गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

गोपिनाथ मुंडेचा निषेध!

आज गोपिनाथ मुंडे या माणसाचा जन्मदिन व तमाम आंबेडकरी लोकं मुंडेच्या नावानी जी काही स्तुतीसुमनांची ऊधळण चालविली आहेत ते पाहून मनाला वेदना होतात. हा माणूस आंबेडकरी समाजाचा हत्यारा होता, गुन्हेगार होता.

सन 1997, रमाबाई नगर, घाटकोपरचा  हत्याकांड घडला तेंव्हा हाच गोपिनाथ मुंडे महाराष्ट्राचा गृहमंत्री होता. कदमला शिक्षा होईल याची काळजी घेणे गृहमंत्री म्हणून मुंडेचं काम होतं. त्या हत्येचा मुख्य सुत्रधार मनोहर कदम यांनी आंबेडकरी समाजावर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एक खोटी नि बनावटी कहानी रचून गोळीबार करणे जरूरी होते असा युक्तीवाद केला. हा सर्व  डिफेन्स कमकुवत होता. कदमला जेलात पोहचविण्याची जबाबदारी मुंडेची होती. पण मुंडे मात्र कदमच्या बाजुने उभा झाला व एक खुन्याला वाचवलं.

भाजप नि सेनेचा सच्चा सैनिक म्हणून मुंडेनी आंबेडकरी जनतेच्या हत्या-याला मोकाट सोडलं  नि कायद्याने शिक्षा होवू नये म्हणून सबळ पुरावे कोर्टात दाखल होणार नाही याची तजविज लावली. एक अर्थाने गृहमंत्री म्हणून मुंडे पदास अपात्र नि नालायक ठरला.

त्यामुळे गोपिनाथ मुंडे हा आंबेडकरी लोकांच्या हत्येस जबाबदार ठरतो. मी तर आयूष्यभर या माणसाचा निषेधच करेन.... व आजही करतो.

गोपिनाथ मुंडेचा निषेध!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा