गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार हटाव, राष्ट्रवादी बचाव.


Image result for शरद पवारसध्या शरद पवार अभी तो मै जंवा हू म्हणत  प्रचारात धावत आहेत. त्यांनी  राजकीय दौरे करण्याचा सपाटा लावला आहे ते स्तुत्य आहे परंतू वास्तवाला धरुन नाही.  कारण बुजुर्ग माणूस जो आता घरी बसून आराम करत पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याच्या अवस्थेला जाऊन पोहचलाय त्यांनी स्वत:च मैदानात उडी घेणे दोन गोष्टी अधोरेखीत करते. एक म्हणजे या बुजुर्गाला सत्तेचा मोह सुटत नाही किंवा दुसरा अर्थ म्हणजे आपल्या घरात उभं केलेलं साम्राज्य चालविण्याच्या लायकीचा कोणी वारस नाही. पवारांच्या बाबतीत दुसरी शक्यता मोडीत निघते कारण त्यांचा वारसा चालवायला दुसरी पिढी सज्जही आहे नि त्यांच्यात कुवतही आहे. एवढच काय तर आता तिसरी पिढीही मैदानात उतरत आहे. त्यामुळे ८० वर्षाकडे झुकलेल्या बुजुर्ग माणसाला ’अभी तो मै जवां हू’ म्हणण्याची काहीच गरज नाही. परंतू ते तसं करत आहेत. याचा एकच अर्थ निघतो तो म्हणजे शरद पवार साहेब (ज्यांना मी लहानपणा पासून आदर्श नेता मानत आलोय) यांना सत्तेची लालसा काही सुटेना. अगदी अंगात बळ नसतांनाही उसने अवसान आणून जे काही चाचलं आहे त्यामागे एकच उद्देश दिसतो तो म्हणजे आपण उभं केलेलं साम्राज्य सध्याच्या पिढीकडे सुपुर्द करण्याची त्यांची ईच्छा नाही. म्हणजेच राष्ट्रवादीची कमान अजितदादा यांच्याकडे जावं हे थोरल्या पवारांना मान्य नाही.


खरंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष पवारांनी जिवाचं रान करुन उभं केलं त्यामुळे त्या पक्षाचं काय करायचं हे त्यांनीच ठरवावं. परंतू अजितदादा व इतर लोकांनी सुद्धा हा पक्ष बांधताना उभी हयात घालविली आहे. दादा तेंव्हा  तिशीत होते ते आता साठीचे झालेत. म्हणजे शरद पवार साहेबांचा हा पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविण्याच्या कामात अजित दादांचाही तेवढाच हातभार लागला आहे. आता निसर्ग नियमाप्रमाणे मोठे साहेब थकले आहेत व ८० कडे झुकले आहेत तेंव्हा एकूण परिस्थिती नि वयाचं भान ठेवत त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतिने हा वारसा दुस-यापिढीकडे हस्तांतरीत करायला हवं होतं. पण ते तसं करतांना दिसत नाहीत. बरं सुप्रिया सुळेकडे सुपुर्द करावा तर ताईची कुवत दादाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. अन चुकून माकून ताईच्या हाती डोर सोपविलीच तर मग दादा गटाचा जो बंड उसळेल तो राष्ट्रवादीला घेऊन बुडणार. अन याची जाण असल्यामुळे पवार साहेब ताईला पुढे करत नाहीयेत. या सगळ्य़ाचा एकूण परिणाम म्हणून दादाची कर्तबगारी  राजकीय़ पटलावर जेवढी ठसठशीत उमटायला हवी ती उमटली जात नाही. मग इतर नेत्यांना थोरल्या पवारांच्या मागे धावावं लागतं. अन थोरल्या पवारांनी कितीही आव आणला तरी ते आता पक्षाचे आऊटगोईंग सदस्य आहेत. ही आऊटगोईंग त्यानी स्वत: स्विकारावी.... न स्विकारल्यास  वेळ त्यांची आऊटगोईंग घडवून आणेल.  थोरले पवार जेवढा काळ पक्ष्याची धुरा स्वताकडे ठेवतील तेवढीच पक्षाची हालत खस्ता होत जाणार. कारण नव्या पिढीला आस्वस्त करण्यासाठी ८० चा पुढारी नको तर तरुण नेतृत्व हवं असतं. हे वास्तव नाकारुन साहेबांची जी मार्केटींग केली जाते की ते तरुणाना भुरळ घालत आहेत. अगदी हीच मार्केटींग पक्षाला मारक ठरत आहे. परंतू त्या बद्दल आजूण कोणी खुलून बोलायला तयार नाही. 

परंतू आता आठवड्याभरातच निवडणूका उरकुन निकाल लागतील. एकदा का हे निकाल लागले नि भाजप-सेना जर सत्तेत आली (ज्याची ९५% शक्यता आहे) की मग आयुष्यभर रक्त झिजविलेले राष्ट्रवादीचे नेते  अस्वस्थ होतील.  जे आज थोरल्या पवारांना तरुण म्हणून प्रोजेक्ट करत हिंडताहेत त्यांची कुरबुर सुरु होईल. दादांनी पक्षाचं नेतृत्व करावं  ही डिमांड पुढे येईल. कारण ज्यांनी पक्षासाठी हयात झोकून दिली ते एका  रेषेच्या पलिकडे थोरल्या पवारांपुढे गप्प बसणार नाहीत. सुखासुखी जर नेतृत्व बदल घडला तर ठीक. नाही घडलं तर मग अजितदादांना त्यांचे कार्यकर्ते गप्प बसू देणार नाहीत. एक तर ते राष्ट्रवादी सोडून जातील किंवा दादांना पक्षाची कमान हाती घ्यायला भाग पाडतील. यामागे सत्तेची लालसा नसून एक नैसर्गिक व्यवहार असेल. थोरल्यांनी नवे वारस नेमायचे असतात व आपण वयामानाने बाजूला होऊन मार्गदर्शन करायचं असतं. जिथे हा संकेत पाळला नाही गेला तिथे नव्या पिढीनी बंड करुन कमान हाती घेतली असा इतिहास आहे. फार जुन्या काळात जायची गरज नाही. अगदी मुलायम सिंग यांचा मुलगा अखिलेशचेच उदा. घ्या. बापानी पक्षाची डोर सोडायची तयारी दाखविली नाही तेंव्हा अखिलेशनी नव्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष हाती घेतला. कमीतकमी पवार साहेबांवर अशी वेळ येऊ नये, एवढी सुझबुझ त्यांनी दाखवावी म्हणजे झालं. 

आता आजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षाचे कर्ते धर्ते पवार साहेब आहेत. त्यांनी जावं हे सांगणारे तुम्ही कोण?  परंतू ही लोकशाही आहे व राष्ट्रवादी पक्ष हा लोकशाहीचा भाग नि संविधानाची तरतूद म्हणून उदयास आला आहे. राजकीय पक्ष कोणाच्या मालकिचा नसतो. जे कार्यकर्ते त्या पक्षात काम करतात त्यांचा असतो. राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हेच त्या पक्षाचे मालक असून त्यांच्या मतदानातून पवार साहेब अध्यक्षस्थानी आहेत. अन आता साहेबांची पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. तरी नाही सोडलं तर हेच मतदार पवार साहेबांना पदावरुन खाली खेचून अजित दादांना खुर्चीवर बसवतील. कारण कार्यकर्ता जेवढा तुमचा भक्त असतो तेवढाच तो व्यवहारी सुद्धा असतो. साहेबांना अध्यक्षस्थानी बसवून आपलं भविष्य उध्वस्थ होतय हे लक्षात आल्यावर हाच कार्यकर्ता आपल्याच भाग्यविध्यात्याला, अन्नदात्याला खाली खेचतो. त्याला पवार साहेबही अपवाद नसणार.  

म्हणून म्हणतो, राष्ट्रवादी वाचवायची असेल तर शरद पवारांना हटावच लागेल. अन नाही हटले तर हटविले जातील, एवढं नक्की!

येणारा काळ राष्ट्रवादीचाच!

सध्या निवडणूकिची धामधूम असून भाजप सोडलं की इतर सगळ्या पक्षांमध्ये सामसूम दिसते. मोदी लाट जी २०१४ उसळली ती २०१९ पर्यंत तग धरुन राहिली व मोदी परत एकदा केंद्राच्या सत्तेत बसले. खर तर मोदी हा माणूस कर्तबगार आहे यात वादच नाही परंतू निव्वड त्याच्या कर्तबगारितून हे यश येतय असं नाही तर त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभं करण्यात विरोधक कमी पडल्यामुळे मोदीची कर्तबगारी अधीक ठसठशीत उमटत गेली हे वास्तव  आहे. तर हे झालं लोकसभेचं. हीच गत विधानसभेतही आहे. जसं मोदी तसच ईकडे फडणवीस. हा माणूस सेनेची भुणभुण पाच वर्षे झेलतो हीच त्याच्या कर्तबगारीची पोचपावती. जोडीला निष्कलंक राजकारणी ही जमेची बाजू आहेच. वरुन ब्राह्मणीसंयम ही उपजत देण ज्यामुळे विरोधकाना न दुखवता हवं ते करत पुढे जाण्याचं कसब रक्तातच.   त्याच बळावर त्यांनी सेनेचा विरोध थोपवून लावत हवं ते करुन घेतलं.  प्राप्त परिस्थितीत यातली प्रत्येक गोष्ट नितांत गरजेची असून त्याचा कम्प्लीट पॅकेज म्हणजे फडणवीस. 

सध्या महाराष्ट्रात भाजपची हवा नक्कीच आहे हे आधी मान्य करावं लागेल. परंतू विरोधी गोटात तुल्यबळ नेता नसल्याने केंद्रात जी अवस्था झाली  ती महाराष्टात तर नक्कीच नाही. किंबहूना फडणवीसांना पुरुन उरतील असे नेते महाराष्ट्रात आहेत. त्यातले सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे अजितदादा पवार. त्यांच्या टीम मधील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी अशा एकसे बढकर एक तोफा राष्ट्रवादीच्या दिमतीला आहेत. तरी राष्ट्रवादीत जी गळती सुरु आहे ती आहेच. अगदी उदयनराजे पासून तर घरचे नातेवाई भाजपत गेलेत. यातली काही सत्तेच्या हव्यासापोटी गेले असतील तर नवल नाही परंतू राष्ट्रवादी पक्षाला राजकीय भविष्य नाही असं वाटल्यामुळे जर गेले असतील तर बाब चिंतनीय आहे. कारण फडणवीसांना पुरुन उरेल असं नेतृत्व  राष्ट्रवादीत असतांना जर पुढा-यांना राष्ट्रवादीत भविष्य दिसत नसेल तर हा जाणा-यां पुढा-यांपेक्षा राष्ट्रवादीचा पक्ष म्हणून पराजय आहे. कारण पक्षाला भविष्य आहे पण ते दिसावं अशी मार्केटींग राष्ट्रवादिनी करायची होती व ती केली गेली नाही असा त्याचा अर्थ निघतो. 

या निवडणुकीत जो काही घोळ होतोय तो होऊ द्या. सध्याचा मतदार हा भाजपच्या बाजूनी झुकलेला आहे हे वास्तव आहे. अन आपण कितीही जोर लावला तरी या अत्यल्प कालावधीत तो परत राष्ट्रवादीच्या बाजुनी येईल ते शक्य दिसत नाही. त्यामुळे परत एकदा भाजपची टर्म येईल हे जवळजवळ स्पष्टच दिसतय. परंतू तसं असलं तरी येणा-या काळात शासन पातळीवर जनमानसात भाजपच्या विरोधात लोकांच्या मनात खदखद निर्माण होणार हे निर्विवाद आहे. त्या खदखदीला एनकॅश करण्याची कुवत फक्त राष्ट्रवादीत असून येणा-या काळात राष्ट्रवादी त्या दिशेनी मोर्चेबांधणी करेल अशी आशा करतो.

बाकी सध्या निवडणूका आहेतच तर काही दिवस रणधुमाळी चालू द्या.

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

आरे वर कारे (पर्यावरण-वाद)

सध्या वृक्षतोडीवरुन जे काही सुरु आहे ते अत्यंत हास्यस्पद तर आहेच पण विरोधक लबाडीचा कळस गाठताना दिसत आहेत. एकदा एनजीओ कंपुनी ओरडा करणे समजू शकतो कारण तो त्यांचा धंदाच आहे परंतू सत्तेचा भागिदार असलेला पेंग्वीनही विरोधी सूर आवळतो तेंव्हा ’देवा.... पांडूरंगा" म्हणावसं वाटतं. यातला देव नि पांडुरंग निव्वड बोलिभाषेतील प्रचलीत वाक्यप्रचार म्हणून घ्यावा. नाहितर तेवढच एक वाक्य धरुन मला झोडपणे सुरु व्हायचे. तर मी हे म्हणत होतो की झाडांवर प्रेम असावं, निसर्गाला जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, तरी यापलिकडे जाऊन एका टप्यावर निसर्गाशी भिडण्याची वेळ येतेच. ते न केल्यास माणूस परत एकदा मागे फेकल्या जाऊ शकतो. सगळ्यात मोठं वास्तव हे आही की ना ही पृथ्वी अमर आहे ना निसर्ग. ते तसही हळूहळू संपणारच आहे. आपलं काम एवढच आहे की आमच्या अतिरेकीपणातून ते संपू नये. एवढच. निसर्गावर प्रेम करताना माणसांनी निसर्गाला मारणे ही अगदी मुलभूत नि नैसर्गीक गोष्ट आहे. फक्त ते करताना एक ताळमेळ बाळगायचा असतो.
मी काही पर्यावरणवादी नाही किंवा विरोधकही नाही. परंतू कायद्याचं शिक्षण घेताना Environmental Law नावाचा कायदा शिकलो. हा कायदा म्हणतो की निसर्गाला जपलं पाहिजे परंतू विकास साधायचा असले तर निसर्गाला एका सिमेरेषे पर्यंत हानी पोहचवूनच तो साधता येतो. त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे माझ्यासाठी निसर्गाची कत्तल करताना पुढच्या पिढीच्या वाट्याचं मी आधीच हिरावून घेत नाही ना... याचं भान ठेवायचं आहे. मग एकाच वेळी निसर्ग नष्ट करुन प्रगती साधणे व पुढच्या पिढीच्या हिस्याचं न हिरावणे हे कसं शक्य आहे? त्यावरही मग उपाय सांगितलेला आहे. की निसर्गाला हानी पोहचवून प्रगती साधताना जेवढी हानी झाली तेवढ्याचा compensatory programme आखून तो पुर्ण करायचा असतो. म्हणजे रस्ता हवा म्हणून जर तुम्ही ५००० झाडं तोडलीत तर दुसरीकडे कुठेतरी ५००० झाडं लावायची असतात. आणि हे काम नियोजन नि दूदर्शीपणातून केल्यास निसर्गाचं अस्तीत्व अधीक प्रभावी नि उपयोगाचं असेल.
Sustainable Development वरील कायदयात सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा कन्सेप्ट/ प्रिन्सीपल एक अत्यंत महत्वाचा प्रनिसीपल म्हणून येतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर माणूस नुसताच निसर्गावर प्रेम करुन जगु नाही शकत तर जगताना त्याला निसर्गावर घाव घालूनच जगावं लागतं. परंतू हा घाव घालताना एक ताळमेळ ठेवायचा असतो. हा ताळमेळ कधी, कसा, कुठे व किती? याचं युनिव्हर्सल मोजमापतंत्र नसून ते परिस्थीतीनुरुप ठरत असतं. म्हणजे हा कायदा हे सांगतो की विकासासाठी तुम्ही निसर्गाला नक्की हानी पोहचवा परंतू ते करतांना जरा ताळमेळ ठेवा. कारण वरील कायद्यातील निसर्ग म्हणजे फक्त झाडं व पाणी नसून अगदी पशू, पक्षी, नद्या, नाले, ते दलदल इत्यादी सगळ्य़ांचा समावेश होते. यातलं एखादं घटक विकासाच्या कामी नष्ट करताना प्रत्येकवेळी ते कॉम्पेनसेटरी प्रोग्रामद्वार भरपाई केल्या जाईलच असं नाही. काही गोष्टी नष्ट झाल्या की त्या संपल्याच. मग अशा वेळी विवेकाने वागत शक्य तो निसर्गाला कमीत कमी हानी पोहचेल अशा पद्धतीने विकास करावयाचा संकेत या कायद्यात दिलेला आहे. त्यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात.
आरेतली झाडं तोडून तिथे मेट्रोचं कारशेड उभारताना विरोधक व मेणबत्यावाल्यांनी जो काही दंगा घातला ते अनाठायी आहे. एवढच नाही तर यांनी थेट न्यायालय गाठलं. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या वरील प्रिन्सीपलनुसार न्यायालयानी शासनाच्या बाजुनी निर्णय दिला. आता खरंतर इथे हुल्लडबाजी थांबालया हवी होती. परंतू ते होताना दिसत नाही. इथली झाडं तोडताना compensatory programme म्हणून दुसरीकडे जी झाडं लावली जात आहेत ती बाजू न्यायालय लक्षात घेतं पण मेणबत्यावाल्यांना मात्र कळत नाही. किंबहूना ती समजावूनच घ्यायची नाही. याला म्हणतात लबाडी. ती करायचीच असं ठरलं असेल तर त्यावर उपाय नसतो.
मेणबत्तीवाल्यांचं ठीक आहे, पण चिऊसेनेचा पेंग्वीनही आरे वर कारे करतो हे पाहून खरच कीव येऊ लागली. बाकी चालू द्या.