही या काळात नेमकी कोणत्या मानसिकतेला कवटाळून जगत आहे असा प्रश्न पडतो.
जरा खोलात जाऊन विचार केल्यास याचं उत्तर सापडतं. भारतीय़ मुस्लीम हा मक्के-मदिनेशी इमान सांगताना तो भारतीय संविधान नि इथले कायदे याला हळुहळु दुय्यम मानू लागला आहे. एवढेच नाही तर जे जे इस्लामचं आहे तेच सर्वोत्तम अशा अविचाराने हा समाज व्यापला जात आहे. इस्लामची थोरवी गाताना अगदी आत्मसन्मान गहाण टाकण्याची ही धारणा समाज म्हणून स्वत: मुस्लीमास तर मारक ठरतेच पण असा समाज ज्या देशात राहतो त्या देशाचाही संथ गतीने घात होत असतो. ही संथ गती कधी उसळी मारुन वाहू लागेल याचा नेम नाही. पण जेंव्हा त्याला वेग येईल तेंव्हा जे काही होणार त्यातून देश सावरायचा नाही. मुस्लीमाचा अविवेक वाढत गेला की देशावर मोठा विध्वंस ओढविल्या शिवाय राहणार नाही. थोडक्यात ही वाटचाल बरोबर अरेबीयन मुस्लीमांशी साम्यता सांगणारी आहे. कुराणाला व त्यातील समाजघातकी विचाराना कवटाळून ठेवल्यामुळे अतोनात पैसा येऊनही जसं अरेबीयन देशं मागास, अविकसीत नि अविचारी राहून गेली. अगदी तसच भारतीय मुस्लीम कुराणाच्या शापामुळे अविवेकी बनत चालला आहे.  हे खरच असं घडत आहे की नाही याबद्दल जे साशंक आहेत त्यांना जणू पुरावा देण्यासाठीच आज भारतीय मुस्लीम स्त्रीयांनी मोर्चा काढून “तीन तलाख बीलाला” विरोध केला. हे विरोधी मोर्चे नुसता विरोध नसून मुस्लीम समाज कसा अविवेकाच्या गाळात रुतत चालला आहे याची साक्ष आहे. त्याला तिथून खेचून बाहेर काढणे जर आज टाळले तर उद्या तो आपल्याला व या देशाला त्याच गाळात खोलवर खेचल्या शिवाय राहणार नाही, एवढं नक्की.
हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असतांना निव्वड स्वार्थापायी मुस्लीमांचे लाड होत असतील तर हा लाडावलेला मुस्लीम एक दिवस उभ्या देशाच्या विध्वशाचं कारण बनेल. त्याची झलक आज “तीन तलाख विरोधी कायद्याच्या” विरोधात मोर्चा काढून संविधानद्रोही मुस्लीम स्त्रीयांनी दाखवून दिली आहे.  

-जयभीम

रविवार, १८ मार्च, २०१८

औरंगझेब माणूस म्हणून सज्जनच!


Image result for aurangzebआज गुढी पाडवा... महाराष्टात आज काही लोकं नववर्ष साजरा करत आहेत तर काही लोकं संभाजिच्या खुनाचा दिवस तो आजच म्हणत काळा दिवस पाळत आहेत. कोण काय पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण. एकमेकांवर आरोप करताना संभाजी महाराजांचा कातील म्हणून औरंगजेबावर ज्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात ते न पटणारे आहेत. शिवाजी महाराज व ओरंगजेब यांच्यात वैर होतं. ते वैर एक सम्राट व एक राजा या दोन महत्वकांक्षांचा टकराव होता. दोघेही सत्ताधीश म्हणून एकमेकांच्या विरोधात जे करत होते ते तत्कालीन राजकीय परिस्थितीला धरूनच होते. शत्रुला पाणी पाजणे व सत्ता अधीक बळकट करणे हे दोघांचेही धोरण होते. त्यासाठी नीति, कूटनीति, डावपेच नि रक्तपात हे दोन्ही बाजुनी खेळले गेले. त्यामागील ऊद्देश एकच.... सत्ता. सत्ता महाराजाना हवी होती तशी ती औरंगजेबालाही हवी होती. याच सत्ता संघर्षात संभाजी महाराजाना पकडून देहदंड फर्मावण्यात आले.  एक सम्राट म्हणून औरंगजेबाजी ती कृती तसं त्याच्या पदाला धरूनच होती. कारण शिवाजी महाराजांपासून ते संभाजी पर्यंत सगळेच औरंगजेबाच्या साम्राज्याला सुरुंग लावते होते. आजच्या भाषेत बोलायचे तर औरंगजेबासाठी शिवाजी नि संभाजीचा रोल हा War Against State  यात मोडतं. अन या गुन्ह्यासाठी देहदंड हीच शिक्षा असते. ती आजही आहेच. कसाबची कृती War Against State याच परिभाषेत बसवून त्याला फाशी फरमाविण्यात आली. अगदी हेच निकष संभाजी महाराजाना लावून त्यांच्या देहदंड देण्यात आला. म्हणजे सत्ताधीश म्हणून औरंगजेबाची कृती Justified (न्याय्य) ठरते. 
पण या घटनेला काही लोकं जातीय रंग देऊन ओरंगजेबाची निंदा नालस्ती करतात जे मला पटत नाही. ती करताना औरंगजेबाचं राज्य परकीय तर शिवाजी महाराजांचं राज्य स्वराज्य ही संकल्पना मांडतात. पण मला ही स्वराज्यवाली संकल्पनाच पटत नाही. खरं पाहिल्यास शिवाजीचं राज्य जेवढं स्वराज्य होतं तेवढच औरंगजेबाचं राज्यही स्वराज्यच होतं. औरंगजेब बाहेरचा नव्हताच मुळी. तो याच मातीत जन्मलेला होता व त्याचं साम्राज्य 100% स्थानिकच होत. तो ब्रिटीशांसारखा ना बाहेरून आलेला होता ना ईथला खजीना तो कुठे परदेशात नेत होता. तो तर ईथला म्हणूनच राज्य करत होता. त्याचा खजिना इथल्याच लोकांसाठी रिता होत होता. म्हणजे तो इथली संपत्ती लुटून नेणारा वगैरेही नव्हता. तेंव्हा औंगजेबाचा राज्य परकीय नि शिवाजीचं मात्र स्वराज्य... ही संकल्पना मांडणे म्हणजे एका अर्थाने लोकांचा बुध्दीभेद करणे होय.
औरंगजेब हा केवळ मुस्लीम असल्यामुळे हा प्रकार केला गेला हे त्यामागील सत्य. त्यामुळे लोकांना खरच असं वाटू लागलं की औरंगजेब हा परका तर शिवाजी आपला. पण वास्तवात दोघेही आपलेच. त्यांचा झगडा दोन सत्ताधीशांचा झगडा होता. ते शत्रूत्व समाजाची विभागणी करणारी नव्हती तर सत्तेसाठीची होती. आपण मात्र त्याचं Interpretation चुकीच्या पद्धतीने मांडत आलो व आज शिवाजी आपला तर औरंगजेब परका हा भ्रम करुन बसलोय. खरंतर औरंगजेब अत्यंत जबाबदारने व नैतिकतेने वागणारा माणूस होता ही गोष्ट त्याचा कारभार नि इतर वागणूकीचा अभ्यास केल्यास दिसून येते. तो कट्टर मुस्लीम असेलही पण शासक म्हणून त्यांची वागणूक Justified होती हेच सिद्ध होते.  
जसे की संभाजीना मृत्यूदंड दिल्यावर औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या पत्नी व मुलाची मोठ्या सन्मानाने सोय लावली. शाहू महाराजांचं शिक्षण, प्रशिक्षण व राजकीय धडे याची सर्व सोय औरंगजेबानी लावली. राजकारभार हाकण्याची कुवत आल्यावर शाहू महारांजाना त्यांची गादी सुपूर्द केली. या सगळ्या वागणुकीतून औरंगजेबानी त्याची शालीनता दाखविली. किंबहुना औरंगजेबात ती शालीनता होतीच. त्या मानाने त्याला शिव्या हासडणारे आम्ही शालीनतेनी वागताना कमी पडतो. स्वराज्य ही संकल्पना तर निव्वड बकवास आहे. कारण स्वराज्य संकल्पना शिवाजी महाराजांना योग्य ठरविण्यापेक्षा औरंगजेबाला परकीय ठरविते त्यामुळे ती बकवास ठरते. ही संकल्पना ज्याच्या डोक्यातून जन्माला आली तो खरा देशद्रोही. किंबहुना अशा भावनेतून समाजाची विभागणी करणारी मांडणी केल्या बद्दल त्याचा निषेध व्हायला हवा.

आजच्या दिवशी संभाजी महाराज गेले याचं दु:खच आहे... पण औरंगजेबाला शिव्या हासडणे हे काही परिपक्वतेचं लक्षण नाही. संभाजींचा मृत्यू हे दोन सत्ताधीशांच्या महत्वकांक्षेतून घडलेली घटना होती, एवढच. जेवढा संभाजी या भुमिचा होता, तेवढाच औरंगजेबही याच भुमिचा होता. उलट औरंगजेबाला अजस्त्र  नि अवाढ्वय देशाचा डोलारा सांभाळायचा होता जो त्यानी मोठ्या  जबाबदारी, कर्तव्यदक्ष व शालीनतेनी सांभाळला. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी, संभाजी यांच्या इतकाच आदर औरंगजेबाचाही असायला हवं. बाकी स्वराज्य वगैरे भंपकपणा करणे आता थांबले पाहिजे.... कारण औरंगजेबाचं राज्य हे परकीय राज्य नव्हतं.... ते 100% एका भारतीयाचच राज्य होतं आणि औरंगजेब एक माणूस म्हणून सज्जनच होता.

गुढी पाडवा साजरा करा वा नका करु पण एका भारतीयाला(औरंगजेबाला) परका म्हणून हीनवू नका. तो शिवाजी नि संभाजी महाराजां ईतकाच या मातीचा होता व त्यांनी मातीशी ईमान जपला.  

-जयभीम
गुरुवार, १५ मार्च, २०१८

शेतकरी नावाचा ’नवदलित’!


Image result for indian farmerभारतीय राजकारणात दलित समाजाला अनन्यसाधारण महत्व आहे. खाजगित दलितांना शिव्या हासडल्या तरी सार्वजनीक जिवनात एकगठ्ठा मताच्या दबावातून दलितांबद्दल आदर असण्याचा खोटा आव आणने क्रमप्राप्त होऊन बसते. त्यामुळे तमाम राजकारणी दलितांबद्दल प्रचंड कळवळा नि उदारता बाळगताना दिसतात. दलित समाजाचे लाड पुरवितांना त्यांच्या आदर्शांचे आदर्श बाळगणेही आलेच. त्यातूनच मग दलितांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राजकरण्याना प्रचंड आदर वाटू लागतो. यामागे बाबासाहेबांची कर्तबगारी पुढारी लोकांना भावते असे नसून बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग मतांच्या रुपांने त्याना खुणावत असतो हे खरे कारण. त्यातूनच मग दलित वस्तीत आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तमाम राजकारणी धावपळ करताना दिसतात. दलितांचे मोर्चे निघाले की लगेच उडी मारुन साथ द्यायला धावुन येणारे पुढारी व सेक्युलर राजकारणी कायमच दलितांचे हीतचिंतक ते आम्हीच हे दाखविण्यात अग्रणी राहिले आहेत. उजवे किंवा भाजप वगैरे मात्र यापासून दूर होते व त्यांना कायमच त्याचा तोटा सहन करावा लागला. पण हल्ली मात्र दलित मताचं राजकीय मुल्य ओळखलेले उजवे सुद्धा दलितांना जवळ खेचण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. अगदी भाजपं व सेना सुद्धा दलित वस्त्यांतुन आपली राजकीय बांधणी करताना दिसतात.  हे करतांना बाबासाहेब या दलित आयकोनला लोटांगण घातल्या शिवाय भागत नाही हेही तेवढच खरय. मग सगळेच ते कसे जास्त आंबेडकरवादी आहेत याची स्पर्धा खेळू लागतात. थोडक्यात दलितांच्या एकगठ्ठा मताचं गणित मांडून तमाम राजकरणी दलितांचे लाड करताना दिसतात. पण कालवर आपल्या हक्काचा मतदार असलेला हा दलित हल्ली उजव्यांनाही मत देतो हे लक्षात आल्यावर राजकरण्यांना त्यांची राजकीय गरज म्हणून नविन दलित शोधणे क्रमप्राप्त होते. अन तो चक्क शेतक-यांच्या रुपात सापडला. मग तमाम राजकारणी या नव्या दलिताचे(शेतक-याचे) कसे हितचिंतक आहेत वा नव्या दलितांचा त्याना कसा कळवळा आहे हे दाखविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करु लागले. यातुनच मग शेतकरी नावाच्या नवदलिताला भारतीय राजकारणातील आपले स्थान आणि उपद्रवमुल्य याचा साकात्कार होऊ लागला.
खरंतर शेतकरी आजवर राजकारण्यांच्या दृष्टीने तसा फार महत्वाचा घटक कधीच नव्हता. कारण हा शेतकरी विविध जाती नि आर्थीक गटात मोडत असल्यामुळे त्याचं एका विशिष्ट राजकीय़ पक्षाचं मत म्हणून उपयोग करण्याचं कोणतच समिकरण अस्तित्वात नव्हतं. जात नि धर्म हे दोन घटक जसं एकगठ्ठा मताचं समिकरण होती तसं शेतकरी कधीच नव्हता. त्यामुळे शेतक-याकडे शासनानी कायमच दुर्लक्ष केलं नि पाणि व वीज याची त्या दृष्टीने सोय न लावल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत गेलं. ही एक बाजू आहे. याची दुसरी बाजू म्हणजे घरातील सगळ्यात ’काबील’ मुलगा नोकरी करेल तर सर्वात "नालायक" मुलगा शेती करेल ही पारंपारीक Practice. यातून ख-या अर्थाने शेती व्यवसायांनी मात खाल्ली असून याचं पाप शेतक-याच्या माथी जातं. कारण सर्वात काबील पोराला नोकरीला पाठविणारा शेतकरी हा ख-या अर्थाने पहिला शेत-द्रोही ठरतो व शासन दुस-या क्रमांकाचा द्रोही ठरतो. शेतीला ख-या अर्थाने ज्यांनी मात दिली तो खुद्द शेतकरीच आहे. 
जोडिला सततचे दुष्काळ नि होणा-या आत्महत्या यातून शेतकरी "बिचारा" म्हणून प्रोजेक्ट होऊल लागला. एकदा ’बिचारा’ हा शिक्का बसला की शासनावर तुटून पडण्याचा पट्टाच(लायसेन्स) मिळतो. हा पट्टाआ शेतक-याच्या वतीने मीडियांनी वापरणे सुरु केले व शासनाला घेराव पडत गेला. पण प्राथमिक अवस्थेत पडणारा हा घेराव फारसा लक्षात न आल्यामुळे शासन कायमच गाफील राहिलं. मग त्याचा उद्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल होत गेली. आपलं उपद्रव मुल्य हळूहळू लक्षात आल्यावर शेतक-यांनी त्याचा पहिला विस्फोट घडविण्याचं ठरविलं आणि हा विस्फोट पुण्यात घडला. हडपसरच्या पुलावरुन दुधाचं पूर ओतून तमाम शेतक-यांनी शासनाल जेरीस आणलं. इथे शेतकरी नावाच्या नव-दलिताचा जन्म झाला(या आधीच्या शेतकरी आंदोलनातून नवदलित जन्मला नव्हता). नवदलित व्याख्येत बसण्यासाठी हवे असलेले सगळे ऐवज "बिचारा" म्हणून एकवटणा-या शेतक-यात होते हे दोन्ही गटांना कळले. शासनाला शेक-याचं उपद्रवमुल्य नि एकगठ्ठ मत या दोन्हीचा साक्षात्कार झाला तो इथेच मग तिथून त्यांचे लाड करणे सुरु झाले. एकदा कोणी आपले लाड करतो हे कळलं की माणूस अधिकच लाडावत जातो व शेतक-यांचे तेच झाले. काही झालं, कोणी कशामुळेही आत्महत्या केली तरी ते शासनाला झोडपू लागले व शेतक-यांच्या या अवस्थेसाठी शासन जबाबदार असल्याचा ओरडा करण्यासाठी मीडिया नि विरोधक तर सज्जच होते. त्यातून शेतकरी नावाचा “बिचारा” हा नवा वर्ग अधिक भक्कम होत गेला. मग या वर्गाला आपल्याकडे ओढण्यासाठी तमाम पराजीत धुरंधरांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून या नवदलिताला आपल्या बाजुने खेचण्याचे प्रयत्न चालविले तर शासनानी नवदलिताच्या उदयाचं अचूक टायमिंग ओळखत त्यांना लुभावण्याचे प्रयत्न सुरु केले. यातूनच मग लाडावलेला हा नवदलित वेगवेगळ्या मागण्या मागत कर्जमाफी पर्यंत येऊन ठेपला. कर्जमाफीचा धिंगाना बरेच दिवस चालला शेवटी तो कसाबसा आवरला गेल्यावर आता या नवदलिताची विविध ठिकाणी नवी नाटकं सुरु झालीत, ती आपण बघतो आहेच. 
एवढं कमी की काय म्हणून शेतक-याला अन्नदाता म्हणून चण्याच्या झाडावर चढविणे सुरु झाले. सगळे लबाड हे विसरतात की शेती हा व्यवसाय असून अन्न पिकवून विकणारा शेतकरी व्यापारी असतो किंबहुना त्यांनी तसं वागायला हवं. एकदा शेतीला व्यापार म्हणून पाहणे सुरु झाले की नफ्या तोट्याची जबाबदारी स्वत:ची असते. ती जबाबदारी अंगावर घेण्याची परिपक्वता शेतक-यात कशी येईल याची काळजी घेणे खरी गरज आहे. तसे घडले की कोणतेही पीक घेतांना मार्केटचा विचार करुन तसा पीक घेणे सुरु होईल. प्रत्येक व्यवसायात शासनाचा रोल जरुर असतो पण आपल्या या अवस्थेला शासनच सर्वस्वी जबाबदार आहे ही भावना शेतक-यांच्या मनात रुजविणे कधीच हिताचे नाही. वरुन त्याला अन्नदाता असण्याचा नवा साक्षात्कार होऊ लागला की ते आजून आत्मघातकी ठरेल. शेती ही शुद्ध व्यापारी तत्वाकडे कशी वळेल हे शेतकरी नि शासन या दोघांनिही पाहायचं आहे. आज मात्र अगदी याच्या उलट होतांना दिसत आहे. शेतक-याच्या प्रत्येक –हासाला शासन जबाबर असल्याचं रंगवून शेतकरी नावाचा नवा ’बिचारा’ आपण जन्मास घालत आहोत. हा बिचार मग आपल्यावर अन्याय होत आहे या भावनेतून शासनाच्या विरोधात एकवट जात असून या एकवटण्याचा राजकीय़ उपयोग करण्यासाठी निघालेले तमाम राजकारणी शेतक-याचे फुकाचे लाड पुरवू लागले आहेत. त्यातूनच मग शेतकरी नावाचा नवा दलित उदयास येत असून त्याच्या मागण्या दिवसें दिवस वाढतच आहेत. या नवदलिताला जन्मास घालण्याचं पाप राजकारणी करत असून त्यामागील भुमिका शेतक-याचं हीत साधणे नसून हा मतांचा ओघ आपल्याकडे वळता करण्याची धूर्त चाल आहे. राजकरण्यांच्या या डावपेचातून जे काही निर्माण होते आहे ते एका टप्यावर समाजाला मारकच ठरणार आहे. आत्ताच या नवदलिताला रोखले नाही तर तो दिवसें दिवस अधिकाधिक मागण्या करत शासनाला जेरीस धरेल. एक दिवस हा नवदलीत त्याच्याच जिवावर उठेल ज्यांनी याला जन्मास घातलं. हे होऊ नये असे वाटत असल्यास या नवदलिताचे अवाजवी लाड करणे थांबले पाहिजे, एवढच!

-जयभीम

सोमवार, १२ मार्च, २०१८

शेतकरी मोर्चा- एक दोशद्रोही कट.Image result for kisana long march mumbaiसध्या नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहचला असून सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. कम्युनिस्टांची शेतकरी वींग म्हणजे "अखिल भारतीय किसान सभा". सध्या ती जवळवळ मृतावस्थेत पोहचली होती. पण शासनाच्या उदासीन धोरणानी तिच्यात परत जीव फुंकल्याचा हा पुरावा आहे. मागच्या अनेक दशकात ही किसान सभा नामशेष होताना दिसते. पण आता मात्र अचानक उसळी मारून मैदानात येण्यामागे या सभेचं वा कम्युनिस्टांची कर्तबगारी नसून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा हा परिणाम आहे.  विविध पक्षांनी मतांचं गणित पुढे ठेवून मोर्चाला चुचकारणे सुरु केले. यातील प्रत्येकच नेता व राजकारणी स्वत:च्या फायद्यासाठी किती टोकाचं ढोंग करु शकतो याचे एकसे एक नमुने इथे पाहायला मिळत आहेत. काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे वगैरे थेट शेतक-यांना भेटायला जाऊन आलेत. ही सगळी नौटंकी मीडियाही मोठ्या कौतुकाने दाखवत आहे. अगदी बोलीवूड स्टार्सही ट्वीटरवरुन शेतक-यांना पाठींबा दर्शविण्या पर्यंत या मोर्चाला ग्लॅमर मिळालय. बाकी इतर पक्ष तर सरळ लोटांगण घालून शेतकरी मोर्चाला पाठींबा ठोकून देत आहेत. हे सगळं ऐकतांना बरही वाटतं, पण या मोर्चाची एकूण बांधणी, त्याची प्रेरणा व त्याचं नेतृत्व कोणत्या विचारधारेतून होत आहे यावर कोणी बोलायचा तयार नाही. शेतक-यांचा मोर्चा निघणे हे कधीच आक्षेपार्ह होऊ शकत नाही. पण, एखाद्या देशविघातक संघटनेच्या प्रेरणेतून असा मोर्चा निघणे निक्कीच आक्षेपार्ह ठरते. या देशाचा कर्ताधर्ता शेतकरी असून त्याच्या मागणीला नक्कीच तमाम राज्यकर्त्यांनी झुकतं माप द्यायला हवं. पण शेतक-यांला या सर्वानी आतापर्यंत निव्वड फाट्यावर मारण्याचे काम केले. यातूनच मग एक देशद्रोही संघटना शेतक-यांच्या उपेक्षीत भावनेला हेरुन त्यांच्या भल्यासाठी उभं होत असल्याचा आव आणत शासनाच्या विरोधात शेतक-याला उभं करते. अन मग तमाम शेतकरी लाल फेटे बांधून लाल-सलामचा नारा देत आझाद मैदानाकडे झेपावतात. हा घोंघावता वादळ दारी धडकेस्तोवर सुस्तवाल असलेलं सरकार मग अचानक खळबडून जागं होतं नि मग काहितरी थातूरमातूर करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतो.
शेतकरी हा अन्नदाता असून त्याची काळजी घेणे शासनाची जबाबदारी असते. पण उद्योगपतींना बेल-आऊटच्या नावानी पैसे वाटणारं सरकार शेतक-यांच्या बाबतीत कायमच उदासीन राहीलं आहे. हे मी देवेंद्र फडणवीस सरकार बद्दल बोलत नसून जे जे सत्तेत होते त्यांच्या बद्दल बोलतोय. कारण सगळेच शेतक-यांच्या प्रश्नांवर उदासीन राहिले आहेत. या उदासीनतेचा परिपाक म्हणून शेतकरी अखेर लाल-द्रोहाच्या विचाराकडे लोटला गेला आहे. अन तो आता चक्क लाल-सलाम म्हणत आझाद मैदानापर्यंत झेपावला ही शासनासाठी शरमेची बाब आहेच, पण तमाम बुद्धीवादी नी देशभक्तांसाठी सुद्धा शरमेची बाब आहे. कारण लाल-सलाम हा शब्द उच्चारणे म्हणजे आपण देशाचा घात करण्याच्या दिशेनी चाललो याची कबुली देणे होय. दुर्दैवानी अजाणतेपणे शेतकरी आज ते करायला निघाला नि तमाम नौटंकीबाज नेते त्याला पाठींबा देण्याचं पाप करत आहेत. आज शेतकरी जर लाल-आगीत ओढल्या गेला वा ढकलल्या गेला तर याची तुलना मी चीनच्या माओवादी क्रांतीशी करतो. कारण ती क्रांती सुद्धा थोड्या फार फरकांनी अशाच पद्धतिने पेटविली गेली. 
चीनची लाल क्रांती काय होती?
पहिल्या कम्युनिस्ट क्रांतीचा जनक लेनीन यांनी १९१७ मध्ये रशियात लाल क्रांती घडवीत जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार स्थापण केले. कम्युनिस्ट सरकार म्हणजे काय? थोडक्यात बोलायचं तर हुकूमशाही... अशी हुकूमशाही जिथे एकच पक्ष असतो, त्यांचे पोलिटब्युरो (निवडणूकीत मत देण्याचा अधिकार असलेले पक्षाचे कार्यकर्ते) असतात. हा अधिकार इतर कोणत्याच नागरिकाला नसतो. सगळं हुकूमशाहाच्या मर्जीनुसार चालतं व सामान्य नागरीकाला कोणताच अधिकार नसतो. फक्त नि फक्त हुकूमशाहाच्या उदारतेवर नागरिकांचं जिवन मरण अवलंबून असतं. देशातील १००% गोष्टींवर या हुकूमशाहाचं १००% नियंत्रण म्हणजे कम्युनिस्ट शासन. तर अशा कम्युनिस्ट शासनाच्या स्थापनेत लेनीनच्या चळवळीचा साथिदार होता तिथला कामगार. लेनीनच्या चळवळीत रशियन शेतकरी कधीच नव्हता हे सर्वात महत्वाचं. लेनिननी शेतक-यांना शिव्या हासडत चळवळ दामटली होती. त्यानंतर हीच लाल चळवळ चीनमध्ये सुरु झाली. पण चीन हा शेतक-यांचा देश असल्यामुळे तिथे कामगारांची चळवळ शहरी वेस ओलांडून पलिकडे जातच नव्हती. मग अशावेळी शेतकरी कुटूंबातून माओ आला व त्यांनी शेतक-यांच्या अस्मितेचे मुद्दे हाती घेत चळवळ पेटवली. शेतकरी पेटतांना जे सुस्तवाल होऊन पडले होते त्यांना मग एके दिवशी ही शेतक-यांची लाल-चळवळ भस्म करुन गेली. अशा प्रकारे चीनमध्ये साम्यवादी चळवळ यशस्वी झाली. थोडक्यात चीनची लाल क्रांती कम्युनिस्टांनी शेतक-यांना हाताशी घेऊन घडविली. अगदी भारतातही सर्व प्रयत्न करुन हारलेले लाले आता शेतक-यांना हाताशी धरुन चळवळ पेटवायच्या दिशेनी पाऊल टाकत आहेत. हा देशासाठी सर्वात मोठा धोका असून वेळीच याचा बंदोबस्त नाही केला तर एक दिवस आपल्यालाही लाल आगीत भस्म व्हावे लागेल, एवढं नक्की. कोणी म्हणतील भारत खूप मोठा देश असून इथे ते शक्य नाही. पण रशीया व चीन भारतापेक्षा  आकाराने कित्येक पट मोठे होते... चीन तर लोकसंख्येनीही मोठा होता. आपला देश ३३ लाख चौरस किमी आहे तर चीन ९६ लाख चौरस किमी आहे. त्यामुळे गैरसमजात राहणे धोक्याचे आहे. लाल्यांना वेळीच आवरावे लागेल. 
लाल चळवळीचा बदलता पॅटर्न
मागच्या शंभर दिडशे वर्षात लाल चळवळीने इथे रुजण्यासाठी खूप झुंज दिली पण इथल्या भक्कम रुजलेल्या विविध विचारांनी तिला कायमच पिटाळले. पण मागच्या काही वर्षात शासनानी राबविलेलं शेतकरी विरोधी नि उदासीन धोरण यातून सामान्य माणसाच्या उरात एक विद्रोह धुसफुसत गेला नि मनातील या विद्रोहाला बरोबर हेरणारी लाल विचारधारा मोक्याच्या वेळी मैदानात उडी मारुन त्यातून लाल क्रांतीचा भडका उडवून देण्याच्या मनसुब्यांने जागोजागी आपले उपद्रव करत सुटली आहे. खरतर लाल विचारधारेला ना लोकशाही मान्य आहे ना व्यक्ती स्वातंत्र्य. पण या दोन्हींचा पूर्ण आव आणत या विविध विचारांच्या गोटात शिरून  लाल क्रांती आकारास येत आहे हे वास्तव आहे. ती पुरेसं बळ प्राप्त झाल्यावर जेंव्हा भडका उडवून देईल तेंव्हा मग कोणालाच तो भडका आवरता येणार नाही. याचा बंदोबस्त आत्ताच करणे आवश्यक आहे. थोडक्यात लाल क्रांती ही कामगारांची संघटना म्हणून बरेच वर्षे झीजून झाल्यावर आपला पॅटर्न बदल, ती आता शेतक-यांची अस्मिता नि प्रश्न पेटवायला निघाली आहे. एकदा ही आग पेटली की ती कोणाच्या बापाला आवरणार नाही व यातून लाल्यांचा स्वार्थ नि छुपा हेतू बरोबर साध्य होईल.
आंबेडकरी चळवळीतील घुसखोरी
या लाल चळवळीने आपला पॅटर्न बदलतांना सर्वात आधी आंबेडकर चळवळीत घुसखोरी केली. ही घुसखोरी करतांना त्यांनी बाबासाहेबांचं थोडसं गुणगाण करुन जयभीम म्हणत निळा झेंडा एका खांद्यावर घेतला तर दुस-या खांद्यावर लाल झेंडा घेतला. आंबेडकरी चळवळीतील मुर्खांना दुस-या खांद्यावरील लाल झेंड्याचा अर्थच कळला नाही.  हा हा म्हणता आज ही लाल चळवळ आंबेडकरी चळवळीत खोलवर रुजत असून तमाम आंबेडकरवाद्यांचा बुद्दीभेद करत आपले लाल विचार (जे देशद्रोहीच आहेत) रुजवणे सुर केले. जयभीमच्या जोडीने लाल सलाम ठोकून आंबेडकरी चळवळ दामटणे नव्याने सुरु झाले असून ही एका उदात्त चळवळीच्या पतनाची सुरुवात आहे. योग्य वेळ येताच हे लाले खांद्यावरचा निळा झेंडा भिरकावून लाल झेंडा उंचावणार ही काळ्य़ा दगडावरची रेघ आहे. पण ती वेळ येईल तेंव्हा सगळच हातून गेलेलं असेल.
थोडक्यात देशद्रोही कमुनिस्टांनी मार्क्स-लेनीन-माओ यांची लाल विचारधारा म्हणजेच हुकूमशाही रुजविण्यासाठी आधी कामगारांची चळवळ करुन पाहिली. ती फेल गेल्यावर, हळूच आंबेडकरी चळवळीत शिरून आपल्या विचारांचा नि चळवळीचा प्रसार सुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आंबेडकरी चळवळीतून बरोबर स्वार्थ साधले जात आहे. मग जोडीला आता शेतक-यांचा प्रश्न हाती घेऊन कम्युनिस्टांनी लाल विचाराच्या राक्षशी पंखाखाली भोळ्याभाबळ्या शेतक-यालाही घेणे सुरु केले. वरवर पाहता यात वाईट काहीच नाही असे जरी वाटले तरी कमुनिस्टांच्या पंखाखाली जाणारी प्रत्येक संघटना शेवटी कशी देशघातकी ठरते हे जगातील तमाम कम्युनिस्ट चळवळीवर नजर फिरविल्यास लक्षात येते. आज आमची आंबेडकरी चळवळ नि आता शेतकरी चळवळ कमुनिस्टांच्या कवेत जाताना दिसत आहे. कमुनिस्टांचे हात रक्तांनी माखलेले असून अख्या जगाला त्याची प्रचिती आली आहे. या अशा रक्तरंजीत विचारांच्या संघटनेला कवटाळून शासन विरोधी डरकाळी फोडणारा शेतकरी जरी त्याच्या प्रश्नांची नि समस्यांची यादी वाचत असला तरी लाल सलामच्या सोबतीने जी वाटचाल होणार आहे ती १००% देशद्रोहाच्या दिशेनी घेऊन जाणारी असून त्यात १% ही किंतू परंतूचा प्रश्न उरत नाही. त्यामुळे आज निघालेला शेतकरी मोर्चा हा वरवर जरी शेतक-यांच्या प्रश्नांसाठीचा वाटला तरी त्याचे खरे सुत्रधार लाले असल्यामुळे त्यातून निघणारा परिणाम हा निव्वड देशद्रोहीच राहणार आहे. हे शेतक-यांना कळण्याइतका त्यांचा अभ्यास नक्कीच नाही, पण इथल्या विचारवंत नि पत्रकार(फक्त अभ्यासू) यांना मात्र व्यवस्थीत माहीत आहे. थोडक्यात हा शेतकरी मोर्चा साध्या भोळ्या लोकांना हाताशी धरुन केलेला देशद्रोहाचा कट आहे, एवढेच!

-जयभीम