रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

आरे वर कारे (पर्यावरण-वाद)

सध्या वृक्षतोडीवरुन जे काही सुरु आहे ते अत्यंत हास्यस्पद तर आहेच पण विरोधक लबाडीचा कळस गाठताना दिसत आहेत. एकदा एनजीओ कंपुनी ओरडा करणे समजू शकतो कारण तो त्यांचा धंदाच आहे परंतू सत्तेचा भागिदार असलेला पेंग्वीनही विरोधी सूर आवळतो तेंव्हा ’देवा.... पांडूरंगा" म्हणावसं वाटतं. यातला देव नि पांडुरंग निव्वड बोलिभाषेतील प्रचलीत वाक्यप्रचार म्हणून घ्यावा. नाहितर तेवढच एक वाक्य धरुन मला झोडपणे सुरु व्हायचे. तर मी हे म्हणत होतो की झाडांवर प्रेम असावं, निसर्गाला जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, तरी यापलिकडे जाऊन एका टप्यावर निसर्गाशी भिडण्याची वेळ येतेच. ते न केल्यास माणूस परत एकदा मागे फेकल्या जाऊ शकतो. सगळ्यात मोठं वास्तव हे आही की ना ही पृथ्वी अमर आहे ना निसर्ग. ते तसही हळूहळू संपणारच आहे. आपलं काम एवढच आहे की आमच्या अतिरेकीपणातून ते संपू नये. एवढच. निसर्गावर प्रेम करताना माणसांनी निसर्गाला मारणे ही अगदी मुलभूत नि नैसर्गीक गोष्ट आहे. फक्त ते करताना एक ताळमेळ बाळगायचा असतो.
मी काही पर्यावरणवादी नाही किंवा विरोधकही नाही. परंतू कायद्याचं शिक्षण घेताना Environmental Law नावाचा कायदा शिकलो. हा कायदा म्हणतो की निसर्गाला जपलं पाहिजे परंतू विकास साधायचा असले तर निसर्गाला एका सिमेरेषे पर्यंत हानी पोहचवूनच तो साधता येतो. त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे माझ्यासाठी निसर्गाची कत्तल करताना पुढच्या पिढीच्या वाट्याचं मी आधीच हिरावून घेत नाही ना... याचं भान ठेवायचं आहे. मग एकाच वेळी निसर्ग नष्ट करुन प्रगती साधणे व पुढच्या पिढीच्या हिस्याचं न हिरावणे हे कसं शक्य आहे? त्यावरही मग उपाय सांगितलेला आहे. की निसर्गाला हानी पोहचवून प्रगती साधताना जेवढी हानी झाली तेवढ्याचा compensatory programme आखून तो पुर्ण करायचा असतो. म्हणजे रस्ता हवा म्हणून जर तुम्ही ५००० झाडं तोडलीत तर दुसरीकडे कुठेतरी ५००० झाडं लावायची असतात. आणि हे काम नियोजन नि दूदर्शीपणातून केल्यास निसर्गाचं अस्तीत्व अधीक प्रभावी नि उपयोगाचं असेल.
Sustainable Development वरील कायदयात सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा कन्सेप्ट/ प्रिन्सीपल एक अत्यंत महत्वाचा प्रनिसीपल म्हणून येतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर माणूस नुसताच निसर्गावर प्रेम करुन जगु नाही शकत तर जगताना त्याला निसर्गावर घाव घालूनच जगावं लागतं. परंतू हा घाव घालताना एक ताळमेळ ठेवायचा असतो. हा ताळमेळ कधी, कसा, कुठे व किती? याचं युनिव्हर्सल मोजमापतंत्र नसून ते परिस्थीतीनुरुप ठरत असतं. म्हणजे हा कायदा हे सांगतो की विकासासाठी तुम्ही निसर्गाला नक्की हानी पोहचवा परंतू ते करतांना जरा ताळमेळ ठेवा. कारण वरील कायद्यातील निसर्ग म्हणजे फक्त झाडं व पाणी नसून अगदी पशू, पक्षी, नद्या, नाले, ते दलदल इत्यादी सगळ्य़ांचा समावेश होते. यातलं एखादं घटक विकासाच्या कामी नष्ट करताना प्रत्येकवेळी ते कॉम्पेनसेटरी प्रोग्रामद्वार भरपाई केल्या जाईलच असं नाही. काही गोष्टी नष्ट झाल्या की त्या संपल्याच. मग अशा वेळी विवेकाने वागत शक्य तो निसर्गाला कमीत कमी हानी पोहचेल अशा पद्धतीने विकास करावयाचा संकेत या कायद्यात दिलेला आहे. त्यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात.
आरेतली झाडं तोडून तिथे मेट्रोचं कारशेड उभारताना विरोधक व मेणबत्यावाल्यांनी जो काही दंगा घातला ते अनाठायी आहे. एवढच नाही तर यांनी थेट न्यायालय गाठलं. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या वरील प्रिन्सीपलनुसार न्यायालयानी शासनाच्या बाजुनी निर्णय दिला. आता खरंतर इथे हुल्लडबाजी थांबालया हवी होती. परंतू ते होताना दिसत नाही. इथली झाडं तोडताना compensatory programme म्हणून दुसरीकडे जी झाडं लावली जात आहेत ती बाजू न्यायालय लक्षात घेतं पण मेणबत्यावाल्यांना मात्र कळत नाही. किंबहूना ती समजावूनच घ्यायची नाही. याला म्हणतात लबाडी. ती करायचीच असं ठरलं असेल तर त्यावर उपाय नसतो.
मेणबत्तीवाल्यांचं ठीक आहे, पण चिऊसेनेचा पेंग्वीनही आरे वर कारे करतो हे पाहून खरच कीव येऊ लागली. बाकी चालू द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा