सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

हिंदू एकवटतोय.

गृहयुध्द नि यादवीचा इतिहास पाहिल्यास असे दिसते की जेंव्हा केंव्हा तिथला बहुसंख्य समाज एका विशिष्ट शक्तींद्वारे परत परत अपमानीत केल्या गेला नि लाथाडल्या गेला तेंव्हा एका टप्यावर हा बहुसंख्य समाज उद्रेक बणून ऊसळला नि रक्तरंजीत क्राती घडली. स्वातंत्र्या नंतर इथला हिंदूही कायम अपमानीत होत राहिला. पण 2014 मध्ये पहिल्यांदा हे दिसून आलं की तो एकवटतोय नि 2019 मध्ये तो अधिक एकवटलेला दिसला. तो आजून एकवटत गेला तर ऊद्रेक अटळ आहे. ज्या नाराजीतून तो एकवटतो ती नाराज करणारी कृती वेळीच थांबणे अत्यंत गरजेचं आहे. बहुसंख्य समाजाला टोकदार बनवत नेणे कधीच देश हिताचं नसतं. गृहयुध्द का घडतात याचे काही पुरावे खाली सापडतात.
अमेरिका
अमेरिकाला स्वातंत्र्य मिळाले 1776 ला. पण मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जो अंतर्गत एकोपा हवा होता तो निर्माण होईना. Mason-Dixon Line नी अमेरीकेचे दोन भागात विभाजन केले होते. या लाईनच्या वरच्या अमेरिकेत जे कायदे लागू होते त्यातले कायदे खालच्या म्हणजे दक्षिणी अमेरीकेत लागू नव्हते. Sep 1850 मध्ये Fugitive Slave Act अमेरिकन संसदेनी पास केला व तिथून समाजात भडका उडाला. हा हा म्हणता अमेरीका  उत्तर नि दक्षीण अशा दोन गटात विभागली गेली व गृहयुध्द पेटले. लाखोची आहुती पडल्यावर अमेरिकनांना अक्कल आली. त्या नंतर कुठे अमेरिकन समाजाला एक राजकीय नि सामाजिक शिस्त लागली.
फ्रान्स
फ्रान्समध्ये 1789 ला प्रजा व राजा यांच्यातिल विसंवादाचा भडका उडाला नि गृहयुध्द पेटले. त्यांची मागणी खूपच सोपी होेती ती म्हणजे  स्वातंत्र्य, समता नि बंधुता हवी, पण ती नाकारली गेली. कारण एकच, एका विशिष्ट गटाचे लाड पुरवायचे होते. ते पुरविण्यासाठी बहुसंख्याला लाथाडलं गेलं.  मग ते मिळविण्यासाठी हा बहुसंख्य जेंव्हा रस्त्यावर उतरला तेंव्हा फ्रान्स पेटलं नि पुढली दशकभर धगधगत राहिलं. या चळवळीने जो रक्तपात केला त्यातून नवी व्यवस्था निर्माण झाली पण लगेच नेपोलियन बोनापार्टनी स्वत:चं राज्यभिषेक करवून घेत सत्ता खिशात घातली. नंतर त्याच नेपोलियनला कैद करून मरेस्तोवर अदन्यात बेटावर नजरकैदेत ठेवलं गेलं. आजचा शिस्तबध्द नि प्रगत फ्रान्स गृहयुध्दाच्या आगीतून तावून सुलाखून निघाला आहे. अन ते घडवलम तिथल्या नाराज नि चिडलेल्या बहुसंख्य समाजानी.
जर्मनी, रशिया सारखी राष्ट्रे यादवी नि सामाजिक रक्तरंजित क्रांतीतून गेलेली आहेत. मानवी रक्ताची किंमत मोजून आजची उन्नत सामाजिक स्थिती गाठता आली.
याच्या अगदी उलट भारताची एक देश म्हणून बांधणी होताना एका बहुसंख्य गटाचं नेतृत्व गांधी करत होते तर वंचितांचं नेतृत्व बाबासाहेब करत होते. दोन्ही नेते सत्याग्रहावर प्रगाढ श्रध्दा असलेली. सभोवतालच्या देशातील सामाजिक पुनर्बांधनी रक्तपातातून होत असतांना या दोघांनी मात्र अहिंसेच्या मार्गातून या देशात एकाच वेळी सामाजिक नि राजकीय क्रांती घडवून आणली. इतर सर्वाना रक्तपातातून जे मिळवावं लादलं ते भारतीयांना संवादातून नि सत्याग्रहातून मिळालं. पण पुढीस 70 वर्षात ही मिळकत राजकारण्यांनी व इथल्या काही कंपूबाज लोकांनी Disputed करून टाकली आहे.
एका विशिष्ट समाजाचे लाड करताना इथला बहुसंख्य समाज कायम फाट्यावर मारला गेला. यातून जी खदखद निर्माण होत गेली ती पुढे 2014 मध्ये मतपेटीतून व्यक्त झाली. 2019 निकालांनी शिक्का मोर्तब केलं की एका विशिष्ट सामाजिक गटाचे केले जाणारे लाड बहुस्ख्यांची ही नवी पिढी खपवून घेणार नाही. समावेशक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आल्याचा हा संकेत होता. त्या अनुषंगाने कायदे बनविणे सुरू झाले. पण कॉंग्रेस व कम्युनिस्टांना अजूनही जनभावनांचा रोख कोणत्या दिशेनी आहे हे कळले नाही. ही लोकं येणा-या प्रत्येक त्या कायद्याला विरोध करू लागली जो कायदा इथे सामाजिक एकोपा निर्माण करणार आहे. आर्टिकल 370,35अ, असो, तीन तलाक असो किंवा CAB असो. हे सर्व कायदे भारतीय समाजाला कायद्याच्या मोजपट्टीवर समान महत्व देण्याच्या हिशेबानी आणले गेलेत. कायदा कोणाचेच लाड करणार नाही असा त्याचा साधा अर्थ आहे.
एवढच नाही तर ही समानता तोवर अपुर्ण राहील जोवर आजून दोन कायदे येणार नाही. 1) Population Regulation Bill व 2) Uniform Civil Code. जेव्हा हे दोन बिल येतील व कायद्यात रूपांतर होतील, तेंव्हा ख-या अर्थाने इथे सर्व समाज समान पातळीवर येईल नि काही जणांचे नको ते लाड थांबतील. इथला बहुसंख्य म्हणजेच हिंदू जो आजवर इतरांचे लाड होताना पाहून गप्प बसायचा तो आता एवटतोय हे मागच्या दोन निवडणुकांतून सिध्द झालय. तो जर हुल्लडबाजीवर उतरला तर मोठा हाहाकार माजेल. बहुसंख्य समाजाचा संयम तुटण्या आधी लाडवलेल्या लोकांनी हुल्लडबाजी थांबवावी. संसदेनी पास केलेले कायदे मान्य करावे. हिंदूला असच डिवचत राहिल्यास, बाबासाहेब व गांधीनी टाळलेलं गृहयुध्द दूर  नाही. कारण हा एकवटणारा हिंदू कट्टर हिंदू नाही तर आपल्याला कोणी मोजतच नाही या भावनेतून दुखावलेला एक समावेशक नि पुरोगामी हिंदू आहे. अन  पुरोगामी हिंदू जर एकवटून रस्त्यावर उतरला तर कोणाची मजाल नाही कि त्याला रोखू शकेल.

२ टिप्पण्या:

  1. मला आश्चर्य होत आहे आजकलच्या जमान्यात कोणी इतके निष्पक्ष कसे लिहू शकते. रामटेके साहेब तुम्ही योग्य त्या मुद्द्यावर हिंदूंना झोडायचे तिथे झोड़ता आणि जिथे त्यांच्यावर अन्याय होतो तिथे सत्याची बाजू घेता कोणताही पूर्वग्रह न ठेवता.आपल्यासारख्या निष्पक्ष लोकांची या विकाउ मीडिया च्या जमान्यात खुप गरज आहे. नाहीतर हे असले विकाउ पेट्रोडॉलर वर जगणारे स्वघोषित बुद्धिजीवी पत्रकार नको त्या मुद्द्यावर समाजाला खेळवत अराजक माजवत राहणार आणि भारताच्या प्रगती मध्ये गतिरोधक आणत राहणार

    उत्तर द्याहटवा