मंगळवार, २१ मे, २०१९

वाळु माफिया

सध्या कोर्टाला सुट्या असल्यामुळे मस्त खाणे, झोपणे अन फेबूवर टिपी करणे सुरू आहे. परंतू काल सायंकाळी एक क्लायंट आला. त्याचा रेती(वाळु)चा धंदा आहे. म्हटलं काय झालं? तर तो सांगू लागला..."सायेब माझ्याकडे दोन टँक्टर्स आहेत. पावसाळा व चुरणी असते तोवर 8 महिने कमाई असते पण हे चार महिने काम मिळत नाही. मग मी वाळुचा धंदा करतो. पण पोलिसांचा खूप त्रास आहे. तसेच पटवारी व रेव्हेन्यूवाल्यांचा पण त्रास आहे. काही दिवसा आधी पटवा-यानी ट्रक्टर जप्ती करून नेली. आता पोलिसांनी दुसरी ट्रक्टर नेली. पोलिस माझ्या मागावर असून मी आठवडाभर झाला लपतोय" वगैरे स्टोअरी सांगितली. मी सगळी केस ऐकल्यावर सगळ्यात आधी पोलिस इन्स्पेक्टरला भेटायचं ठरवलं. क्लायंटला म्हटलं तु आजून दोन दिवस भुमिगत रहा मी तुझी बेल करतो. 

आज P.I. ला भेटायला गेलो. नागपूर पासून ते पोलिस स्टेशन 65 किमी दूर आहे. P.I.ला भेटलो तर त्याचं स्टोअरीचं वर्जन अगदी उलट होतं. वाळुमाफीयाची दागागिरी कशी असते, ते कसे पोलिसांच्या अंगावर धावतात, वाळु तस्करांवर कारवाई करतांना आम्हाला खूप रिस्क उचलावि लागते, हे खूप खतरनाक असतात. मी प्रामाणिकपणे वाळु तस्करी रोकण्याचा प्रयत्न व त्या अनुषंगाने कारवाई करतो वगैरे P.I. नी दुखडा ऐकवला. ते ऐकल्यावर मला पोलिसांची बाजू योग्य वाटली. शेवटी महत्वाचं काय ते बोलून बाहेर पडलो.
 
परंतू वाटेत बरेच वाळुचे ट्रक्टर सर्रास जाताना दिसले. क्लायंटचा भाऊ सोबतच होता. म्हटलं यांना का नाही धरत पोलिस? त्यावर तो म्हणला "साहेब, या आधीचा P.I. महिना रू 5000/- प्रति ट्रक्टर, प्रति महिना घ्यायचा. हा नविन P.I. रू. 20,000/- प्रति ट्रक्टर मागतोय. आम्हाला तेवढा हप्ता परवडत नाही जरा कमी करा म्हणून बोलणी केली पण हा ऐकायला तयार नाही. ज्यांनी रू 20,000/- चा हप्ता पोहचविला त्यांचे ट्रक्टर्स चालू आहेत अन आमच्यावर मात्र कारवाई सुरू आहे. रेव्हेन्यु वाल्यांचा हप्ता वेगळा, पोलिसांचा वेगळा, गाडीचा EMI वगैरे सगळं पाहता एवढा हप्ता द्यायचा तर कामही तेवढे मिळायला पाहिजे. पोलिसांना या सगळ्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना वाढीव हप्ता पाहिजे असतो, बास.
 
त्यातूनच मग एखादा कोणीतरी पोलिस व पटवा-यांशी मारामारीवर उतरतो. यामागे दादागिरी प्रकार नसून बरेचवेळा पोलिस व पटवा-यांचा अती लोभ कारणीभूत असतो. वगैरे वगैरे तो सांगत होता व मी ऐकत होतो. आज मला वाळु तस्करीचं पडद्या मागील गणित नेमकं काय असतं ते कळलं. या वाळु तस्करांना ऊभं करण्याचं काम पोलिस व पटवारीच करत असतात. मग हप्त्याची रक्कम वाढत गेली की एका टप्यावर यांचं भांडण होतं. मग कोणीतरी एखादा टोकाला जातो व त्यातून मग गाडी आंगावर घालेस्तोवर प्रकरण जाते. नेमकी ही घटना पेपरात येते व वाळु माफीयाला झोडपले जाते. पण त्याला ऊभा करणारा पोलिस व पटवारी हे मात्र निर्दोष व बिचारे म्हणून प्रोजोक्ट केले जातात.

वाळु माफिया बदमाश आहेत हे खरच आहे, पण त्याना ऊभं करणारे रिश्वतखोर पोलिस व पटवारी हे ही तेवढेच दोषी आहेत.

शुक्रवार, १७ मे, २०१९

गोडसे टेररिस्ट नाही, फक्त खुनी, तरी देशभक्तच!


सध्या नाथुराम गोडसे वरुन रान पेटले आहे. साध्वी प्रज्ञानी गोडसेला देशभक्त काय म्ह्टले सगळे पेटून उठले नि गोडसे आतंकवादी होता म्हणून बोंबा मारणे सुरु झाले. पण खरच आतंकवादी कोणाला म्हणतात, त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे? त्याच्या व्याख्या कुठे आहेत? मग त्या व्याख्येप्रमाणे गोडसे टेररिस्ट ठरतो का? हे कोणीच तपासून पाहायला तयार नाही. सगळ्या पुरोगामिंचा एकच हट्ट दिसतोय, आम्ही म्हणतोय ना की गोडसे टेररिस्ट होता... म्हणजे तो होताच, बास! तर असं न करता आपण जरा खोलात जाऊन तपासू या की कायद्याच्या कसोटीवर कोणाला टेररिस्ट म्हटले जाते.

TERRORISM
Terrorism हा शब्द फ्रेन्च शब्द Terrorisme पासून आला. तसा हा शब्दही मुळचा फ्रेंच शब्द नसून तो लॅटीन शबद Terrere (ज्याचा अर्थ ’थरकाप’ होतो) मधुन आला. फ्रेंच राज्यक्रांतीच्यावेळी Jacobin Club नी  सत्ता ताब्यात घेतली व हजारो निरपराधांची हत्या केली गेली. त्यातून देशात जो हाहाकार उडला त्याला संबोधण्यासाठी हा शब्द वापरला होता. फ्रेंच  राज्यक्रांतीचा सन १७९२ ते १७९४ चा काळ हा Reign of Terror म्हणून ओळखला जातो. पण नंतर Jacobin Club च्या हातून सत्त्त गेली व पुढे Terrorist हा शब्द सत्तेचा दुरुपयोग या अर्थाने वापरला गेला. पण मधल्या जवळ जवळ २०० वर्षाच्या काळात या शब्दाच अर्थ बदलून गेला व त्याचा आजचा नविन अर्थ Killing of innocent people by a private group to create a threat” असा होत पुढे UN च्या सेक्युरिटी कोऊन्सीलने An act intended to cause death or serious bodily harm to civilians or non-combatants with the purpose of intimidating a population or compelling a Government to do or abstain from doing any act”  असा केला.
थोडक्यात सामान्य लोकांना जिवे मारणे किंवा त्यांच्यात भिती पैदा होईल असे विघातक कृत्य करणे व त्यातून शासनाला एखादे कार्य करण्यास रोखणे वा एखादे कार्य करण्यास बाध्य करणे अशा कृत्यास टेररिस्ट म्हणजेच आतंकी कृत्य असे म्हटले जाईल. तर ही झाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिभाषा.

आतंक विरोधी विविध कायदे
आपल्या देशात १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्या पासून वेगवेगळे आतंकवादी होत गेले व त्यांना रोखण्य़ासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. परंतू सगळेच कायदे उपयोगाचे ठरले नाही व काहिंचा फायद्या पेक्षा उलट सामान्य लोकांना त्रासच झाला मग त्यातले काही कायदे रेपिल केले गेले. आतंकी कारवायाना रोखण्यासाठी आजवर आलेल्या कायद्यांची सुरुवात होते ती म्हणजे 1) The Unlawful Activities (Prevention) Act-1967.  या कायद्यापासून. पुढे तो कायद्या अपुरा पडतोय हे लक्षात आल्यावर  2) Terrorist And Disruptive Activities (Prevention) Act-1987 (TADA) हा कायदा करण्यात आला. परंतू टाडातून आतंक आवरण्यापेक्षा पिलिसांचाच अतिरेकिपणा वाढताना दिसला. मग आला 3) The Maharashtra Control of Organised Crime Act-1999 (MCOCA), आणि त्या नंतर आला 4) Prevention of Terrorist Act-2002(POTA) असे वेगवेगळे कायदे आणले गेले. परंतू यातल्या काही कायद्यांचा पोलिस लोकांनी खूप गैर वापर केल्याचे सिध्द झाले व त्यातून मीडियानी रान पेटविले. या सगळ्याचा परिणाम म्हणून TADA आणि POTA हे कायदे रद्द करण्यात आले. परंतू टेररिस्ट कृत्ये मात्र वाढतच गेले. त्यावर उपाय म्हणून UAPA ला २००४ मध्ये अमेंड केले गेले व त्यात नव्या तरतुदी घालून टेररिस्ट कृत्यावर लगाम लावण्याचे काम झाले.

Section-15 of UAPA
टेररिस्ट म्हणजे काय किंवा कोणत्या कृत्याला टेररिस्ट कृत्य म्हणावे याचा घोळ होऊ नये म्हणून युएपिए कायद्याच्या सेक्शन १५ मध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात त्याचा अर्थ कोडीफाईड करण्यात आला आहे तो असा आहे... “Whoever does any act with intent to threaten or likely to threaten the unity, integrity, security or sovereignty of India or with intent to strike terror or likely to strike terror in the people or any section of people in India or in any foreign country. तर ही झाली टेररिस्टची व्याख्या.

नाथुराम गोडसे फक्त खुनी
आता प्रश्न पडतो तो म्हणजे नाथुराम गोडसे टेररिस्टच्या व्याख्येत बसतो का? अजिबात नाही. कारण गोडसेनी गांधीला गोळी घातली त्यातून ना युनिटीला थ्रेट होता, ना इन्टिग्रिटीला, ना सेक्युरिटीला ना सोव्हरेनिटीला थ्रेट होता. गोडसेचं गणित अगदी साधं सोपं होतं की “गांधीजी, तुम्ही देशाची फाडणी केलात व एक शत्रू देश आमच्या उरावर उभं करुन ठेवलात त्यामुळे तुम्ही आता देवाघरी चालते व्हा. ईथे आजून तुमचा उपद्रव नको व आजून एक फाळणी नको वा आजून दंगे व जळपोळी नको” असा त्याचा अर्थ होता. त्याहीपुढे जाऊन गोडसेच्या कृत्याचं कायद्याच्या निकषावर दुसरं एक इन्टरप्रिटेशन निघतं ते म्हणजे “खूप झाली तुमची उदारता नि मुस्लीम प्रेम, देशाची फाडणी करुन तुम्ही आमचं प्रचंड नुकसान केलात, ही घ्या त्याची शिक्षा अन मुक्त व्हा” तर गोडसेच्या कृत्याचे असे दोन इन्टरप्रिटेशन निघतात. परंतू वरिल कृत्यातून कोणत्याही प्रकारचा सामाजिक आतंक किंवा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होणारं इन्टरप्रिटेशन निघत नाही. त्यामुळे नाथुराम गोडसेचं कृत्य हे सेक्शन १५ च्या तरतूदीला धरुन आतंकवादी(टेररिस्ट) कृत्य असा अर्थ काढता येत नाही.
नाथुरामचं कृत्य हे निव्वड एका खास व्यक्तिबद्दल असलेला खुन्नस व त्यातून नियोजनबद्द पद्धतिने केलेला खून एवढाच त्याचा अर्थ निघतो व त्यासाठी आपल्या कायद्यात IPC – 302 कलम लागू पडतो. या सेक्शनच्या अंतर्गत खुनाचा गुन्हा व त्यानुसार असलेली शिक्षा नाथुराम गोडसेला देण्यात आली. गोडसेच्या कृत्यातून कोणत्याही प्रकारचा Threat to National Security, Threat to Society, Threat to Sovereignty of Nation निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे नाथुराम गोडसेला टेररिस्ट म्हणता येणार नाही. तो खुनी होता व खुनी म्हणता येईल.    

 नाथुराम गोडसे देशभक्त
तर आता प्रश्न उरतो की नाथुराम आतंकी नव्हता एवढं ठिक आहे, पण तो देशभक्त होता असं जे म्हटलं गेलं त्याचं काय? कारण तो गांधीना मारतो हे कृत्य देशद्रोही ठरविण्यासाठी पुरेसं आहे असा मीडियातून व पुरोगामी विचारातून केलेला प्रचार लोकांच्या गळी वर्षोन वर्षे उतरविण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना वाटते की खुनाचा आरोप म्हणजे देशद्रोह सुद्धा होतोच. पण तसं होत नाही. किंबहुना कायदा तरी तसं मानत नाही. कारण गांधीचा खुन करणे म्हणजे देशाच्या विरोधात उठाव केला किंवा सार्वभौमत्वाला धोका निर्माण केला असं काही होत नाही. त्याच बरोबर नॅशनल सेक्युरिटीला धोका निर्माण केला असही होत नाही. याचं आजून खोलात जाऊन सखोल विवेचन करायचं म्हटल्यास असं दिसतं की गांधीजी काही शासन दरबारी अतिउच्चा पदावर असलेले इसमही नव्हते की ज्यामुळे शासकीय पदावर असलेल्या व्यक्तिचा खून करुन देशात दहशत निर्माण करण्यात आली वगैरे आरोपही टिकत नाही. 
एकूण काय तर गांधिजीं एक व्यक्ती होते व त्यांच्या एकूण कृत्याचा राग म्हणून गोडसेनी गांधीना मारलं. म्हणजे गोडसेचा अपराध हा ३०२ च्या अंतर्गत येतो. म्हणजेच गोडसे हा खुनी ठरतो. पण खुनाचा गुन्हा करणे म्हणजे देशभक्त नसणे असं होत नाही. या देशात १०-१२ खुन करणारेही आरोपी आहेत व ते फक्त खुनी म्हणून संबोधले जातात. खुन केल्याने त्या माणसातील देशभक्ती Disputed होत नसते. खुनाचं कारण हे वैयक्तीक असेल व त्यातून सार्वभौमत्वाला धोका निर्माण होत नसेल तोवर अशा खुन्याची देशभक्ती Undisputed  राहते. गोडसेची देशभक्तीही अबाधीत राहते. कारण त्याच्या खुनाचा हेतू हा देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जाणारा नव्हता. म्हणून गोडसे हा जरी गांधीचा खुनी असला तरी तो देशभक्त होताच. 
आता कोणी म्हणेल की गोडसे देशभक्त होता हे कशावरुन म्हणता? याचं उत्तर सोपं आहे. जोवर एखाद्या भारतीयाच्या कृत्यातुन त्याची देशभक्ती Questionable होत नाही, तोवर तो देशभक्तच मानल्या जातो. मग देशभक्ती Questionable कधी होते? तर ती तेंव्हाच Questionable/disputed होते जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्या कृत्यातून देशाच्या सार्वभौमत्वा धोका निर्माण करतो, देशाच्या सेक्युरिटीला धोका निर्माण करतो, देशाच्या विरोधात युद्ध पुकारतो किंवा शत्रू राष्ट्राशी हात मिळविणी करुन देशाच्या विरोधात काही कट कारस्थान आखतो. गोडसेनी यातलं काहीच केलं नाही. त्यामुळे गोडसेचं वागणं व देशभक्ती Questionable होत नाही. जर ती तशी नाही तर मग गोडसे हा देशभक्तच. बाकी कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या.  

त्यामुळे कोणी किती बोंबा मारल्या तरी गोडसे हा फक्त खुनी होता, तरी तो देशभक्तच होता, बास!