रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

कायदेभान: 509, डोळा मारणे गुन्हा.

सध्या मोलेस्टेशन व हरँशमेंट वरून तमाम स्त्रीया पेटून ऊठल्या आहेत. या सर्व बायका नोकरी धंदा करणा-या असून कधी ना कधी यांना विनयभंगाचा सामना करावा लागलेला आहे. पण तो करीयरचाअसा टप्पा असतो जिथे पंगा घेणे म्हणजे करिअर सुरू होण्या आधी संपण्याचीच शक्यता अधिक, म्हणून स्त्रीया हे सगळं मुकाट्यांनं सहन करून पुढे जात असतात. पण हे एकमेव कारण नसून त्यामागे कायद्याचं पुरेसं द्न्यान नसणे हे दुसरं कारण आहे. झालेला प्रकार पोलिसात नेल्यास न्याय मिळेलच याची खात्री नसणे वा आपलीच उलट तपासणी होऊन आगाऊपणाचा ठपका बसण्याच्या भितीपोटी बायका सगळं सहन करतात.
पण वास्तव अगदी वेगळं आहे. आपल्या कायद्यात स्त्रीयांना न्याय देण्यासाठी भरपूर तरतुदी आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी बायकांनी थोडसं धैर्य नि थोडसं कायद्याचं भान बाळगलं की काम फत्ते होऊ शकतं. मुळात आपल्याला ही भिती असते की माझी तक्रार नोंदविली जाईल का? कारण अधिकांश लोकांचा पोलिस स्टेशनचा अनुभव असाच असतो की तक्रार द्यायला आल्याचा पश्चाताप व्हावा या पध्दतीने पोलिस वागतात. मग लोकं पो.स्टे.ला जाणच टाळतात. मी पुढल्या लेखात त्यावर लिहेनच.
तर आपले कायदे स्त्रीयांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. विनयभंग व अपमान करणारी कोणतीही तक्रार केली गेल्यास पुरूषाला अद्दल घडविणा-या ढिगभर तरतूदी असून इथून सुटला तरी तिथे अडकेल याची पुर्ण सोय विविध कायद्यांमधून लावलेली आहे. ते वापरण्यासाठी थोडिसी हिंमत न नॉलेज असावं, एवढच.
वरील सेक्शन डोळा मारण्याशी संबंधीत आहे. नुसतं डोळाच नाही तर शिटी वाजवल्यामुळे  जर स्त्रीला अपमानीत व्हावं लागलं असेल तरी या तरतुदी अंतर्गत कारवाई केली जाते. आपण मात्र शिटी व डोळा मारणे शुल्लक गोष्टी समजून सोडून देतो. पण याची तक्रार दिल्यास कायदा मात्र आरोपीला सोडत नाही. तुम्ही तक्रार देऊन तर बघा, मग कळेल की आरोपिची कशी वाट लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा