गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

सौ. अमृता फडणविस


Image result for amruta fadnavisसन 1960 मध्ये महाराष्ट्र निर्माण झाला. तेंव्हा पासूनच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची यादी बघा. चव्हाण, नाईक, पाटिल, पवार, अंतुले, राणे, देशमुख, शिंदे, चव्हाण ही नावं. मुळात यांच्या बायका शिकलेल्या होत्या का? जर होत्या तर त्यांच्यात स्वतंत्र विचार नि कुवत होती का? कुवत असेल तर ती वापरायला या घराण्यांमध्ये स्वातंत्र्य होतं का? मागचा इतिहास चाळून पाहिल्यास ती शक्यता दिसत नाही. मागील तमाम मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवत्या रांधा, वाढा आणि उष्ट काढा या आपल्या संस्कृतीचा पोलादी कडा तोडण्यास असमर्थ ठरल्याचे दिसते. कुवत असतांनाही जर त्या पुढे येऊ शकल्या नसतील तर यास त्यांचे नवरे व समाज जबाबदार अाहे. गंमत म्हणजे यांच्या बायका वर्षातून एकदा पंढरीच्या विठोबाच्या पुजेत न चुकता दिसायच्या. नव-याच्या बाजुला उभं राहणे एवढीच यांची कर्तबगारी. या व्यतिरिक्त कला, साहित्य, संस्कृती, तत्वदन्यान, विदन्यान, व्यापार यातील कोणत्याच क्षेत्रात ना या बायकांची मुशाफिरी होती न त्यातलं योगदान. पडद्या मागील गृहिनी म्हणून त्यांची स्तुती करायची तर तोंड फाटेस्तोवर करा, मला काय त्याचं. पण एक विसरता कामा नये, या तमाम बायका एकतर कर्तबगारीशुन्य काकुबाई होत्या किवा संस्कृतीचा पोलादी कडा न तोडू शकल्यामुळे कुवत सिध्द न करू शकलेल्या शोषित होत्या.

पन्नास साठ वर्षाची ही प्रथा तोडून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी पहिली मुख्यमंत्र्यांची सौ. ही अमृता फडणवीस आहे. त्यामुळे अमृताचं अभिनंदन. अमृता ही उच्चशिक्षीत बँक अधिकारी आहे. एवढच नाही तर शास्त्रीय गायन शिकलेली एक गायिकाही आहे. त्याच बरोबर आधुनिक विचाराची नि स्वत:च्या स्वातंत्र्याची जाण असलेली स्त्री आहे. पारंपारिक वेशभुषेसकट आधुनिक परिधानाचा अचूक सेन्स असलेली मॉडर्न स्त्री आहे. एवढच नाही, तर विविध फँशन करण्यासाठी हवी असलेली अंगकाठी, ते जपण्यासाठी लागणारं व्यायाम व आहार सजगता याचा तोल सांभाळलेला आहे. त्यामुळे त्या बिनधास्त फँशन करतात. आधिच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकाही संतुलीत आहार नि जिम वगैरे लावून शरिराचा शेफ सांभाळु शकत होत्या. अन मग हवं तेंव्हा हवं ते परिधान करू शकत होत्या. पण त्यांनी हे केलेलं नाही किंवा जमलं नसावं, यात अमृताचा काय दोष?
मुख्यमंत्र्याची बायको या पलिकडे जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याची कुवत नि कलागुण संपन्नता अमृतामध्ये होती व त्याबळावर तिनी ती निर्माण केली. फँशन आणि तिचे स्वतंत्र विचार हे दोन्ही लोकांना दिसतात नि खटकतात... खटकू द्या. काकूबाई टाईपची तसेच विचाराने जवळपास मुकी व बहिरी सौ. बघण्याची सवय असलेला महाराष्ट्र पहिल्यांदाच बोलणारी, फँशन करणारी व स्वत:चं विचार मांडणारी मुख्यमंत्र्याची सौ. बघून चिखलफेक करत असेल तर ही त्या समाजाची विकृती आहे. सौ.ची नाही.
मत नोंदविणारी सौ. चालत नाही अशा खुज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणताना लाज वाटते.
सौ. अमृता फडणविसांना माझ्या शुभेच्छा.

३ टिप्पण्या:

 1. हाच आपला आज पर्यंतचा पुरोगामी महाराष्ट्र होता अजून खुप पुरोगामीपणा दिसायचा बाकी आहे रामटेके साहेब
  70 वर्षे ज्या प्रदेशात जी जात बहुसंख्य त्या जातीच्या उमेदवाराला तिकीट,त्याचाच मुख्यमंत्री हेच प्रयत्न झाले आजपर्यंत जातीअंता साठी पुरोगामी पक्षां कडून

  उत्तर द्याहटवा
 2. चातका सारखी तुमच्या लेखाची वाट पाहत असतो. आजकलच्या कुल ड्यूड स्यूडो सेकुलर स्यूडो पुरोगामी लोकांच्या डोळ्यात झंझणित अंजन घालणारे लेख लिहित रहा साहेब.

  उत्तर द्याहटवा
 3. टॅगलाइन ज़बरदस्त, या आंबेडकरी जनतेला एव्हढी साधी गोष्ट कळत की या अरबी बुरखाचाप वहाबी हिंसक संस्कृतीचे गुलाम असलेल्यांच्या मनात शरिआ सर्वोच्च आहे. भारतात अजुनतरि अन्य धर्मीयांची बहुसंख्या आहे म्हणून या संविधान टिकून आहे आणि नाईलाजाने या मदरसाछाप लोकांना ते स्वीकार करवा लागत आहे. जरा या वाहाब्यांची संख्या 40 टक्क्यांच्या वर जाऊद्या मग बघा किती दिवस संविधान टिकते.

  उत्तर द्याहटवा