गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

कोण म्हणतं अन्नाला धर्म नसतो?

सध्या झोमँटोचं मुस्लिम डिलीव्हरी बॉय प्रकरण ट्रेंड करतय. एका ग्राहकांनी जेवण मागवलं नि ते मुस्लिम डिलिव्हरी बॉयनी आणल्यामुळे त्या ग्राहकांनी ते अन्न नाकारलं. सणासुधीचा काळ असल्यामुळे ते चालणार नाही असा ग्राहकाचा युक्तीवाद आहे. ईथल्या प्रथा, सणवार, रोजे व ईद, जैन समाजांचे उपवासं व नवरात्री वगैर या सगळ्या सणांचं तटस्थ विवेचन केल्यास प्रत्येकच समाज आपली धार्मीकता अन्ना पर्यंत घसरवित नेतो हे वास्तव आहे. म्हणजे इतर वेळी नॉनवेजवर ताव मारणारे हिंदू नवरात्रीत चक्क त्याच अन्नाला वर्ज मानतात. त्यात आजून कोणतं साईंटीफिक कारण नसत तर शुद्ध धार्मीक निकषावर ते ठरतं. आमच्या महाराष्ट्रातही श्रावण लागला की धार्माचे नियम असे काही बदलतात की त्याचा पहिला वार अनेक प्रकारच्या अन्नावर होतो व अन्नाचे बरेचसे प्रकार त्या काळासाठी अस्पृश्य होऊन बसतात. थोडक्यात अन्नाला कितीही नाही म्हटलं तरी जातीची किनार देऊन बाद करण्य़ाची प्रथा इथे आहेत. मग ती नाकारण्याचं काहीच कारण नाही. अगदी या सगळ्या पार्श्वभूमीवरच एका ग्राहकाने मुस्लीम माणसाने आणलेलं अन्न नाकारलं. वरून या ग्राहकांनी पैसे पण परत करू नका असं झेमँटोला कळवलं.
यावर झोमँटोनी "अन्नाला धर्म नसतो, तर अन्नच धर्म असतो" असं उत्तर दिलं जे लॉजिकल वाटतं. पण हे वास्तव आहे का? अजिबात नाही.

हलाल केलेलं चिकन
वरील प्रकरण हिंदूवर शेकायचं आहे म्हणून सगळ्यांनी झोमॅटोची बाजू घेऊन नेटवर शिमगा सुरु केला. हे नेहमीच्या पॅटर्नला धरुनच आहे. हिंदूला बडवायची संधी आली की सगळे विद्वान बनून ढोल बडवायला लागतात. अन त्यातल्या त्यात पिडित जर मुसलमान असेल तर मग या विद्वानांना अधिकच चेव चढतो. पण याच निकषावर मुसलमानाला बडवायची वेळ आली की हे सगळे विद्वान पसार होतात. मी झोमॅटोला म्हणतो की तुम्ही एखाद्या मुसलमानाला बिना 'हलाल' चं मटन द्या अन वरिल डॉयलॉग मारा की "बाबारे अन्नाला धर्म वगैरे काही नस्तो, तू बिना हलालचं मटन जे हिंदूच्या हॉटेलातून आणलय, तू खाऊन घे". मग कळेल अन्नाला धर्म असतो की नाही. अगदी नॅशनल मीडिया सुद्धा गळा फाटेस्तोवर ओरडेल की एक मुसलमानाला बिना हलालचं मटन डिलिव्हरी केलच कसं म्हणून.  

आपल्या देशात माणूस हा धर्माच्या पिडित आहेत परंतू अन्नही आहे हे वास्तव आहे. सगळ्याच धर्मांनी ईथे अन्नावर त्यांच्या सोयीनी अस्पृश्यता लादली आहे. इथला ख्रिश्चन व इतर समाज डुक्कर खातो परंतू मुसलमान डुक्कर खात नाही. कारण त्याचं धर्म त्याला ते खाण्यास मनाई करतं. हिंदू  गाय खात नाही कारण त्याचा धर्म ते खण्यास मनाई करतं. थोडक्यात धर्मांनी अन्नाला अस्पृश्य बनवून टाकलं नि आपण ते पाळतोच आहे. किंबहूना मुसलमानानी गाय खायलाच पाहिजे. ती खाणेच त्याचा धर्म आहे असा पण एक पायंडा पाडून ठेवला गेलाय. म्हणजे अन्नाला धर्म आहेच.  तर ही सगळी पार्श्वभूमी पाहता नि  सणासुधीचा काळ पाहता ग्राहकाच्या मागणीचं धार्मिक निकषावर भान ठेवायला हवं. नाहीतर मग मुसलमानांचं 'हलाल' वालं लाड पुरविणंही बंद करा. "ईथे हलाल मिळेल" अशा पाट्या जागोजागी लागलेल्या असतात. या पाट्या मुसलमान अन्नाचं उदारिकरण आहेत.  या असल्या पाट्या तुरंत हटवा जे अन्नाला धार्मिक बनवतात. एवढच नाही तर हलालचं मटन हिंदूना खायला दिलं जातं जेंव्हा की ती कधीच हिंदूंची डिमांड नसते. कोणत्याही चिकन शॉपमध्ये जा.... चिकनचं हलाल करतात व ते हिंदुना दिलं जातं. का? तर बहुतांश चिकनवाले मुसलमान असतात व ते हा प्रताप करतात. तेंव्हा मात्र को. णी म्हणत नाही की हे असं का? मी स्वत:चं उदा. सांगतो. जिकडे कुठे चिकन घ्यायला जा, बहुतांश दुकानं मुसलमानांची असतात. त्यांना जर म्हटलं की मला अर्धा किलो चिकन दे जे हलालच नाही. ते स्पष्ट नाकारतात. एक तर अख्खी कोंबळी न्या म्हणतात किंवा हलालचं चिकन घेउन जा म्हणतात. खरंतर दुकानदार म्हणून चिकन सेंटर मध्ये मुसलमानांची मक्तेदारी आहे, हिंदू दुकानदार तुलनेने कमी आहेत. याचा फायदा घेऊन ही लोकं माझ्या सारख्या ग्राहकावर बळजबरीने हलालचं चिकन लादतात तेंव्हा आम्ही कुठे जायचं. हे अन्नाचं धार्मिकीकरण नाही का? पण यावर कोणी बोलत नाही.
ईथे मात्र झोमँटो अक्कल शिकवून जाते ही बाब हिंदूना एकवटायला हातभार लावणारी आहे. अशाच लहान सहान गोष्टींतून एखादी विचारधारा टोकदार होत जाते. अन्नाच्या बाबतीत मुसलमानांचे लाड होतात.  नि तिच डिमांड हिंदूनी केली की लगेच अन्नाला धर्म नसल्याचा साक्षात्कार होतो ही लबाडी आहे.
अन्नालाही धर्म असतो व ते 100% पाळलं जातय मुसलमानांकडून. ज्यांना डोळे, कान, मेंदू झाकायची सवय आहे त्यांनी झाकावं. पण हेच वास्तव आहे.

Process & Delivery
यावर कोणितरी हा युक्तीवाद करेल की हलाल व डिलिव्हरी बॉय या गोष्टींची तुलना करता येणार नाही. कारण  एक प्रक्रीया(हलाल) आहे तर दुसरी सेवा(डिलिव्हरी) आहे. त्यांची तुलना करणे चुकतं. पण मी म्हणतो की सेवा अन्नाला डिफाईन करु शकत नाही. तसेच प्रक्रियाही अन्नाला डिफाईन करु शकत नाही असा साधा सुधा तर्क नि युक्तीवाद आहे. मुळात अन्नाला धर्माचं निकष लावूच नका. जर एका ठिकाणी तो लावत असाल तर दुस-या ठिकाणी टाळता येणार नाही. एवढच!

-ऍड. एम.डी. रामटेके