गुरुवार, २ जानेवारी, २०२०

आयाळ नसलेला सिंह

लहाणपनी ऐकलेल्या अनेक कथा कहाण्यांपैकी आताच्या राजकीय संदर्भाला धरून आठविणारी कथा म्हणजे आयाळ नसलेला सिंह. कथा काल्पनिक व मनोरंजनासाठीची असली तरी त्यात दडलेला सार आजच्या घडीला चपखल बसतो. ही कथा भाऊ तोरसेकरांनी पण मागे कुठल्यातरी संदर्भानी सांगितली होती.

तर गोष्ट अशी आहे की कोण्या एका जंगलात एक सिंह राहात होता. तो त्या जंगलाचा राजा होता. सगळे प्राणी आपल्या सिंह राजाला मान सन्मान देत असत. मग हा सिंह मोठ्या थाटात आपलं आयाळ झटकत रानात फेर फटका मारायचा. असाच फेरफटका मारताना एक दिवस त्याला रानातील एका नदित सुदरशी राजकुमारी आंघोळ करताना दिसली. मग काय, सिंह त्या राजकुमारिच्या प्रेमात पडतो. तिचं नाव, गाव नि पता शोधून काढतो व लग्नाची मागणी घालायला थेट राज दरबारात धडकतो.
अचानक सिंहाला दरबारात पाहून सगळेच टरकतात. पण लगेच त्यांना कळतं की हा तर प्रेमात पडलेला सिंह आहे. मग त्याची मागणी ऐकूण झाल्यावर त्याला शब्द दिला जातो की हो आम्ही तुला मुलगी द्यायला तयार आहोत पण जरा वेळ द्या. सिंह दोन दिवसाची मुदत देवून निघून जातो. सिंहाला पाहून अख्खं गाव घरात लपून बसतो. रस्त्यानी जाण्याची कुणाची मजाल नसते.

बरोबर दोन दिवसांनी सिंह परत दरबारात धडकतो. तोवर चलाख राजानी गेम आखला होता. सिंहाला म्हणतो की माझी मुलगी लग्नाला तयार आहे, पण ते तुझं आयाळ बघून घाबरलीये. जर ते काढाल तर बरं होईल. मग काय, हा तर प्रेमात पडलेला सिंह होता. दुस-या दिवशी आयाळ काढून हजर झाला. मग राजा परत म्हणतो की मुलगी तयार आहे पण तुझ्या दातांना घाबरतेय. सिंह दात काढून येतो. मग सांगितल्या जातं की मुलगी तुझ्या नखांना घाबरतेय. तिस-या दिवशी सिंह नखं काढून येतो.

आता जो दरबारात ऊभा होता तो आकंठ प्रेमात बुडालेला, स्वत:चे नख काढून फेकलेला, दात काढून टाकलेला नि सिंहाची शान असलेलं आयाळ ऊतरवून बसलेला सिंह होता. या अवतारातला सिंह जेंव्हा म्हणतो की मला तुमची मुलगी द्या, तेंव्हा राजा थेट नाकारतो. मग सिंह चवताळतो व सिंह गर्जना करतो की ब-या बोलाने मुलगी दिली नाही तर मी हमला करेन. पण सिंह विसरला होता की तो आता निव्वड नावाचा सिंह होता. त्याची आयूधं स्वत:च उतरवूव टाकली होती. राजाच्या सैनिकांनी सिंहाला कुत्र्यासारखं बदडून पिटाळल. रस्त्यांनी जाताना त्याच गल्ल्यांमध्ये लहानशी पोरंटोरही सिंहाची टिंगल टवाळी करू लागली. तर ही झाली कथा.

महाराष्ट्राच्या राजकारणात ऊध्दव नावाचा सिंह असाच खुर्चीच्या प्रेमात पडला. ती देण्याचा वादा पवार नावाच्या राजानी केला. मग यांनी आपली नखं, दात व आयाळ उतरवून ठेवलं. दिसायला हा खुर्चीवर जरूर दिसतोय पण याती हालत मात्र सेम टू सेम त्या रानातल्या सिंहासारखी होताना दिसतय.
बघू, शेवट कसा होतो ते.